Skip to main content

सैराट आन सैराटच

लेखक अभ्या.. यांनी गुरुवार, 05/05/2016 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीचा १२ चा शो आणि भागवतटॉकीज ची फरशीबी दिसणार नाही एवढी गर्दी, पार्कींगचे पाचही थेटरचे लॉट फुल्ल भरलेले. हाउसफुल्लच्या काउंटरवरची हुज्जत. सगळी गर्दी १८ ते ३० मधलीच. जणगणमनला उभारलेल्या पब्लिकने काळ्या स्क्रीनवर रंगीबेरंगी सैराट अक्षरांनाच दिलेल्या शिट्ट्या. त्या काळ्या स्क्रीनवरच्या पाट्यातल्या नागराज पोपटराव मंजुळे नावाला झालेला डब्बल जल्लोष. लका आपला माणूस. पाट्या पडतानाच मागे टेनिसबॉलची क्रिकेटमॅचची गावठी कॉमेन्ट्री सुरु झालेली. कॉमेन्ट्रीला सोता नागराज बसलेला गच्चीवरच्या पॅवेलिनला. एकच फाइट वातावरण टाइटचे फ्लेक्स, तीनचाकी सायकलच्या बक्षीसाची अनाउंसमेन्ट, लोकल बिली बाउंडिंगला मॅचमधूनच घरी हाकलत नेणारी आजी, प्रिन्स लिहिलेली नंबरप्लेट, पितळी पिस्तुलाची चावी आणी पुढं तलवारीची नंबरप्लेट असलेली बुलेट वाजवित युवानेते आगमन केले आणि आमच्या हितलीच स्टोरी असल्याची खात्री पटली. म्याचमध्ये गरज असताना आपला हिरो पाणी हापसत हिरवीनीसमोर नजर लावून बसलेला. दिसायला देखणंय लका. पिक्चरपुरती बॉडी कमी केलीय म्हणा पण तब्येत केली तर हाय मटेरिअल हिरोचे. शेवटच्या ओव्हरीत मॅच जिकून देतय आणि बक्षीस घेतय गावचे भाग्यविधाते आणि सर्वेसर्वा पाटलांकडून. हापसताना जिच्यावर नजर लावली ती हेचीच पोरगी. अजून तर झलक नाही आली. पण स्कॉर्पिओतून उतरताना दिसलीच. मजबूत लका काम पण डोळे काय म्हणतोस. अगागागागा. पाटलाची लैच लाडकी लेक आर्ची बुलेट घेऊन कॉलेजात येतीय. हिरीत पवायलेल्या पोरांना नीट बाहेर हाकलून स्वतः पोरीना घेऊन उतरायचा थाट अंगात. तिच्याबी मनात हे कोळ्याचं परश्या भरतंय. परश्याच्या डोक्यात तर आर्ची सोडून काहीच नाही, नुसतं नाव ऐकलं तिचं तरी गडी सैराट सुटतोया. परश्याचे जिगर दोस्त म्हनावं तर दोनच. लंगडा प्रदीप आन गॅरेजवाला सल्ल्या. त्येंनी भरीस पाडून चिट्ठ्या बिठ्या प्रकरण होतंय. आता दोन्ही साइडनी ओके असतयच तवा लीड आटोम्याटीक आर्चीकडंच. शेतातल्या, फोनवरच्या गप्पातून जातीय फुलत ही स्टोरी. आर्चीच्या भावाच्या म्हणजे प्रिन्स च्या बड्डे पार्टीला हे तिघं जातेत झिंगाट नाचायला. काय राव थेटरातला जल्लोष. पोलीसानी दांडके मारुन पब्लिक पडद्यासमोरुन हाकललं तवा कुठं थांबलेला पिक्चर सुरु झाला. आर्चीच्या घरामागं एका बेसावध क्षणी दोघांना आर्चीचा बाप बघतो. कुत्र्यासारखा मार खाउन तिघे परत येतेत. प्रशांतरावांची उचलाबांगडी नीट करमाळ्याला. हिकडं रितीरिवाजापरमाणं आर्चीला बघायला पाव्हणे आलेलेच. परिस्थितीचा अंदाज घेऊन आर्ची करमाळ्याला परश्याला भेटायला येती. तिथे काय सपोर्ट मिळत नसल्याने पळ काढतेत. पाटलाची माणसं जीव खाउन मागं असतेतच. परंड्याला पोलिसांकच्या तावडीत सापडून परत आणले जातेत. पोलीस स्टेशनात परश्या आणि त्याचा मित्रांवर रेप आणि किडनॅपचा चार्ज बसतोय हे कळाताच आर्चीला बापाचा मनसुबा कळतो. स्टेटमेंट फाडून बाहेर पडताच इकडे पाटलाकडून परश्याला जबरी मारहाण होत असती. जिगरीची आर्ची तेथून परश्याला घेऊन पळ काढती. खिशात पैसे नाही. कोन ओळखीचे नाही आशा अवस्थेत हैदराबादला पोचलेल्या दोघांवर यायची ती संकटे येतेतच. एकमेकाच्या साथीने निस्तरत एका भल्या बाईची पडती गाठ. फाटका का हुईना पण आसरा मिळतो. आक्खं आयुष्य थाटात काढलेल्या आर्चीला हे असलं गरीबीचं जगणं पेलवणं तर अवघड होतय पण ती मागं हटत नाही. कष्टात वाढलेल्या परश्याला ही असली जिंदगी सवयीची असली तरी आर्चीसारखा निखारा पेलवत नाही. बिनलग्नाचा सुरु झालेला संसार भांड्याला भांडे वाजवतोच. बारक्या सारक्यावरुन वाढलेल्या भांडणात आर्ची बापाच्या घराकडे परत यायला निघती. प्रवासात जाणवती ती संसारातल्या साथीची आन विश्वासाची किंमत. हिकडे गळ्याला फास लावून घ्यायला निघालेला परश्या थांबतो आन आर्ची परत येती. एकेक दिवस सरतो आन दोघांचे दिवसबी पालटतेत. डोश्याच्या गाडीपासून चांगली नोकरी मिळवणार्‍या परश्यासोबत आर्ची पण नोकरीत प्रमोशन मिळवीत जाते. कायदेशीर लग्न बिग्न केलेल्या ह्या दोघांत पिल्लू आकाशचे बी आगमन होते. हैद्राबादेत थाटात आक्टीव्हावर नवर्‍याला आणि मुलाला घेउन फिरणारी आर्ची सगळ्यात जास्त शिट्ट्या खाउन जातीया राव. . आता म्हणताल आक्खी स्टोरीच टाकली का देवा, तर पिक्चरमध्ये भावला हाच प्रामाणिकपणा. कुठंबी आडमाप नाही की काय हातचं राखलेलं नाही. स्टोरी टेलींग म्हणत्यात नाही का या कलेला. अगदी १०० मार्काने बोर्ड फाडून पास ओ आमचा नागराज. अशी रियल्ल स्टोरी की भिडलीच पाह्यजे. आता कायजणांना नाय झेपली. नसंना का. अस्मितेचे, प्रतिष्ठेचे आन संपत्तीचे गॉगल लावून बसल्यावर काय दिसतं त्येच दिसणार त्येना. जिंदगीच्या उन्हातान्हात फिरणार्‍यांना आपली सावळी का हुईना पण जीव लावणारी आर्ची आठवती. आता नसना का ती शिरेलीतली गोग्गोड पण जिगर बघा की भौ. भाषा म्हणताल लै गावठी पण आसच बोलतो ओ आम्ही. आसच बोलतो आन राहतो पण. झिंगाटवर थिरकले पाय तर बिघडलं काय? पिच्चर संपताना थेटरमध्ये एक तर पावलाचा आवाज येतो का? मग... आन स्टोरी सांगताना जगावी तरी कीती ह्या माणसांनी? ती आर्ची, लका वर्गात परश्याला बघाया पळत येता येता थांबती तव्हा बघायचा चेहरा. काय असती हूरहूर, काय ती नजर. लाख रिटेक मारावे बॉलीवूडने पन अशी नजर आणावी. च्यालेंज है भौ. सजणाची स्वारी आली म्हणताना आलेली लाज, परत फिरती परश्याकडं तवा आलेली समज सगळं कसं आपल्या डोळ्यानं बोलती राव आर्ची. परश्या बी तसलच. कुठंच हिरोगिरी न दाखवता भिडतय मनाला. डोश्याच्या गाडीवर सराइतपणे वर हात टेकून डोसे मारणं असू दे की निर्दयी मार खाउन आलेला बावरलेपणा. सगळा कसा अस्सल. परशाच्या जानी दोस्त प्रदीप. लंगडं हाय पण दिमाग का दिमाग. आर्चीनंतर सगळ्यात जास्तीच्या शिट्ट्या घेतल्या की गड्याने. सल्ल्या बी परफेक्ट. गावागावात सापडतेत असले दिलदार जिगरयार. होतेत...... अगदी असल्या स्टोर्‍या प्रत्येक गावात होतेत. वय असतं ते. मार खाउन कुणी गप्प बसतं नायतर गाव सोडतं, कुणी जीवलगाचा हात धरुन पैलतीरी लागतं. प्रत्येक आर्ची परश्याच्या नशीबात येणारी स्टोरी हाय ओ. याड लागलेल्यांची स्टोरी सांगीतली मन लावून तवा तर कुठं समद्याना याड लागलं. ते म्हणतेत ना. जेवढं पर्सनल होतय तेवढं युनिव्हर्सल होत जातय. आता ही सैराट स्टोरी कशी होतीया दिसतीच हाय ना.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 59761
प्रतिक्रिया 219

प्रतिक्रिया

In reply to by विवेक ठाकूर

शेवट आहे तसा ज्यांना मान्य आहे त्यांना चित्रपट आवडलायं
म्हणजे नक्की काय म्हणायचय.. त्या परिस्थितीत तसच व्हायला पाहीजे असं वाटतंय त्याना चित्रपट आवडलाय.. की त्या परिस्थितीत तसंच होतं असं वाटणार्‍यांना चित्रपट आवडलाय.

In reply to by बाळ सप्रे

मला वाटतं प्रश्न तर आहेतच पण त्यावर उत्तर शोधणाऱ्या अभिव्यक्ती एक दिशा देतात. ज्यांना उत्तरापेक्षा वास्तविकताच ठळकपणे मांडली जाणं सार्थ वाटतं त्यांना सिनेमा आवडेल. तसा तो सुरेख आहेच पण शेवटी दृष्टीकोनच आवड-निवड ठरवतो ही वास्तविकता आहे .

In reply to by विवेक ठाकूर

चित्रपटांतून समस्या मांडल्या जातात पण त्यावर उपाय नाहीत हे आपल्याला खटकतंय.. योग्यच आहे.. एवढं सोपं उत्तर असतं तर समाज आधीच सुधारला नसता?? गुडीगुडी शेवट हेदेखिल समस्येचे समाधान नसते.. आपल्या मनाचे समाधान असते.. शेवटी समाज सुधारणा ही एक मोठी प्रक्रीया आहे.. त्याचे परीणाम दिसायला दशकं/ शतकं जावी लागतात. पण अशा समस्या मांडणीतून विचार करायला प्रेरीत करणे हेदेखिल मला महत्वाचे वाटते. जेवढं कटू वास्तव भिडेल तेवढं जास्त विचार करायला प्रेरीत करेल अशीही एक विचारधारा असू शकते.. जर यात तसा शेवट नसता तर कुठल्या समस्येवर विचार झाला असता?? अनेक प्रेमकथांसारखी ही एक.. झिंगाटसारखी गाणी पण खूप येत असतात.

In reply to by बाळ सप्रे

आनंददायी, तर्कपूर्ण आणि विचार करायला लावणारा सुध्दा असू शकतो. सिनेमा इतकं प्रभावी माध्यम आहे की सूडभावना आणि जातीवादापेक्षा प्रेम हा सर्वांना जोडणारा धागा होऊ शकतं अशी सोपी मांडणीही करता येते .

In reply to by शलभ

=)) उचित प्रश्न. असा भयंकर शेवट होऊ नये हे प्रेक्षकांच्या मनात येतंच, तोच तर त्या चित्रपटाचा उद्देश आहे. माझ्या कामवालीने परवा तिच्या कुटूंबियांसोबत सैराट पाहिला, रात्रभर झोपू शकलो नाही अशी तिची प्रतिक्रिया होती. समाजाच्या वेगवेगळ्या घटकांच्या अशा प्रतिक्रिया पुरेशा बोलक्या आहेत. अशांना थोडातरी धक्का देण्यात कलाकृती यशस्वी होत असेल तर हेतू सफल झाला असे वाटते.

In reply to by सुबोध खरे

डॉक्टरसाहेब, स्पा किंवा वल्ली यांना आवडला नाही म्हणून मी कुठेच टिका केली नाही. आधीच्या एका धाग्यावरच ह्याबद्दल बोललो आहे की आवडला, आवडला, नै आवडला नै आवडला, इट्स ओके. मला फक्त कुतूहल होते की चित्रपट न बघता तीव्र विरोधी प्रतिक्रिया का येत असाव्यात ह्याबद्दल. त्यात का. यो. यांनी मार्केटींगने पेड निगेटीव रिस्पॉन्सचा फंडा वापरला आहे असे सूचित केले. दोन तीन गोष्टी मिक्स झाल्याने गैरसमज, गोंधळ होत असेल.

In reply to by तर्राट जोकर

तजो तुमच्याशी सहमत, अशी भरपूर उदाहरण सापडतील, बाकी सोनावणी यांचा ब्लोग जातीच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही

In reply to by तर्राट जोकर

कोणतीही पोरगी बापाचं न ऐकता कुठल्या पोरासंगट पळून जाते तेव्हा बापाचा अपमानच होतो.
हे सरसकटीकरण झाले...सगळ्याच केसेस अश्या नस्तात

In reply to by टवाळ कार्टा

हे माझे मत किंवा दृष्टीकोन नाही. समाजाचे वास्तव आहे. 'पोरी पळून गेल्यावर बापाचे अभिनंदन करणार्‍या' केसेस असतील तर माहित नाही.

In reply to by तर्राट जोकर

मला म्हणायचे होते की सरसकट पळून जाणार्या मुलांची चूक नसते...मुळात पळून जाणे हा टोकाचा निर्णय घेईपर्यंत परिस्थिती ताणली का जाते याचा विचार कोणी करतच नाही का??

In reply to by टवाळ कार्टा

टका, मुद्दा गडबड होतोय का? पळून जाणार्‍या मुलांची चूक असते वा नसते हे माझ्या प्रतिसादात मी कुठेच म्हटले नाही. पण मुलगी पळून गेली की समाज पालकांना अपमानितच करतो व पालकांनाही स्वतः अपमानित झाल्याचे वाटतेच हे वास्तव आहे असे माझे म्हणणे आहे. अनेक प्रकरणांमधे आईबापाला तर थेट मुलगी घरी परतलीच नाही हे कळल्यावर प्रेमप्रकरणाचा उलगडा होतो, मुली-मुलं घरी सांगू शकत नाहीत, आईबाप नाहीच म्हणणार हे त्यांनी गृहीत धरलेले असते.

In reply to by तर्राट जोकर

मार्केटींग करताना मुद्दामुन जात मध्यवर्ती राहील असेच मेसेज वगैरे फॉरवर्ड केले गेले. ह्या अर्थाने जातीयवाद म्हटले मी. बाकीची कथा तर अगदी स्टीरिओटाईप वाटली.

In reply to by विवेक ठाकूर

धन्यवाद विवेकजी. अनुभव माझा. चित्रपट नागराजचा. मला भावला, दुसर्‍याला भावावा ही सक्ती नाहीच. राहता राह्यला विदारक शेवटाचा विषय. आहे ते आहे. चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर आणि पटकथेवर दुसरा शेवट मला पटला नसता कारण मी ह्या दुनियेत जगतोय. भले ती वाईट असेल, जंगलराज असेल पण एक वास्तव कथा आहे.

In reply to by अभ्या..

आपणच सुरूंग लावून उडवावं असं काहीसं वाटलं. पण तुला शेवट आवडला असेल तरी हरकत नाही . इट इज अ डन जॉब नाऊ, त्यावर काय चर्चा करणार ?

In reply to by विवेक ठाकूर

नाही विवेकजी, आवडला हा शब्द नाहीच. कधीच आवडणार नाही असा शेवट. पण कथेत जी पात्रे ज्या पार्श्वभूमीवर उभी आहेत ती त्यांच्या त्यांच्या भुमिकेला प्रामाणिक राह्यलीत. बस्स. . चर्चा हा तर माझा मोठा वीक पॉइन्ट सो.... थॅन्क्स.

ये बात... लय भारी लिवलंय मित्रा..अगदी मनातलं आपन तर या भाषेच्या प्रेमातच पडलो...९०% महाराष्ट्र हीच भाषा बोलतो की....

असो. आतातर मी सैराटच्या विरुद्ध येणार्‍या प्रतिक्रियांचा आढावा घेतोय. एकसोएक भारी प्रतिक्रिया आहेत. सोनवणी आजोबा का पेटलेत ते तर शेवटपर्यंत कळले नाही. मज्जा आहे बुवा. चित्रपट निव्वळ आवडला नाही इतपत ह्या प्रतिक्रिया नाहीत त्यापेक्षा जास्त आहेत हे जाणवतंय. बहुतेक त्या जातीयवादी सूर लावलेल्याही नाहीत. मग काय कारण असावे, चित्रपट न आवडलेल्याच्याही तीव्र प्रतिक्रिया येण्याचे? कारणे शोधुया.

In reply to by स्पा

कोणते इंग्रजी चित्रपट आवडतात ह्याची जाहिरात सैराटच्या धाग्यावर येऊन करनारांकडे आहे ना त्यातूनच थोडासा उचलला आहे. ;-)

In reply to by स्पा

'सैराट' म्हणजे होली काऊ आहे हे तू कसे विसरलास ? चित्रपट आवडलाच पाहिजे नाही तर तू वर्णवर्चस्ववादी किंवा चित्रपटांची जाण वगैरे नसलेला. लगेच तुझी अक्कल वगैरे काढली जाणार.

In reply to by अप्पा जोगळेकर

वर्णवर्चस्ववादी, चित्रपटांची जाण नाही आणि अक्कल नाही. तीनही गोष्टी मी कोणाहीविरुद्ध इथे बोललो नाही अप्पासाहेब. मला कुतूहल आहे हे ह्याचीही अग्निपरिक्षा द्यायला लागेल काय? उदाहरण देतो. गेम्स ऑफ थ्रोनबद्दल कंठाळी प्रचार सुरु आहे. त्याचे चाहते सोशलमिडियावर सैराट सुटले आहेत. मला त्या विषयी स्वारस्यच नाही. किंवा इतके हाइप केले जातेय तर खरंच काय प्रकरण आहे ह्याचाही मागोवा घेतला नाही. माझ्यासाठी गेम्स ऑफ थ्रोन अस्तित्वातच नाही. त्यामुळे ते चांगले वा वाईट आहे, हाईप चुकीची आहे, अजून काही बलस्थान, मर्मस्थानं असल्या फंदात पडलोच नाही. मी फक्त दुर्लक्ष केले आहे. जीओटीबद्दल आयुष्यात पहिल्यांदाच लिहितोय, बहुतेक शेवटचं.

In reply to by तर्राट जोकर

च्यामारी जोकरभाव, तुम्हाला खरेच कर्णपिशाच्च अवगत आहे. हे गेम ओव्ह थ्रोन्स चे फॅड पाह्यले, लोक हिरीरीने चर्चा करतेत, कुठल्या पात्राशी तुमची जवळीक आहे हे शोधून पाहतेत, त्यांचे व्हिडोवर समालोचन करतेत, गेस करतेत. अर्रतिज्यायला. वास्तवापासून दूर जाउन कुठल्यातरी काल्पनिक स्टोरीशी तुम्ही रिलेट होऊ शकता. सैराटने काय घोडे मारले? असाच शेवट हवा न तशीच स्टोरी हवी. भंकस तिज्यायला.

In reply to by अभ्या..

वास्तवापासून दूर जाउन कुठल्यातरी काल्पनिक स्टोरीशी तुम्ही रिलेट होऊ शकता
अगदी हेच म्हणायचं आहे अभ्या दा च्यायला GOT मूडदा बशविला त्याचा घंटा काय कळत नाही. भारताले लोक GOT कशासाठी पाहतात हे जग जाहीरच आहे

In reply to by अभ्या..

हे असल डोक्यात जाणारं पब्लिक आज्काल फार दिसते. ह्यांची खास लक्षणे १.विंग्रजी पिक्च्रर बघणार कसाही असो, कळो न कळो. हिंदी मराठी नो वे. २. फ्रेंड्स, होम्लॅंड टीवीवरच्या आवडत्या मालीका. ३. क्रिकेट बघत नाहीत. युरोपिअन फूट्बाल पाह्त्यात.. बाकी नंतर लिहतो..

In reply to by अभ्या..

सहमत अभ्या. गेमॉफथ्रोन्सचा चाहता असूनही मी हे डेफिनिटलि कबूल करेन. शहरी क्राउडला सैराट किंवा फ्याण्ड्री हे दोन्ही अपील होत नै हे कितीही कटू असले सत्यच आहे. (मी सैराट अन फ्याण्ड्री दोन्ही पाहिलेले नाहीत. जमेल तेव्हा जरूर पाहीन.)

In reply to by बॅटमॅन

करेक्ट.. इथे (पुणॅ-मुंबैत) वाढलेल्यांना हा जवळचा वाटत ब नसेलही... पण लहान गावातुन/शहरातुन इथे आलेली मुले थेटरात गर्द्या करत आहेत. म्हणुन त्या सिनुमाला शहरात इतका रिस्पाँस मिळत होता. फ्यांड्री तर मी मझ्या इन-लॉ समवेत पाहिला. झोप्ले होते दोघेही. अगम्य भाव होते त्यांच्य चेहर्‍यावर.

In reply to by बॅटमॅन

शहरातले लोक असे नव्हे तर ज्यांच आता ग्रामीण भागात काहीच मूळ राहिलेलं नाही त्यांना हा चित्रपट नाही आवडला, दुसरं निरीक्षण म्हणजे कोकणातल्या लोकांचा या प्रकारच्या संस्कृतीशी परिचय नसल्याने त्यांनाही नाही आवडला, सैराट हे कॅप्सूल नसलेलं कडवट औषध आहे

In reply to by अभ्या..

सैराटने काय घोडे मारले?
ती आर्चि आणि परश्या बसलेले घोडे जिवंत आहे की मेले कि पाटलानं मारलं हे आता तपासुन पहायला पाहिजे !! ghoDaa

In reply to by तर्राट जोकर

छे छे. मी इन जनरल म्हटले आहे. तुम्हाला उद्देशून नाही. कदाचित तुम्ही दिलेल्या उपप्रतिसादाला स्पा ने जे उत्तर दिले त्यावर कमेंटल्यामुळे तुम्हाला तसे वाटले असेल. तरी एक डाव माफी करावी. आणि त्या इन जनरल चा माझ्याकडे विदा वगैरे नाही. पण एकंदरच 'बालगंधर्व' चित्रपटाचा होता तसाच कंठाळी प्रचार वाटला. बस इतकेच. बाकी प्रत्येकाची भक्ती निरनिराळी. त्याचा आदर आहेच.

In reply to by अप्पा जोगळेकर

बरे झाले बालगंधर्वचा उल्लेख केला ते. तो प्रचार कंठाळी वाटण्याचं कारण कदाचित नटरंग हा सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर नव्या दिग्दर्शकाचा दुसरा चित्रपट म्हणून हाईप झाली म्हणून असेल. असंच फॅन्ड्रीमुळे सैराटचे झाले असावे.

In reply to by तर्राट जोकर

सैराटची पद्धतशीरपणे प्रसिद्धी चालवली आहे मालक. हा जातीपातीचा मुद्दा देखील त्या प्रसिद्धीचा भाग असावा अशी शंका यायला लागली आहे कारण टाइमपास प्रदर्शित झाला तेव्हा असल्या काही चर्चा झाल्या नव्हत्या. फँड्रीच्या वेळेसही नाही. मग आताच कसा मुहुर्त साधला? असो. चित्रपट प्रसिद्धीचा एक भाग म्हणुन सोडुन द्यावे. अन्यथा चित्रपट प्रदर्शनापुर्वीच त्याची एवढी हवा व्हावी हे न समजण्यासारखे आहे. खानत्रयींपैकी एखाद्याचा बहुचर्चित सिनेमा प्रदर्शित व्हायच्या आधी जशी हवा निर्माण होते त्यापेक्षा जास्त हवा निर्माण केली गेली. तशी तगडी स्टारकास्ट असली असती तर गोष्ट वेगली. तसे नसल्याने चित्रपटाची इतकी जास्त हवा आकलनाच्यापलीकडे आहे. त्यामुळेच मार्केटिंग जबरदस्त केले आहे असे म्हणतो.

In reply to by मृत्युन्जय

झी तर्फे तसे अधिकृत माहिती न आल्या मुळे विशिष्ट जातींचा मुद्दा सोशल मिडियावर कुणी आणला ह्याबद्दल आपण काही सांगू शकत नाही. निगेटीव पब्लिसिटी हा आजकालचा फंडा आहेच. ब्रिगेडी तत्सम लोकांना पैसे देऊन विरोधी प्रतिक्रिया द्यायला लावून चित्रपटाबद्दल चर्चा घडवून आणणे हे जाणून बुजून केल्याचे अंदाज आपण लावू शकतो.

In reply to by तर्राट जोकर

सोनवणी आजोबा का पेटलेत
त्यांचं सोडा हो. त्यांचा लेख मी वाचला. नागराजने कींवा अन्य कोणीही हा सिनेमा जातीपातीच्या विरोधात आहे किंवा नाही असा काहीच प्रचार केला नाही. पण ते लेखात प्रत्येक प्रसंग आणि शेवट जातीशी रीलेट करु पहात आहेत. का ते कळत नाही. चित्रपटामधे बटबटीत जातसंघर्षाचे प्रसंग असतील अशा आशेला तडा गेलाय बहुतेक... :)

अभ्या, लै भारी लिहिलंस रे...तुला मला जास्तच जवळचा पिच्चर... पुर्वार्ध - माज आणि माज, पैशाचा,सत्तेचा आणि तारुण्याचा माज अतिशय व्यवस्थितपणे दाखवला आहे नायिकेनं पेश्श्ल - मी कुटं म्हणलं आवडलं नाय असं.. उत्तरार्ध - हल्ली जे हिंदित डब केलेले सौथ इंडियन चित्रपट असतात ना त्याच पावलावर आणि बराच लांबवलेला लक्षवेधी भुमिका - हैदराबादेत भेटलेली मराठी अम्मा शेवट - लैच फसलेला, दोन चार वर्षे दुनियेत टक्के टोणपे खाल्लेली पोरं आपल्या जिवावर उठलेल्यांवर डिंकाच्या लाडवासाठी विश्वास ठेवतील हे पटत नाही.. भारी मेकप - पोरीचा बाप आधीचा आणि नंतरचा सभेतला.. काही प्रश्न - शेवटी आनिचं काय झालं ? बुलेट बटण स्टार्ट असताना किका का मारतेत सगळे जण ? हिरो हिरोइन रेल्वेत चढतेत कशी? परश्या एवढी वर्षे घरी कॉटॅक्ट करतो का नाही ?

थेटरच वातावरण नीट कळलं. छान लिहिलंय मला गाणी youtube वर बघून सगळी आवडली, कॅमेरा वर्क मस्तच झालंय. पण शेवट वाईट आहे हे ऐकल्यावर मी मूवी बघणं शक्य नहिये.

जबरी लिहीले आहे. सैराट च्या मी वाचलेल्या रिव्यू/परीक्षण्/समीक्षण जे काय असेल त्या सर्वात हे जास्त आवडले. आता पिक्चर पाहताना यातील वर्णने आठवतील :). पिक्चर पाहायचा आहेच, आता इंटरेस्ट आणखीनच वाढला. फक्त एकच सांगतो - ज्यांना नसेल आवडला त्यांना न आवडू दे. त्यातल्या अनेकांचे चष्मे असतील. पण सर्वांचेच नसतात, काहींना नाहीच आवडत. जाउदे. त्यांना एकाच गटात ढकलू नका.

अभ्या भाऊ सांगतायत म्हणजे नक्की चांगला असेल सिनेमा. दुसर्या किंवा तिसर्या आठवड्यात पाहिला जाईल. तो पर्यंत थेटर मध्ये नाचणार्या पब्लिकचा हा सिनेमा पाहून झाला असेल. पैजारबुवा

मी कालच बघितला... मला तर आवडला. अगदी सामाजीक संदेश, कथा मुल्य.. वगैरे गोष्टी डोक्यात न घेता बघा. आजकालच्या इतर मराठी चित्रपटांपेक्षा कितीतरी भारी...

पण अाता त्याची इतकी प्रसिध्दी, चर्चा इ. झालीय की कोर्या मनाने पहाता येणार नाही. जातीयता इ मुळे गढूळ झालंय सगळं. अांम्ही शाळेत असताना एक दूजे के लिए अाला होता. तसा निखळ बघता येणार नाही ह्याचं दु:ख अाहे खरं, पण बघणार नक्की.

उत्तम परीक्षण. चित्रपट समोर उभा राहीला. चित्रपट बघण्याची उत्कंठा वाढ्ली.
पिच्चर संपताना थेटरमध्ये एक तर पावलाचा आवाज येतो का? मग...
म्हणून
झिंगाटवर थिरकले पाय तर बिघडलं काय?
हे मात्र पटत नाही. चित्रपटगृहात उभं राहून अगदी पडद्यासमोर जाउन पोलिसांना बोलवावं लागावं इतका गोंधळ हे एक समाज म्हणून लाजिरवाणच आहे! आणि एक दोन ठीकाणी झालेल्या घटनांवरून स्फूर्ती घेउन सगळीकडे होत असेल तर चिंताजनकही आहे. आणि ह्या घटना म्हणजे चित्रपट/ गाण्यांच यश वगैरे आहे असं म्हणणं तर उथळपणाचा कहर आहे..

In reply to by टवाळ कार्टा

त्यांना तो हक्कच वाटतो !! नाचणा-या तरुणाईला विरोध करून पहा काय होते ते. अगदी लग्नाच्या मिरवणूकीत बँजोवाल्याला पण फटके पडतात त्याने ते म्हणसतोवर आवडते गाणे वाजवले नाही तर.

एक नंबर लिवलंय अभ्या दादा. पहिल्याच दिशी थेटरात बघितल्यापासून सैराट व्हाया झालंय. उद्याच्याला परत एक डाव बघायला जाणार हाय. खरं हे सैराटचं भूत मानेवरून उतरायला काय तयार नाय हाय बग.

In reply to by वैदेही बेलवलकर

सहमत. सैराटचं हे भूत उतरत नाहिये. डोक्यातलं विचारांचं काहुरही कमी होत नाहीयें. या निमित्ताने अवती भवतीच्या भरडल्या चिरडल्ल्या गेलेल्या कहाण्या आणि कुटुंबं परत एकदा डोक्यात घुमताहेत.

वरती डॉक म्हणाले त्याला सहमत "ज्याना आवडला नाही हा त्यांचा चोईस आणि ज्यांना तो आवडला ती त्यांची अभिरुची. त्याबद्दल एकमेकांवर टीका करावी असे मला वाटत नाही. " मि तरी टि.व्ही. वर आला तरी बघणार नाहि. 'सदमा' हा पहिल्यांदा पाहिला तेव्हाच पुर्ण पाहिला होता त्याचा शेवट त्यानंतर कधिहि बघितला नाहि उगा त्रास होतो.

खुप छान लिहीलं आहे. कालच सैराट सिनेमा पाहीला व आज लेख वाचताना सगळा सिनेमा जश्याच्यातसा डोळ्यासमोर उभा राहीला. "वास्तववादी" मराठी चित्रपट सगळ्यांनी एकदा जरुर पहा.

In reply to by शिद

सिनेमातलं वास्तव, इकडे वाद आणि वादी! एक टेम्पो आणा रे च्यायला.... समद्यास्नी घालू आनि न्हिऊ तकडं हिरीत.

बास बास पटलं शेठ. हेच आणि असंच वाटतंय ट्रेलर बघून. 'आताच बया का' मधल्या आर्चीबद्दल सुद्धा हेच म्हणायचंय. लोकांना 'शेवट असा का केला' हा प्रोब्लेम असणं मज्जेशीर आहे. तुम्हाला हवंय ते देणं आणि तुम्हाला सिनेमावर विचार करायला लावणं यात फरक आहे. तुम्हाला हवंय ते दिल्यानंतर तुमचे विचार बंद होतात आणि कलाकृती खालावते हे माझे मत. नागराज म्हणूनच महत्वाचा आहे कारण प्रेक्षकांना 'काय बघायचं' याचं 'वळण' लावण्याची क्षमता त्याच्यात आहे ! त्याच्यात त्याच्या ष्टोरीशी प्रामाणिक राहूनसुद्धा प्रेक्षकांना खेचण्याची ताकद आहे, ती तशीच राहावी. प्रत्येकाची आवड असते हि गोष्ट खरीच पण फक्त चान चान देणारे बाकीचे सिनेमे आहेतच कि. नागराज चे यश, 'हि माझी गोष्ट आहे आणि ती दाखवली कि प्रेक्षक मिळतात' हे दाखवून देण्यात आहे.

अस्मितेचे, प्रतिष्ठेचे आन संपत्तीचे गॉगल लावून बसल्यावर काय दिसतं त्येच दिसणार त्येना. >>> क्या बात !

च्या मायला बघायलाच लागेल बहुतेक अभ्या....... लेखा सोबत एक टिकट पण दयायचस ना :-)

अभ्याभौ, जब्राट लिहीलंय! आत्तापर्यंत काही पाहिला नाही पण तुमचा लेख वाचून पहायला हवा असं वाटतंय . रच्याकने सगळी चर्चा वाचून मला एक प्रश्न पडलां, चित्रपटाला चित्रपट म्हणून का नाही बघू शकत आपण ? जस्ट करमणूकीचे साधन आहे पहा २-३ तास ऐंजॉय करा अन् द्या ना सोडून ! उगाच त्यात जातीपाती, लैच वास्तव आहे, लैच उथळ आहे , लैच खोल आहे. कशाला??? नसेल पहायचा तर नाही पहायचा एवढं काय त्यात ?

मलाही आवडला सैराट. शेवट कसा असावा, कोणत्या भागाला किती महत्व द्यावं हे सांगणारे महान आहेत. कोणतीही कलाकृती बघताना ती प्रेक्षकाला गुंगवून ठेवते, पडद्यावरचं वास्तव वाटायला लावते हे महत्वाचं. त्या दृष्टीने सैराट कित्येक मराठीच काय, बॉलिवुडपटांपेक्षादेखील सरस आहे. खरंतर त्या अर्थानं चित्रपटात जातीसंघर्ष नाही. मला सर्वात जाणवली ती नायिकेमध्ये असणारी धमक. आणि सर्व फिल्मभर तीच आहे. भलेही बिन्धास हिरॉईन्स याआधी दाखवल्या गेल्या असतील, पण त्या बेगडी वाटाव्या अशी ट्रिटमेंट दिलेली असते. वास्तवाची जाणिव असणारा हिरो आणि ती नसूनही वास्तवाला धिटाईने पुढे जाणारी ही नायिका म्हणजे लाजवाब आहे. स्त्री आणि पुरुष या जातींनी परस्परांची समजली जाणारी स्वभाव वैशिष्ट्ये आपल्यात मुरवली की होणारी जादू अतिशय सुंदरपणे सिनेमात चित्रीत झाली आहे. आपल्या जाणिवांशी प्रामाणिक रहाताना आलेल्या प्रसंगाला निडरपणे तोंड देणारी नायिका आणि प्रसंगी पुरुषपणा जागा झाला तरी कोमलपणा जपणारा नायक याचा जबरदस्त कॉम्बो यात आहे. शेवटही एखादा प्रसंग अंगावर न येताही अस्वस्थ करुन सोडणारा कसा होऊ शकतो याचा नमुना. बहुतेक दोन्ही बाजूच्या जातीयवाद्यांना मसाला न मिळाल्याने ते फारच निराश झालेले दिसतायत. ऐनवेळेला जायचं ठरवल्याने मी हा सिनेमा कधी नव्हे तो स्टॉलमधे बसून पाहिला. आजूबाजूच्या गर्दीचा चेहरा बघून आपल्याला काही धड बघता येणार नाही असं वाटलेलं. परंतू सुरुवातीच्या प्रेमप्रसंगातला शिट्यांचा गजर सोडता कोणत्याही आक्षेपार्ह कॉमेंट ऐकू आल्या नाहीत. उत्तरार्धात तर अतिशय शांतता होती. शेवटीही लोकं शांतपणे बाहेर पडत होते. समीक्षकांपेक्षा आम पब्लिक जास्त शहाणं असल्याचं हे चित्र या चित्रपटाच्या निमित्तानं दिसलं, ते सुखद होतं.

In reply to by अंतरा आनंद

व्वा! आवडला प्रतिसाद. शब्दाशब्दाशी सहमत. मलाही हेच लिहायचं होते पण इतकं सुंदर जमले नसते.

In reply to by तर्राट जोकर

सुंदर प्रतिसाद अंतरा.अभ्याचे परीक्षणही मनापासून आलेलं जाणवतंय. बघायला न मिळाल्याचे वाईट वाटत होते.पण आता सर्व परीक्षणं आणि चर्चा वाचून कदाचित जास्त उमगेल चित्रपट असं वाटतंय.पहिल्यांदाच!

अत्यंत घीसापीट्या ह्या स्टोरी मधे आवडण्या सारखे काय आहे ते मुळीच कळले नाही. हीरो हीरवणीच्या प्रेमाला घरुन विरोध, पळुन जाउन लग्न, व त्या नतंर बापांनी घातलेला खोडा. जात मधे आणायची अजीबात गरज नव्हती. दुख्खी एन्ड नविन म्हणावा तर तसेही नाही. अगदी कयामत से कयामत तक पासुन आत्ता आलेल्या रामलीला मधे तसाच अंत आहे. त्यामुळे ह्या पिक्चर ला पास.