Skip to main content

बहर

लेखक सुचेता यांनी मंगळवार, 20/01/2009 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच तुझ्या आठवणींचा बहर मजला पुरता वेढुन गेला भरदार फुललेला गुलमोहोर पावसान पुरा झोडुन गेला !! कळेल तुला त्या तेथे दुरवर आठवांचा पायरव वाजुन गेला आवरताना चांदणे हे शुभ्रतर रात माझी जागवुन गेला !! निनाद्ताना पावसाची सर मजला पुरता झींगुन गेला कधि ना तुला कळ्णार गंध तुझा हा वेडावुन गेला!! सुचेता सुळे
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1811
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

कधि ना तुला कळ्णार गंध तुझा हा वेडावुन गेला!! वा! छान आहे कविता..

प्रतिक्रिया देणार्या सर्वांची मनापासुन आभारी आहे.. आपल्या प्रतीसादाने हुरुप आला, वेळेचा प्रश्न असल्याने सध्या तरि मोठे काहि लिहीता येत नाहि पण पुढे नक्की लिहिन सुचेता.