✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

यथा शास्त्रप्रमाणेनं...

अ
अत्रुप्त आत्मा यांनी
Mon, 05/02/2016 - 22:06  ·  लेख
लेख
सदर लेखनाचा रोख हा धार्मिकविधींमध्ये साध्या साध्या व्यवहाराच्या गोष्टी धार्मिक-आचार म्हणून कश्या रूढ होतात? हे दाखवून देणे हा आहे. 1)मुंजीतील क्षौर विधी-(न्हाव्याकडून) डोक्याचे केस काढणे. (गोटा करणे) (केंव्हा तरी) घडलेला घटना प्रसंग:- न्हाव्याकडून वस्तरा फिरवून झाल्यावर डोक्यावर काही केस राहिले. पुढे मुंजमुलाची तशीच अंघोळ झाली. नंतर कपडे घालून मुंजमुलगा मांडवात आला. कुणाला तरी राहिलेले केस दिसले. "हे चूक आहे" अशी चर्चा तिथे नातेवाईक/पुरोहित .. इत्यादिंकडून घडली. पुन्हा मुंजमुलास पाटावर बसवून राहिलेले केस न्हाव्याकडून काढण्यात आले. मग 'केस काढले', म्हणून पुन्हा त्याला अंघोळ घातली गेली. वरील प्रसंगात घडलेली गोष्ट ही व्यवहारात फक्त "चुकिची-दुरुस्ती" एवहढाच अर्थ लक्षात आणून देते. पण सदर घटना ही धर्माच्या क्षेत्रात घडलेली असल्यामुळे पाहणारे , ती गोष्ट धार्मिक मनानी पाहतात, व्यावहारीक मनानी नाहि. (कारण तो धर्म आहे) थोडक्यात सदर घटना "का व कशासाठी? " म्हणून पाहिली जात नाही. पुढच्या मुंजीत पाहणारे लोक सदर घटनेचा आचार करतात. पहिल्या ठेपेत तुळतुळीत गोटा झालेला असला, तरी परत शास्त्र-म्हणून वस्तरा फिरवला जातो. पुन्हा अं-घोळं ही होते. अश्या या गोष्टी व्यवहारधर्मातून धर्मव्यवहारात घुसत ऱहातात. हा प्रकारही तसा सामान्य आहे. याखेरीज अजून काही प्रकार घडतात, ज्यात विधींची वेळ बदल होते. आणी त्याचंही धर्मशास्त्र होतं. 2)विवाहासंस्कारातील नाम लक्ष्मीपूजन:- वैदिक पद्धतिनी लग्नविधी झाल्यास, सदर विधी मंगलाष्टकांच्या आधी? की नंतर योग्य? असा एक वाद अगदी हल्लीही ऐकू येतो. याची पहिली तोड अशी की वधू ही लग्न होऊन सासरी माप ऒलांडून आत आली की लगेचंच हे नामलक्ष्मीपूजन करावे, असा नियम आहे. अता घरीच हा विधी करणे "सांगितलेले" असल्यावर , तो मंगलकार्यालयात करणे ही सरऴ सरळ सोय आहे. मग तो मंगलाष्टकांच्या आधी होवो अथवा नंतर! ( पाकशास्त्रात कुकरमधे डाऴ आधिच्या डब्यात लावावी ? की नंतरच्या? असा वाद पेटणार नाही. पेटला, तर त्याची तोड काय कुठे लावल्यानी कमी/अधिक शिजते? यावर निघेल. पण आमच्या धर्मशास्त्रात पाकशास्त्रा प्रमाणे बुद्धी वापरायची नसते. तिथे शास्त्राचा पाक काढून एकमेकांना नापाक करायचे असते. असो! ) ज्यांना हे पटतं, किंवा अन्य कारणांनी आवश्यक वाटतं ते हा विधी आधी करतात. पण बहुसंख्य लोक हा विधी मंगलाष्टकांच्या नंतर करावा.., असेच मानणारी असतात. जणू तेच शास्त्र आहे. यावरून अनेकदा यजमान पार्ट्यांमधे आपापसात कींवा पुरोहितांविरूद्ध टोकाची भांडणे पेटतात. अनेकांना (विशेषत: नात्यातले म्हणजे- ना त्यातले/ना ह्यातले असतात, त्यांना! )हा विधी सगळ्या भोजनपंगती झाल्यावर कार्यालय सोडता सोडता एंजॉय करायला (नंतर) हवा असतो. मग हे असे एंजॉई @यजमान पुरोहितात आधी काय "ठरले" आहे? @बाहेर गावी जाणाय्रा मुलीकडच्या नातेवाईकांना उशीर सोसावा लागून त्रास होईल का? @कार्यालय कितीला 'सोडायचं' ठरलेलं आहे? @पुरोहित , फोटोशूटवाले वगैरेंचा पुढची अपॉईंटमेंट आपण अचानक 'शाळा' करून किती वाजवतो आहे? इत्यादी क्षूद्र गोष्टिंकडे पहात नाहीत. "हे नंतर(च) करायचं असतं..! " असा शास्त्र दंडूक घेउन ते सगळ्यांना पिडतात. ह्या दंडुकाचं खरं बीज आहे , ज्याची त्याची सोय! पण ते रुपांतरीत होतं , " यथा शास्त्रप्रमाणेनं... ". ह्यात! सदर लेखन इथे मांडण्यामागे हेतू इतकाच की अश्या प्रसंगी सजग-कर्त्यांनी वरील गोष्टी समजून घेउन आडमुठेपणा, राजकारण इत्यादी करणाय्रांना जमेल तसे रोखावे. किंवा सवाई राजकारण करून त्यांची ताकद कमी करावी. म्हणजे अनेक ठिकाणी अनेकांची त्रासापासून सुटका होईल. (ता. क. - ह्या प्रकारचे आणखिही गोंधळ याच धाग्यावर जमेल तसे मांडत राहीन, जेणेकरून ते माहित होतील. )
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
धर्म
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
अनुभव
मत

प्रतिक्रिया द्या
21115 वाचन

💬 प्रतिसाद (139)

प्रतिक्रिया

@हेच दुर्दैव.››› असोच्च असो!

अत्रुप्त आत्मा
Tue, 05/03/2016 - 22:55 नवीन
@हेच दुर्दैव.››› असोच्च असो! निरर्थक आत्मकुंथक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

बघा बघा.

प्रचेतस
Tue, 05/03/2016 - 22:58 नवीन
बघा बघा. तरी मी म्हणत होतो की......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अग्गाग्गा बुवा...

विजय पुरोहित
Tue, 05/03/2016 - 22:47 नवीन
अग्गाग्गा बुवा... तुमच्या शिव्या सुद्धा गुदगुल्या करतात हो... उल्लूल्लूल्लूल्लूल्लूल्लू.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

हायला, कुंडली आहे का सर्कस?

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 05/03/2016 - 23:25 नवीन
हायला, कुंडली आहे का सर्कस? व्यापकशांत हा शब्द विशेष आवडला. ल्लूल्लूल्लूल्लू ल्लूल्लूल्लूल्
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

१००. हुश्श!

यशोधरा
Tue, 05/03/2016 - 22:59 नवीन
१००. हुश्श!
  • Log in or register to post comments

खीक्क

याॅर्कर
Tue, 05/03/2016 - 23:03 नवीन
एका व्यक्तीवर एवढेजण तुटून पडत आहेत हे पाहून मज्जा आली.
  • Log in or register to post comments

शतक झाल्याबद्दल बुवांना

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 05/03/2016 - 23:22 नवीन
शतक झाल्याबद्दल बुवांना ताम्रकलश, शालजोडी, सत्यनारायण पुजा आरतीसह (पॉकेटबुक एडिशन), धोतरजोडी व टनाटनीट वाजणारे २१ नारळ देउन सत्कार करणेत येत आहे. इदं न मम!! (मिपाधर्मसुधारणासमिती जेपीसंचालितनाखुनटोचीतअगोबाप्रेरित नवग्रहदशापिडीत)
  • Log in or register to post comments

ताम्रकलशऐवजी टम्रेल दिलं तर?

DEADPOOL
Wed, 05/04/2016 - 16:20 नवीन
ताम्रकलशऐवजी टम्रेल दिलं तर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

.

mugdhagode
Tue, 05/10/2016 - 13:14 नवीन
ट ताम्रकलश .... टाम्रकलश ..... टामरल ..... टमरेल फुणा ओख
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DEADPOOL

.

mugdhagode
Tue, 05/10/2016 - 13:14 नवीन
ट ताम्रकलश .... टाम्रकलश ..... टामरल ..... टमरेल फुणा ओख
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DEADPOOL

निलकांत साहेब,

सुरवंट
Tue, 05/03/2016 - 23:39 नवीन
निलकांत साहेब, बघा या धाग्यावर संपादक सदस्यांनीच अवांतर प्रतिसाद देण्याचा धडाका लावला आहे. खेळीमेळी समजू शकतो पण शंभरी करायची म्हणून काहीही टायपायचे का? त्यासाठी खफ आहेच की. आज एक मिपाकर असल्याची शरम वाटली.
  • Log in or register to post comments

मी या शरम आलीला अणू मोडण देत

वैभव जाधव
Tue, 05/03/2016 - 23:45 नवीन
मी या शरम आलीला अणू मोडण देत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरवंट

बुवा एकदाच येउन सर्व बॉल

खटपट्या
Wed, 05/04/2016 - 01:30 नवीन
बुवा एकदाच येउन सर्व बॉल टोलाउन जातात वाटते...
  • Log in or register to post comments

एकदाच येऊन इतकेच नाही, तर

सस्नेह
Wed, 05/04/2016 - 11:18 नवीन
एकदाच येऊन इतकेच नाही, तर ब्याटीच्या एकाच फटक्यात सगळे बॉल टोलवतात =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

आत्मू शेठ लेख पटला. भावना

इष्टुर फाकडा
Wed, 05/04/2016 - 01:53 नवीन
आत्मू शेठ लेख पटला. भावना पोचल्या. बहुतेक प्रतिसाद विरोधी का आहेत हे कळले नाही, मिपावर हा अनुभव नवाही नाही. बाकी मुंज वगैरे कालबाह्य आणि असबंध गोष्टी लोक मुळात करतातच का हे मला कळत नाही. हल्ली तर मुंजाची घोड्यावरून वरात काढणे, त्यासमोर नाचणे वगैरे प्रकारही होतात. हास्यास्पद आहे. लोकांकडे पैसा आहे, सत्कारणी लावावा कसा याची अक्कल नाही. अर्थात ज्याचा त्याचा प्रश्न आहे वगैरे मान्यच. हिंदू धर्माचा मला अभिमान आहे आणि मी नास्तिक नाही. पण मला कर्मकांडात लॉजिक दिसत नाही.
  • Log in or register to post comments

+१ सहमत...

खटपट्या
Wed, 05/04/2016 - 02:15 नवीन
+१ सहमत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इष्टुर फाकडा

@आत्मू शेठ लेख पटला. भावना

अत्रुप्त आत्मा
Wed, 05/04/2016 - 07:20 नवीन
@आत्मू शेठ लेख पटला. भावना पोचल्या.››› धन्यवाद. @बहुतेक प्रतिसाद विरोधी का आहेत हे कळले नाही, मिपावर हा अनुभव नवाही नाही. ››› दू आयडी आणी डूआयडी यांचा खेळ आहे तो! ह्या धाग्याकरता मलाही सदर प्रकार धक्का देउन गेला. लोक धार्मिक गोष्टिंचं अंधानुकरण आणी राजकारण कसं करतात? एव्हढाच मुद्दा होता. बरं, कर्मकांड कालबाह्य, अनावश्यक आहेत असं मत असेल तर काहीच म्हणणं नाही. पण करायची आहेत, तर एंजॉयमेंट साठीच करतो. असं तरी म्हणावं. किंवा लोकनिंदेला भिउन करतो .. हे तरी! म्हणजे करवणारा त्या खेळाला तयार होतो. पण आपल्याकडे पुरोहितापाशी संकेतानी वा प्रत्यक्ष बोलायची पद्धतच नाहिये. (वर्तमान काळातले बरेच पुरोहित यजमानाला आवश्यक सेवा देण्याच्या प्रव्रुत्तीचे आहेत. ) बोललं गेलं तर खूप गोष्टी सोप्या होतात, असा माझा अनुभव आहे. हा समन्वय व्हावा , असं मला/आंम्हाला वाटतं. म्हणूनच हे इथे मांडलय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इष्टुर फाकडा

हे दू आयडी कोणते हो?

प्रचेतस
Wed, 05/04/2016 - 09:21 नवीन
हे दू आयडी कोणते हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

दू आयडी कोणते असतील ते असतील.

सतिश गावडे
Wed, 05/04/2016 - 09:36 नवीन
दू आयडी कोणते असतील ते असतील. मात्र तुम्ही का त्यांच्या कुंडलीतील पापग्रह असल्याप्रमाणे हात धुवून त्यांच्या मागे लागला आहात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

तो तुमचा समज आहे.

प्रचेतस
Wed, 05/04/2016 - 09:42 नवीन
तो तुमचा समज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

चालू दे तुमचं निरर्थक

सतिश गावडे
Wed, 05/04/2016 - 10:03 नवीन
चालू दे तुमचं निरर्थक अत्मकुंथन. कुंथा अता हुंब..हुंब..हुंबक्क्क्क्क्क्क्क्क्क.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हे 'हुंब..हुंब.

प्रचेतस
Wed, 05/04/2016 - 10:05 नवीन
हे 'हुंब..हुंब..हुंबक्क्क्क्क्क्क्क्क्क' म्हणजे नेमके काय असते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

पुन्हा तुमच्यासाठीच

नाखु
Wed, 05/04/2016 - 10:40 नवीन
अर्रर्र... तुम्हाला अजून तीन सुवचने माहिती नाहीत. नाहीतर इतक्यात माफी न मागता ती सुवचने तोंडावर फेकून मारली असती तुम्ही. असो. तुमच्या सोयीसाठी चारही सुवचने पुन्हा लिहितो. व्यवस्थित नोट करुन ठेवा. || श्री तांब्याराम प्रसन्न || १. तो तुमचा समज आहे. २. चालूद्या तुमचे निरर्थक अत्मरंजन ३. तुम्ही निरर्थक भ्रमवादाचे बळी आहात ४. आपणास मुद्दा कळलेला नाही ही सुवचने (आपल्याकडे उत्तर नसले की) समोरच्याची बोलती बंद करण्यासाठी याच क्रमाने वापरावीत. अतिशय प्रभावी अशी ही सुवचने असून आम्ही त्यांचा वापर करुन खात्री केली आहे. चौथे सुवचन हे ब्रम्हास्त्र आहे. मात्र तुम्ही ते पहिल्याच बाणावर आणि ते ही चुकीच्या पद्धतीने अभिमंत्रित केलेत त्यामुळे घोळ झाला.
गावडे सरांचा प्रीतीसाद तुमच्यासाठी जसाच्या तसा.... काडी चा बदल न करता. चोपपेस्तेवाला नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

=))

सतिश गावडे
Wed, 05/04/2016 - 11:11 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

@ कुंडलीतील पापग्रह

अत्रुप्त आत्मा
Wed, 05/04/2016 - 10:34 नवीन
@ कुंडलीतील पापग्रह असल्याप्रमाणेे ›››› पापग्रह नाही! छलग्रह!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

बाकी मुंज वगैरे कालबाह्य आणि

सतिश गावडे
Wed, 05/04/2016 - 09:01 नवीन
बाकी मुंज वगैरे कालबाह्य आणि असबंध गोष्टी लोक मुळात करतातच का हे मला कळत नाही. हल्ली तर मुंजाची घोड्यावरून वरात काढणे, त्यासमोर नाचणे वगैरे प्रकारही होतात. हास्यास्पद आहे. लोकांकडे पैसा आहे, सत्कारणी लावावा कसा याची अक्कल नाही. अर्थात ज्याचा त्याचा प्रश्न आहे वगैरे मान्यच. हिंदू धर्माचा मला अभिमान आहे आणि मी नास्तिक नाही. पण मला कर्मकांडात लॉजिक दिसत नाही.
सहमत आहे. लोक बरेच विधी अनेक पीढयांपासून चालत आले आहेत म्हणून करतात. त्याची आजच्या काळातील आवश्यकता तपासून पाहत नाहीत. काही वेळा तुम्ही म्हणत आहात तसे हे विधी मिरवण्यासाठी, आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन करण्यासाठी केले जातात. कुणालाही हे विधी आता कालबाह्य झाले आहेत म्हणून बंद करावेसे वाटत नाही. तुम्ही दिलेले मौजीबंधनाचे उदाहरणच घेतले तरी अशा विधींचा फोलपणा लक्षात येतो. औपचारीक शिक्षणाची सुरुवात किंवा आपले मुल शिक्षणासाठी गुरुगृही जाण्यास योग्य वयाचे झाले या वेळी करण्याचा हा विधी. आज गुरुकुल व्यवस्था राहीलीच नाही. आणि औपचारी़क शिक्षण (लहान मुलांच्या दुर्दैवाने) वयाच्या तिसर्‍या वर्षीच सुरु होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इष्टुर फाकडा

लोक बरेच विधी अनेक

सूड
Wed, 05/04/2016 - 11:02 नवीन
लोक बरेच विधी अनेक पीढयांपासून चालत आले आहेत म्हणून करतात. त्याची आजच्या काळातील आवश्यकता तपासून पाहत नाहीत. काही वेळा तुम्ही म्हणत आहात तसे हे विधी मिरवण्यासाठी, आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन करण्यासाठी केले जातात. कुणालाही हे विधी आता कालबाह्य झाले आहेत म्हणून बंद करावेसे वाटत नाही. तुम्ही दिलेले मौजीबंधनाचे उदाहरणच घेतले तरी अशा विधींचा फोलपणा लक्षात येतो.
सगाकाकांशी सहमत!! अत्मबंध गुर्जी, एक धर्मसुधारक पुरोहित म्हणून, कालबाह्य झालेला प्रकार असलेने मुंजच करु नका असे आपण कोणत्या यजमानास सांगून त्याचे मन वळवण्यात यशस्वी झाला आहात का? असल्यास आपले अनुभव वाचावयास आवडतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

चला.. .., पुन्हा एकदा तेच

अत्रुप्त आत्मा
Wed, 05/04/2016 - 13:04 नवीन
चला.. .., पुन्हा एकदा तेच दळण दळू. (या धाग्याचा तो विषय नाही, हे विचारणाय्राला माहीत असूनंही! ) सूड, @एक धर्मसुधारक पुरोहित म्हणून, कालबाह्य झालेला प्रकार असलेने मुंजच करु नका असे आपण कोणत्या यजमानास सांगून त्याचे मन वळवण्यात यशस्वी झाला आहात का?››› तुम्हाला असं नेहमीच का वाटतं की धर्मसुधारक हा धर्मउच्छेदक असतो? स्वत:चा प्रश्न जाणीवपूर्वक मुदलातच गंडवून तुम्हाला काय मिळतं? @असल्यास अनुभव अनुभव वाचावयास आवडतील.›› आहेत .. असेही अनुभव आहेत. एक काळ असा होता की मी काही कर्मकांड योग्य व काही अयोग्य असं समजत होतो. तेंव्हा असं होत होतं. पुढे आणी आजला धरून आता झालेलं आकलन असं की सगळं काही कालबाह्य, चूक कसंही असलं तरी 'करू नका' हे सांगितलेलं मी भटजी असल्यामुळं लोक ऐकत नाहीत. दुसरं म्हणजे हे धर्मउच्छेदकाचं काम आहे. माझं नाही. कारण मी धर्मउच्छेदक नाही. याखेरीजंही मी कोणिही असलो नसलो तरी मी "काय सांगायचं? " याची योग्यायोग्यता "ऐकणाय्राला किती आकलन होणार आहे!? आणी आचरणात येणार आहे? " यावर ठरवितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

मुळात मुंज आताच्या काळात

वैभव जाधव
Wed, 05/04/2016 - 14:08 नवीन
मुळात मुंज आताच्या काळात करावी का? ती धर्मसंगत आहे का? ती प्रथा परंपरा म्हणून करावी का? धर्म उचछेदन म्हणजे धर्म आहे पण त्याचं उखडून फेकणे असं मानलं जात असेल तर मुंज करणे म्हणजे धर्म असं मत आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

धर्मसुधारक आणि धर्मउच्छेदक

सूड
Wed, 05/04/2016 - 14:28 नवीन
धर्मसुधारक आणि धर्मउच्छेदक यातील भेद आम्हा पामरांस समजावोन सांगावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

जैसे कर्म तैसे कांड घडते येथे

तर्राट जोकर
Wed, 05/04/2016 - 10:42 नवीन
जैसे कर्म तैसे कांड घडते येथे. ;)
  • Log in or register to post comments

ज्ञानी असो की अज्ञान

सतिश गावडे
Wed, 05/04/2016 - 11:13 नवीन
ज्ञानी असो की अज्ञान गती एक आहे जाण प्रतिसाद न चुकवी कोणी थोर असो अथवा सान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

आम्हालाही एक सुचले

चौकटराजा
Wed, 05/04/2016 - 15:54 नवीन
प्रेरणा - टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी पंढरीची काडी ही सारावी मंडई पेटवावी वाट ही लावावी धाग्यामाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

काडी ही सारावी

प्रचेतस
Wed, 05/04/2016 - 16:03 नवीन
काडी ही सारावी मंडई पेटवावी वाट ही लावावी धाग्यामाजी
Image removed. मार्केटयार्ड उठलं! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

आत्मुबुवा, पण 'कर्मकांड

तर्राट जोकर
Wed, 05/04/2016 - 14:17 नवीन
आत्मुबुवा, पण 'कर्मकांड म्हनजे धर्म नाही' ह्यास तुम्ही सहमत झाला व्हतात ना खफवर? मग हे धर्मसुधारक, धर्मौच्छेदक कुठून उपटलेत मधेच? भाकड गोष्टी करुच नयेत ना माणसाने, तुम्हीही आणि तुमच्या विरोधात बोलणार्‍यांनीही. लग्नाला भटजी कशाला हवा, मुळात लग्नच का हवं तेही तर एक कर्मकांडच आहे, मुलाची नाव ठेवायला बारसे कशाला...?
  • Log in or register to post comments

@कर्मकांड म्हनजे धर्म नाही'

अत्रुप्त आत्मा
Wed, 05/04/2016 - 15:45 नवीन
@कर्मकांड म्हनजे धर्म नाही' ह्यास तुम्ही सहमत झाला व्हतात ना खफवर? ››› मी सहमत झालो ते ती व्यक्ती तसं मानते याला! मला स्वत:ला नैतिकता सोडून बाकी काहीच धर्म/धर्म्य वाटत नाही. पण हे माझं खाजगी मत आहे. तेच ते (एकमेवं) धर्म सुधारणेच्या वाटेवर उपयोगी पडत नाही. हा दाखला वर आलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

मेलेला माणुसही जंगलात फेकुन

तर्राट जोकर
Wed, 05/04/2016 - 14:18 नवीन
मेलेला माणुसही जंगलात फेकुन द्यावा.
  • Log in or register to post comments

लेख खुपच छोटा वाटला. म

जेपी
Wed, 05/04/2016 - 16:21 नवीन
लेख खुपच छोटा वाटला. म
  • Log in or register to post comments

मुळात संपुर्ण केस काढुन गोटा

प्रणवजोशी
Tue, 05/10/2016 - 07:18 नवीन
मुळात संपुर्ण केस काढुन गोटा करायची गरज नाही मी पण केला नव्हता
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा