गावाकडे म्हणजे विदर्भात एक 50ft×96ft एक प्लॉट घेतलाय. आजूबाजूला सध्या तरी उघडे माळ आहे. या प्लॉटवर आईबाबांना विरंगुळा म्हणून आणि त्यांची नातवंडे गावाकडे आली की त्यांच्यासाठी नवल आणि बदल म्हणून एक छोटीशी बाग उभी करायचे योजिले आहे. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ईशान्य कोनावर बोर घेतली. पाणी भरपूर आहे. वीज जोडणी आणि सबमर्सिबल पंप ही दोन्ही महत्वाची कामे झाली आहेत. माळ असल्याने पक्के कुंपण उभारणीचे काम सध्या सुरु आहे. एक 12×12 ची पूर्वाभिमुख खोली, संडासबाथरूम एक कोपऱ्यात असेल. ईशान्येलाच बोअरशेजारी गेट असेल.
बाग नेमकी कशी असावी यावर घरी सध्या भरपूर काथ्या कुटला जात आहे. चार पैसे मिळावे हा उद्देश अजिबात नाही. पहिले प्राधान्य फळझाडांना आहे. जास्तीत जास्त प्रकारची फळझाडे लावायचा विचार आहे. तसेच लहान लहान वाफे करून तिथे घरगुती गरजेपुरते आले, हळद, कांदे, लसूण, मिरची, टोमॅटो, भेंडी, कारले, वांगी, कोबी, पालक, मेथी वगैरे लावायचा पण विचार आहे. बुढाबुढीच्या गरजेपुरता भाजीपाला असणार त्यामुळे रासायनिक खते, कीटकनाशके वगैरे वापरायचा विचार नाही. तसेच नातवंडे होळी-दिवाळीत गावी आली की त्यांनाही कीटकनाशकविरहित ऑरगॅनिक, घरचे खायला मिळेल. फळझाडांमध्येही एका प्रकारचे एक किंवा दोन झाडेच असली तरी हरकत नको. फळांची भरपूर व्हरायटी असेल आणि कुठल्या ना कुठल्या मोसमात कुठले ना कुठले फळ खायला मिळेल.
आमच्यापुढे असलेले मुख्य प्रश्न
1. विदर्भात सगळ्या प्रकारची फळझाडे जगू शकतील का? मला काजू, जाम, फणस सारखी कोंकण पट्टीची झाडे आणि सफरचंद, नासपाती, आलुबुखारा सारखी थंड हवेतली झाडे पण लावून पहायची आहेत. किवी फळ विदर्भात जगवायचा प्रयत्न कोणी केला आहे का? आमच्या शेजाऱ्यांनी रांगेने माड लावले होते. पण आजूबाजूला इतर झाडे असणारे तेव्हढे जगले. थेट उन्हाच्या झावा बसणारी, मोकळ्या जागेतली नारळी तग धरू शकली नाही उन्हाळ्यात. तो अनुभव पाहता नारळ वगैरे प्लॉटच्या आतल्या भागात लावायचा विचार आहे.
2. आंब्यासारखी डेरेदार झाडे कुठे लावावी? भविष्यात ह्या झाडांची सावली एवढी दाट व्हायला नको की, भाजीचे वाफे जगणारच नाहीत. पण बाहेरच्या बाजूने लावले तर लोकच दगड मारतील किंवा कुंपणावरून तोडतील. हासुद्धा विचार करायला पाहिजे. कुंपणाशेजारी कोणती झाडे लावायला पाहिजे?
3. एक विचार असा आला की एक तृतीयांश भाग निव्वळ मोठ्या झाडांना द्यावा. तिकडे झाडे जवळजवळ असतील. उर्वरित दोन तृतीयांश भागात जास्त अंतर ठेवून इतर झाडे, शक्यतो कमी सावलीची, कमी पसरणारी लावावी म्हणजे मध्ये मोकळ्या जागेत वाफे छान तग धरतील. कैसा खयाल है?
4. नेहमीच्या वापरातील काही औषधी झाडे पण लावायचे ठरवले आहे. आवळा, हिरडा बेहळा, अश्वगंधा, सर्पगंधा, अडुळसा, तुळस, जास्वंद, कोरफड वगळता इतरही काही नेहमी कामी येणारी औषधी झाडे सुचतात का?
5. एकूण किती झाडे एवढ्या जागेत बसवता येतील? जागेचा जास्ती जास्त सुयोग्य वापर कसा करता येईल? बागेच्या रचनेच्या अजून काही कल्पना सुचतात का?
6. ठिबक सिंचन यंत्रणा बसवणार आहोत. तेवढीच पाण्याची बचत! टाइमर वगैरे लावायला जास्तीचा किती खर्च येईल? जैन इरिगेशन वगळता दुसरा कोणताही सप्लायर माहीत नाही. तुम्हाला काही नावे माहीत आहेत का?
अजून काही प्रश्न आले डोक्यात तर कमेंटमध्ये विचारणार. सध्या पुरे.
धन्यवाद.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
11462
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुलांसाठी पांढरा जाम,राय आवळे
केळीचं झाड पाणी वाहत्या
तिकडे फक्त एक खोली तेवढी
In reply to केळीचं झाड पाणी वाहत्या by अजया
टायमर साठी ही लिंक बघा :http:
लिंकसाठी धन्यवाद. पाहतो तिकडे
In reply to टायमर साठी ही लिंक बघा :http: by sandeepn
वाह..!
मस्त रे स्वाम्या!
आईबाबांची नातवंडे काय! नोटेड.
In reply to मस्त रे स्वाम्या! by पैसा
लक्ष ठेवा
In reply to आईबाबांची नातवंडे काय! नोटेड. by कैलासवासी सोन्याबापु
एक नातू आहे की आधीच! भविष्यात
In reply to लक्ष ठेवा by पैसा
विषयंतरा साठी क्षमस्व
मधुमालती किंवा रातराणी लावता
In reply to विषयंतरा साठी क्षमस्व by मानसी१
धन्यवाद
In reply to मधुमालती किंवा रातराणी लावता by कैलासवासी सोन्याबापु
स्वाम्या बावल्या
सगळी औजारे शक्यतो अशीच असतील
In reply to स्वाम्या बावल्या by कैलासवासी सोन्याबापु
मस्त धागा आहे. चान्गली माहिती
In reply to सगळी औजारे शक्यतो अशीच असतील by स्वामी संकेतानंद
झाडीबोली, वर्हाडी मिक्स आहे.
In reply to मस्त धागा आहे. चान्गली माहिती by उल्का
काहीशी उध्धट वाटते. माझा
In reply to झाडीबोली, वर्हाडी मिक्स आहे. by स्वामी संकेतानंद
नाय ओ!
In reply to काहीशी उध्धट वाटते. माझा by उगा काहितरीच
झाडीबोली - प्रथमच ऐकले हे नाव
In reply to झाडीबोली, वर्हाडी मिक्स आहे. by स्वामी संकेतानंद
मिसळपाव वर झाडीबोलीत एकेक
In reply to झाडीबोली - प्रथमच ऐकले हे नाव by उल्का
भाज्याचे वाफे कसे छान बनवतात
रत्नांग्री म्हणजे थेट दुसरे
In reply to भाज्याचे वाफे कसे छान बनवतात by कंजूस
५० बाय ९६ फूट?? त्यात वनरूम
भरपूर जागा आहे
In reply to ५० बाय ९६ फूट?? त्यात वनरूम by आनंदी गोपाळ
भरपूर जागा होते हो. खोली 12
In reply to ५० बाय ९६ फूट?? त्यात वनरूम by आनंदी गोपाळ
आयला!!