✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

गो बाय

म
मूखदूर्बळ यांनी
Sat, 04/30/2016 - 11:33  ·  लेख
लेख
(माझ्या ४ वर्षाच्या मुलीला लिहीलेल एक पत्र जे ती आणिक थोडी मोठी झाली की वाचेल आणिक मला येऊन घट्ट बिलगेल नेहेमी सारखी ) गो बाय तुला येऊन चार वर्ष झाली. तू आलीस म्हणून जगण्याला एक कारण मिळाल अगदी एकूलत एक. आई बापाच्या अकाली जाण्याने मोडून गेलेल्या एका माणसाला उमेद मिळाली. गो बाय तूला आठवतय का. पोटात असताना तू गर्भ सन्स्काराची सी डी ऐकायचीस अगदी शान्तपणे. कधी कधी खूप मस्ती करायचीस आईला लाथा मारायचीस मग मी कसलस स्तोत्र म्हटल की शान्त व्हायचीस अगदी शहाण्या बाळा सारखी. मग ०५/०३/१२ ला तू आलीस अगदी तुझ्या मावशी आजीच्या तारखेला तू आलीस. लोक म्हणाले बहीणीच्या तारखेला तिची आजीच परत आली. अगदी माझ्या आई सारख्या डाव्या हातावर पानाची खुण घेउन आलीस. मग मीही हेलावलो आणि म्हटल माझी आई आली. तुला आठवतय का तू घरी यायच्या आधी मी स्वतःच्या हातने पूर्ण घर फिनाईलने धुवून काढल फक्त आणिक फक्त तुझ्या साठीच गो बाय. मग तुझ्या साठी केक आणायला जात होतो तेन्व्हा एका म्हातार्‍याने विचारल " काय झाल ? " मी म्हटल मुलगी झाली छान तेन्व्हा तो पिचकला " डोण्ट गेट नर्व्हस " मस्तकात तिडीक गेली. वाटल तिथल्या तिथे त्याला कानफटाव. प्रत्यक्षात मी बेफाम हसलो त्याच्या तोण्डावर. म्हातारा खजील झाला बहुदा गो बाय मग तू घरी आलीस घराला र.न्ग आला. तुझ्या साठी सत्व बनवण्यात तुला ते खाववण्यात, लाळेराने तुझे तोन्ड पुसण्यात, तुझे ल.न्गोट बदलण्यात तुला झोपवण्यासाठी गाणे म्हणण्यात वेळ कसा गेला ते कळ्लच नाही. आयुष्याला खर्‍या अर्थाने अर्थ आला. गो बाय तू थोडी मोठी झालीस बोबडे बोल बोलू लागलीस घराला हसवू लागलीस दुडूदुडू धावायला लागलीस. मी झोपलो की माझ्या पोटावर येऊन बसायला लागलीस . गाणी म्हणायला लागलीस. सान्गायला लागलीस की मी डॉक्टर होणार आणि मग काय करणार तर म्हणे घर बा.न्धणार अश्या बाल-लीलानी हसवायला लागलीस. आता शाळेत जायला लागलीस शाळेतल्या गम्मती सान्गायला लागलीस. मला कुठे दुखल तर औषध लावायला लागलीस. मी लटका रागावलो की न कळून मला बिलगयला लागली. गाणी म्हणायला लागलीस, नाच करायला लागलीस. नूस्ती मज्जमाडी. गो बाय तू थोडी झालीस की कदाचित माझे पत्र वाचशील. मग थोडीशी हळवी होशील. तेन्व्हाही मला बिलगशील. कदाचित रडशील, माझ्याबरोबर. आपण दोघ खुप खुप रडू एकत्र बसून. रडणे सम्पता सम्पता हसू बरोबर बसून. मग तू मला कदाचित माझी आवडती कॉफी करून देशील माझी आई द्यायची तशी. फक्त फरक एकच आहे आईला म्हणायच राहून गेल पण तुला मी म्हणेन गो बाय तू मला खुप खुप आवडतेस. तू मला खुप खुप आवडतेस गो बाय
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
3723 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

हृद्य मनोगत ! डोळा पाणी

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 04/30/2016 - 11:42 नवीन
हृद्य मनोगत ! डोळा पाणी आणणारे ! तुमची मुलगी हे मोठेपणी जेव्हा वाचेल तेव्हा तिला भरून येईल आणि ती आपल्या बाबाला बिलगेल, नि:संशय !
  • Log in or register to post comments

सहमत. अगदी खरे.

विजय पुरोहित
Sun, 05/01/2016 - 10:15 नवीन
सहमत. अगदी खरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

गोड लिहीलंय :)

नीलमोहर
Sat, 04/30/2016 - 12:00 नवीन
अजून पुढे किती गंमतीजंमती होतील पाहत राहा, मुली म्हणजे आयुष्यभरासाठीचा आनंदाचा ठेवा असतो...
  • Log in or register to post comments

तंतोतंत

नाखु
Sat, 04/30/2016 - 15:00 नवीन
आयुष्यभरासाठीचा आनंदाचा ठेवा मोठा होताना पाहण्याचे सुख शब्दातीत आहे. पा लक नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

मस्त

सविता००१
Sat, 04/30/2016 - 12:49 नवीन
खूप गोड लिहिलंय
  • Log in or register to post comments

खरंच खूप गोड लिहिलंय. मस्तं!

पद्मावति
Sat, 04/30/2016 - 14:55 नवीन
खरंच खूप गोड लिहिलंय. मस्तं!
  • Log in or register to post comments

छान लेख आहे.

सोनुली
Sat, 04/30/2016 - 15:09 नवीन
छान लेख आहे.
  • Log in or register to post comments

+100

सुबोध खरे
Sat, 04/30/2016 - 15:13 नवीन
+100
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोनुली

डोळ्यात पाणी आणणारे लिहितोस

पैसा
Sun, 05/01/2016 - 17:12 नवीन
डोळ्यात पाणी आणणारे लिहितोस.
  • Log in or register to post comments

मस्तच!

बोका-ए-आझम
Mon, 05/02/2016 - 00:00 नवीन
ज्यांना मुलगी आहे ते भाग्यवान!
  • Log in or register to post comments

छान लिहिलय.

रेवती
Mon, 05/02/2016 - 01:09 नवीन
छान लिहिलय.
  • Log in or register to post comments

धन्यवाद :)

मूखदूर्बळ
Mon, 05/02/2016 - 11:23 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments

मुलगी नाही म्हणून मेव्हण्याच्या मुलीला स्वतःची मुलगी मानलंय

विवेक ठाकूर
Mon, 05/02/2016 - 11:39 नवीन
त्यामुळे मुलीची ओढ आणि प्रेम काय काय असतं याचा अनुभव आहे. छान लिहीलंय तुम्ही.
  • Log in or register to post comments

छान लिहिलय.

जगप्रवासी
Mon, 05/02/2016 - 17:48 नवीन
छान लिहिलय.
  • Log in or register to post comments

.

सूड
Mon, 05/02/2016 - 19:42 नवीन
.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

मूखदूर्बळ
Tue, 05/03/2016 - 10:31 नवीन
परत एकदा धन्यवाद
  • Log in or register to post comments

फार छान. मला पण लेक आहे. मी

भाग्यश्री कुलकर्णी
Tue, 05/03/2016 - 13:43 नवीन
फार छान. मला पण लेक आहे. मी रिलेट करु शकते.
  • Log in or register to post comments

सुंदर !!!

मितान
Tue, 05/03/2016 - 18:15 नवीन
रिलेट करता आले.. :)
  • Log in or register to post comments

खूप हृदय आणि सुंदर.

यशोधरा
Tue, 05/03/2016 - 18:47 नवीन
खूप हृदय आणि सुंदर.
  • Log in or register to post comments

भरुन आलं वाचताना.मुलगी

अजया
Tue, 05/03/2016 - 18:52 नवीन
भरुन आलं वाचताना.मुलगी नसल्याची कायम उणीव भासतेच..
  • Log in or register to post comments

धन्यवाद :)

मूखदूर्बळ
Wed, 05/04/2016 - 09:57 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments

खूप छान लिहिले आहे.

उल्का
Wed, 05/04/2016 - 10:52 नवीन
पत्र आवडले. खात्रीने लेकिला तर खूपच आवडणार ह्यात शंकाच नाही. मुलं मोठी झाल्यावर लहान्पणीच्या गमती जमती ऐकायला त्याना खूप आवडतं. :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा