✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चारचौघांत

ह — हर_हुन्नरी, Fri, 04/08/2016 - 11:26
चारचौघांत डोळे मिटून स्वस्थ बनायला मनाई आहे चार लोकांत गेलं की सारखं बघावं लागतं डोळे उघडून नजर भिरभिरली नाही इकडं तिकडं एखाद्याच्या कपड्यावरून , फर्निचर वरून , दाढीवरून नवीन घेतलेल्या मोबाईल वरून तर आपण अस्तित्वातच नसतो नजर तर चालवावी लागतेच आणि तोंड सुद्धा बोलत राहावं लागतं सारखं चारचौघांत मौनाचं काम नाही आपले विचार , कच्चे पक्के , आपली मतं , राजकीय , अराजकीय , सांस्कृतिक , असांस्कृतिक बोलून दाखवावेच लागतात आपलं असणं त्याशिवाय ध्यानात येत नाही कोणाच्या मागचं सरकार , पुढचं सरकार , नवीन टूथपेस्ट अमुक फ़िल्म , तमुक टेक्नोलोजी अमक्याची फेसबुक कॉमेंट , तमक्याची गर्लफ्रेंड पास्ता कसा बनवतात , शेअर बाजार , इकोनोमी , इकोलोजी अशा कुठल्याही गोष्टीवर बोलत राहावं लागतं मॉल मध्ये गेल्यावर सतर्कपणे वाचाव्या लागतात मालावरच्या सूचना मनात आणावेच लागतात विविध डेंजर विचार , आपलं शोषण होतंय , आपल्यापेक्षा कमी काम करूनही, आपल्यापेक्षा मूर्ख असणारा बॉस कसा मजेत पैसे कमावतो , बायकोची आवडती सिरीयल बंद झाली तर !! वगैरे मनाला सारखं ढवळत ठेवावं लागतं बाहेर छान सूर्यप्रकाश असला तरी चारचौघं घरी आले किंवा चारचौघांच्या घरी गेल्यावर खिडक्यांवरचे पडदे ओढून घ्यावे लागतात , घरातले भकभक कृत्रिम लाईट लावून गप्पा माराव्या लागतात; भविष्याच्या मग ते कुणाचंही असो ऑफिसात असतील चारचौघं तर बाहेरच्या निसर्गाकडं डोळेझाक करून वातानुकूलित हवेत प्रेझेन्टेशनं करावी लागतात चारचौघांत आपले आपण होऊन राहता येत नाही चारचौघात गेल्यावर एकदा तरी मोबाइल खणखणावा लागतोच गेलाबाजार एखादा मेसेज तरी घ्यावा नाहीतर पाठवावा लागतो चारचौघांना "एक्सक्यूज मी हं" असं म्हणून बाजूला जाउन चपळ बोटांनी संदेश लिहावा लागतो बोटे, कान , नाक , हात , पाय , भेजा असं सर्व सतर्क ठेवावं लागतं चारचौघांत मग कधीतरी ही बाहेरख्याली डोळे , कान , नाक , हात , पाय, हृदय वगैरे बंद पडतात आपण आपल्यात विरघळून जाण्याच्या सोहळ्याला चारचौघं मृत्यू म्हणतात ते या बंद पडलेल्या कान , डोळे , पाय वगैरेंच्या समोर शोक करतात , भाषणं म्हणतात चूप बसत नाहीत , मौन होत नाहीत शरीराला मूठमाती देतात , जाळतात वगैरे चारचौघांत आपलं आपण होऊन राहता येत नाही

प्रतिक्रिया द्या
4540 वाचन

💬 प्रतिसाद (30)

खूप सुंदर!!!

प्राची अश्विनी
Fri, 04/08/2016 - 12:57 नवीन
खूप सुंदर!!!
  • Log in or register to post comments

फार दिवसांनी एक वेगळी कविता

तर्राट जोकर
Fri, 04/08/2016 - 13:20 नवीन
फार दिवसांनी एक वेगळी कविता वाचायला मिळाली. आवडली.
  • Log in or register to post comments

बंधनकारक सामाजिक संकेतांनि

येडाफुफाटा
Fri, 04/08/2016 - 13:37 नवीन
बंधनकारक सामाजिक संकेतांनि घुसमटलेलला जीव. मस्त.
  • Log in or register to post comments

सहमतआपण आपल्यात विरघळून

विजय पुरोहित
Tue, 04/12/2016 - 20:41 नवीन
सहमत आपण आपल्यात विरघळून जाण्याच्या सोहळ्याला चारचौघं मृत्यू म्हणतात अप्रतिम देखणी शब्दरचना... इतक्या सुंदर वर्णनाबद्दल औपनिषदीक ऋषींना देखील ईर्ष्या वाटली असती...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: येडाफुफाटा

छान विषय आहे कवितेचा !!!

फिझा
Fri, 04/08/2016 - 13:52 नवीन
आवडली !!
  • Log in or register to post comments

वास्तवदर्शी. आवडली कविता.

शिव कन्या
Fri, 04/08/2016 - 23:17 नवीन
वास्तवदर्शी. आवडली कविता.
  • Log in or register to post comments

मस्त! आवडली!

रातराणी
Sat, 04/09/2016 - 04:10 नवीन
मस्त! आवडली!
  • Log in or register to post comments

वेगळ्याच प्रकारची कविता. खूप

पद्मावति
Tue, 04/12/2016 - 01:17 नवीन
वेगळ्याच प्रकारची कविता. खूप आवडली.
  • Log in or register to post comments

अनपेक्षित!!!!!!!

जव्हेरगंज
Tue, 04/12/2016 - 20:09 नवीन
तुफान आवडली!! अवांतर : शेवट जरा वेगळा केला असतात तर. डायरेट मृत्यूचा भडक वाटतोय. कवितेच्या एकंदर अर्थगर्भाशी विसंगत. म्हणूनच शेवट सोडून बाकी आवडले!!
  • Log in or register to post comments

उलट

चाणक्य
Tue, 04/12/2016 - 22:06 नवीन
उलट मला एकदम समर्पक वाटला शेवट. मस्त कविता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

कविता आवडली

पैसा
Tue, 04/12/2016 - 20:21 नवीन
कविता आवडली
  • Log in or register to post comments

फार छान!

एस
Tue, 04/12/2016 - 23:16 नवीन
बर्‍याच दिवसांनी एखादे काव्य असे आवडले आहे.
  • Log in or register to post comments

.. तुम्हां सर्वज्ञांच्या समाजी

हर_हुन्नरी
गुरुवार, 04/14/2016 - 17:57 नवीन
मिपाकरांना नमस्कार , ही कविता लोकांना एकूणात आवडते आहे हे पाहून आनंद झाला. सर्वांना धन्यवाद ! कवितेचं शेवटचं कडवं खटकलं असं चं म्हणणं आहे. आता मला कविता कशी सुचते वगैरे सांगून तुम्हाला बोर करणार नाही. इतकंच सांगतो की मला संपूर्ण कविता दिसेपर्यंत किंवा ऐकू येईपर्यंत मी तिचा पक्का खर्डा करत नाही. कवितेची पहिली कडवी सलग लिहून झाली होती आणि तरीही काहीतरी राहिलं आहे असं वाटत होतं. हे शेवटचं कडवं मला काही वेळाने , म्हणजे खरं तर दोन दिवसांनी दिसलं, त्यातून ही दैनंदिन कामाच्या गडबडीत कच्चा आणि पक्का खर्डा करण्यात ही वेळ गेला. असो ! मिपा वर काही चांगल्या कविता वाचायला मिळतात आणि कवितेचे चांगले वाचक ही भेटतात हे किती छान ! राम राम !
  • Log in or register to post comments

अतिअवांतर प्रश्न - काव्याचा

अन्या दातार
Wed, 04/20/2016 - 13:36 नवीन
अतिअवांतर प्रश्न - काव्याचा खर्डा पक्का करताना चारचौघांचा विचार करता काय? ;) कविता आवडली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हर_हुन्नरी

.. तुम्हां सर्वज्ञांच्या समाजी

हर_हुन्नरी
गुरुवार, 04/14/2016 - 17:59 नवीन
मिपाकरांना नमस्कार , ही कविता लोकांना एकूणात आवडते आहे हे पाहून आनंद झाला. सर्वांना धन्यवाद ! कवितेचं शेवटचं कडवं खटकलं असं जव्हेरगंज यांचं म्हणणं आहे. आता मला कविता कशी सुचते वगैरे सांगून तुम्हाला बोर करणार नाही. इतकंच सांगतो की मला संपूर्ण कविता दिसेपर्यंत किंवा ऐकू येईपर्यंत मी तिचा पक्का खर्डा करत नाही. कवितेची पहिली कडवी सलग लिहून झाली होती आणि तरीही काहीतरी राहिलं आहे असं वाटत होतं. हे शेवटचं कडवं मला काही वेळाने , म्हणजे खरं तर दोन दिवसांनी दिसलं, त्यातून ही दैनंदिन कामाच्या गडबडीत कच्चा आणि पक्का खर्डा करण्यात ही वेळ गेला. असो ! मिपा वर काही चांगल्या कविता वाचायला मिळतात आणि कवितेचे चांगले वाचक ही भेटतात हे किती छान !
  • Log in or register to post comments

आवडलं आणि भिडलं काव्य..

