उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम्
वर्ष तत् भारतं नाम भारती यत्र संततिः
समुद्राच्या उत्तरेला आणि हिमाद्रीच्या दक्षिणेतल्या भू भागाला भारत असे म्हणतात. या भारतभूमीची संतति इथे निवास करते.
अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते.
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी.
हे लक्ष्मणा, सुवर्ण लंकेचा राजा बनण्यापेक्षा अयोध्येत भरताच्या अधीन सेवक राहणे अधिक रास्त कारण माता आणि मातृभूमी स्वर्गापेक्षा हि महान आहे.
पुरातन काळापासूनच आपण आपल्या भरत भूमीला आई म्हणतो. युरोपियन लोक हि देशाला पितृभूमी म्हणतात. एकदा का देशाला आपण माता /पिता मानले कि देशात बंधुत्वाचे वातावरण आपसूक निर्मित होते. जिथे सोख्य असेल तिथे शांती, आणि समृद्धी हि आलीच
प्रकृतीने हिमालयापासून समृद्रापर्यंत एक विशिष्ट भूभागाची रचना केली आहे. या भू-भागात अनेक भाषा-भाषी, पंथ आणि जातींचे लोक राहतात. एकाच राजाचे राज्य नेहमीच या भूभागावर राहील, हे संभव नाही. सत्तेसाठी युद्ध हे अटळ आहेच. आपल्या देशात सत्ता बदलली तरी लोकांवर जास्त अत्याचार होत नव्हते. कारण लोकांमध्ये बंधुत्व भाव आहे.
आपले ऋषी-मुनि दूरदर्शी होते. धर्म आणि जातीच्या नावाने संपूर्ण भरत भूमीत राहणार्या लोकांना सांस्कृतिक दृष्ट्या एक सूत्रात बांधणे शक्य नाही हे त्यांना माहित होते. प्रत्येकाला त्याचीच भाषा, जाती आणि पंथ श्रेष्ठ वाटतो. पण देशाच्या मातीप्रती लोकांच्या मनात आत्मीयता उत्पन्न करणे शक्य होते. आपल्या ऋषींनी हेच केले. सकाळी म्हणण्याचे श्लोक म्हणजे प्रात:स्मरणची रचना केली. लोकांच्या मनात देशाची माती आणि तिथे जन्मलेल्या महापुरुषांप्रती आदर भाव जागृत करणे हाच दूरदर्शी ऋषींचा उदेष्य हेतू होता. उदा:
गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती.
नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधि कुरु.
महेन्द्रो मलय: सह्ये देवतात्मा हिमालय:.
ध्येयो रैवतको विन्ध्यो गिरिश्चारावलिस्तथा.
अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका.
पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिका.
रोज सकाळी प्रात:स्मरण केल्याचा परिणाम, लोकांच्या मनावर नकळत होतोच. घरात नळाच्या पाण्याने किंवा गावात विहिरीच्या पाण्याने, स्नान करत असताना आपण देशातील सर्व नद्यांच्या पाण्याने आंघोळ करण्याचा आनंद घेतो. यमुनेच्या पाण्यात स्नान करताना माझ्या मनात कावेरी नदीत स्नान करण्याची इच्छा उत्पन्न होते. सर्व पर्वतांचे आणि नगरांचे दर्शन घेण्यासाठी यात्रेची इच्छा होणारच.
भरतभूमी वर जन्म घेणार्या आपल्या पूर्वजांप्रती आपल्या मनात आदर आणि श्रद्धा निर्माण करण्याचे काम हि आपल्या ऋषींनी केले. भारतभूमीत जन्म घेणारी महान विभूती मग ती स्त्री असो वा पुरुष, त्यांची स्मृती नेहमी आपल्याला राहावी म्हणून त्यांना हि प्रात:स्मरणात स्थान दिले. आयुष्यभर संघर्ष करून आपले उद्दिष्ट साध्य करणार्या आपल्या ५ महान स्त्रियांचे आपण रोज प्रात: स्मरण करतो:
अहल्या द्रोपदी सीता तारा मंदोदरी तथा.
पंचकन्या स्मरेनित्यं महापातक नाशनम्.
तसेच पुण्यश्लोको नलो राजा... ‘अश्वत्थामा बलिर्व्यासो... सारांश अश्यारीतीने पुरातन ऋषींनी आपल्या मनात या देशाच्या माती आणि पूर्वजांच्या प्रती आपल्या मनात आदर आणि भक्तीभाव उत्पन्न केला. आज आपण आपल्या पूर्वजांची पूजा करतोच मन देशाच्या मातीला ‘भारत माँ’ संबोधून तिची हि पूजा करतो.
