तिचं म्हणणं..
मी तुम्हाला मुळीच आवडत नाही..
अन माझा मुद्दा..
तु मला कधी आवडत नाहीस ते सांग..!
बोलताना असे बोलुन गेलो..
तु जशी घरात आवडतेस.. तशी तू प्रवासातही आवडतेस..!
ती मग अडुनच बसली... घरातले नंतर पाहु..
प्रवासात कशी आवडते हे सांगा..!
-------------------------------------------------------------------------------
प्रवास १ :
विमानप्रवासात कधी
मी मध्यमवर्गीय संकोचाने
एखादी टंच हवाईसुंदरी
दुर्लक्ष केल्यागत
न्याहाळीत असतो....
तु अचानक तिला
आपल्याकडे बोलावतेस..
मुद्दामुन तिला गॉसिपिंग केल्यासारखे
कानात काही सांगायला..
खाली वाकवतेस..
उन्न्त तिचे उरोज पाहुन
माझा मध्यमवर्गीय संकोच अजुनच संकोचतो..
अन तिरक्या केलेल्या डोळ्यातुन डोकावतो...
आणि माझ्या मग कानावर येते..
"अॅक्चुअली माय हजबंड इज अ प्रीडायबेटीक.
वुड यु प्लीज ऑफर ओन्ली ग्रीन सालाड टू हिम इफ अवेलेबल!"
क्षणात त्या हवाई सुंदरीची तू दवाई सुंदरी करतेस.. (आभार पु.ल)
ती ही तिथुन "अॅट सो यंग एज.." म्हणत
माझ्याकडे एक सहानुभुतीपूर्ण कटाक्ष टाकुन
चुचकारत निघुन जाते..
(ती हसल्याचा मला उगाचच भास होतो.)
अन हे झाल्यावर तु सहजपणे
माझ्याकडे वळून पाहत म्हणतेस
काय टंच मुलगी होती ना.!
फिगर पाहीली का तिची?
मला आवडली...
तुम्हाला?
हवेत माझी फिरकी घेणारी तू...
मला तेव्हा तिथे खरोखरच...
आभाळाच्या उंचीइतकी जाम आवडतेस....
- कानडाऊ योगेशु
(टू बी कंटीन्युड....)
| लेखनविषय: |
|---|
वाचने
15896
प्रतिक्रिया
84
मिसळपाव
प्रतिक्रिया
दंडवत
वप्या लेका. तूच रे जिगर.
In reply to दंडवत by वपाडाव
आम्ही मराठवाड्यातील असल्याने
In reply to दंडवत by वपाडाव
चालु द्या
नेहमीचेच ______ कलाकार दिसले
In reply to चालु द्या by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नवीन म्हण
In reply to नेहमीचेच ______ कलाकार दिसले by स्पा
माझे ही बिरुटे सरांसारखे झाले
किंगफिशर बंद झाली हो :)
In reply to माझे ही बिरुटे सरांसारखे झाले by ज्ञानोबाचे पैजार
आयड्या...!
In reply to किंगफिशर बंद झाली हो :) by मराठी कथालेखक
बाकी सगळं जाऊ दे हा
u+n+n+t असे टाईप करा...
In reply to बाकी सगळं जाऊ दे हा by वैभव जाधव
उंट येतोय. असो! बदलीन.
In reply to u+n+n+t असे टाईप करा... by विजय पुरोहित
उन्नत (unnat) ( Ö Ö ) :)
In reply to उंट येतोय. असो! बदलीन. by वैभव जाधव
उंट येतोय. असो! बदलीन.