नीलमोहर
Fri, 04/15/2016 - 10:28 नवीन
चारचौघांत आपलं आपण होऊन राहता येत नाही, - हे अगदीच खरं. या चारचौघांपासून लांबच राहिलेलं बरं. ह्यांना दुसर्‍याच्या आयुष्यात भारी रस.. आपलं ठेवायचं झाकून अन.. एकदा ह्यांना भेटून विचारावं, बाबांनो तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे :)
  • Log in or register to post comments

आवडली कविता.लिहित रहा मिपावर

अजया
Fri, 04/15/2016 - 10:37 नवीन
आवडली कविता.लिहित रहा मिपावर
  • Log in or register to post comments

मस्त

भाग्यश्री कुलकर्णी
Fri, 04/15/2016 - 19:19 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

कविता हृदयाला भिडणारी आहे, पण

विवेकपटाईत
Fri, 04/15/2016 - 19:26 नवीन
कविता हृदयाला भिडणारी आहे, पण कवीच्या मनात नकारात्मक विचार तर येत नाही ना. आजकल भीत वाटते.
  • Log in or register to post comments

मस्तच विषय आणि त्याची सुरेख मांडणी.....

ज्ञानोबाचे पैजार
Sun, 04/17/2016 - 09:38 नवीन
थोडीशी नकारात्मक वाटली पण आवडली. पण चार चौघात रहाण एवढही काही वाईट नसत... चारचौघात राहूनही अलिप्त रहाणे ही देखिल एका कलाच आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

छान कविता!

इडली डोसा
Sun, 04/17/2016 - 10:12 नवीन
दुसरं कडवं वाचुन बरीच लोकं डोळ्यासमोर तरळुन गेली (शिवाय मिपावरच्या धाग्यांवर बेतलेलं आहे का हे कडवं? असा विचारही मनात येऊन गेला =) ). बाकी ज्या चारचौघांमधे मनमोकळं राहता येईल अश्या चारचौघांची तुम्हाला सोबत मिळो ही शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

मिपा धागा ..?

हर_हुन्नरी
Mon, 04/18/2016 - 16:29 नवीन
माननीय इडली डोसा..नाही...मिपा च्या कुठल्याच धाग्यावर दुसरं कडवं बेतलेलं नाही .. !! आणि पटाईत साहेब , काळजी करू नका मी बिलकुलच निराशावादी/नकारात्मक विचार करणारा मनुष्य नाहीए ...:)
  • Log in or register to post comments

कविता आवडली

विवेक ठाकूर
Tue, 04/19/2016 - 15:31 नवीन
शेवट तर उत्तम आहे. तुमच्याकडे वेगळा विचार करण्याची आणि मांडण्याची शैली आहे. लिहीत राहा.
  • Log in or register to post comments

पर्फेक्ट कविता.

सस्नेह
Wed, 04/20/2016 - 14:05 नवीन
मिपावर स्वागत ! सामाजिक संकेतांनी गुदमरलेल्या जिवाची घुसमट अगदी अचूक शब्दात.
बाहेरख्याली डोळे , कान , नाक , हात , पाय, हृदय
हे अगदी भिडले ! लिहित रहा.
  • Log in or register to post comments

कविता आवडली

सुखीमाणूस
Wed, 04/20/2016 - 14:29 नवीन
१००% छान
  • Log in or register to post comments

उत्तम कविता.

अभिजीत अवलिया
Fri, 04/29/2016 - 08:38 नवीन
उत्तम कविता.
  • Log in or register to post comments

आवडली कविता!

पथिक
Fri, 04/29/2016 - 09:51 नवीन
आवडली कविता!
  • Log in or register to post comments

छान च लिहिलीय ओ!

वैभव जाधव
Fri, 04/29/2016 - 10:53 नवीन
छान च लिहिलीय ओ! बाकी इंद्रियांचं कामच बाहेरख्याली असणं आहे. त्यांना आतल्या बाजूला वळवणं जमवता आलं तर खऱ्या अर्थे जमतं.
  • Log in or register to post comments

छान च लिहिलीय ओ!

वैभव जाधव
Fri, 04/29/2016 - 10:53 नवीन
छान च लिहिलीय ओ! बाकी इंद्रियांचं कामच बाहेरख्याली असणं आहे. त्यांना आतल्या बाजूला वळवणं जमवता आलं तर खऱ्या अर्थे जमतं.
  • Log in or register to post comments

येउ देत

वपाडाव
Fri, 04/29/2016 - 12:02 नवीन
सुरेख... मार्मिक...
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा