बागेसंदर्भात सल्ला हवा आहे
गावाकडे म्हणजे विदर्भात एक 50ft×96ft एक प्लॉट घेतलाय. आजूबाजूला सध्या तरी उघडे माळ आहे. या प्लॉटवर आईबाबांना विरंगुळा म्हणून आणि त्यांची नातवंडे गावाकडे आली की त्यांच्यासाठी नवल आणि बदल म्हणून एक छोटीशी बाग उभी करायचे योजिले आहे. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ईशान्य कोनावर बोर घेतली. पाणी भरपूर आहे. वीज जोडणी आणि सबमर्सिबल पंप ही दोन्ही महत्वाची कामे झाली आहेत. माळ असल्याने पक्के कुंपण उभारणीचे काम सध्या सुरु आहे. एक 12×12 ची पूर्वाभिमुख खोली, संडासबाथरूम एक कोपऱ्यात असेल. ईशान्येलाच बोअरशेजारी गेट असेल.
बाग नेमकी कशी असावी यावर घरी सध्या भरपूर काथ्या कुटला जात आहे. चार पैसे मिळावे हा उद्देश अजिबात नाही. पहिले प्राधान्य फळझाडांना आहे. जास्तीत जास्त प्रकारची फळझाडे लावायचा विचार आहे. तसेच लहान लहान वाफे करून तिथे घरगुती गरजेपुरते आले, हळद, कांदे, लसूण, मिरची, टोमॅटो, भेंडी, कारले, वांगी, कोबी, पालक, मेथी वगैरे लावायचा पण विचार आहे. बुढाबुढीच्या गरजेपुरता भाजीपाला असणार त्यामुळे रासायनिक खते, कीटकनाशके वगैरे वापरायचा विचार नाही. तसेच नातवंडे होळी-दिवाळीत गावी आली की त्यांनाही कीटकनाशकविरहित ऑरगॅनिक, घरचे खायला मिळेल. फळझाडांमध्येही एका प्रकारचे एक किंवा दोन झाडेच असली तरी हरकत नको. फळांची भरपूर व्हरायटी असेल आणि कुठल्या ना कुठल्या मोसमात कुठले ना कुठले फळ खायला मिळेल.
आमच्यापुढे असलेले मुख्य प्रश्न
1. विदर्भात सगळ्या प्रकारची फळझाडे जगू शकतील का? मला काजू, जाम, फणस सारखी कोंकण पट्टीची झाडे आणि सफरचंद, नासपाती, आलुबुखारा सारखी थंड हवेतली झाडे पण लावून पहायची आहेत. किवी फळ विदर्भात जगवायचा प्रयत्न कोणी केला आहे का? आमच्या शेजाऱ्यांनी रांगेने माड लावले होते. पण आजूबाजूला इतर झाडे असणारे तेव्हढे जगले. थेट उन्हाच्या झावा बसणारी, मोकळ्या जागेतली नारळी तग धरू शकली नाही उन्हाळ्यात. तो अनुभव पाहता नारळ वगैरे प्लॉटच्या आतल्या भागात लावायचा विचार आहे.
2. आंब्यासारखी डेरेदार झाडे कुठे लावावी? भविष्यात ह्या झाडांची सावली एवढी दाट व्हायला नको की, भाजीचे वाफे जगणारच नाहीत. पण बाहेरच्या बाजूने लावले तर लोकच दगड मारतील किंवा कुंपणावरून तोडतील. हासुद्धा विचार करायला पाहिजे. कुंपणाशेजारी कोणती झाडे लावायला पाहिजे?
3. एक विचार असा आला की एक तृतीयांश भाग निव्वळ मोठ्या झाडांना द्यावा. तिकडे झाडे जवळजवळ असतील. उर्वरित दोन तृतीयांश भागात जास्त अंतर ठेवून इतर झाडे, शक्यतो कमी सावलीची, कमी पसरणारी लावावी म्हणजे मध्ये मोकळ्या जागेत वाफे छान तग धरतील. कैसा खयाल है?
4. नेहमीच्या वापरातील काही औषधी झाडे पण लावायचे ठरवले आहे. आवळा, हिरडा बेहळा, अश्वगंधा, सर्पगंधा, अडुळसा, तुळस, जास्वंद, कोरफड वगळता इतरही काही नेहमी कामी येणारी औषधी झाडे सुचतात का?
5. एकूण किती झाडे एवढ्या जागेत बसवता येतील? जागेचा जास्ती जास्त सुयोग्य वापर कसा करता येईल? बागेच्या रचनेच्या अजून काही कल्पना सुचतात का?
6. ठिबक सिंचन यंत्रणा बसवणार आहोत. तेवढीच पाण्याची बचत! टाइमर वगैरे लावायला जास्तीचा किती खर्च येईल? जैन इरिगेशन वगळता दुसरा कोणताही सप्लायर माहीत नाही. तुम्हाला काही नावे माहीत आहेत का?
अजून काही प्रश्न आले डोक्यात तर कमेंटमध्ये विचारणार. सध्या पुरे.
धन्यवाद.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
मुलांसाठी पांढरा जाम,राय आवळे
केळीचं झाड पाणी वाहत्या
तिकडे फक्त एक खोली तेवढी
टायमर साठी ही लिंक बघा :http:
लिंकसाठी धन्यवाद. पाहतो तिकडे
वाह..!
मस्त रे स्वाम्या!
आईबाबांची नातवंडे काय! नोटेड.
लक्ष ठेवा
एक नातू आहे की आधीच! भविष्यात
विषयंतरा साठी क्षमस्व
मधुमालती किंवा रातराणी लावता
धन्यवाद
स्वाम्या बावल्या
सगळी औजारे शक्यतो अशीच असतील
मस्त धागा आहे. चान्गली माहिती
झाडीबोली, वर्हाडी मिक्स आहे.
काहीशी उध्धट वाटते. माझा
नाय ओ!
झाडीबोली - प्रथमच ऐकले हे नाव
मिसळपाव वर झाडीबोलीत एकेक
भाज्याचे वाफे कसे छान बनवतात
रत्नांग्री म्हणजे थेट दुसरे
५० बाय ९६ फूट?? त्यात वनरूम
भरपूर जागा आहे
भरपूर जागा होते हो. खोली 12
आयला!!