✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सत्यनारायण कथा - सामाजिक समरसतेची कथा

व
विवेकपटाईत यांनी
Fri, 04/29/2016 - 20:27  ·  लेख
लेख
काही वर्षांपूर्वीची गोष्ट, दिल्लीच्या दत्त विनायक मंदिरात सत्यनारायणाची कथा सुरु होती. मंदिराच्या प्रांगणात एक ग्रहस्थ काही लोकांसोबत सत्यनारायण कथेचा माखौल उडवित होते. मी हि तिथे पोहचलो. थोड्यावेळातच लक्ष्यात आले, हे ग्रहस्थ नुकतेच पुण्याहून परतले आहे, आणि तिथल्या एका महाविद्वानाची मुक्ताफळे आपल्या तोंडाने फेकत आहे. मी हि त्या चर्चेत शामिल झालो. एखादी कथा हजारों वर्षांपासून जनमानसात रुजलेली आहे, तर निश्चितच त्या कथेत सामान्यांना भावणार काही तरी असणारच. सत्यनारायणाची कथा सामान्य माणसाला सत्यमार्गावर चालण्याची प्रेरणा तर देतेच शिवाय सामाजिक समरसतेचा संदेश हि देते. समाजातील सर्व वर्गांना हि कथा एक सूत्रात बांधते. हिंदू धर्मात सदैव दोन प्रवाह राहिले आहे. एक प्रवाह स्वत:चे वर्चस्व स्थापित करण्यासाठी समाजात दुही माजविण्याचे कार्य करतो, ज्याला आपण आसुरी शक्ती म्हणू शकतो तर दुसरा प्रवाह समाजात सौख्य निर्माण करणारा अर्थात दैवीय शक्ती म्हणू शकतो. सत्यनारायण कथा सामान्य लोकांसाठी आहे. सत्यनारायणाची कथा लोकांना सत्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देते व समाजात सौख्य हि निर्माण करते. नवीन कामाची सुरुवात लोक सत्यनारायणाची कथा करून सुरु करतात. नवीन विवाहित जोडपे या कथेचे श्रवण करून आपला संसार सुरु करतात. सत्य आणि परस्पर विश्वास हे सुखी जीवनाचे सार आहे. सत्यनारायण कथेतील पहिले पात्र एक दरिद्री ब्राम्हण आहे. हा ब्राम्हण दरिद्री का बरे असेल हा विचार मनात आलाच. जर ब्राम्हण जास्ती दक्षिणेच्या लालचाने पूर्व निश्चित यजमान सोडून दुसरी कडे जाईल तर काय होईल. त्याला पहिल्या यजमानाशी खोटे बोलावे लागेल. काही काळ ब्राम्हणाला जास्त दक्षिणा मिळेल. पण नंतर अधिकांश यजमान त्याला बोलावणे सोडून देतील. ब्राह्मण दरिद्री होईल. अश्याच एका दरिद्री ब्राम्हणाला नारद मुनींनी सत्याचरणाचा उपदेश केला. ब्राम्हणाची परिस्थिती बदलली. तो श्रीमंत आणि समृद्ध झाला. दुसरे पात्र एक मोळीविक्या आहे अर्थात आजच्या पुरोगामी भाषेत म्हणायचे तर दलित समाजातला. तो ब्राम्हणाचा घरी येतो, कथा ऐकतो आणि प्रसाद हि भक्षण करतो. याचा अर्थ त्या काळी ब्राम्हणाच्या घरी हि दलिताचे स्वागत होत होते. दुसर्या शब्दांत सत्यनारायण कथेत अस्पृश्यतेचा निषेध केला आहे. या कथेत अंगध्वज नावाचा राजा हि एक पात्र आहे. राजा म्हणजे क्षत्रिय. जंगलात गवळी समाजाचे लोक (वनवासी) सत्यनारायणाची कथा करीत आहे. राजा अंगध्वज त्यांच्या हातून प्रसाद स्वीकार करीत नाही. जातीपातीच्या भेदभावावर विश्वास ठेवणारा राजाच्या हातून प्रजेचे कल्याण संभव नाही. राजा प्रजेचा विश्वास गमावतो. परिणाम, राजाचे राज्य नष्ट होते. राजा अंगध्वजाला त्याची चूक उमगते. तो वनात राहणार्या गवळी लोकांसोबत सत्यनारायणाची पूजा करतो आणि त्यांच्या सोबत प्रसादाचे भक्षण करतो. अर्थात राजा अंगध्वज सामाजिक भेदभावाच्या नीतीचा त्याग करतो व जनतेचा विश्वास पुन: संपादित करतो. राजाने सामाजिक भेदभाव सोडून समस्त प्रजेशी भातृभाव ठेवला पाहिचे याचा बोध या कथेतून मिळतो. या कथेत साधूवाणी (वैश्य समाजातला) हि एक पात्र आहे. हा व्यक्ती दिलेला शब्द न पाळणारा आणि सदैव खोटे बोलणारा आहे. हिंदीत एक म्हण आहे 'काठ कि हांडी बार बार नही चढती'. साधुवाणीला खोटे बोलण्यचे फळ भोगावे लागतात. कैद हि भोगावी लागते आणि व्यापारात नुकसान हि होते. शेवटी साधुवाणीला सत्य मार्गावर चालण्याचे महत्व कळते. वैश्याला (व्यापारीला) हि सत्य मार्गावर चालायला पाहिजे हा बोध या कथेतून मिळतो. सारांश सत्यनारायणाच्या कथेत समाजातील सर्व वर्णांचे पात्र -ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, दलित आणि वनवासी आहेत. सामान्य माणसाला कळावे म्हणून कथेत अनेक चमत्कार हि आहेत. पण या चमत्कारांच्या मागचे कारण समजून सत्यनारायण कथेकडे बघितले तर कळेल हि कथा सर्वांनी सत्य धर्माचे आचरण करावे आणि जातिगत भेदभावाचा मार्ग सोडून बंधुभावाने राहण्याचा संदेश देते. त्या गृहस्थाना सत्यनारायण कथे कडे पाहण्याची वेगळी दृष्टी मिळाली. बिना वाचता, समजता पुरातन कथांचा विरोध करणे हि एक प्रकारचे अज्ञान आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
7502 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

मस्त लिहिले आहे!

DEADPOOL
Fri, 04/29/2016 - 20:36 नवीन
मस्त लिहिले आहे!
  • Log in or register to post comments

सहमत...

विजय पुरोहित
Fri, 04/29/2016 - 20:40 नवीन
सहमत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DEADPOOL

काका मिशनवर आहेत जणू...?

तर्राट जोकर
Fri, 04/29/2016 - 20:41 नवीन
काका मिशनवर आहेत जणू...? चलुद्या.
  • Log in or register to post comments

हो ना तजो!

DEADPOOL
Fri, 04/29/2016 - 20:48 नवीन
हो ना तजो! मला वाटतं काही लोक जिहाद करायलाही निघालेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

काका मिशनवर आहेत जणू...?

मितभाषी
Sat, 04/30/2016 - 18:40 नवीन
काका मिशनवर आहेत जणू...? चलुद्या.
=)) तजो किमान शब्दात कमाल अर्थ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

काका अप्रतिम लेख लिहिला आहेत.

विजय पुरोहित
Fri, 04/29/2016 - 20:48 नवीन
काका अप्रतिम लेख लिहिला आहेत. सत्यनारायण कथेकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टीकोन दिला आहे तुम्ही. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

जातच का , धर्मबंधुत्वही हवे.

mugdhagode
Fri, 04/29/2016 - 20:49 नवीन
मोदीसर आता बॉलीवुडच्या तीन खानांना घेऊन दोन वर्षाचा सत्तानारायण घालणार आहेत.
  • Log in or register to post comments

मुग्धे नक्की काय म्हणायचंय

विजय पुरोहित
Fri, 04/29/2016 - 20:56 नवीन
मुग्धे नक्की काय म्हणायचंय तुला? जरा सपष्ट सांग की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mugdhagode

ओह साॅरी! मुग्धाताई म्हणतो!

विजय पुरोहित
Fri, 04/29/2016 - 21:03 नवीन
ओह साॅरी! मुग्धाताई म्हणतो! तुम्हाला मुग्धे फक्त प्रचू सर म्हणू शकतात. साॅरी हां!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

सत्यनारायण हजारोंवर्षांपासून

अनुप ढेरे
Fri, 04/29/2016 - 21:00 नवीन
सत्यनारायण हजारोंवर्षांपासून चालत आलाय?
  • Log in or register to post comments

गावडे आणि प्रगो ककांच्या

स्पा
Fri, 04/29/2016 - 21:15 नवीन
गावडे आणि प्रगो ककांच्या प्रतिक्षेत
  • Log in or register to post comments

सत्यनारायण कथेईतकाच भंपक लेख.

सतिश गावडे
Fri, 04/29/2016 - 21:23 नवीन
सत्यनारायण कथेईतकाच भंपक लेख. सत्यनारायण व्रताचे मुळ शोधण्याचा एक प्रयत्न इथे केला गेला आहे. माझा व्यक्तीश: लोकांच्या सत्यनारायण पूजेला विरोध नाही. मात्र त्यांनी पुजेचा मंडप भर रस्त्यात घालून वाहतूकीचा खोळंबा करू नये आणि ध्वनिवर्धक लाऊ नये एव्हढीच माफक अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments

तुम्ही आसुरी शक्ती व जिहादी

तर्राट जोकर
Fri, 04/29/2016 - 21:29 नवीन
तुम्ही आसुरी शक्ती व जिहादी आहात गावडेसर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

आजच दुपारी माझ्या

सतिश गावडे
Fri, 04/29/2016 - 21:40 नवीन
आजच दुपारी माझ्या मित्रवर्यांनी मला "माझे विचार दुराग्रही आहेत" अशी खरड केली आहे. ज्याअर्थी माझ्यावर अशी टिका होत आहे त्याअर्थी मला अजूनही स्व गवसलेला नाही. मला पुर्णत्वाचा उलगडा झालेला नाही. मला वाटते मी पाश्चिमात्य लेखकांनी लिहीलेली अजून दोन चार पुस्तके वाचायला हवीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

मला कसलाच उलगडा झाला नाही

तर्राट जोकर
Fri, 04/29/2016 - 21:59 नवीन
मला कसलाच उलगडा झाला नाही तुमच्या प्रतिसादावरुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

फार लोड घेऊ नका. सोडून द्या =

सतिश गावडे
Fri, 04/29/2016 - 22:03 नवीन
फार लोड घेऊ नका. सोडून द्या =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

तुम्ही तजोना न समजणारा

DEADPOOL
Fri, 04/29/2016 - 22:08 नवीन
तुम्ही तजोना न समजणारा प्रतिसाद देऊन त्यांचा अपमान करत आहात! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

तुम्हाला आमच्या दोघांमधे

तर्राट जोकर
Fri, 04/29/2016 - 22:27 नवीन
तुम्हाला आमच्या दोघांमधे पचकायची गरज?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DEADPOOL

गावडेजी तुमच्याच भाषेत

विवेकपटाईत
Sat, 04/30/2016 - 11:48 नवीन
गावडेजी तुमच्याच भाषेत लोकसत्तेतील एक भंपक लेख एवढेच म्हन्टेल. सत्यमेव जयते पासून अनेक सुभाषिते वेद आणि उपनिषदात आहे. सत्य धर्मा बाबत अनेक कहाण्या वेद उपनिषद आणि पुराणात आहेत. आपल्याला माहिती असतीलच. या शिवाय आपल्या प्रत्येक धार्मिक कार्यात 'ऋतं वदिष्यामि, सत्यम वदिष्यामि' आपण म्हणतोच. सत्यम वद धर्मं चर. केवळ सत्य बोलण्यानेच धर्माचे पालन होते. इस्लाम मध्ये सत्य आचरण म्हणजे धर्म नाही. बहुतेक काही मुस्लीम पिराना हिंदू धर्माचा सत्य आचरण म्हणजे धर्म हा सिद्धांत आवडला असावा आणि त्यांनी त्यांचे पालन केले असावे. एवढाच अर्थ लेखातून निघतो. या हून अधिक अर्थ काढणे म्हणजे मूर्खपणाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

