Skip to main content

ब्राह्मणी मटन मसाला

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 01/05/2016 या दिवशी प्रकाशित केले.
ब्राह्मणी मटण मसाला..... असे चमत्कारीक नाव असलेली एक रेसिपि वाचनात आली..ति शे‌अर करत आहे ................. साहित्य... मटण १/२ किलो एक मोठा कांदा चिरलेला तेल दालचिनी ईलायची दगडफुल.खसख...तमालपत्र लवंगा आदी खडा मसाला. गोडा मसाला..आमटी साठी वापरतात तो तिखट मिठ मॅरिनेट साठी........ बचकभर कोथिंबीर पुदीनी आल+लसुण +मिरची .. वाटण... एक चिरलेला कांदा निम्म खोबरे.. २ वेलदोडे +२ लवंगा आल+लसुण कृति....... १..बचकभर कोथिंबीर पुदीना+ आल+लसुण+मिरची .. च वाटण तयार करा मटनाला लावुन घ्या २...कुकर मधे २ मोठे चमचे तेल घ्या तेल तापले कि ... खडा मसाला घाला त्या आल लसणाची पेस्ट टाका कांदा टाकुन मंद आचेवर खरपुस शिजु द्या त्यात मॅरिनेट केकेल मटण टाकुन व्यवस्थित हलवुन घ्या.. तिखड मिठ ..गोडा मसाला चवि प्रमाणे घाला. व मिश्रण व्यवस्थित हलवुन घ्या...व मंद आचेवर शिजु द्या... ३..वाटण..एका कढ‌ईत चमचाभर तेल घ्या तेल तापल्यावर त्यात कांदा खोबरे आल+लसुण पेस्ट चमचाभर खसखस लवंग २ वेलदोडे २ लालसर गुलाबी रंगावर भाजुन घ्या... मिश्रण गार झाले कि मिक्सरमधे त्यात थोडे पाणी घालुन पेस्ट करुन घ्या.. सदर वाटण कुकरमधे शिजत असलेल्या मटणात मिसळा ....एक चमचा गोडा मसाला घाला चांगले हलवुन घ्या मिश्रण व रस्सा हवा असेल त्या प्रमाणात पाणी मिसळा.... कुकर ला झाकण लावा.. ४-५ शिट्ट्या कुकरने मारल्या कि ८-१० मिनिटे मंद आचेवर एक उकळी कााढा शिट्टी पडली कि मटण तयार.... मस्त चापा..

वाचने 16151
प्रतिक्रिया 35

प्रतिक्रिया

फुर्र्र्र्र्र्र्र्र्र

या पूर्वीच्या तुमच्या कथेतील आमसुले वाचून तुमचा साहित्यिक धसका घेतलेला होता. नशीब यात तसलं काही नाही. बाकी वेलकम बॅक अकुकाका.

दमानी जरा, किती येळा फाट्यावर मारताय? फाटा मोडलं त्यो.

माझ्यामते ब्राम्हणी ह्याचा उल्लेख इथे कमी तिखट ह्या अर्थाने आला असावा. बाकी ब्राम्हणी घार नावाची एक घार असते असे ऐकुन आहे त्याबद्दल कुणी लिहिले म्हणजे समजा फोटो टाकले तर तिथे ही धार्मिक तेढ निर्माण करायला तसा उल्लेख केला असे समजायचे का?

अकु काका यात नेमकं काय ब्राह्मणी आहे असं वाचनात आल्यावर जाणवलं ? की खाणारा ब्राह्मण आहे म्हणून ब्राह्मणी? - fandry वैभ्या!

In reply to by वैभव जाधव

म्हणून ब्राम्हणी मटण. फक्त शेंगदाणे खाणा-या बकरीच्या मटणाची कृती उपवास मटण म्हणून टाकावी काब्रे?

वाटलंच मला यावर खडाजंगी होणारच. एकूणच ट्यार्पी निर्माण करण्यात ब्राह्मणांचा हात कुणीच धरू शकत नाही हेच खरे. =))

ब्राह्मणी गोडा मसाला मिळतो हे माहिती आहे, तसेच ब्राह्मणी मटन मसाला असू शकतो, रेसेपी असू शकते, काका फोटो प्लीज. बाकी चालू द्या. -दिलीप बिरुटे

दलित पुरणपोळी, मराठा श्रीखंड, जैन सागुती, धनगरी साबुदाणा खिचडी इ. पाककृती वाचण्यास उत्सुक आहे. स्वतः शाकाहारी असल्यामुळे स्वाद घेण्यावर मात्र मर्यादा असू शकतात.

In reply to by कानडाऊ योगेशु

ज्यांची खाण्याची मारामार होती ते काय पुरण पोळी खाणार, आता काहींची परिस्थिती बदलली असेल, पण अजुनही भटके दलित यांची खाण्याची मारामार आहे, त्यांच्याही आयुष्यात पूरण पोळी, सुखाचं जगणं वाट्याला यावं, अशी अपेक्षा आज महाराष्ट्र दिनी करायला हरकत नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by विजय पुरोहित

सहमत हय!

अकुनी वाढून जिलबी, सुंबडीत पसार ! लोकांची हलगी, नावात पिसार फोटो नाही भेटत बसा मसाला कुटत रडतखडत कूट काव्य मधून साभार