Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by पुणे मुंग्रापं on Fri, 04/15/2016 - 12:22
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
राहणी
अर्थकारण
अर्थव्यवहार
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
नमस्कार, गुढीपाडवाच्या दिवशी म्हणजे 1975 च्या गुढीपाडव्याला मुंबई ग्राहक पंचायतीची गुढी रोवली गेली. 41 वर्षे अव्याहत पणे ग्राहक शिक्षण, ग्राहक चळवळ तसेच सदस्यांकरीता उपयोगी वाणसामान, वस्तुंचे मासिक वितरण अशा विविध उपक्रमांतून मुंबई ग्राहक पंचायतीचे काम वाढतच आहे. आज जवळपास 36000 कुटुंब सदस्य संख्या असलेल्या मुंबई ग्राहक पंचायतीचा वटवृक्ष बहरतच आहे. आपण या निमित्ताने एक नविन अनुदिनी (Blog) सुरु करीत आहोत जी आवाजी (Audio) स्वरुपात आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात बऱ्याचदा वाचण्याकरीता पुरेसा वेळ उपलब्ध होत नाही, म्हणूनच मुंबई ग्राहक पंचायतीकडे उपलब्ध असलेल्या रेडीओ भागांचे या अनुदिनी करीता संपादन करुन ते आपण 15 दिवसांनी एक भाग असे प्रसारीत करणार आहोत. हे सर्व भाग आपण ऐकून त्याचा आनंद तर घ्याच, पण आम्हालाही कळवा आपल्याला हे भाग आवडले की नाही ते. चला तर करुया सुरुवात..... मुंबई ग्राहक पंचायतीचे संस्थापक सदस्य श्री. अशोक रावत यांनी मुंबई ग्राहक पंचायतीच्या स्थापनेपासूनच्या कामाचा घेतलेला हा आढावा आपण ऐकूयात.... खालील दुव्यावर टिचकी मारुन (Click) आपण हा भाग ऐकू शकता. ध्वनी अनुदिनी भाग-1 - श्री अशोक रावत

टिप - सदर लिंक मुंबई ग्राहक पंचायतीच्या गुगल ड्राईव्ह वरील ऑडियो फाईल सुरु करते. आपण हा भाग येथूनही ऐकू शकता. धन्यवाद. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा. - अनुदिनी गट, मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभाग सदर ध्वनी धागा मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभागाच्या http://punemgp.blogspot.in या ब्लॉगवरही प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवर या पुर्वीचे असे ग्राहक माहितीचे लेख आपणांस वाचता येतील.
  • Log in or register to post comments
  • 3977 views

प्रतिक्रिया

Submitted by बोका-ए-आझम on Fri, 04/15/2016 - 12:25

Permalink

वर्धापनदिनाबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा!

एक शंका - कूपर हाॅस्पिटलजवळच्या एका चौकाचं नाव ग्राहक चळवळीचे प्रणेते मधुकरराव मंत्री यांच्या नावे आहे. त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल काही कळू शकेल का?
  • Log in or register to post comments

Submitted by रुस्तम on Fri, 04/15/2016 - 12:25

Permalink

मस्तच...

लवकरच ऐकतो...
  • Log in or register to post comments

Submitted by gogglya on Fri, 04/15/2016 - 12:56

Permalink

ग्राहक पंचायत, पुणे विभाग यांच्याशी संपर्क

कसा करावा याची माहीती कुठे मिळेल. मी काही दिवसांपुर्वी पुणे मुंग्रापं यान्ना व्य नि केला होता पण काहीही उत्तर मिळाले नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by पुणे मुंग्रापं on Fri, 04/15/2016 - 13:10

In reply to ग्राहक पंचायत, पुणे विभाग यांच्याशी संपर्क by gogglya

Permalink

मिसळपाव वरील माहिती तिन-चार

मिसळपाव वरील माहिती तिन-चार कार्यकर्त्यांकडून दिली जात असल्याने व्यनि पाहिले जात नाहित. आपण pune.mgp@gmail.com या इ-मेल पत्त्यावर संपर्क केल्यास आपली तक्रार/सूचना/माहिती योग्य कार्यकर्त्याकडे पाठविली जाईल. इ-मेल मध्ये आपला संपर्क क्रमांक लिहिल्यास संपर्क करणे सोपे जाईल. धन्यवाद...
  • Log in or register to post comments

Submitted by gogglya on Fri, 04/15/2016 - 18:51

In reply to मिसळपाव वरील माहिती तिन-चार by पुणे मुंग्रापं

Permalink

'pune.mgp@gmail.com' या ई-मेल पत्त्यावर

दिनांक ५ एप्रिल २०१६ रोजी ई-मेल पाठवली आहे, पण अजून उत्तर मिळाले नाही. ई-मेल मराठीतच असावी असा नियम नाहीये ना? कारण मी इंग्रजी भाषेमध्ये ई-मेल पाठवलेली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पुणे मुंग्रापं on Sat, 04/16/2016 - 09:17

In reply to 'pune.mgp@gmail.com' या ई-मेल पत्त्यावर by gogglya

Permalink

आपल्या इमेल वर उत्तराची इमेल

आपल्या इमेल वर उत्तराची इमेल पाठविली आहे. कृपया तपासावी.
  • Log in or register to post comments

Submitted by सुधांशुनूलकर on Sat, 04/16/2016 - 14:24

Permalink

ऐकली. धन्यवाद.

मुंबई ग्राहक पंचायतीचे सभासद आहोतच, मुंबईतल्या काही उपक्रमांमध्ये जमेल तसा भागही घेतो. मुंबई ग्राहक पंचायतीचं कार्य उत्तरोत्तर वाढतच राहो, अशी मनःपूर्वक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by अनन्न्या on Sat, 04/16/2016 - 16:11

Permalink

मीही ग्राहक संघाच्या रायगड वितरण केंद्रतून सामान घेते.

मालाचा अतिशय उत्तम आहे. रत्नागिरीतही चांगला प्रतिसाद मिळतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by अनन्न्या on Sat, 04/16/2016 - 16:13

Permalink

मालाचा दर्जा उत्तम आहे

लिहीताना गडबड झाली.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com