अग्गोबै !

mugdhagode
Sat, 04/30/2016 - 15:31 नवीन
मुसलमान खोटं बोलतात ! हिंदुंच्यात खरे बोलणे म्हणजे धर्म. खोटे बोलू नये ! ........ गृहपाठ : मुसलमान कसाई - हिंदू साधू व पळणारी गाय ही कथा वाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

ऋतं वदिष्यामि, सत्यम

माहितगार
Sat, 04/30/2016 - 19:13 नवीन
ऋतं वदिष्यामि, सत्यम वदिष्यामि' आपण म्हणतोच. सत्यम वद धर्मं चर. केवळ सत्य बोलण्यानेच धर्माचे पालन होते
विवेकजी, वाक्य ठळक करून नेमके काय साध्य करावयाचे आहे ? काय सत्य हे माझे / आमचे विश्वास या पलिकडे असूच शकत नाही का ? पारंपारीक सत्यनारायण कथेचा आधार घेऊन सत्य न्याय इत्यादी तत्वे विस्कटून सांगू शकाल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

तीर्थ प्रसादाची सोय धागा

वैभव जाधव
Fri, 04/29/2016 - 22:34 नवीन
तीर्थ प्रसादाची सोय धागा वाचनमात्र केल्यानंतर इथेच केली आहे. पंचामृत आणि केळ घातलेला साजूक तुपातला शिरा हेच अनुक्रमे तीर्थ आणि प्रसाद आहेत. इच्छुकांनी लाभ घ्यावा ही विनंती. प्रत्येकी एक मूद शिरा मिळेल. प्रसाद खाऊन हात कनातीच्या पडद्याला पुसू नयेत. 21 ची पावती फाडल्यास मोतीचुराचा दीड लाडू मिळेल. अधिक हवे असल्यास दीड च्या पटीत हिशोबाप्रमाणे रोख रक्कम देऊन घेऊन जाणे. पैसे सुटे देणे. सत्यनारायणाचा प्रसाद प्यारे1 विथ प्यारी 2 यांचे सौजन्याने आहे. अजय आपलं जय सत्यनारायण भगवान की!
  • Log in or register to post comments

हसाव की रडाव.

सतीश कुडतरकर
Sat, 04/30/2016 - 11:37 नवीन
एखादी कथा हजारों वर्षांपासून जनमानसात रुजलेली आहे, ??????????? हसाव की रडाव.
  • Log in or register to post comments

हा बांग्लादेशच्या अधिकृत

माहितगार
Sat, 04/30/2016 - 12:45 नवीन
हा बांग्लादेशच्या अधिकृत एनसायक्लोपिडीयाचा संदर्भ पहाता किमान इस्वीसनाच्या १६व्या शतकापासून या कथापूजेचे अस्तीत्व दिसते १) कथेत आंतर-धर्मीय अ‍ॅडाप्टॅबीलीटी आहे. २) पादुका पुजा, पुस्तक पुजा जशा अमुर्त मुर्तीपुजन आहे तसे सत्यनारायण/सत्यपीर/सत्यअंबा कथेतही मुर्ती शिवाय केवळ कलश पुजन म्हणजे अमुर्त-मुर्तीपुजन शक्य आहे. ३) पुजेत रिच्युअल्स आणि अंधश्रद्धा आहेत पण उपरोक्त धागा लेखक म्हणतो तसे धर्म आणि जातींची बंधने ओलांडून नेण्याची क्षमता या कथेत आहे असे वाटते. ४) अधिक पुरोगामी अडॅप्टेशन्स तयार करण्याची क्षमता या कथेच्या फॉर्मॅट मध्ये असावी अर्थात ते तसे प्रयत्न करणार्‍यांवर अवलंबून असावे असे माझे व्यक्तीगत मत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतीश कुडतरकर

सामाजिक समरसतेची कथा

सतीश कुडतरकर
Sat, 04/30/2016 - 14:09 नवीन
सामाजिक समरसतेची कथा yavarunach lekhkachi disha kalate. Jya pujela unepare 100-150 varshancha sandarbh aahe tyavishayi lekhak, हजारों वर्षांपासून as lihun saral saral sandarbhhin lihit aahe. पुजेत रिच्युअल्स आणि अंधश्रद्धा आहेत पण उपरोक्त धागा लेखक म्हणतो तसे धर्म आणि जातींची बंधने ओलांडून नेण्याची क्षमता या कथेत आहे असे वाटते.>>>> yapeksha ya kathetil ECONOMICS lihile asate tar Economic Times/CNBC ne nakkich dakhal ghetli asati.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

त्यामुळे तर काही भटजी मनास

वैभव जाधव
Sat, 04/30/2016 - 14:13 नवीन
त्यामुळे तर काही भटजी मनास पटत रुचत नसून देखील अशा पूजा नाईलाजाने सांगत असतात. होमिओपॅथी न पटणारा एखादा होमिओपॅथी वाला निव्वळ लोकांना हवं म्हणून साबुदाणा गोळ्या देतो किंवा हातभट्टी वाला निव्वळ लोक मागतात म्हणून हातभट्टी बनवून विकतो तसंच काहीसं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतीश कुडतरकर

@ त्यामुळे तर काही भटजी मनास

अत्रुप्त आत्मा
Sat, 04/30/2016 - 15:07 नवीन
@ त्यामुळे तर काही भटजी मनास पटत रुचत नसून देखील अशा पूजा नाईलाजाने सांगत असतात.››› आम्ही अश्या अश्या भटजींनहूनही वेगऴा मार्ग निर्माण केला, आणी स्विकारला. मूऴ कथेतील हीण काढून त्यात सत्व मिसळले. ऐका सत्य नारायणाssssची कथा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैभव जाधव

girhaik aslyavar maal vikla

सतीश कुडतरकर
Sat, 04/30/2016 - 15:08 नवीन
girhaik aslyavar maal vikla janarach. Majha akshep tya sandarbh hin 'hajaro varsh' ya shabdala aahe.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैभव जाधव

>> girhaik aslyavar maal

सतिश गावडे
Sat, 04/30/2016 - 16:25 नवीन
>> girhaik aslyavar maal vikla janarach. नुसता विकलाच जात नाही तर आम्ही "सुधारीत" उत्पादन विकतो असे म्हणून स्वत:ची "प्रगत दुकानदार" म्हणून पाठ थोपटून घेणारे दुकानदारही असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतीश कुडतरकर

त्यामुळे तर काही भटजी..

माहितगार
Sat, 04/30/2016 - 16:16 नवीन
त्यामुळे तर काही भटजी..
तुमचे तिकडे व्यक्ती लक्ष्य असल्यास चालू ठेवावे -काही भटजी अर्थार्जन करताना पुरोगामी दृष्टीकोण बाळगण्याचा प्रयत्न करत असतील तर मी तरी टवाळीत सामील होणार नाही; माझ्या स्मरणात ही कथा जेवढी आहे त्यानुसार ही कथा-रिच्युअल कुणालाही करता येणे अभिप्रेत असावे. बाकी व्यापार, इकॉनॉमीक्स आणि व्यवस्थापन या सोबत ह्या कथेचे अडॅप्टेशन करणे मलाही आवडू शकेल पण तत्पुर्वी ती मला युनिकोडात कॉपीराईट फ्री स्वरुपात हवी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैभव जाधव

अगदी त्रयस्थाच्या नजरेने या

सतिश गावडे
Sat, 04/30/2016 - 16:47 नवीन
अगदी त्रयस्थाच्या नजरेने या पुजेकडे पाहायचे झाल्यास या पुजेची पाळेमुळे जनमानसात घट्ट रुजली आहेत हे लक्षात येईल. आजच्या घडीला चार शेजारी पाजारी, नातेवाईक, गावकरी घरी बोलावण्याचा आणि सहभोजनाचा उत्तम मार्ग आहे. कोकणात तर एक माणूस गेल्याचा प्रसंग वगळता लोक आनंदाच्या कोणत्याही प्रसंगी सत्यनारायण घालतात. एकंदरीत पुजेचा विधी पाहता पुरोहीतानसाठीही ही सोयीची पूजा असावी असे वाटते. कथेत आणि एकंदरीत व्रतात फारसे तथ्य नसले तरीही ही पूजा व्यक्तिगत पातळीवर करण्यास आक्षेप असन्याचे कारण नाही. तेव्हधाच पुरोहितांना रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना. वाहतुकीला अडचण होणार नाही, ध्वनिवर्धक लागणार नाही अशा पुजेला मी ही जाईन आणि प्रसाद घेईन. धर्मसुधारक पुरोहितांनी "धार्मिक प्रसंगी ध्वनिवर्धक लावून ध्वनी प्रदुषण करु नका" असे समाज प्रबोधन करायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

"वाहतुकीला अडचण होणार नाही,

माहितगार
Sat, 04/30/2016 - 16:57 नवीन
"वाहतुकीला अडचण होणार नाही, ध्वनिवर्धक लागणार नाही...." +१ डोक्यात जाते, वाहतूक अडचण आणि कानदुखे ध्वनी मलाही नकोसे होतात, अलिकडे माझ्या गाडीजवळून मला आवडणार्‍या कै. व्यक्तीमत्वाची रस्त्यावरुन मिरवणूक जाताना वेळेचा खोळंबा झाला तर ठिक पण बडवलेले ढोल दुरुन साजरे वाटले तरी जेव्हा कानाशी वाजले तेव्हा कान हाताने चोळून नीट करावा लागला. होणारा असला त्रास पब्लिकला सांगता येत नाही कारण त्यांना ते समजत नै आणि सहनही होत नाही ;) धर्मसुधारक पुरोहितांनी "धार्मिक प्रसंगी ध्वनिवर्धक लावून ध्वनी प्रदुषण करु नका" असे समाज प्रबोधन करायला हरकत नाही. +१०००० करावेच जो ध्वनी आपल्याला स्वतःला अथवा इतरांना प्रसन्नता देत नाही तो धार्मीक म्हणवून न घेता त्याज्य ठरवावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

एकंदरीत पुजेचा विधी पाहता

प्रचेतस
Sat, 04/30/2016 - 16:59 नवीन
एकंदरीत पुजेचा विधी पाहता पुरोहीतानसाठीही ही सोयीची पूजा असावी असे वाटते.
आणि भक्तांसाठी पण. वार,मुहूर्त, सोवळं, ओवळं, जात पात ह्याची भानगड नाही, पक्वांनाची जरुर नै नुसत्या शिऱ्यावर काम भागतं. कमी खर्चात, कमी वेळेत काम भागतं. भक्ताला देवकार्य केल्याचं समाधान, पुरोहिताला चार पयशे कनवटीला बांधून अजून चार घरी पूजा सांगितल्याचे समाधान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

सहमत

नंदन
Sat, 04/30/2016 - 17:12 नवीन
वार,मुहूर्त, सोवळं, ओवळं, जात पात ह्याची भानगड नाही, पक्वांनाची जरुर नै नुसत्या शिऱ्यावर काम भागतं. कमी खर्चात, कमी वेळेत काम भागतं. भक्ताला देवकार्य केल्याचं समाधान
'तुका म्हणे त्यातल्या त्यात' आठवले. अर्थात, हाही लाखो वर्षांपासून प्रचलित असलेला अभंग असून, त्यातून आर्किटेक्चरपासून जेनेटिक इंजिनिअरिंगचे धडे (वाया गेलेली इ.) पुढची पिढी घेऊ शकते; अशा खयाली जिल्बीच्या प्रतीक्षेत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

:)

माहितगार
Sat, 04/30/2016 - 18:54 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

शक्य तेवढ्या जुन्या

माहितगार
Sat, 04/30/2016 - 12:07 नवीन
शक्य तेवढ्या जुन्या आवृत्तीवरुन सत्यनारायण कथा https://mr.wikisource.org/wiki/ या विकिप्रकल्पास कॉपीराईट मुक्त स्वरुपात हवी आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा