सध्या टिव्हीवर एक मालिका चालू आहे. त्यातील एका प्रमुख पत्राच्या तोंडी सतत एक वाक्य दिले आहे “ परंपरेशी तडजोड नाही”. ह्या सीरिअलमध्ये आपल्या पूर्वजांनी किती विचारपूर्वक काही नियम,चालीरिती आखून दिल्या आहेत आणि त्या पाळणे किती गरजेचे आहे वगैरे गोष्टी सांगितल्या आहेत. गंमत म्हणून ती सीरिअल पाहताना जाणवले की, खरच आपल्या पूर्वजांनी प्रत्येक गोष्टीचा किती सखोल विचार केला होता. पण दुर्दैवानी त्या मागील शास्त्र आपण समजून न घेता परंपरेच्या नावाखाली आंधळेपणाने त्याला नको तो अर्थ देत आहोत.
कॉलेजमध्ये असताना आम्हाला climatology किंवा ऋतुचक्र / हवामानाबद्दल लेक्चर्स असायची. कुठल्याही वास्तुतज्ञाला इमारत बांधण्यापूर्वी त्या जागेच्या हवामानाबद्दल पूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. मुंबईत बांधल्या जाणाऱ्या इमारती व चेरापुंजीला बांधल्या जाणाऱ्या इमारती ह्यांमध्ये खूप फरक आहे किंवा असावाच. हा फरक मुख्यत्वे दोन्हीच्या भौगोलिक फरकामुळे आहे. ह्याच्या पूर्ण अभ्यासाशिवाय इमारती बांधणे शुद्ध वेडेपणा ठरेल. आणि ह्याचाच सखोल विचार आपल्या पूर्वजांनी केला होता. भारताची भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन वास्तुरचनेचे काही नियम त्यांनी लोकांना घालून दिले. ह्यासाठी त्यांनी दिशांचा अभ्यास करून नैसर्गिक उर्जा , जी आपल्याला मुबलक प्रमाणात फुकट मिळते आहे ,त्याचा वापर कसा करावा हे सांगितले. त्याचबरोबर पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश ह्या पंचमहाभूतांचा आपल्या मनावर व शरीरावर होणारा परिणाम त्यांनी अभ्यासिला. थोडक्यात वास्तुरचना म्हणजे नैसर्गिक गोष्टींबरोबर साधलेला समतोल हा मुख्य उद्धेश्य समोर ठेवला.
मुळातच दक्षिण दिशेला आपल्याकडे खालनायकाप्रमाणे वागवले जाते. दक्षिण दिशेला दारे –खिडक्या नकोत, तिकडच्या भिंतीची उंची जास्त असावी, घराचा मुख्य दरवाजा दक्षिणेला नसावा वगैरे वगैरे. नेहमी सावत्र वागणूक मिळणाऱ्या ह्या दिशेप्रती आपसूकच त्यामुळे माझ्या मनात कणव निर्माण झाली. त्याच्यावरील लागलेला बट्टा पुसून टाकण्यासाठी परत climatologyच्या पुस्तकांची मदत घेतली. तेव्हा जाणवले ह्याच्यावरील सगळे आरोप बरोबर आहेत, फक्त त्यामागील शास्त्रीय कारणे कोणीच लक्षात घेत नाही. आपल्याला माहितीच आहे सूर्य पूर्वेला उगवून पश्चिमेला मावळतो. त्याचा हा प्रवास दक्षिण दिशेकडून होतो. त्यामुळे सूर्याचा जास्तीतजास्त कालावधी दक्षिण दिशेला असतो. साहजिकच ह्या दिशेला असलेल्या खोल्या तापून निघतात. हे मला केव्हा जाणवले जेव्हा आमच्या पुण्याच्या नवीन घरी रहायला गेलो. पूर्वीच्या काळी शेक-शेकोटीने बाळंतीणीची खोली कशी गरम रहायची तशी ही खोली तापायची. दिवसभर अंगाची लाहीलाही आणि बैचेनी. ह्याचे मुख्य कारण ह्या खोलीची जागा. बरोब्बर दक्षिणेला असल्याने दिवसाचे सहा-सात तास उन्हात न्हाऊन निघायची. बरं उन्हापासून संरक्षण करायला पडदे ओढले तर दोन महिन्यात प्रखर उन्हाने पडद्याचा रंग उडून पोतेरे झाले. आता मी सूर्याला तर सांगू शकत नाही तुझा मार्ग बदल, गुपचूप आमची खोली बदलली आणि अशा ठिकाणी गेले जिथे उन्हाचा त्रास कमी होईल. तेव्हा एक गोष्ट पटली की, आपल्या वास्तूचे दक्षिण दिशेकडून येणाऱ्या प्रखर उन्हापासून संरक्षण करणे फार गरजेचे आहे. त्यामुळे ह्या दिशेला उंच भिंतीचा आडोसा का करावा व खिडक्या का नसाव्यात हे समजले. ह्या दिशेला असलेल्या खोल्या वर्षातून एकदाच कधीतरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी गेस्ट रूम म्हणून किंवा स्टोर रूम म्हणून वापरल्या तर उत्तम. रोजच्या वापरायच्या खोल्या शक्यतो बाकीच्या दिशांना ठेवाव्यात.
दुसरे, दक्षिणेला उंच भिंत बांधणे व दारे खिडक्या न ठेवणे ह्याचे प्रमुख कारण म्हणजे भारताची भौगोलिक स्थिती. आपल्याला माहितीच आहे की मान्सूनचा पाऊस दक्षिण- पश्चिमेकडून येतो. वाऱ्यामुळे अडवातिडवा कसाही घरात घुसणाऱ्या पावसाने काय हाल होतात हे मी प्रत्यक्ष बघितले आहे. माझ्या क्लाएंटचा वरळीला १४ व्या मजल्यावर सी फेसिंग फ्लॅट आहे. त्या फ्लॅटची पावसामुळे झालेली दुर्दशा अजूनही डोळ्यासमोरून जात नाही. ह्याचे मुख्य कारण दक्षिण- पश्चिमेकडील खिडक्या. एकतर आजकाल खिडक्यांना छज्जे नसतात. त्यामुळे पाऊस आडत नाही. खिडक्यांच्या फटींमधून पाणी येउन फक्त ह्याच खोलीत सुनामी सदृश वातावरण झाले होते. बाकीच्या दिशांना असलेल्या खोल्या पाषाणासारख्या कोरड्या ठणठणीत होत्या ! अशावेळी सांगा दक्षिण दिशेची काय चूक? वस्तुतज्ञाने दिशांचा नीट अभ्यास करून खिडक्यांची रचना केली असती तर ही वेळच आली नसती.
दक्षिण दिशेच्या अगदी विरुद्ध, पट्ट राणीसारखी असलेली दिशा म्हणजे पूर्व दिशा. पूर्वाभिमुख घर असावे, अभ्यास करताना पूर्वेला तोंड करावे,स्वयंपाकघर पूर्व किंवा अग्नेयला असावे वगैरे गोष्टी आपण ऐकतो. ह्यामध्येसुध्दा निसर्गाचा शास्त्रोक्त अभ्यास केलेला जाणवतो. पूर्वीपासून आपल्याला सांगितले जाते की सकाळी लवकर उठून अभ्यास करावा. पूर्वीच्या काळी हा अभ्यास बाहेर झाडाखाली बसून होत असे. साहजिकच पूर्वेला बसून अभ्यास केल्याने सूर्याची पहिली कोवळी उन्हे अंगावर पडत. ज्यामुळे विद्यार्थी दशेतील मुलांना भरपूर नैसर्गिक उर्जा मिळत असे. त्याच प्रमाणे कोवळे ऊन म्हणजे विटामिन डी चा मुबलक स्त्रोत. सूर्याच्या कोवळ्या उन्हामुळे होणाऱ्या शारीरिक व मानसिक फायद्याची माहिती आपल्या पूर्वजांना नक्कीच असणार. आजकाल प्रत्येक दुसऱ्या माणसामध्ये विटामिन डीची जी कमतरता आढळते व त्यामुळे हाडांच्या समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते, ह्याचे मुख्य कारण म्हणजे निसर्गाकडून फुकट उधळलेली ही उर्जा आपण घेतच नाही. आपल्या पूर्वजांनी मात्र जाणून- बुजून, कधी धाक-दपटशहाने किंवा कधी धार्मिकतेचे कारण देऊन हे नियम आचरणात आणायला भाग पाडले. ज्याचा फायदा फक्त एका व्यक्तीला व कुटुंबाला न होता पूर्ण समाजाला झाला.
अभ्यासाच्या जागेप्रमाणेच भर दिला गेला स्वयंपाकघरावर. सकाळची लगबग सुरु होणारे घरातील हे प्रथम व मुख्य स्थान. ह्याच्या स्थानाबद्दलसुध्दा मला वाटते की सुर्याचा प्रामुख्याने विचार केला गेला असावा. सूर्याची कोवळी उन्हे अन्न पदार्थावर पडल्यास त्यातील बॅक्टेरिया नाश पावून सकसपणा वाढीस लागतो हे आपण जाणतोच. हेच प्रमुख कारण असावे पूर्वेला किंवा अग्नेयला स्वयंपाकघर ठेवण्याचे. त्याचप्रमाणे पूर्वी खिडकी हे एकच साधन होते स्वयंपाकघरातील वास व धूर बाहेर घालवायचे. अशावेळी भारतीय उपखंडातील वाऱ्याच्या दिशेचा अभ्यास करून स्वयंपाकघर ह्या दिशांना ठेवल्यास वास व धूर घराच्या आतमध्ये न शिरता बाहेर फेकला जाई.
पश्चिमेचा वारा म्हणजे सर्वात आल्हाददायक! त्यामुळे पूर्व –पश्चिम दिशेला घराचे तोंड असण्याचा अजून एक फायदा म्हणजे उत्कृष्ट वायुवीजन किंवा ventilatilation. नवरा बायकोच्या भांडणाने तापलेले वातावरण थंड करण्याचा हा नैसर्गिक उपाय. तुम्ही आलिया भटचा “टू स्टेट्स” पिक्चर पहिला असेल, तर तुम्हाला तिच्या घराच्या मधोमध असलेला चौक नक्कीच आवडला असेल. मोहेंजोदडो संस्कुतीपासून ते आत्ता आत्ताच्या वाडा संस्कृतीपर्यंत असे “ओपन टू स्काय” चौक भारतीय वास्तुरचनेची खासियत होती. पूर्व –पश्चिम दिशेला उघडणारा हा चौक घरात हवा खेळती ठेवून, तापमान आल्हाददायक ठेवण्याचे काम करायचा. आजकाल फ्लॅट संस्कृतीमुळे ही रचना काळाच्या पडद्या आड गेली आहे. पण जर का आपण पूर्व-पश्चिम दिशेला दारे- खिडक्या असणारे घर निवडले तर हवा खेळती रहायला नक्कीच मदत होईल.
मला आठवतंय लहानपणी आजीला छळायला म्हणून मुद्दामून दक्षिणेकडे पाय करून झोपायचे. त्यावेळी ती परोपरीने समजवायची की दक्षिणेकडे पाय करून झोपल्याने तब्येत बिघडते, नको झोपूस. पण मला ती त्यावेळी कटकट वाटायची . तिच्याकडेपण त्यावेळी “असे का झोपू नये” ह्याचे समाधानकारक उत्तर नसायचे. साहजिकच जुन्या काहितरी चाली-रिती म्हणून मी कानाडोळा करायचे. नंतर कळले की ही अंधश्रद्धा नसून ह्यालापण शास्त्रीय आधार आहे. आपल्या पृथ्वीला उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव ही दोन चुंबकीय क्षेत्रे आहेत हे सगळ्यांनाच माहित आहे. ह्या चुंबकीय लहरी उत्तर ते दक्षिण सतत वाहत असतात. आपल्या रक्तात लोह असल्याने ह्या चुंबकीय प्रवाहाचा आपल्या शरीरावर साहजिकच परिणाम होतो. आपण ह्या चुंबकीय प्रवाहाच्या दिशेने म्हणजे उत्तरेला डोके व दक्षिण दिशेला सतत पाय करून झोपलो तर आपल्या रक्तातल्या लोहावर व पर्यायाने आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. गरगरणे, चक्कर येणे ,डोकेदुखी व रक्ताशी संबंधीत दुखणी सुरु होतात. ह्यासाठी म्हणून उत्तर दिशेला सोडून बाकी कुठल्याही दिशेला डोके करून झोपल्यास आपली तब्येत नीट राहते व झोपपण नीट लागते. आजीची कळकळ आत्ता समजतीये ! sorry आजी.
प्रत्येक दिशेची खास वैशिठ्ये आपण पहिली. पण त्याच बरोबर घरात भरपूर नैसर्गिक उजेड येणेपण शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी गरजेचे आहे. इंग्लंड सारख्या ठिकाणी हिवाळ्यात जेव्हा दिवसेन दिवस सूर्याचे दर्शन होत नाही, त्यावेळी लोकांमध्ये नैराश्याचे झटके येण्याचे प्रमाण कैक पटीने वाढते. अशावेळी BBC वर लोकांचे मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी दिवसभर मनोरंजनाचे कार्यक्रम मुद्दामून दाखवले जातात. आपल्याकडे नशिबाने भरपूर उजेड असतो, त्याचा योग्य वापर करणे गरजेचे आहे.
वास्तूरचने बद्दल हा शास्त्रीय दृष्टीकोन समजल्यानंतर मनोमन मी आपल्या पूर्वजांसमोर नतमस्तक झाले. हाताशी काहीही साधने नसताना प्रत्येक गोष्टीची शास्त्रोक्त पद्धतीने केलेली आखणी बघून आपल्या परंपरेविषयीचा अभिमान दुणावला. टीव्हीवरील सीरीअलचे पुढे काय होईल माहीत नाही. पण शास्त्रीय कारण दिलेत तर परंपरेशी हातमिळवणी करायला मला मात्र नक्कीच आवडेल.

वाचने
10774
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगला विषय.
निरर्थक मुद्दे
कोवळी उन्हे बॅक्टेरिया मारतात
In reply to निरर्थक मुद्दे by मराठी कथालेखक
लेख आवडला .
लेख एकूण आवडला
=))
छान लेख
लेख आवडला...
आपल्या लेख मध्ये अतिशयोक्ती
थ्वीचे चुंबकीय क्षेत्र ०.१
In reply to आपल्या लेख मध्ये अतिशयोक्ती by सुबोध खरे
पहाड साहेब
In reply to थ्वीचे चुंबकीय क्षेत्र ०.१ by काळा पहाड
मॅग्नेटो रिसेप्शन जर इतकुश्या
In reply to पहाड साहेब by सुबोध खरे
हा एक काही डॉक्टर लोकांनी
In reply to आपल्या लेख मध्ये अतिशयोक्ती by सुबोध खरे
Magnetotherapy self help book
In reply to हा एक काही डॉक्टर लोकांनी by काळा पहाड
कदाचित अनेक दुष्ट शक्ती या
बरोबर. प्रतिकार करण्याचं
In reply to कदाचित अनेक दुष्ट शक्ती या by उगा काहितरीच
दक्षिणेकडचं ऊन आणि पाऊस
पृथ्वीचे चुंबकीय उत्तर-दक्षिण
In reply to दक्षिणेकडचं ऊन आणि पाऊस by बोका-ए-आझम
काहीही?
In reply to पृथ्वीचे चुंबकीय उत्तर-दक्षिण by काळा पहाड
बोका साहेब, तुम्ही पूर्वी
In reply to काहीही? by बोका-ए-आझम
माझं म्हणणं अजूनही तेच आहे.
In reply to बोका साहेब, तुम्ही पूर्वी by काळा पहाड
दिशा एक भ्रामक कल्पना
विश्व अनंत आहे
In reply to दिशा एक भ्रामक कल्पना by चौकटराजा
+१ गल्लत लेख
पूर्ण भारताचं हवामान एकच आहे.
आप्ले पूर्वज
बादरायण संबंध कसा जोडला जातो,
दक्षिणेचा मुद्दाही सर्वस्वी चुकीचा
लेखातील चित्र दोनचार
असं घर असेल त्याची मजा आहे
उन्हाळ्यात म्हणजे सुर्याचे
हात कंगन को आरसी क्या
In reply to उन्हाळ्यात म्हणजे सुर्याचे by मार्मिक गोडसे
भारत विषुववृत्ताच्या उत्तरेला
In reply to उन्हाळ्यात म्हणजे सुर्याचे by मार्मिक गोडसे
चला निदान महाराष्ट्रापुरते
In reply to भारत विषुववृत्ताच्या उत्तरेला by विजय पुरोहित
जरा सकळी वा सायंकाळी बाहेर
कोणत्या राज्यात राहता ?
In reply to जरा सकळी वा सायंकाळी बाहेर by मार्मिक गोडसे
होकायंत्र असेल तर रस्त्यावरील
कदाचीत पुणे तेथे सरकले असेल
In reply to होकायंत्र असेल तर रस्त्यावरील by मार्मिक गोडसे
एक माहिती
येस.
In reply to एक माहिती by चौकटराजा
तुमच्याकडे Simulator चालत
साधी सरळ गोष्ट आहे.
मुंबईत घर घेताना( विकत किंवा
बिल्डरनंही सर्वात वरचा मजला
In reply to मुंबईत घर घेताना( विकत किंवा by सुबोध खरे
तोच मजला सर्वात वर
In reply to बिल्डरनंही सर्वात वरचा मजला by मराठी कथालेखक
किंवा
In reply to तोच मजला सर्वात वर by गवि
खुलासेदार नाखु सचिव अखिल मिपा "बघता काय वरचा मजला शोधा" संघटना.
याला काय म्हणावे?
सध्या मी राहते त्या घरातील