जेंव्हा देशाचे राजकीय दृष्ट्या शेकडों तुकडे झालेले होते, त्याच वेळी आदी शंकराचार्यांनी देशाच्या चारी भागात चार मठांची स्थापना केली. चार धाम यात्रेची सुरवात बहुधा आदी शंकराचार्यांमुळेच सुरु झाली असेल. शाक्त पंथीयांनी देशात विभिन्न भागात (पाकिस्तान सहित) ५२ शक्तीपीठांची स्थापना केली. शैवांनी देशात विभिन्न प्रांतात १२ ज्योतिर्लिंगांची स्थापना केली. जवळपास सर्व हिंदू तीर्थ क्षेत्री जैनांनी सुद्धा आपली मंदिरे उभारली. गुरु गोविंद जर काही काळ आणिक जिवंत राहिले असते तर निश्चित कन्याकुमारीला हि एक गुरुद्वारा बांधला असता. असो. आज हि विभिन्न स्थानांवर भरणार्या कुंभ मेळ्यात देशातील सर्व ठिकाणाहून यात्रेकरू येतात, सर्व पंथीय साधू सन्यासी, यात्री एकत्र बसून चर्चा करतात. अश्यारितीने देशातील सर्वपंथांनी, या मातीप्रती लोकांचे प्रेम, श्रद्धा आणि आदरण निर्माण करण्यात महत्वाचे योगदान दिले आहेत.
देशाला मातृभूमी किंवा आई मानण्याने, देशात राहणार्या लोकांमध्ये बंधुभाव निर्माण होतोच या शिवाय एक राजनीतिक सत्ता स्थापन करण्यात हि यश येते. आपल्या देश्यात शेकडों चक्रवर्ती झाले. एकदा दिल्ली काबीज केली कि संपूर्ण देशाची सत्ता सहज प्राप्त होत होते हे आपण इतिहासात पाहिलेच आहे. आत्ताचेच उदाहरण घ्या. देशाला स्वतंत्रता मिळण्याच्या वेळी देशात ६०० पेक्षा जास्त राजे-महाराजे होते. त्यातील अधिकांश राजा-महाराजांनी स्व:खुशीने आपल्या राज्यांचे भारतात विलीनीकरण केले. तेथील जनतेने हि विरोध केला नाही. कारण विभिन्न राज्यात राहणारी लोक या देशाला ‘भारत माँ’ म्हणून ओळखत होते. भारतमाते प्रती त्यांच्या मनात श्रद्धाभाव होता.
इस्लाम मध्ये देशाला मातृभूमी मानण्याची अवधारणा नाही. पण धर्मावर आधारित बंधुभावाची अवधारणा आहे. त्यांच्या मनात आपल्या गैर इस्लामिक पूर्वजांप्रती सम्मानाची भावननेला हि स्थान नाही. तेथील जनतेला एकत्र ठेवण्याचा कुठलाच दुआ उरलेला नाही. एकाच देशात राहणारे लोक, एकच धर्म मानणारे, पंथ, कबीला, जातीच्या नावावर एका दुसर्याच्या विरुद्ध लढत आहे. कोण स्वकीय आणि कोण परीकीय हे कळण्याची बुद्धी हि त्यांच्यात उरलेली नाही. जे लोक त्यांच्या कबील्याचे किंवा पंथाचे नाही, त्यांची हत्या करण्यात त्यांना काहीच वाईट वाटत नाही आहे. मग लहान मुले असो किंवा स्त्रिया सर्वांचाच वध होतो. लाखोंच्या संख्येने लोकांना आपली जन्मभूमी सोडून शरणार्थी बनावे लागले आहे. ह्या देशांचा संपूर्ण विनाश झालेला आहे. एकच धर्म मानणारे बंधुभावाने राहू शकतात, हि अवधारणा फोल ठरली आहे. गेल्या शतकात दोन विश्व युद्ध इसाई धर्म मानणार्या युरोपियन देशांत झाले. नेपाल हिंदू धर्मावलंबी असला तरी भारताशी त्याचे संबंध चांगले नाही. इस्लामी देशांची परिस्थिती तर आपण पाहताच आहोत..
