Skip to main content

(तिफण गोफण)

लेखक नाखु यांनी बुधवार, 27/04/2016 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
मुळाक्षरे १ येते ऊबळ अधून -मधून , खाजर्या धाग्याची , टाळ्याखाऊ हर्षाची , तुझ्या कुजक्या शेर्यांची , अन त्यावर केलेल्या फेर्याची … येते सणक अधून -मधून , खुसपटी लिखाणाची , निसटलेल्या अर्थाची , तुझ्या डोळ्यातील अविश्वासाची , अन एकाचवेळी मिळालेल्या खेटरांची …. येते सुरसुरी अधून -सुरसुरी रतीबाच्या गवळ्याची , लागो झकाझकींची , तुझ्या खरडीतील (केलेल्या) मातीची , अन त्या क्षणी उडालेल्या एका आय्डीची …… ==================================== मुळाक्षरे २ ज्या लिखाणाला ऊंडारायचे(च) असते वाहवायचे असते ते पाहत नाही अनुमान किती खंग्री धाग्यात आर्तता किती अर्थाची काही शक्यता वा माहीतीचा कणसूरपणा ते खफत ठेच्काळत अवांतराच्या फटीत निर्लज्ज चिकाटीने उभारते अस्तित्वाची दखल जागल्या धाग्याला घ्यायला लावते मोकळे शी.डी. खत्म जोड काव्यनिग्रह ================================================ मुळाक्षरे ३ पुख्खे आता झोडायाचे मला भय वाटते, ही पुख्खे आता झोडायाचे मला भय वाटते! रसना गुंतुनी जातेय जी पुढच्या अर्थी निःसत्वसा त्याने दोस्तांनाही कापायचे मला भय वाटते! कुंथीत माझे जाहले आहेत उदर काचांतुनी मी खाउ जाता त्या (दोंद) सुटायाचे मला भय वाटते!! हा दाटला प्रतिबंध माझ्या भोवती चोहीकडे घुसमटला वारा सुटायाचे मला भय वाटते!! आहे नेहमीचा सोडा(वाला) अजुनी कितीतरी दूरसा अन ओळखीच्या नजरा, भेटायाचे मला भय वाटते!! -घणरेघ टीप- ही गजाल नाही. गजाल सारखी वाटत असली तरीही. तेव्हा (लिंबूपाणी मुद्दाम) बाजूला ठेवून वाचावी ही नम्र विनंती.
लेखनविषय:

वाचने 3777
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

हायला एका दगडात तीन पक्षी? भारीच.....आवडले पैजाराबुवा,

In reply to by विजय पुरोहित

Dive aagar हा नवीन रस निर्माण केल्याबद्दल नाखुकाकांचा पिंचित सत्कार करावा काब्रे?