Skip to main content

देव गाभाऱ्याबाहेर निघाला!

लेखक DEADPOOL यांनी मंगळवार, 19/04/2016 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
शून्य मनाने बसलो होतो गाभाऱ्यात आली ती पलीकडुन! सांगितले कानात येताहेत भेटायला तुला! किती आनंदलो मी! बहुता दिसा भेट होणार का जन्मासी आलो मी! जगण्याला अर्थ येणार आली ती देवळात निघाली माझ्याकडे येण्यासाठी! आता रिते झाले मन नवे वर्म भरून घेण्यासाठी! थांब कुलटा घणाघात झाला! परंपरा तोडशिल? मुलाला भेटायला! परंपरा आड आली भरल्या डोळ्याने परत निघाली! मुलाला भेटावयाची इच्छा इच्छा अधुरीच राहिली! माता गेली माघारी मुलाचा कोप झाला! आणि परंपरा तोडून देव गाभाऱ्याबाहेर निघाला!

वाचने 7291
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

कविता चांगली जमली आहे. -दिलीप बिरुटे

सुनीता विल्यम्स आणि कल्पना चावला अंतराळात भरारी मारुन आल्या. त्या नंतर देखिल स्त्रीयांच्या मंदिर प्रवेशा वरुन वादंग सुरु आहेतच. असल्या देवळांमधे देव सुध्दा रहात नसेल. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

आणि तुळजापुरला याची प्रचिती येते.. बिचारा खंडोबा अगदी पाठीशी शिल्ञा (वासाच्या) फुलांचे निर्माल्य आणि बडव्यांची अरेरावीत किती थांबणार तो केव्हाच बाहेर पडला असेल... कुठलाही नवसाचा आणि बिन नवसाचा अश्या भेदभावी लोकांना फाट्यावर मारणारा नाखु एक नमस्कार पुरेसा आहे

In reply to by बोका-ए-आझम

संपूर्ण समाजाला टार्गेट नाही करता येणार बोकाशेठ, पण आपण बोललात त्यात बऱ्याच अंशी तथ्य आहे !

In reply to by DEADPOOL

पण जे त्याला विरोध करत नाहीत किंवा तटस्थ राहतात त्यांचा दोष नक्कीच आहे.

In reply to by बोका-ए-आझम

दुर्जन+कंट्क संख्येने जास्त नाहीत, तर संख्येने जास्त असलेले विनाकारण दुर्बळ आणि नको इतके सज्जन राहतात म्हणून कंटकाचे फावते (अर्थात मला काय त्याचे)! चारचौघातला तरी वेडसर नाखु