Skip to main content

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १७: रस्ता: मतदान

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 21/04/2016 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, छायाचित्रणकला स्पर्धेच्या १७व्या भागाला दिलेल्या प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद. स्पर्धकांबरोबर त्यांना प्रोत्साहन देणार्‍या सर्वांचेच विशेष आभार. या स्पर्धेच्या मतदानासाठी हा धागा आहे. नेहमीप्रमाणेच वाचकांनी आपली मते १, २, ३ अशी नोंदवावीत ही विनंती. तसे क्रमांक का द्यावेसे वाटले याबद्दलही जरूर लिहा. आपली मते आजपासून १० दिवस, म्हणजे ३० तारखेपर्यंत नोंदवावीत ही विनंती. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा! फोटोज मोठ्या आकारमानात पाहायचे असल्यास त्यावर क्लिक करावे. क्र. १ झायन नॅशनल पार्क (युटा, युएसए) येथील 'एंजल्स लँडिंग' हा चित्तथरारक ट्रेल क्र. २ पावसाळी प्रदेशाकडे घेऊन जाणारा हवा हवासा रस्ता क्र. ३ खंडाळ्याच्या घाटासाठी क्र. ४ तापोळा जवळच्या जंगलातली ही पायवाट क्र. ५ विमानातून दिसलेला महामार्ग क्र. ६ कॅनडाच्या विनिपेग शहरातील पोर्तेज अ‍ॅव्हेन्युचा टॉप अँगलने घेतलेला हिवाळ्यातील फोटो क्र. ७ वळणवाट क्र. ८ ही वाट दूर जाते.. क्र. ९ दुबईच्या शेख झायेद रस्त्यावरील एक चौक क्र १० झेड ब्रिजच्या रस्त्यावर क्र. ११ ही वाट खोल जाते... क्र. १२ सुदूर वसलेल्या वाडी कडे जाणारी एक वाट क्र. १३ 'वळत नकळत' - एक नागमोडी वळणांचा रस्ता (येऊर, जिल्हा ठाणे) क्र. १४ वसंत ऋतूमध्ये टिपलेला एक रस्ता क्र. १५ माझ्या गावातला एक रस्ता क्र. १६ हिवाळ्यात काश्मीरमधील गुलमर्ग येथे जाताना टिपलेला रस्ता प्रथमच मतदान करणार्‍यांसाठी संदर्भ - छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१५ मतदान. जाहीरपणे मतदान करायचे नसल्यास साहित्य संपादक या आयडीला संदेशाद्वारे मत पाठवू शकता.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 14833
प्रतिक्रिया 47

प्रतिक्रिया

In reply to by चांदणे संदीप

७ = आयडियल रस्ता! डोंगरातला असूनही (म्हणजे, लोकवस्तीपासून कदाचित दूर) त्यावरचे पांढरे व पिवळे पट्टे फिके पडलेले नाहीत हे विशेष! छान ढगाळलेल्या वातावरणात बहुधा हा फोटो घेतलेला असावा, त्यामुळे प्रकाशाचा टोन अगदी परफ़ेक्ट! समोर सुंदर निसर्गचित्र! सुंदर रस्ता, सुंदर फोटो! फक्त तो एक लोखंडी खांब नसता तर १० पैकी १० गुण दिले असते, आता साडेनऊ! ;) १३ = स्वप्नातला वाटावा असा रस्ता! निवांत, सरळमार्गी! रस्त्याच्या बाजूची रानफुले जणु शिस्तीत रांग लावून आपल्याला जाताना पाहण्यासाठी रांग लाऊन उभी आहेत असे वाटते! झकास फोटो! १४ = अशा रस्त्यांवरून बाईक अथवा सायकल वळणावळणाने दामटत जायची मजाच और आहे! अशाच काही जुन्या आठवणींमुळे या रस्त्याला/फोटोला निवडले. Sandy

क्रमांक १- क्र. ४ तापोळा जवळच्या जंगलातली ही पायवाट क्रमांक २-क्र. १३ 'वळत नकळत' - एक नागमोडी वळणांचा रस्ता (येऊर, जिल्हा ठाणे) क्रमांक ३ क्र. १५ माझ्या गावातला एक रस्ता

१) क्र. २ पावसाळी प्रदेशाकडे घेऊन जाणारा हवा हवासा रस्ता २) क्र. ११ ही वाट खोल जाते... ३) क्र. ९ दुबईच्या शेख झायेद रस्त्यावरील एक चौक सगळीच छायाचित्रे अप्रतिम आहेत. मतदान आणि स्पर्धा संपल्यावर, निकाल जाहीर झाल्यावर मिपाकरांकडून प्रत्येक छायाचित्राची सविस्तर माहिती वाचायला आवडेल.

१ -१६ २. -४ ३. २. पहिला तिसरा सहावा हेज मुळे फसलेले आहेत. यात फिल्टर वापरला असता तर हेच भारी ठरले असते,

१ - १६ २ - ८ ३ - १२ ८ आणि १२ हे रस्ते बघुन जुने दिवस आठवले. अश्याच गावच्या रस्त्यावरुन M80 मोटारसायकल दामटायचो.

आज २१ तारीख आहे. मत नोंदवण्याची वेळ गेली आहे ते एकापरीने बरे झाले. सगळेच फोटू आवडलेत डावे उजवे करता येणार नाही.

In reply to by रेवती

आज मतदानाचा पहिला दिवस आहे. मत नोंदवण्याची मुदत ३० एप्रिल रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री बारा वाजता संपेल.

In reply to by साहित्य संपादक

स्वारी हां, चुकून २० तारीख असे वाचले गेले. तरीही मत देणे अवघड आहे. ;)

क्र. १ साठी वळणवाट हा ७ क्र. रस्ता निवडण्याचे कारण आजूबाजूचा डोंगराळ परिसर, त्यातील न जाणवेल असे फिकट पिवळे ऊन व रस्त्यावरील पिवळे सॉलीड पट्टे उठून दिसतायत. डोंगरावर हिरवाई नाही तरी पिवळा रंग त्यात उत्साह आणतोय. क्र.२ साठी क्र. ३ हा खंडाळ्याच्या घाटाचा फोटू आवडलाय कारण अनेक रस्ते दिसतायत व त्यातील उजवीकडील रस्ते चंदेरी दिसतायत ते आवडले. एक जुना रस्ता बाजूला दिसतोय. क्र.३ माझ्या गावातील रस्ता, फोटू क्र.१५. हिरवाई व रस्त्यावरून येणारी एकच रिक्षा, उजव्या बाजूची खादीची पाटी असे सगळे गावाचा फील व प्रगतीची चाहूल देणारे चित्र वाटले. मुद्दाम झेड ब्रिजला मत देणे टाळले आहे कारण तो ब्रिज व त्यासंबंधित कोणताही फोटो आवडतोच.

In reply to by रेवती

क्र. १५ आजी, तु जे आवडलं म्हणाली ना, खादीची पाटी नेमकी मला ह्या फटुत तीच अस्थानी वाटली... प्रत्येकाचं मत वेगळ्म असु शकतं... कुणी जाणकार शंका निरसन करेल का??

In reply to by चौकटराजा

फोटो छानच आहे परंतु या धाग्यावर (मतदानाचा धागा) अस्थानी वाटत आहे. स्पर्धेचा धागा या फोटोसाठी अधिक योग्य व्यासपीठ आहे असे वाटते.

1: क्र.14- वसंत ऋतूमध्ये टिपलेला एक रस्ता 2: क्र.9 - दुबईच्या शेख झायेद रस्त्यावरील एक चौक 3: क्र.7 - वळणवाट पहिला रस्ता - वर निळेनिळे सुंदर आकाश , दुतर्फा दाट हिरवळ आणि त्यावर फुलांची आरास, हा सरळ मोकळा रस्ता,छान दिसतो. दुसरा रस्ता - व्यवहारिक, अपरिहार्य तिसरा रस्ता - रोडरॅश बाइक रेसिंग चा रस्ता

१. २ २. ७ ३. १४ (अंमळ फिल्मी/डॉक्टरड वाटत आहे, म्हणुन नाहीतर पहिला)

क्र. १ साठी वळणवाट हा ७ क्र. रस्ता क्र.२ साठी क्र. ३ हा खंडाळ्याच्या घाटाचा फोटू क्र.३ माझ्या गावातील रस्ता, फोटू क्र.१५

१) ७ २) २ ३) ४ क्र. १५ मधील पाटीवर 'खादी' नव्हे 'स्वादी' असे लिहिलेले आहे.

क्रमांक १- क्र. ४ तापोळा... हिरव्या झाडींमधुन जाणारी लाल नागमोडी वाट. क्रमांक २- क्र .२ पावसाळी प्रदेशाकडे.... कधीही पाउस पडायला सुरुवात होईल असे कूंद वातावरण. क्रमांक ३- क्र. ८ वाट दूर जाते.. माझ्या गावकडचा रस्ता अजुनही असाच लाल मातीचा आहे. गाडी (एस. टी) गेल्यावर धुराळा बाजुच्या झुडुपांवर बरसतो. जी बहुतेक करुन करवंदाचीच असतात.

१.-- क्र. २ पावसाळी प्रदेशाकडे घेऊन जाणारा हवा हवासा रस्ता २.-- क्र. ७ वळणवाट ३.-- क्र. १४ वसंत ऋतूमध्ये टिपलेला एक रस्ता

१) ७ , एक्स्पोझर एकदम बरोबर हातळलं आहे. कॉम्पोझिशन पण मस्त. २) १४ , रंग खुप सुंदर आहेत. थोडासा लो अँगल शॉट घेण्याचा प्रयत्न करून पहायला हवा होता. ३) २ , चांगला प्रयत्न केलाय. डावी कडे थोडी ब्रिदिंग रूम हवी होती. अजून थोडासा वाईड शॉट मस्त आला असता.

आतापर्यंत मतदान केलेल्यांचे आभार. ज्यांना मतदान करायचे आहे परंतु अजून केले नाही त्यांनी कृपया लक्षात घ्यावे की मतदानाची मुदत भारतीय प्रमाण वेळेनुसार उद्या रात्री १२ वाजता संपणार आहे.