लेख छानच पण अजून खुलवता आला असता, असे वाटते.
कृष्णकमळाबाबत ठाऊक नाही पण केवड्याचे आणि सापाचे नाते मात्र अतूट आहे!
पुलेशु
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
कृष्णकमळाबाबत ठाऊक नाही पण केवड्याचे आणि सापाचे नाते मात्र अतूट आहे!
रातराणी बद्दल सुद्धा अस ऐकलं आहे.
झुडपांमध्ये उंदरांना आणि त्यामुळे सापांना लपण्यासाठी आदर्श वसतिस्थान निमार्ण होत असावं. सापांचा फुलझाडांशी या पेक्षा काही वेगळा संबध असावा असं वाटत नाही.
वैज्ञानिक दॄष्टीकोन ठेऊन सरळ साधा अर्थ काढण्या ऐवजी आपण रसिक दृष्टीकोन ठेवून सापाला फुलांचा वास आवडतो असा निष्कर्ष काढत असू कदाचित.
आम्ही येथे पडीक असतो!
नवरा हुशार आहे हे माहीत होते, पण आपत्कालीन व्यवस्थापनात तो इतका
निपुण असेल याची मला आधी कल्पना नव्हती. त्याने मला अगदी शांतपणे सांगितले, " आपल्या फँमिली डॉक्टरला फोन कर." " कशाला ते ? " " अग, म्हणजे तो सापाच्या
विषावरचा उतारा ( anti venom ) का काय ते आणून ठेवेल ना. " भले ! म्हणजे आलेला साप आमच्यापैकी कोणाला ना कोणाला तरी चावणारच आहे, असा त्याचा ठाम विश्वास दिसला.
:D
यामिनि
मि अत्ता साप पकङायला शीकत आहे त्यामुळे माहित आहे कि सगळे साप विषारि नसतात
छान लिहिले आहे आपल्याकडे बरेच लोक घाबरतात सापला
मि Environmental sciences madhy M.Sc केल आहे त्यामुळे माहिति आहे थोडिफार
मला माफ करा १/२ लागला आहे हे लिहायला आनि चुका पण आहेत
पण मि नक्कि सापावर लिहिन
आपलि आन्तरजालावर लिहिता न येनारि :''(
यामिनि
सर्पाख्यान छानच, ओघवत्या भाषेत लिहिले आहेत. खुप आवडले
पु. ले. शु.
नागराज
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
वा ! सर्पाख्यान मस्तंच आहे :).
अहो साप विषारी काय अन बिनविषारी.. दोघेही चावतातच.. डास चावला तरी दुखते..साप चावल्यावर काय होणार !
सापावर लक्ष ठेवणे आणि सर्व मित्रांना पाचारण करणे हेच उत्तम. पुण्यामध्ये तरी सर्पमित्र तत्परतेने येतात असा अनुभव आहे.
-- लिखाळ.
>> परत जर साप निघाला तर तशीच अन तेवढीच गाळण उडेल याची १०० टक्के खात्री.
अगदी पटलं.
लहानपणी आमच्या इथे कच्चा रस्ता,झुडपं वगैरे असं सगळं असल्यानी वर्षात एक्-दोन साप निघायचे त्याची आठवण झाली.
सुंदर आणि रसाळ वर्णन आहे! जसे घडले तसे लिहिले आहे असे वाटले. त्यामुळे एक छान ओघवतेपणा आला आहे. पु.लं. च्या म्हैस मधल्या 'डायवर कोन हाए?' विचारणार्या पोलिस शिपायाची आठवण झाली. आख्यान 'सुफळ संपूर्ण' कसे झाले ते मात्र कळले नाही! मला उद्या साप दिसला तर माझी या आख्यानामुळे काही कमी धांदल उडेल असे वाटत नाही! नवर्याने मात्र आपला रोल व्यवस्थित पार पाडला त्यामुळे त्याचे कौतुक केल्यावाचून राहावत नाही! :$
द.मा. मिरासदारा॑च्या 'बाबू शेलाराचे धाडस' ह्या तूफान विनोदी गोष्टीची आठवण झाली.
बाकी च॑दन, केतकी व रातराणीपाशी साप येतात असा माझाही अनुभव आहे. आमच्या घरी बर्याच वर्षा॑पूर्वी एक मोठा नाग आला होता. सर्पोद्यानात फोन केला तर सगळे एक्सपर्ट प्रदर्शनाला त्या॑च्याकडचे नाग दाखवायला गेले होते म्हणून त्या॑नी एक ट्रेनी पाठविला. त्याची आमच्या कपाटाखाली लपलेला नाग पाहून गाळण उडाली व त्याने फायरब्रिगेडला बोलविण्याचा सल्ला देऊन काढता पाय घेतला. ब॑बवाल्या॑नी मात्र त्या नागास ठार केले. ला॑बी जवळ जवळ आठ फूट होती व त्या॑चे म्हणणे हा जिव॑त पकडणे फारच अवघड होते. पण न॑तर आम्हा॑ला फार व्याप झाला. त्र्य॑बकेश्वरला जाऊन नारायण नाग बळी यज्ञ आणि त्रिपि॑डी श्राद्ध इ करावे लागले.
१०-१२ फूट लांबी वाचूनच धामण असणार हे वाटलंच होतं. पण लेख छान आहे. आवडला.
<<त्यांनी मारे एक गोणते, एक काठी वगैरे बरोबर आणली होत>>
गोणता( बारदान, पोते) हा शब्द आता सहसा कानावर पडत नाही. लिहिला तर जातच नाही विशेष. तो शब्द तुम्ही इथे लिहिल्याने बरयाच मुदतीने तो वाचायला मिळाला. अश्या अनेक शब्दांचे मिपावर पुनर्रज्जीवन झाले आहे. लेखकाच्या जडण-घडणीप्रमाणे लेखनात तसे तसे शब्द वापरले जातात. मिपावर त्यामुळे असे वेगवेगळे शब्द वाचायला मिळतात.
अवांतर : माउ मउ का असेना पण घरात असताना तिने सापाला प्रतिकार कसा केला नाही? मांजरे सापाला नक्की अडवतात, शेपटी फुलवून .
अति अवांतर : लेखकाने " सर्वांचे धन्यवाद अशी प्रतिक्रिया दिल्यावर नवी प्रतिक्रिया द्यावी का?
घरच्या घरी कॄष्ण- कमळ बघण्याचा सोपाउपाय.. वेल न लावता..
स्टीलची पातेले गॅसवर ठेवून गॅस पेटवावा..
आता पातेल्याच्या बुडाशी पहावे..
गॅसच्या ज्योतीने बनलेले कॄष्ण- कमळ दिसेल.
वेल लावावी लागत नाही... साप आकर्षित होत नाहीत
प्रतिक्रिया
आवडले,
छान
कृष्णकमळा
:)
साप
छान
सर्पाख्यान
वा !
सुन्दरच
मस्तच
मस्त..
मस्तं
आवडले आख्यान
मस्त
सर्पाख्यान!
सर्पाख्या
'बाबू शेलाराचे धाडस'
धन्यवाद..
धामण
वेलीशिवाय कॄष्ण- कमळ