एकट्याने रात हि पेलावी कशी
एकट्याने रात हि पेलावी कशी
चांदण्याची बरसात झेलावी कशी
भारलेला अंधार रातराणीच्या गंधाने
मंतरले मन एका विदेही स्पर्शाने
क्षणांची माया हि तोडावी कशी
एकट्याने रात हि पेलावी कशी
चांदण्याची बरसात झेलावी कशी
लागता लागेना काळजाचा ठाव
दूर दूर कुठेतरी सखयाचा गाव
धुक्यातली वाट हि चालावी कशी
एकट्याने रात हि पेलावी कशी
चांदण्याची बरसात झेलावी कशी
उधाणली स्वप्ने भावनांना पूर
दिसेना काठ कुठे डचमळे ऊर
हृदयाची नाव पार लागावी कशी
एकट्याने रात हि पेलावी कशी
चांदण्याची बरसात झेलावी कशी
कविता आवडली.
आपला हात जगन्नाथ म्हणावे आणि
:):)
हाहाहा..
आवरा :)
मस्त कविता!
धन्यवाद, एस आणि संदीप !
पेलणे ह्या शब्दाचा वाक्यात उपयोग बघुन ड्वॉळे पाणावले :))
बाकी 'पेलावी' हा शब्दप्रयोग
हा शब्द वापरावा कि नाही हा
हाहाहा
कविता चांगली आहे पण प्रत्येक
मान्य
कविता आवडली
भन्नाट.
अहो विदेही म्हटलंय की त्यांनी
विदेही = non physical!
रात्री झोपेची गोळी घेउन
चांदण्याची बरसात मिस करायची
सुंदर..
>>>>दूर दूर कुठेतरी सखयाचा
कविता सूफी आहे. 'तो' जो
सर्वांना धन्यवाद !