Skip to main content

शनि ग्रह आणि पृथ्वीवरचे जीव

लेखक वैभव जाधव यांनी बुधवार, 13/04/2016 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
पृथ्वी आणि चंद्र यांच्या रोजच्या फुगडीतून चंद्राच्या गुरुत्वाकर्षणा मुळे आठ तासा तून एकदा भरती आणि नंतर ओहोटी होते. 4 4 मीटर लाटा उसळतात. चंद्र जवळ आहे म्हणून असं होतं म्हणे. माणसाच्या शरीरात असलेल्या पाणी सदृश घटकांवर परिणाम होतो असं मानायला जागा आहे का? अशा मुळे माणसाच्या वागण्यावर ठराविक दिवशी (अमावस्या पौर्णिमा) परिणाम होतो असं मानलं जातं. आता काथ्याकुटाचा मूळ विषय- म्हणजे शनि आणि पृथ्वी यांचं त्यांच्या त्यांच्या कक्षेत फिरताना काही आकर्षण प्रतिकर्षण होत असतं का? जर ते तसं होत असेल तर तो शनीचा माणसावर होणारा परिणाम मानावा का? शनि एका ठराविक काळात त्याच्या आणि पृथ्वीच्या गतीतील बदलामुळे तुलनात्मक एका च जागी असल्याने तो त्या राशीत आहे असं वाटून, त्यामुळे ठराविक लोकांना त्याच्या या आकर्षण बळामुळे त्रास होणं शक्य मानलं जावं का? - विश्वातील एका घटकाचा दुसऱ्या घटकावर परिणाम होत असतो असं मानणारा पहिला काथ्या कुटणारा वै जा.

वाचने 32049
प्रतिक्रिया 180

प्रतिक्रिया

सिक्सगन आर्मस्ट्रॉन्ग आणि नेफ्यु आर्मस्ट्रॉन्ग नासिकच्या पॅलेस कडुन कोठ्डी पर्यंत सरकत गेले व आता त्याच कक्षेत स्थीर झालेत हा शनिच्या बलाचा परिणाम असावा काय ? असाच परिणाम नेफ्यु पॉवरच्या बाबतीत घडण्याची दाट शक्यता आहे असेbभाकित वर्तवले जात आहे. शनिबलाच्या अभ्यासक / मिपा जाणकार काही प्रकाश टाकु शकतिल का?

In reply to by चौथा कोनाडा

आणि गुरुअंकल व देव-इंद्राचे चांगले सम्बंध आहेत. तस्मात त्यांना अजून तरी धोका नाही.

बहुतेक सगळे ज्योतिषी श्याम भागवतांप्रमाणेच सांगतात. की कुंडलीत ग्रह अमुक ठिकाणी आहे म्हणून घटना घडत नाहीत. तर अशा घटना घडण्याची शक्यता आहे असे ते ग्रहचिह्न दर्शवते. जसे रस्त्यावर शाळा असेल तर सूचना म्हणून रस्त्याच्या कडेला मुलाचे चित्र असलेला फलक असतो. फलक असला काय नसला काय, शाळा असणारच. फक्त फलक नसला तर आपल्याला ते कळणार नाही आणि वेगनियंत्रणाची खबरदारी न घेतल्यास अपघात घडू शकतो. कुंडलीची आणखी एक मनोज्ञ बाजू म्हणजे व्यक्ति आणि भवताल यांचे संबंध तपासणे. कुंडलीतले दुसरे, तिसरे, चौथे, सहावे, सातवे, दहावे, अकरावे स्थान (किंबहुना सर्वच स्थाने) हे त्याच्या आयुष्यावर परिणाम करू शकणार्‍या व्यक्तींसाठी मानले आहे. उदा. चतुर्थ हे मातृस्थान, सप्तम हे ज्यायास्थान, दशम पितृस्थान, वगैरे. या प्रमाणे भावंडे, मातुलगृह, सासर, नोकर, बॉस, मित्र या सर्वांशी त्याचे संबंध कसे असतील हे अजमावता येते. या सर्व स्थानांत चांगलीच ग्रहचिह्ने असतील असे नाही किंबहुना नसणारच. म्हणजे एखादी व्यक्ती आईशी जितपत चांगली वागेल तितकी वडिलांशी वागत नसेल. किंवा पत्नीशी जुलमाने वागणारा माणूस मुलांवर अतिशय प्रेम करणारा असू शकेल. यामुळे माणसाची सकल किंवा सर्वंकष वागणूक अंतर्विरोधात्मक असू शकते हे सत्य कळते. मनुष्य एका कोनातून चांगला म्हणजे सर्वच चांगला असे नसते हे उमगते. चांगल्यावाईटाच्या कल्पना पुन्हा पुन्हा तावून सुलाखून निघतात. स्वतःच्या प्रगतीसाठी हे पृथक्करण साहाय्यभूत ठरू शकते.

In reply to by राही

इंग्रजींत ह्याला correlation आहे पण causation नाही असे म्हटले जावू शकते. पण त्याच वेळी अनेक अभ्यासांत correlation सुद्धा नाही असे सामोरे आले आहे. एकाच वेळी जन्म घेतलेली मुले त्यामुळे जवळ जवळ समान भविष्य घेवून जन्माला आली असती आणि तसे असते तर उत्क्रांतीच्या प्रवाहात ठराविक सीजन मध्ये जन्म घेणारी मुले जास्त वाचली असती आणि हळू हळू मानवांचा सुद्धा "मेटिङ्ग सीजन" निर्माण झाला असता. जनावरां मध्ये आपण त्या प्रकारची उत्क्रांती पाहतोच.

In reply to by राही

फलक असला काय नसला काय, शाळा असणारच. फक्त फलक नसला तर आपल्याला ते कळणार नाही आणि वेगनियंत्रणाची खबरदारी न घेतल्यास अपघात घडू शकतो.
पण यात गृहितक असं आहे की फलकाचा शाळा जवळ असण्याशी काहीतरी संबंध आहे. वर साहना यांनी कोरिलेशन आणि कॉझेशन वगैरे म्हटलेलं आहे. पण ग्रहांच्या बाबतीत तेही नाही. त्यातल्या त्यात जमेची बाजू म्हणजे ज्योतिषी फारतर समुपदेशकाप्रमाणे काम करू शकतो. संकटात असलेल्या माणसाला धीर देऊन 'सुमारे तीन महिन्यांत परिस्थिती सुधरायला लागेल' अशी आशा देण्याचं काम करू शकतो. माझी पत्रिका ज्यांनी ज्यांनी कोणा ज्योतिष्याला दाखवली आहे त्यांना हाच सल्ला मिळालेला आहे.

In reply to by राजेश घासकडवी

ज्योतिषी फारतर समुपदेशकाप्रमाणे काम करू शकतो
एक्झॅक्टली.. ज्योतिषात चांगली बाजू पाहण्याच्या इच्छेने विचार झाल्यास हीच एक बाजू समोर येते.. पण मग समुपदेशनच करायचयं तर खरच ज्या घटकांचा परीणाम होतो ( उदा. आजूबाजूच्या व्यक्ति, त्यांच्याशी संबंध, सांपत्तिक स्थिती इ.) त्याच घटकांच्या आधारे का करु नये?? ग्रह तारे दशा वगैरे काल्पनिक आधार कशाला??

In reply to by बाळ सप्रे

मला वाटतं की काल्पनिकपणा हेच समुपदेशनाच्या बाबतीत ज्योतिष्याचं बलस्थान आहे. 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' हे खरं असलं तरी संकटांनी गांजलेल्यांना, किंवा डिप्रेशनमध्ये अडकलेल्यांना आपली छिन्नी हातोडीच पेलवत नाही. मग पुतळा घडत नाही यामुळे मनोबल अजूनच खच्ची व्हायला होतं. अशांना 'काळजी करू नकोस. हे दोन महिने उलटले की भविष्य उज्ज्वल आहे. हा पुतळा आपोआप तयार होणार आहे.' असं अधिकारवाणीने सांगता आलं की त्या माणसाला किमान छिन्नी हातोडी उचलण्याचं बळ मिळतं. हे जर काल्पनिक घटकांवर आधारित नसेल तर 'चांगलं होणार आहे' यावर विश्वास बसणं कठीण पडेल.

अनेक लोक साधे गणित मांडत आहेत कि शनीचे आपल्या पासून अंतर एवढे आहे...चंद्राचे एवढे आहे...म्हणून गुरुत्वाकर्षण बल एवढे येईल...मग काहीच परिणाम होत नाही....यात एक गोष्ट विचारात घेतलेली नाही ती म्हणजे त्या-त्या ग्रहावरून पृथ्वीवर येणारी परावर्तीत प्रकाश उर्जा...म्हणजे...सूर्याचा प्रकाश त्या-त्या ग्रहांवर पडतो आणि तो परावर्तीत होऊन सगळीकडे जातो...त्यातील एक अंश जो पृथ्वीकडे येतो त्यात देखील प्रचंड उर्जा असते....साधे ग्रहण जेव्हा होते तेव्हा एक ग्रह मध्ये आल्याने अनेक बिलियन जुल्स उर्जा अडवली जाते...आणि खरा परिणाम हा या उर्जेतून होत असतो...म्हणून पौर्णिमेला आणि अमावास्येला चंद्राच्या पृथ्वी पासूनच्या अंतरात फार फरक नसतो पण परावर्तीत उर्जेत फार फरक असतो...चंद्रावर पाणी आणि बर्फ खूप आहे म्हणून तेथून परावर्तीत प्रकाश हा सौम्य मनाला जातो...या उलट मंगळावर लोह (लाल रंग) अधिक असल्याने तेथून आलेला प्रकाश हा उग्र आणि डोके फिरवणारा मानण्यात येतो...असो....आता ज्योतिष शास्त्र मध्ये ग्रहांचे अस्त आणि उदय असतात...म्हणजे जेव्हा एखाद्या ग्रहाचा पृथ्वीवर प्रकाश पोहोचत नाही तेव्हा त्याचा अस्त झाला असे म्हणतात...लग्नाचे मुहूर्त पण गुरु-शुक्र यांच्या अस्त काळात नसतात....तेव्हा फक्त वजन आणि अंतर हे भौतिक शास्त्र (आणि भौतिक विचार??) झाले...अनेक परदेशी विद्यापीठांमध्ये यावर चांगले संशोधन झाले आहे आणि ग्रहांचा हा खेळ आइन्स्ताइन ला देखील जाणवला होता हे त्याचे विचार वाचल्यावर समजते...तेव्हा ज्योतिष हे शास्त्र आहेच...आपल्याला समजत नाही किंवा जाणवत नाही किंवा सोयीस्कर वाटत नाही म्हणून एखादे शास्त्र नाही असे म्हणणे हेच अशास्त्रीय आहे...इथे नास्तिक, निधर्मी आणि सेकुलर वाद असे मुद्दे येतात...पण व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून ज्याने त्याने आपल्या विचाराने स्वीकार किंवा धिक्कार करावा ....वरील विचार स्वीकारण्याची कोणावर कसलीच सक्ती असू शकत नाही.

In reply to by पुतळाचैतन्याचा

आयो य्यो . किती मोठा शोध भाउ ? अर्र्र आमच्या गुर्जीनी चन्द्रावरचा प्रकाश म्हणजे परावर्तित म्हणजेच उर्जेच्या सन्दर्भात निकृष्ट ह्ये शिकिवलं हुतं ! चन्द्रावरचं पानी आनाया सुरेश प्रभू ना गाडी पाठवाया सांगायचं काय गड्यानो ?

In reply to by चौकटराजा

तुमचे गुरुजी चंद्रप्रकाशात कुठे डुलत असतात याचा शोध घ्या....शेवटच्या २ ओळी तुमच्यासाठीच होत्या

In reply to by पुतळाचैतन्याचा

>>चंद्रावर पाणी आणि बर्फ खूप आहे म्हणून तेथून परावर्तीत प्रकाश हा सौम्य मनाला जातो... याचा उल्लेख असलेल्या एखाद्या शोधनिबंधाचा किंवा एखाद्या अवकाश संशोधन केंद्राचा दाखला मिळेल का?

In reply to by सतिश गावडे

गावडे साहेब...चंद्र-प्रकाशाचे तापमान मोजणारे आणि त्याला थंड आहे असे जाहीर करणारे अनेक लेख आणि प्रयोग गुगल आणि यु-ट्यूब वर उपलब्ध आहेत. मुद्दाम खाली एक उलटी लिंक देतो: http://www.nytimes.com/1995/03/10/us/surprising-scientists-full-moon-is… आता यात म्हटले आहे कि या प्रकाशानी पृथ्वी गरम होते (वरील उल्लेखाच्या विरुद्ध). याचा अर्थ पृथ्वीला उर्जा (केलोरीज ) मिळते....तरी पण थंड का म्हणतोय मी? तर जसे आयस्क्रीम थंड असते पण त्यात भरपूर केलोरीज (उर्जा) असते तशी उर्जा पृथ्वीला मिळते पण त्यात थंडावा असतो....मी मुद्दाम एक शब्द वापरला आहे कि...थंड "मानण्यात" आलेला आहे...हे मी पश्चिमी प्रयोगांच्या आधारे नव्हे तर भारतीय शास्त्रांमध्ये चंद्र प्रकाशाला शीतल आणि पोषक मानून त्या नुसार त्याचे कारकत्व देण्यात आले आहे....उदा. अनेक आयुर्वेदिक कंपन्या पौर्णिमेला औषध निर्माण करतात ते याच मुळे...आता फक्त नासा ने थंड सिद्ध केले तरच तो थंड आणि बाकी लोकांनी "मानले" तर थंड नाही असे इथे केलेले नाही.