ज्या देशांत त्यांची पूर्वजांना सम्मान दिल्या जातो, तेथील परिस्थिती वेगळी आहे. इराणी लोक आज हि अग्निपूजक जाल, रुस्तम, सोहराब यांचे तराणे गातात, तिथे शांती आहे. ५००० पेक्षा जास्त द्वीपसमूह आणि भारताप्रमाणे भिन्न-भिन्न जनजातीय असलेल्या इंडोनेशियात लोक एकत्र राहतात. रामायण आणि महाभारतातल्या कथांनी आणि चीनी परंपररेनी तिथल्या लोकांना एकत्र जोडलेले आहे. मिस्त्रच्या लोकांना आपल्या पिरामिड आणि त्यांना बनविणार्या पूर्वजांवर गर्व आहे. नील नदी प्रती त्यांच्या मनात आदर भाव आहे. परंतु आजकाल इस्लामी कट्टरता त्यांच्या मनात त्यांच्या पूर्वजांप्रती अनादर निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचेच परिणाम आज मिस्त्रचे लोक भोगत आहेत.
१९४७ मध्ये भारताच्या ज्या भागात इस्लाम मानणारे लोकांची संख्या जास्त होती, तो भूभाग देशापासून वेगळा झाला त्याचे कारण हेच. पण हे इथेच थांबणार नाही, देशाच्या मातीप्रती आदर नसल्यामुळे पाकिस्तानचे भविष्यात आणखीन हि तुकडे होण्याची संभावना नाकारता येत नाही. आज तिथे अराजकतेचे वातावरण आहे. बलूच, पठाण, पंजाबी, शिया, सुन्नी सर्वच दुसर्याला आपले शत्रू समजतात. जर इस्लामी जगात शांतता प्रस्थापित करायची असेल तर मातृभूमीला आईचे स्थान देण्याची अवधारणा इस्लाम मध्ये समाविष्ट करावी लागेल. अर्थात हे कार्य इस्लामी विद्वानांच करावे लागेल. एकदा देशाला आई म्हंटले कि त्या भूमीत जन्म घेणार्या सर्व पंथीय आणि जातीय लोकांविषयी बंधुत्व भाव आपसूक निर्माण होतो. लोक एका दुसर्याला जाणण्याचा प्रयत्न करतात. देशात शांती प्रतिस्थापित होते.
आज आपल्या देशाला ‘भारत माता’ म्हणण्याचा विरोध काही अतिशहाणे पुरोगामी करीत आहे. एक तर त्यांना इतिहासाचे ज्ञान नाही. होणार तरी कसे? अंग्रेजानी देशावर राज्य करण्यासाठी ‘फूट डालो राज करो’ च्या नीतीचे अवलंबन केले होते. त्या साठी त्यांनी आपल्या पुरातन इतिहासालाच खोटे ठरविले. हेतू आपल्या पूर्वजांप्रती आपली श्रद्धा नष्ट करणे. एकदा लोकांच्या मनात ते वेगवेगळे आहेत, हि भावना रुजविली कि त्यांच्यात दुही माजविण्यात यश येतेच. त्याच साठी देवासुर संग्राम म्हणजे आर्य आणि द्रविडांचे युद्ध. असा इतिहास शिकवणे सुरु केले. आज देशाला स्वत्रंत होऊन हि ७० वर्षे झाली तरी हि आपल्याला पूर्वजांचा खरा इतिहास शिकविला जात नाही. अंग्रेजानी त्यांच्या स्वार्थासाठी तैयार केलेला खोटा इतिहास शिकून तैयार झालेले अतिशहाणे आपल्या भूमीला ‘माता’ कसे मानणार. भारत मातेच्या बर्बादीचे नारे लावणारे त्यांचे हिरो झालेले आहे. या विद्वानांना एवढे हि कळत नाही, एकदा भारत माते विषयी आपली श्रद्धा नष्ट झाली तर या मातीचे शंभर तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. मग लिबिया आणि इराक सारखी आपली गत व्हायला कितीस वेळ लागेल.
हे टाळायचे असेल, तर उद्यापासूनच आपल्या मुला-बाळांना प्रात: स्मरणीय श्लोक शिकवा. आपल्या देशातील नद्या, पर्वत, पवित्र सरोवरे, पुरातन ऋषी-मुनि, राजा-महाराजा, बादशाह आपले सणवार त्यांच्या मागच्या कहाण्या इत्यादी बाबत माहिती दिली तरी चालेल.
याद्या
32688
प्रतिक्रिया
184
मिसळपाव
लेख आवडला. विचार करण्यासारखा आहे.
