आधी सोसायचे ,मग हासायचे
आधी रुजायचे, मग फुलायचे
स्वप्न पेरायचे, अश्रू वेचायचे
अश्रू पाजायचे, स्वप्न पोसायचे
खेळ मांडायचे, जरी मोडायचे
मांडणे-मोडणे, एक मानायचे
तारे माळायचे, नभ नेसायचे
आपलेच रूप, मग बघायचे
वाट चालायचे, तुला शोधायचे
स्वत्तःला हळूच , मागे सोडायचे
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1021
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
तारे माळायचे, नभ नेसायचे
धन्यवाद!
In reply to तारे माळायचे, नभ नेसायचे by कानडाऊ योगेशु