In reply to by पुतळाचैतन्याचा

चंद्राचा परिवलन व परिभ्रमण वेग एकच असल्याने चंद्राची एकच बाजु आपल्याला दिसते. जिकडे बर्फ आहे ती बाजु आपल्याकडेच येत नाही. चुभुदेघे

पुण्याहून औरंगाबादला जाताना नगरच्या पुढे घोडेगाव लागते. तिथून ७ कि.मी. वर सोनई गाव आहे. १९८५ सालापासून त्या गावी कामानिमित्त जाण्याचा योग येतोय. ही माझी ट्रीप नेहमीच शनिवारी असायची. हल्ली प्रमाण खूपच कमी झालेय पण पूर्वी वारंवार जायला लागायचे. लाल डब्याने जायचे व यायचे. पण जर कधी स्कूटरने किंवा मोटरसाईकलने गेलो तर शनिशिंगणापूरला जरूर जायचो. तर त्यावेळची पहिली भेट मला आठवतीये त्याप्रमाणे मी मोटरसायकल चौथर्यापासून २-४ फुटावर लावली होती. आरामात चौथर्यावर जाऊन दर्शन घेतले होते. त्या चौथर्यावर बसून मित्राबरोबर गप्पा मारल्या होत्या. आजूबाजूला कोणिही नव्हते. जर मला एखादा रूपया दानधर्म करायची हुक्की आली असती तर तो रूपया दान करण्यासाठी एकही याचक मिळाला नसता. पाय धुवायला नळ नव्हता की ड्रेसकोड नव्हता. अंघोळ करून ओलेत्याने चौथर्यावर जायची सक्ति नव्हती. पण.. १९८७-८८ साली अनिसने तिथे आंदोलन केले. महाराष्ट्रातील सर्व वर्तमान पत्रातून त्या आंदोलनाला अफाट प्रसिध्दी मिळाली आणि सगळे बदलूनच गेले. वर्षभरात मला माझी बाईक चक्क २५ फूटावर लावायला लागली. बर्याच बाईक लागल्या होत्या. दर्शनाला रांग नव्हती पण गर्दी होती. १९९३ साली बजाजने FE नावाची स्कूटर काढली होती. मला पहिल्या लॉट मधली स्कूटर मिळाली होती. ती घेऊन गेलो होतो. मात्र यावेळेस स्कूटर बरीच लांब लावायला लागली. आता ड्रेसकोड आला होता. अंघोळ मस्ट होती. मी चौथर्यावर न जाता लांबूनच नमस्कार केला. रांगेत ओलेत्याने काही पुरूष उभे होते. नेहमीच्या चहावाल्याचे दुकान चांगलेच भरभराटीला आले होते. त्याने ओळख दाखवली पण आता त्याला बोलायला फुरसत नव्हती. आता दानधर्म करायची हुक्की आली तर ती भागवायला काही याचक मदत करायला तयार होते. बराच बदल झाला होता. २००४ साली बजाजची पल्सर घेतली. आता मात्र अर्धा किमी. लांब बाईक लावायला लागली. सिमेंट क्रॉक्रिट टाकून दोन पार्किग लॉट केले होते. गच्च भरले होते. जत्रा फुलली होती. अंघोळ करायला लावलेल्या नळांची संख्याच मुळी ५० च्या वर गेली होती. ओलेत्याने दर्शन घेण्यासाठी भली मोठी रांग लागलेली. दुरूनच दर्शन घेतले व निघालो. काम संपवून रात्री ८ वाजता सोनईहून निघालो. अजूनही जीपगाड्या भरून भक्त येतच होते. रस्ता वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पोलीस उभे होते. हम्म. सगळेच बदलले होते. आंदोलनाद्वारे अनिसनी जनजागृती केली होती आणि तेव्हापासून अनिसचे कार्यकर्ते गणितीश्रेणीने तर भक्तगण भूमिती श्रेणीने वाढत चालल्याची जाणीव आणखीनच घट्ट झाली होती. पूर्वी बोलेरो, टेंम्पो ट्रॅक्स मधून फक्त बापयेच यायचे. आतातर बायामाणसेही येणार आहेत दर्शनाला. बापेलोग कच्चीबच्ची व बायकोला घरी ठेऊन ट्रीपला जातात. पण बाई माणूस मुले बाळे घरी ठेऊन एकवेळ कामाला जातील पण ट्रीपला नाही जाणार. थोडक्यात आता सहकुटुंब सहपरिवार दर्शन सुरू होईल. घरटी एक मुलगा व एक मुलगी धरल्यास आता भक्त गणांची संख्या चौपट व्ह्यायला काहीच हरकत नाही. शिवाय अगदी लहान असल्यापासून शनिदेवांची भक्ति कशी करायची याचे बाळकडू मिळालेली एकदम तरूण पिढी २०३० सालापर्यंत तयार झालेली आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार असे दिसतेय. मग विचार करायला लागल्यावर प्रश्न पडतो. १) अनिस कुठे कमी पडतीय? २) प्रत्येक शनिच्या देवळा समोरची रांग कायम मोठीच का होत राहिली आहे. ३) गेल्या ३० वर्षात लोकसंख्या फक्त ३५% वाढलेली असली तरी ही भक्तांची रांग हजारपटींनी का वाढतेय ४) शनिदेव वगैरे काही नसते असे मिपाकर सतत सिध्द करत असूनही असे का होतेय. नुसतेच मिपाकर नव्हेत. मायबोली मनोगत वगैरे सर्वठिकाणी प्रयत्न करूनही काहीच कसा बदल घडत नाहीय्ये. ५) जयंत नारळीकर सारखा शास्त्रज्ञाचाही प्रभाव का पडत नाहिय्ये? किंवा ....... १) या भक्तांना खरोखरच काही पडताळे येताहेत का? २) अगोदर त्रास असा नव्हता. सगळे काही ठीक चालले होते. थोड्या कुरबुरी असायच्या पण त्या कोणाच्या संसारात नसतात? पण साडेसाती सुरू झाली व जो एकामागोमाग त्रास सुरू झाला की जीव नकोसा झाला. शेवटी शनिदेवांची आराधना सुरू केली व त्रास थांबला अस काही खरेच होतय का? खरोखरच हे तपासले पाहिजे. ३) शनिशिंगणापूरला अमावास्येला येणारी ही लाखो भक्तमंडळी खरच येडी आहेत? अनाडी आहेत? न शिकलेली आहेत? निष्कर्ष काढणे खरेच इतके सोपे असते? त्यांच्यात वकिल, डॉक्टर, बी.एस्सी, इंजिनिअर झालेल कुणीच नसेल? मला वाटते शनिदेवांची टिंगल टवाळी करून प्रश्न सुटणार नाहीय्ये. भक्तगणांची अडाणी, मूर्ख अशी हेटाळणी करून हे थांबवता आलेले नाहीय्ये, किंवा थांबवता येणार नाहीय्ये. कोणता तरी वेगळा उपाय योजला पाहिजे यावर तरी निदान सहमती होणे आवश्यक आहे. त्यानंतरच कदाचित मार्ग सापडू शकेल. मग.. १) ज्योतिषांची एक भाषा असते. त्याचे शब्दशः अर्थ घेऊन चालणार नाही किंवा २) फलज्योतिष हे ज्योतिषशास्त्राचे एक छोटे अंग किंवा बाय प्रॉडक्ट आहे. या फलज्योतिष सांगणार्याच्या चुकांचे खापर मूळ ज्योतिषशास्त्रावर फोडून चालणार नाही ह्याचेही भान ठेऊन मग उपाययोजना सुचायला लागतील. ३) निदान टिका करण्याअगोदर फलज्योतिषा बरोबरच मूळ ज्योतिष शास्त्रातील मूलभूत संकल्पना ही समजावून घेणे आवश्यक असल्याचे मान्य झाले पाहिजे. असे जेव्हा काही होईल तेव्हा मात्र खर्या अर्थाने परिणाम दिसू लागेल.

In reply to by शाम भागवत

चांगले लिहीत आहात. सहज मनात आले की एवढे हजारो लाखो लोक आंघोळी पुन्हा तिथे करत असतील तर किती पाणी फुकट जात आहे तिथे.

In reply to by शाम भागवत

शनी-शिंगणापूर हे शिर्डीच्या वाटेवर म्हणा किंवा शिर्डीच्या खुप जवळचे असे एक देवस्थान आहे. त्यामुळे शिर्डीला आलेले भाविक लोक "वाटेत शनी-शिंगणापूरलाही जाऊ" असा विचार करून शनी शिंगणापूरला जात असावेत. कुणी आवर्जून फक्त शनी शिंगणापूरला जात असेल असं वाटत नाही. आता लोक शिर्डीला का जातात हा वेगळा मुद्दा आहे. साईबाबांवर लोकांची श्रद्धा आहे. त्या श्रद्धेपोटी लोक जातात. शनी-शिंगणापूर का प्रसिद्ध झाले याची मी ऐकलेली माहिती वेगळी आहे. कुणी कॅसेट कंपनीचे मालक म्हणे तिथे गेले होते. बहूधा टी सिरीजचे गुलशन कुमार असावेत. त्यांनी म्हणे शनीदेवावर एक व्हीडीओ फिल्म बनवली आणि तेव्हापासून हे ठीकाण प्रसिद्धीला आले. ही माहिती मी खुप पुर्वी युनिक फीचरच्या एका लेखात वाचली होती. त्यांच्या वेबसाइटवर हा लेख शोधला असता सापडला नाही. आता शनीची मूर्ती म्हणून ज्या पाषाण शीळेची पुजा केली जाते त्याचीही अशीच एक कथा आहे. तिथल्या एका गावकर्‍याच्या स्वप्नात शनीदेव आले आणि कुठल्याशा ओढ्यात (किंवा शेतात) मी पडून आहे, मला बाहेर काढ आणि माझी स्थापना कर असे म्हणाले. त्याप्रमाणे त्या गावकर्‍याने ती शीळा शोधून काढली आणि तीची स्थापना केली. मंदिरासमोर वाढणार्‍या रांगेबद्दल म्हणाल तर ते फक्त शनीमंदिरांच्या बाबतीत होत नसून सर्वच मंदिरांच्या बाबतीत होत आहे. दिवसेंदिवस माणसाचं आयुष्य अधिकाधिक गुंतागुंतीचं होत चाललं आहे. पावलापावलावर माणसाला अपेक्षाभंगाला सामोरं जावं लागत आहे. हे सारं आयुष्याचा भाग म्हणून स्विकार करण्याईतकी जाण सार्‍यांनाच नाही. ज्यांना नाही ते आपल्या समस्या दूर करण्यासाठी "देव" नावाच्या शक्तीला शरण जात आहेत. त्यातून देवळांसमोरच्या रांगा वाढत आहेत. काही सुखी समाधानीही आहेत. आपलं हे सुख समाधान ही देवाची कृपा आहे अशी त्यांची भावना आहे. असेही लोक देवाप्रती कृतज्ञता म्हणून देवदर्शनाला जातात. "शनी महात्म्य" हे एखाद्या भयकथेला लाजवेल असे कथानक आहे. माझा ज्योतिषाचा विशेष असा अभ्यास नाही मात्र एकंदरीत साडेसाती या संकल्पनेचा विचार करता प्रत्येक माणसाच्या आयुष्यात केव्हा ना केव्हा साडेसाती येणारच. या काळात जर कुणाच्या आयुष्यात कठीण प्रसंग आला तर काही जण त्याला धीराने सामोरे जातात. काहींना ओळखीपाळखीतील, शेजारी-पाजारी ज्योतिषाला पत्रिका दाखवून बघा असे म्हणतात. हल्ली तर ज्योतिशी लोकही ऑनलाईन कन्सल्टींग देतात. वाकडवरून हिंजवडीला जाताना अशा ज्योतिषांच्या लक्ष वेधून घेणार्‍या भल्या-मोठया जाहीराती दिसतात. असो. कठीण प्रसंगी "हा ही उपाय करून पाहू" असे म्हणून पत्रिका दाखवली जाते. आणि मग त्यातून पुढे "दैवी" उपाय सुरु होतात. ज्योतिषी धीर देतो, तोडग्याने समस्या नक्की दूर होईल असे आश्वासन देतो. चिंताग्रस्त मनाला थोडासा दिलासा मिळतो. वृत्तीत सकारात्मकता येते आणि माणूस समस्येला भीडतो. कधी समस्या दूर होते, कधी नाही होत. जेव्हा समस्या दूर होते तेव्हा त्या ज्योतिषाचा, त्याने दिलेल्या तोडग्याचा बोलबाला होतो. जेव्हा समस्या दूर होत नाही तेव्हा माणूस नाईलाजाने ती परिस्थिती नशिबाचा भाग म्हणून स्विकारतो. माणसाने जेव्हा अज्ञाताचा शोध घ्यायला सुरुवात केली, आपल्या आयुष्यातील सुख-दुखांचा कार्यकारणभाव शोधण्याचा प्रयत्न सुरु केला तेव्हा कधीतरी फलज्योतिष या कलेचा शोध लागला असावा. माणसाच्या आयुष्यात घडणार्‍या घटनांचा त्याच्या जन्मवेळी आकाशातील "ज्योतींंच्या" स्थानाशी संबंध असावा असे त्याला वाटले असावे. आणि मग नवीन जीव जन्माला आला की त्यावेळची आकाशातील ग्रहांच्या स्थितीची नोंद केली जात असावी. आणि मग त्या व्यक्तीच्या आयुष्यात घडणार्‍या घटनांचा संबंध जोडला गेला असावा. यातूनच ज्योतिष विकसीत झाले असावे. हे "कोरीलेशन" पुढे काळाच्या ओघात "कॉजेशन" बनले असावे. अर्थात हे जेव्हा कधी झाले तेव्हा माणूस विश्वाचे आकलन करण्यात चाचपडतच असावा. म्हणून तर तारा असणारा सूर्य कुंडलीमध्ये नवग्रहांपै़की एक आहे आणि पृथ्वीचा उपग्रह असणारा चंद्र कुंडलीत एक स्वतंत्र ग्रह मानला जातो. नव्हे, मनाचा कारक म्हणून त्याला कुंडलीत विशेष स्थान आहे. राहू आणि केतूचा तर अतापताच नाही. सध्याचे ज्योतिशी त्यांना उत्तर आणि दक्षिण छेदन बिंदू (north and south lunar nodes) मानतात. दुसरे काय स्पष्टीकरण देणार ते तरी. सर्वसाधारणपणे सश्रद्ध हिंदू घरात जन्माला येणारे मुल आपल्या आई बाबांच्या श्रद्धा तशाच्या तशा स्विकारते. सौरमालेचा अभ्यास फक्त शाळेतील परीक्षेत उत्तिर्ण होण्यासाठी केला जातो. पुढे आयुष्यात कधी साडेसाती आली की पृथ्वीपासून लाखो-करोडो किलोमीटर दूर असणारा शनी हा ग्रह "देव" बनून आपल्याला शहाणपणा शिकवायला कसा येईल हा प्रश्न त्याला पडत नाही. तो निमुटपणे शनी महात्म्य वाचतो, ज्योतिषाने सांगितलेले तोडगे करतो. मानवी जीवनातील ताण-तणावांना, समस्यांना सामोरं जायचा अजून एक उपाय आहे. तो म्हणजे मानसोपचारांचा. मात्र मानसोपचार प्रचंड खर्चिक आहेत. सर्वसामान्यांना परवडण्यापलिकडचे आहेत. हे उपाय दिर्घकाळ चालू ठेवावे लागतात. इतके करूनही समस्या दूर होईलच याची खात्री नसते. आपल्याकडे मानसोपचारतज्ञाकडे जायचा कुणी विषय काढला की "मला काय वेड लागले आहे काय?" असा प्रतिप्रश्न केला जातो. शरीराचे जसे तात्कालिक छोटे छोटे आजार असतात तसेच मनाचेही (खरे तर मेंदूचे) आजार असतात या गोष्टीचा स्विकार अजूनही समाजाने केलेला नाही. मानसोपचारतज्ञाकडे जाणे म्हणजे वेड लागणे असे एक सरधोपट समिकरण बनले आहे. (वेड लागणे ही schizophrenia या मनोरोगाची टोकाची अवस्था आहे.) डॉक्टरकडे कशाला जातो, तो तुला अँडीप्रेसंटच देईल असे भयानक सरसकटीकरण केले जाते. या सार्‍या कारणांमुळे सर्वसामान्य माणूस मानसोपचारांपासून दूर राहतो आणि देव आणि कुंडलीला जवळ करतो. ते स्वस्तही पडते आणि बरेच वेळा प्रभावीही ठरते. नाहीच काही मार्ग निघाला तर खापर फोडायला नशीब असतेच.

