(इच्छा अधूरी..)
शून्य मनाने बसलो होतो अंधारात
आला तो तिकडून!
सांगितले खुणावत
येतीय भेटाया तुला!
किती आसुसलो मी!
निव्वळ चखण्यावर न भागणार
एकेका घोटा तहानलो मी!
आज आस सारी मिटणार
दिसली ती नजरेस
बनली जी माझी होण्यासाठी!
आता रिता झाला गिलास
नवा पेग भरून घेण्यासाठी!
थांब बे पेताडा
मालक गरजला!
बिल भरशील?
पेग भराया निघाला!
सा* गरिबी आड आली
क्वार्टरही हाती न लागली!
खंबा लावायची इच्छा
इच्छा अधुरीच राहिली!
बाटली गेली माघारी
बेवड्याचा संताप झाला!
आणि दारू सोडून
बेवडा बार बाहेर निघाला!
___________________
प्रेरणा: __/\__
** डेडपूल, प्रथम तर इतक्या सुरेख संकल्पनेचे बारा वाजवल्याबद्दल माफी असावी. मात्र एखाद्या रचनेचे विडंबन म्हणजे ती रचना उत्तम असल्याची पावती असते (आणि नाईलाजास इलाज नसतो ;) तेव्हा कृपया राग मानू नये. धन्यवाद.
के
मिपावरची काही जुनी चागली
नीमो अतिशय झकास जमले आहे
एक नं जमलय!
नमो जी
अजून पैजार माऊली यायचे आहेत
बाबौ...मस्त जमेश =))
लीलाधर हे विडंबने करीत नसतात.
कवि लिलाधर यांच्या एकेक
विडंबणे करा