हं
कुणीच सुखाने गादी त्याग करीत
In reply to हं by mugdhagode
बहादूरशाह ची खंत
In reply to हं by mugdhagode
सारे जहाँ से अच्छा
स्वतंत्र पाकिस्तानच्या
In reply to सारे जहाँ से अच्छा by तर्राट जोकर
अगदी अगदी, अचूक पकडलेत. जसे
In reply to स्वतंत्र पाकिस्तानच्या by मृत्युन्जय
काय बोलता? म्हणजे कवी इक्बाल
In reply to अगदी अगदी, अचूक पकडलेत. जसे by तर्राट जोकर
मी असं कधी म्हटलं?
In reply to काय बोलता? म्हणजे कवी इक्बाल by मृत्युन्जय
म्हणजे स्वतंत्र पाकिस्तानच्या
In reply to मी असं कधी म्हटलं? by तर्राट जोकर
अगदी अगदी. आधीच तर सांगितले
In reply to म्हणजे स्वतंत्र पाकिस्तानच्या by मृत्युन्जय
काय झाले की ती गांधी
In reply to अगदी अगदी. आधीच तर सांगितले by तर्राट जोकर
मुस्लिम राष्ट्र, पण वर
In reply to काय झाले की ती गांधी by मृत्युन्जय
आता कन्फुझ व्हायची पाळी माझी. ;)
In reply to मुस्लिम राष्ट्र, पण वर by तर्राट जोकर
इफ ओन्ली यु कुड हॅव
In reply to आता कन्फुझ व्हायची पाळी माझी. ;) by ईश्वरसर्वसाक्षी
अहो म्हणुनच तसे म्हणालो ना
In reply to इफ ओन्ली यु कुड हॅव by तर्राट जोकर
माझा प्रश्न तसाच राहिला. पण
In reply to मुस्लिम राष्ट्र, पण वर by तर्राट जोकर
तुमच्या प्रश्नाचे उत्तर
In reply to माझा प्रश्न तसाच राहिला. पण by मृत्युन्जय
कसे हवे तेवढेच वाचता हो
In reply to तुमच्या प्रश्नाचे उत्तर by तर्राट जोकर
धन्यु तजो हे काव्य इथे दिल्या
In reply to सारे जहाँ से अच्छा by तर्राट जोकर
मझहब नही सिखाता आपस मे बैर रखना
In reply to सारे जहाँ से अच्छा by तर्राट जोकर
मझहब नही सिखाता आपस मे बैर
बाकी हिंदू-मुस्लिम, भारत,
In reply to मझहब नही सिखाता आपस मे बैर by तर्राट जोकर
आयत्या पिठावर रेघोट्या
In reply to बाकी हिंदू-मुस्लिम, भारत, by मृत्युन्जय
स्वातंत्रय लढ्यापासून चार हात
In reply to आयत्या पिठावर रेघोट्या by तर्राट जोकर
व्यक्तींबद्दल नाही,
In reply to स्वातंत्रय लढ्यापासून चार हात by मृत्युन्जय
कम्युनिस्ट होते असे.
In reply to व्यक्तींबद्दल नाही, by तर्राट जोकर
ज्या स्वातंत्र्य युद्धात तर
In reply to कम्युनिस्ट होते असे. by बोका-ए-आझम
‘‘चीनो अरब हमारा हिंदूस्ताँ
In reply to मझहब नही सिखाता आपस मे बैर by तर्राट जोकर
उपरोल्लिखित कविता ही कवी
In reply to ‘‘चीनो अरब हमारा हिंदूस्ताँ by सुधीरन
मौक्तिके अशीच बरसू द्या
In reply to मझहब नही सिखाता आपस मे बैर by तर्राट जोकर
का ??
If you are sitting outside
In reply to का ?? by अर्धवटराव
and who decides this ?
In reply to If you are sitting outside by तर्राट जोकर
देशप्रेम, इतीहास वगैरे विषय
In reply to and who decides this ? by अर्धवटराव
म्हणजे कोणि ??
In reply to देशप्रेम, इतीहास वगैरे विषय by तर्राट जोकर
पूर्ण वाक्य आहे हो. तरीबी
In reply to म्हणजे कोणि ?? by अर्धवटराव
खरच कळत नाहिए
In reply to पूर्ण वाक्य आहे हो. तरीबी by तर्राट जोकर
But if you have enough
In reply to If you are sitting outside by तर्राट जोकर
And who are you to decide my
In reply to But if you have enough by DEADPOOL
छान लेख... बाबी विचार
..
लेख पटला नाही-
प्रतिसाद आवडला.
In reply to लेख पटला नाही- by विशाखा पाटील
असं का व्हावं
In reply to लेख पटला नाही- by विशाखा पाटील
विशाखा ताई, समाजात नेहमीच दोन
In reply to लेख पटला नाही- by विशाखा पाटील
तुम्ही ज्या शब्दांना मराठी
In reply to विशाखा ताई, समाजात नेहमीच दोन by विवेकपटाईत
हम्म
लब्बाड
हे टाळायचे असेल, तर
मी इथे बादशाह शब्द हि टाकला
In reply to हे टाळायचे असेल, तर by मराठी कथालेखक
आपल्या गैर इस्लामिक
In reply to मी इथे बादशाह शब्द हि टाकला by विवेकपटाईत
राम कृष्ण माझे नव्हे तर इतर
In reply to मी इथे बादशाह शब्द हि टाकला by विवेकपटाईत
राज्यघटना आणि लोकशाही मुल्य!
In reply to राम कृष्ण माझे नव्हे तर इतर by मराठी कथालेखक
भारतात फक्त हिंदू राज्यघटना
In reply to राज्यघटना आणि लोकशाही मुल्य! by ट्रेड मार्क
हास्यास्पद का?
In reply to भारतात फक्त हिंदू राज्यघटना by तर्राट जोकर
काहिच्या काही विधानं तुम्ही
In reply to हास्यास्पद का? by ट्रेड मार्क
अपेक्षित प्रतिसाद
In reply to काहिच्या काही विधानं तुम्ही by तर्राट जोकर
तुमच्या वाक्यातच विदा आहे मी
In reply to अपेक्षित प्रतिसाद by ट्रेड मार्क
हा हा
In reply to तुमच्या वाक्यातच विदा आहे मी by तर्राट जोकर
तुमच्या कलगीतुर्यात बोलतो आहे म्हणून आगाऊ माफ़ी मागतो, पण
In reply to अपेक्षित प्रतिसाद by ट्रेड मार्क
नाय बा
In reply to तुमच्या कलगीतुर्यात बोलतो आहे म्हणून आगाऊ माफ़ी मागतो, पण by नाना स्कॉच
मला
In reply to नाय बा by पैसा
माहीतगार साहेब कृपया इकडे लक्ष देणे (विकी लिंक असल्यामुळे ही विनंती करतोय)
इस्लामिक बँकिंग मध्ये व्याज
In reply to राज्यघटना आणि लोकशाही मुल्य! by ट्रेड मार्क
फायदा वाटून घ्यावा
In reply to इस्लामिक बँकिंग मध्ये व्याज by मराठी कथालेखक
,,
In reply to मी इथे बादशाह शब्द हि टाकला by विवेकपटाईत
.....
In reply to ,, by mugdhagode
चला, परत पंख लागण्याची तयारी चालू आहे.
In reply to ..... by mugdhagode
पटाईतकाका
..
संघाच्या लोकांनी त्यांच्या
In reply to .. by mugdhagode
जनत
उगाच हवेत भावनिक गोळीबार लेख!
अरब देशात त्यांच्या जातीनिहाय
मोकळ्या वावरात मोकळे
मोकळ्या वावरात मोकळे
नाय बॉ आम्हि लंडन ला जात असतो
बापाची कबर वाळायच्या आत
ह्या
In reply to बापाची कबर वाळायच्या आत by गॅरी शोमन
नियोग
In reply to ह्या by नाना स्कॉच
नियोगाचे नियम वाचले!
In reply to नियोग by बोका-ए-आझम
शिवाय
In reply to नियोगाचे नियम वाचले! by नाना स्कॉच
सगळ्यांचा संबंध फ़क्त वारस अन दमड़ी ह्याच्याशी असतो,
हे वाक्य चुक ठरते काय???हजारो वर्षांपूर्वीची पद्धत
In reply to नियोगाचे नियम वाचले! by नाना स्कॉच
दुरुस्ती
In reply to हजारो वर्षांपूर्वीची पद्धत by ट्रेड मार्क
इथे एक दोन दशकांपूर्वी
In reply to हजारो वर्षांपूर्वीची पद्धत by ट्रेड मार्क
तुम्हाला बोलण्याचा रोख कळत नाही बहुतेक
In reply to इथे एक दोन दशकांपूर्वी by तर्राट जोकर
आम्ही कधीच गोल गोल फिरत नाही
In reply to तुम्हाला बोलण्याचा रोख कळत नाही बहुतेक by ट्रेड मार्क
अशी तुमची समजूत आहे
In reply to आम्ही कधीच गोल गोल फिरत नाही by तर्राट जोकर
व्यभिचार कसला त्यात?
In reply to नियोगाचे नियम वाचले! by नाना स्कॉच
एक एक करुन उत्तरे माझ्यापरीने
In reply to व्यभिचार कसला त्यात? by बोका-ए-आझम