In reply to by सतिश गावडे

किती संयमित प्रतिसाद देता येतो याचे उत्तम उदाहरण.अगोदर राजेश घासकडवी यांनीही गुरुत्त्वाकर्षणाचा मुद्दा सोप्या रीतीने समजावून दिलाय.

In reply to by सतिश गावडे

सर्वसाधारणपणे सश्रद्ध हिंदू घरात जन्माला येणारे मुल आपल्या आई बाबांच्या श्रद्धा तशाच्या तशा स्विकारते. हे जवळ जवळ १००टक्के सत्य .आमचे फॅमिली डो म्हणतात साय अति खाण्याची सवय १५ वर्षापर्यन्त लागते व माणूस एम डी २२ ते २५ व्या वर्षी होतो.सबब साय खाउ नका असे लोकाना सांगतो पण स्वतः......? तसेच हे श्रद्धेचे प्रकरण असते. माझ्या नातेवाईकात हा नियम तर १०००१ टक्के लागू होतो. पुढे कार्यकारण भावाचे कितीही ज्ञान झाले तरी भान येत नाही. प्लासिबो मुळे काही बाबतीत फरक पडतो पण अम्तर्मनातील समजूतीलाव ताकदीला फार मोठे स्थान बाह्य गोष्टीपेक्षा महत्व आहे भले माणसाचे कायिक जीवन परिसरावर अवलंबून असेल तरीही. मी तरी माझ्या जीवनात शुभेच्छा देतो घेतो आशिर्वाद देतो व घेतो पण त्यामुळे मी घडलो किंवा कुणी घडला असे मी मानत नाही.

In reply to by तर्राट जोकर

आम्हाला इन्वर्स सिलेक्शन म्हैते. फोटोशॉपमध्ये असतय. जेवढे सिलेक्ट केलेले तेवढे सोडून उरलेले सिलेक्ट होते. Alt+S+I

खरे आहे हे.

""पुण्याहून औरंगाबादला जाताना शाम भागवत - Sat, 16/04/2016 - 17:06 नवीन पुण्याहून औरंगाबादला जाताना नगरच्या पुढे घोडेगाव लागते. तिथून ७ कि.मी. वर सोनई गाव आहे. १९८५ सालापासून त्या गावी कामानिमित्त जाण्याचा योग येतोय.--------" हा संपुर्ण प्रतिसाद काय दर्शवतो? जे विश्वास ठेवत नाहीत ते १) विश्वास ठेवणाय्रांना पटवू शकत नाहीत तर ते गुरुत्वाकर्षणाचे नियम इथे थिटे पडतातहेत.२) ज्यांना धाग्याविषयाला धरून चर्चा करायची हे ती चालू द्या.

वैभव जाधव साहेब या अगोदरची पोस्ट गेल्या ३० वर्षांच्या लढाईच्या मूल्यमापनासाठी स्वअनुभवावर टाकली होती. पण आता माझा सहभाग नसणारेय. अजून एक दोन पोस्टी टाकणार होतो. उद्याचा दिवस त्यासाठी मोकळा असेल असे गृहित धरले होते. पण उद्या तातडीने दुसर्या गावी जावे लागतय त्यामुळे आता जमेल असे वाटत नाही. पण काही असो तुमचा पहिलाच धागा शंभरी पार करणार असे दिसतेय. कंजूष साहेब गावडे साहेब नमस्कार. शुभं भवतु.

शनी-शिंगणापूर हे शिर्डीच्या वाटेवर म्हणा किंवा शिर्डीच्या खुप जवळचे असे एक देवस्थान आहे. त्यामुळे शिर्डीला आलेले भाविक लोक "वाटेत शनी-शिंगणापूरलाही जाऊ" असा विचार करून शनी शिंगणापूरला जात असावेत. कुणी आवर्जून फक्त शनी शिंगणापूरला जात असेल असं वाटत नाही.
तुम्ही जो संशय व्यक्त केलाय तो मुद्दा मान्य. शनिवार, अमावास्या व शनि अमावास्या हे दिवस सोडून तुम्ही म्हणता तसे घडणे शक्य आहे पण तरीही..... ५२ शनिवार, १२ अमावास्या व शनि अमावास्या यादिवशी होणारी अभूतपूर्व गर्दी सुध्दा शिर्डीचीच असते पण "शिर्डीला आलोच आहोत तर शनि शिंगणापूरला जाऊन ४-५ तास रांगेत उभे राहून दर्शन घेऊ." अशा विचारातच सर्व भक्त मंडळी आलेली असतात अशी मनाची समजूत घालणे मला जरा जड जातेय. माझ्या लेखात मी नेहमी शनिवारीच सोनईला जायचो असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे आणि माझे अनुभव हे फक्त शनिवारचेच आहेत. असो.

शनी-शिंगणापूर का प्रसिद्ध झाले याची मी ऐकलेली माहिती वेगळी आहे. कुणी कॅसेट कंपनीचे मालक म्हणे तिथे गेले होते. बहूधा टी सिरीजचे गुलशन कुमार असावेत. त्यांनी म्हणे शनीदेवावर एक व्हीडीओ फिल्म बनवली आणि तेव्हापासून हे ठीकाण प्रसिद्धीला आले. ही माहिती मी खुप पुर्वी युनिक फीचरच्या एका लेखात वाचली होती. त्यांच्या वेबसाइटवर हा लेख शोधला असता सापडला नाही.
मी गेल्या ३० वर्षांच्या कालखंडाबद्दल बोलतोय. त्यात मी १९८५, १९८७-८८, १९९३, २००४ या टप्यां वर मला आलेले अनुभव मांडले आहेत व त्या आधारे काही निष्कर्ष काढायचा प्रयत्न केला आहे. गुलशन कुमारांनी फिल्म काढली त्यामुळे शनिशिंगणापूरची प्रसिध्दी वाढली असे तुम्ही म्हणताय. तुमचे म्हणणे संयुक्तिक असल्याने तसे झाले असणे शक्य आहे. पण.. गुलशन कुमार तेथे कधी गेले होते व त्यांनी ती फिल्म कधी बनवली होती हे तुम्ही लिहिले असते तर बरे झाले असते. माझ्या माहिती प्रमाणे १९९४ सालापर्यंत तरी तशी काही फिल्म बनलेली नव्हती. म्हणजे गुलशन कुमारांनी फिल्म बनवली, त्यामुळे अनिस वाल्यांना शनिशिंगणापूरची महिती मिळाली व मग त्यांनी आंदोलन केले असे काही घडले नसून, ८७-८८ मधे आंदोलन झाले व त्या आंदोलनामुळेच शनिशिंगणापूर प्रसिध्दी पावून १९९४ नंतर गुलशन कुमार तेथे आकर्षित झाले असे घडले असण्याची शक्यता मला जास्त वाटते. मी या आंदोलनाला इतके म हत्व देतोय कारण; एखादे चोरी अथवा दरोडा पडला तरी ती बातमी होते. मग एखाद्या गावात गेल्या ५० वर्षात एखादी छोटीशी सुध्दा चोरी झाली नाही ह्या बातमीचे मूल्य किती असेल? कुठे बाहेर जायचे असले तरी ह्या गावातील लोक घराला कडी कुलपेही लावत नाहीत ह्या वाक्याने या बातमीचे मूल्य किती वाढेल? कडी कुलपांचे जाऊ दे, त्या गावातील एकाही घराला दाराच्या चौकटी असल्या तरी त्या चौकटींना दारेच नसतात तरीही तिथे चोरी होत नाही. ह्या बातमीचे मूल्य काय असेल ? आणि शेवटचे, या गावाचे रक्षण शनिमहाराज स्वतः करतात त्यामुळे तेथे चोरी होत नाही ही अंधश्रध्दा असून आम्ही त्याला आव्हान देत आहोत (म्हणजे त्या गावात जाऊन चोरी करून दाखवणार आहोत.) असे अनिस ने जाहीर केल्यामुळे या गावाची प्रसिध्दी किती वाढली असेल याचा ज्याने त्याने आपल्या कुवती प्रमाणे विचार करावा. असो. गुलशन कुमारांनी निव्वळ धंदा म्हणून ती फिल्म काढली, का त्यांनाच काही अनुभव आला म्हणून त्या अनुभवापोटी त्यांनी ती फिल्म काढली याबाबत मलाही माहिती नाही. शिवाय तुमच्या मुद्याचा प्रतिवाद करण्याच्या हेतूने ती माहिती मिळवून इथे टंकण्यात मला रसही नाही. ज्योतिष शास्त्र हे अध्यात्मिक उन्नती करण्यासाठीचे एक हत्यार (टूल) असून त्याचा उपयोग हल्ली फलज्योतिषासाठी केला जातो. व त्यामुळे मूळ ज्योतिष शास्त्र बदनाम होत आहे हा खरा माझा प्रतिपादनाचा हेतू असल्याने जास्त चर्चाक न करता इथेच थांबतो.

In reply to by शाम भागवत

ज्योतिष शास्त्र हे अध्यात्मिक उन्नती करण्यासाठीचे एक हत्यार (टूल) असून त्याचा उपयोग हल्ली फलज्योतिषासाठी केला जातो. व त्यामुळे मूळ ज्योतिष शास्त्र बदनाम होत आहे हा खरा माझा प्रतिपादनाचा हेतू असल्याने जास्त चर्चाक न करता इथेच थांबतो.
यावर जरुर लिहा. आज ज्योतिष हे "फलज्योतिष" म्हणून माहीती आहे. कित्येक हवशे नवशे आणि गवसे ज्योतिषी लोकांच्या विपत्तीचा गैरफायदा घेऊन आपले खिसे भरत आहेत.

In reply to by सतिश गावडे

खिसे तर प्रत्येकजणच भरत आहे. मग ते राजकारणी, कंत्राटदार, प्रशासक, उच्चाधिकारी, डाॅक्टर, मेडिकल स्टोअर्स, एम.आर., खाजगी कंपन्या, जाहीरात करणारे, टीव्ही चॅनल, नगरसेवक हे सर्व यात येत नाहीत का? हे सर्व लोक पण कुठली तरी भीति दाखवूनच स्वतःचे खिसे भरतात ना? नाही मी काय म्हणतो? असल्या भोंदू ज्योतिषी व महाराजांची पोलखोल व्हावीच पण सोबत वरच्या वर्गांसोबत पण तशीच चर्चा व्हावी ना?

In reply to by विजय पुरोहित

होय. करायलाच हवी. मात्र आता विषय ज्योतिष्याचा चालू आहे तर सुरुवातीला ज्योतिष्यांबद्दल चर्चा करूया. :)

In reply to by वैभव जाधव

कोण भांडतंय त्याची साडेसाती चालु असेल. असो. शंभर प्रतिसादानिमित्त जेपीसंचालित, अध्यक्षित अखिलमिपासत्कारसमितीतर्फे आपले घोड्याची लोखंडी नाल, जहाजाचा जुना खिळा, लोहाराची ऐरण ह्यांच्या संयुक्तवितळमाने बनवलेली शनीची अंगठी देण्यात येत आहे. (वर्गणीचे तेवढे दोनशीक्कावन जमा करुन टाका, तेवढंच पुन्न...)

प्रश्न घेऊन इच्छुक ज्योतिषाकडे गेला की त्या प्रश्नाच्या प्रकाराने ठराविक ग्रहाकडेच बघितलं जातं.गुरू हा चांगला ग्रह असा गैरसमज पसरलेला असतो आणि बय्राचदा तुम्हाला शनि/मंगळाची पीडा आहे हे ऐकवलं जातं तसं सर्वात वाइट्ट ग्रह गुरूबद्दल कोणी बोलत नाही. मंगळ- तडकाफडकी वाट लावतो पण अडीच वर्षाच्या आत ठीक होतं. शनि - हळहळू वाट लावतो आणि हळूहळू पुर्ववत करतो. गुरू: कायमची वाट लावतो सुटका नाही.एवढा मोठा ग्रह वजनदार ग्रह बसला की सर्व चेंगरूनच जातं.

In reply to by विजय पुरोहित

गुरू वाईटच . अलिकडे शाळांच्या फ्या किती झाल्यात पहा ! सगळे ज्ञान नेटवर ८०० रूपयाच्या पॅक मधे मिळते. परत बस चा खर्च नाही. ह्या ह्या !

In reply to by चौकटराजा

सहमत आहे गुरुजी वाईटच ! इतक्या विनंत्यानंतरही पिंपरीकट्ट्याला येईनात ते... अति अवांतर :टक्या गुरुशीच गुरगुर हे पुस्तकाचे कुठवर आलय लिखाण.. अभ्याला मुखपृष्ठ बनवायला सांगायचं आहे छपाई बद्दल बोलणी करायची आहेत मूळ अवांतर : गावडे मास्तरांचा दीर्घ प्रतिसाद आवडला. ज्योतीषाचा तिटकारा द्वेष करण्यापेक्षा अभ्यास करून नीर-क्षीर करणे जास्त रास्त. त.जों.च्या सत्कार यादीत काळी बाहुली राहिली आहे ती सत्कार प्त्र दाखवून घेऊन जाणे. सेवा तत्पर नाखु

मुलांविशयी काहीही प्रश्न आला- न होणे,मंदबुद्धी,वैरी,अपंग,वेडसर इत्यादी की गुरूच पाहावा लागतो.अतिहुशार लोक वृद्धापकाळी भ्रमिष्ट, अपमान वगैरे गुरू.शनिची पीडा जाते तशी याची जात नाही.भोग.त्यामुळे भोग नसलेला मनुष्य म्हणजे सुखी मनुष्य.

काही निर्णय झाला की खरडा करुन कळवा प्लीज. :) अशा धाग्यांनी बर्‍याचद पब्लिक गोंधळुन जाते. ग्रहांचा परिणाम होतो की नै म्हैती. पण चर्चेचा परिणाम हळव्या जिवांवर होऊ शकतो आणि असे काठावर असलेले बंधु पटापट शनिला हात जोडायल लागतात. =)) ग्रहाचं टेन्शन नका घेऊ मित्रहो . चांगलं खात पित जा. आयुष्य इंजॉय करा. बाकी चालु द्या. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नमस्कार बिरुटेसर, रोचक चर्चा आणि माहितीपुर्ण प्रतिसाद. शाम भागवत यांनी पुरेसे स्पष्टीकरण दिलेच आहे. तुमच्या काळजी निमित्त थोडा माझा अनुभव इथे द्यावासा वाटला. शाम भागवतांनी सांगितल्याप्रमाणेच ज्योतिष हे आध्यात्मिक उन्नतीचे साहाय्यक आहे. ह्यात कोणतीही ऐहिक, भौतिक सुख, समाधानाची अपेक्षा करु नये असा दंडक मी तरी मानतो. माझा गेल्या बर्‍याच वर्षांचा अंकशास्त्राचा अभ्यास आहे. आजकाल नाशिकमधे माझ्याकडे काही जिज्ञासू यायला लागले आहेत. पण माझे एक तत्त्व आहे जे मी शंभर टक्के पाळतो आणि त्यामुळे मला काही विशिष्ट गोष्टी कळल्यात. मी माझ्याकडे येणार्‍या कुठल्याच जातकाला कोणतेही उपाय सांगत नाही. रत्न, यंत्र, शांती इत्यादी खर्चिक उपाय तर सोडाच, अगदी मंत्र म्हणा, जप करा इतकेही नाही. जे आहे जसे आहे ते तसे त्यांच्यासमोर मांडतो. त्यांचे मागचे आयुष्य कसे गेले, पुढे कसे जाणार, काय आव्हाने असतील, काय चांगल्या गोष्टी होऊ शकतात, काय काळजी घ्यावी असे सर्व सांगतो. कठिण काळासाठी तयार राहायला सांगतो. थोडक्यात समुपदेशनाचेच काम. पण होतं काय की हे इच्छुक त्यासाठी येतच नसतात. त्यांना ताबडतोब रामबाण उपाय हवा असतो. गंडा, दोरा, खडा, यंत्र, यज्ञ काहीतरी नाही काय ज्याने आमची सुटका होईल, काम नीट होउ शकेल असे उपाय मागतात. आयुष्याकडे उघड्या डोळ्याने पाहायची तयारीच नसते. जे आहे ते कबुल करण्याची मानसिकता नसते. मी बघतो ते ९० टक्के समस्या ह्या मनोकायिक असतात. मनोबल वापरले, वाढवले तर ह्यातल्या किमान ६०-७० टक्के तरी समस्या निपटून जातात. पण सगळेच लोक मनाचे धैर्यवान नसतात. शस्त्रे असुन गळपाटतात. त्यांना कोणी दुसर्‍याने त्यांचे काम करावे असे वाटत असते. खडा, दोरा, मंत्र, यंत्र हे सगळे दुसर्‍याच्या खांद्यावर आपली जबाबदारी टाकण्याचे प्रकार आहेत. ह्यातुनच ज्योतिषी, भोंदु ऑफकोर्स, अशांना याची दशा, त्याची साडेसाती, अमका भारी तमका वक्री करुन भंडावून सोडतात. मी कधीही फसवणार्‍यांना दोष देत नाही. दोष नेहमी फसले जाणार्‍यांचाच. अहो, तुम्हीच संधी देताय ना, मग जो हुशार असेल तो कशाला सोडेल? तर मी स्पष्ट सांगतो, बाबांनो. कितीही उड्या मारा, प्रारब्धाच्या बाहेर काही नाही. कोणत्याही दैवी समजल्या जाणार्‍या उपायांचा उपयोग होत नाही. जे झालं असं वाटतं ते योगायोग फक्त. एक नातेवाईक आहेत, स्वत:चे स्टोनक्रशर, ट्रक्सने बिल्डिंग मटेरियल सप्लाय च्या धंद्यात बराच पैसा कमावला. टोलेजंग इमारत बांधली, दोन-तीन ट्र्क्स होते. नंतर अचानक उतरती कळा लागली. बराच पैसा अडकला. कोणीतरी सांगितले नारायण नागबळी करा. केला. ज्यादिवशी त्र्यंबक सोडले त्याच दिवशी एक मोठी अमाऊंट घेउन जा म्हणुन क्लायंटचा फोन आला. साहेब खुश. पण दोन वर्षांनी त्यांना बघितले तर चाळीवजा दोन कौलारु खोल्यांच्या भाड्याच्या घरात राहत होते. सगळी संपत्ती समाप्त. हे भविष्य कोणताही सामान्य ज्योतिषी सांगु शकणार नाही. असे अनेक किस्से आहेत. ग्रहांचा परिणाम होत नाही. ते फक्त सुचक आहेत. पण ते काय सुचना करत आहेत हे गिफ्टेड -मार्क माय वर्ड्स- 'गिफ्टेड' ज्योतिषालाच कळते. असे गिफ्टेड ज्योतिषी मिळणे ज्याच्या नशिबात आहे त्यालाच मिळतात. त्या विशिष्ट क्षणी त्याला पुढचा मार्ग दर्शवतात. गंडा घालणारे फक्त गंडा घालतात. अशांपासून खरंच दूर राहणे. माझ्या अभ्यासात असेही लक्षात आले आहे की काही विशिष्ट अंक असणारे लोक अजिबात ज्योतिषात विश्वास ठेवत नाहीत काहीही झाले तरी. त्यांची कुंडलीच तशी असते. अशांनी लाथ मारिन तिथे पाणी काढीन हा अ‍ॅटिट्युड जरुर ठेवावा, पण तितके भाग्यशाली नसलेल्या आपल्या इतर बांधवांची त्यांच्या वागणुकीबद्दल खिल्ली उडवू नये ही विनंती. धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

मला अंकशास्त्र पद्धतीने माझे भविष्य/प्राक्तन/ज्योतिष पाहायचे आहे. तुमचा जातक व्हायला काय करावे लागेल? त्याचा मोबदला किती द्यावा लागेल?

In reply to by सतिश गावडे

हरकत नसेल तर प्रकट मुलाखत मी घेईन अर्थात साथीला चिंचवडचे चिक्त्सक काकाश्री असतील्च. वाचक नाखु

In reply to by संदीप डांगे

भारीच प्रतिसाद डांगे अण्णा... अशांनी लाथ मारिन तिथे पाणी काढीन हा अ‍ॅटिट्युड जरुर ठेवावा, पण तितके भाग्यशाली नसलेल्या आपल्या इतर बांधवांची त्यांच्या वागणुकीबद्दल खिल्ली उडवू नये ही विनंती. +111

In reply to by संदीप डांगे

तर मी स्पष्ट सांगतो, बाबांनो. कितीही उड्या मारा, प्रारब्धाच्या बाहेर काही नाही. कोणत्याही दैवी समजल्या जाणार्‍या उपायांचा उपयोग होत नाही. जे झालं असं वाटतं ते योगायोग फक्त. हे १००१ एक टक्के आहे त्यामुळे मी भयानक दु:खे वाट्याला येऊन आनंदी राहिलो काही अवचित चांगले घडले त्यालाही योगायोग॑ मानतो. एक माणसाची मजबुरी हे दुसर्‍याची संधी एक माणसाचे दुरदैव हे दुसर्‍याचे सुदैव हे सार आहे आपल्या जीवनाचे.

या धाग्याचा टिआरपी चांगला असल्यामुळे हा सगळ्यांनी बघावा असा एक मेसेज इथे टाकत आहे. (हा मला व्हॉट्सअ‍ॅपवर आलेला आहे, त्यामुळे काही लोकांनी तो आधीच पाहिलेला असू शकतो.) याचा विषयाशी संबंध नाही याबद्द्ल चूभूमाअ.

"We need help from India to free us. Why is India silent?" — Baloch woman

What Nazis did to Jews, Pakistan is doing to our people, says a Baloch woman with tears in her eyes. Demanding help from India to free her country from Pakistan's actrocious occupation, she urges India not to remain a silent spectator when her neighbors, the Balochs, are suffering.

राजेश घासकडवी, तुम्ही गुरुत्वाकर्षणाच्या नियमांत फलज्योतिष बसवू पाहताहात. मात्र हा नियम (ज्याला न्यूटनचा नियम म्हणतात तो) कितपत परिपूर्ण आहे? या नियमानुसार शनीच्या कड्यांचं स्पष्टीकरण करता येत नाही. मग त्याच्या कसोटीवर फलज्योतिष घासून बघावे का? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

अरेरे, अशी चूक झाली का माझी? न्यूटनचे फडतूस, सिद्ध न झालेले नियम वापरून मी ज्योतिषासारख्या महान शास्त्रावर शंका घेण्याचा प्रयत्न केला तर... कुठे फेडू मी हे पाप?!

In reply to by तर्राट जोकर

आमची द्रव्याने भरलेली नौका श्रीवर्धन बंदरात आम्ही घट्ट बांधून ठेवली आहे. त्यामुळे टेन्शन इल्ले.

In reply to by कंजूस

लोक न्युटनच्या नियमांचा उगाच बाऊ करतात. न्युटनने सफरचंद झाडावरून खाली पडताना पाहण्याआधी सफरचंदं काय वर जात होती काय आत्मा जसा देह सोडून वर जातो तसे?

In reply to by सतिश गावडे

कोकणात सफरचंदे होत नाहीत म्हणून. नैतर गुरुत्वाकर्षणाचा शोध एखाद्या कोंकण्यानेच लावला असता!

In reply to by तर्राट जोकर

नारळ माडावरून पडताना कधीही माणसाच्या डोक्यात पडत नाही असा एक समज आहे. खरे खोटे कोणास ठाऊक.

In reply to by सतिश गावडे

सजातीय धृव प्रतिकर्षण करतात. त्यामुळे वरुन पडणारा नारळ डोक्याजवळ आला की प्रतिकर्षित होउनन्नारळ दूर जाउन डोके शाबूत रहाते. हॅरी पॉटरच्या जुडव्या छड्याप्रमाणे नारळ व डोस्के जुडवा असल्याने एकमेकाना मारु शकत नाहीत.