सैराट .... माझ्या नजरेतून...
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
आयुष्यात पहिल्यांदा कुठल्या चित्रपटाची गाणी मी तो पहायच्या आधी एवढी ऐकली असतील.. असो.. याचे श्रेय प्रमोशनकारांना देण्यात येते...
खरं तर ती अती वापरलेली गावाकडची भाषा trailor मध्ये समजली.... आणि मी picture न बघण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं...
सोमवारी अचानक box office चे विक्रम मोडलेले idiot box ने दाखवले आणि मराठी बाणा जागवत म्हटलं वीकेंड ची वाट न पाहता बघूनच यावा.. मंगळवार शोधला...
तसं पाहिला तर कथा काही नवीन नाही... पण च्या मारी अर्ची खूप भाव खावून गेली राव... नुकतीच नववी पास झाल्याचं समजलं... पण कॅमेरा समोर एक क्षण म्हणून वाटलं नाही कि हा तिचा पाहिला picture आहे असं... खरच भावली...
परश्या पण तेवढाच छान वावरलाय कॅमेरा समोर( तो दिसायलाच फार आवडला.. त्याने होडीतून मारलेली उडी तर..आय हाय ....) नागेशचं दिगदर्शन छानच..त्याची स्वताच्याच movie मध्ये थोड्या साठी का होईना acting करण्याची सुभाष घई स्टाईल आवडली... पक्षांचे उडणारे थवे तर अप्रतिम...
अर्थात मी इथे गाण्यांबद्दल बोलतच नाहीये... अजय अतुल ला प्रणाम!!! Zingat च्या तालावर ठाणेकरांनी theatre मध्ये न नाचण्याचा सभ्य पणा मात्र तेवढा दाखवला... बिना संगीताचा शेवट आणि निशब्द प्रेक्षक यांनी त्या निस्सीम शांततेत भर घातली.....
एकूणच काय तर आवडला...
प्रतिक्रिया
छान नजर आहे तुमची !
मस्तच आहे