मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मराठी संकेतस्थळावर तुमचा दिवसातून किती वेळ जातो?

विकास · · कौल

वाचने 1500 वाचनखूण प्रतिक्रिया 43

भाग्यश्री Sat, 01/17/2009 - 05:18
सद्ध्या हाती काही कामधंदा नसल्याने, आणि भरपूर वेळ असल्याने १ ते३ तास.. ! (स्वगतः इतका वेळ संकेतस्थळांवर ???? व्यसनमुक्ती केंद्र शोधलं पाहीजे..) http://bhagyashreee.blogspot.com/

सुनील Sat, 01/17/2009 - 06:22
नक्की सांगता येणे कठीण. काही दिवशी मुश्किलीने अर्धा तास तर कधी सहज ४-५ तास. म्हणून सरासरी काढून १-३ तास ह्या पर्यायाला मत दिले आहे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

विकास Sat, 01/17/2009 - 07:50
नक्की सांगता येणे कठीण. काही दिवशी मुश्किलीने अर्धा तास तर कधी सहज ४-५ तास. म्हणून सरासरी काढून १-३ तास ह्या पर्यायाला मत दिले आहे. माझे पण असेच आहे!

In reply to by विकास

नक्की सांगता येणे कठीण. काही दिवशी मुश्किलीने अर्धा तास तर कधी सहज ४-५ तास. म्हणून सरासरी काढून १-३ तास ह्या पर्यायाला मत दिले आहे. माझेही असेच !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छोटा डॉन Sun, 01/18/2009 - 11:54
>>नक्की सांगता येणे कठीण. काही दिवशी मुश्किलीने अर्धा तास तर कधी सहज ४-५ तास. म्हणून सरासरी काढून १-३ तास ह्या पर्यायाला मत दिले आहे. +१, असेच म्हणतो ... कधी मुश्किलीने ५-१० मिनीटे तर कधी दिवसभर पडीक, त्यामुळे सरासरी काढुन व सुवर्णमध्य काढुन "१-३ तास" ह्याला मत दिले आहे. ------ (मर्यादीत ) छोटा डॉन

रेवती Sat, 01/17/2009 - 06:57
गेले दोन तीन महिने रोज दीड ते दोन तास असायचे मिपावर पण नविन वर्षाचा संकल्प म्हणून अर्धा ते पाऊण तास असते म्हणून पहिला पर्याय निवडलाय. आपण अगदी योग्य कौल सुरू केलाय. रेवती

सोनम Sat, 01/17/2009 - 07:29
५ पेक्षा अधिक, मिपा अथवा इतर संकेतस्थळावर मी कायमच पडलेली (लॉगइन) असते कधी कधी सुट्टी असेल् तर २-३ तास बसते. नेट लावले की पहिल्यादा मिपावर येते.

अनिल हटेला Sat, 01/17/2009 - 07:32
हापीसात असल्यास मिपावर पडीक असतो... कामानिमित्त बाहेर गेल्यास दिवसातुन १५-२० मिनिटे असतोच असतो... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

In reply to by अनिल हटेला

विकास Sat, 01/17/2009 - 07:51
हापीसात असल्यास मिपावर पडीक असतो... कामानिमित्त बाहेर गेल्यास दिवसातुन १५-२० मिनिटे असतोच असतो... म्हणजे मग हापिसात का जाता? :-) ;)

In reply to by विकास

नितिन थत्ते Wed, 01/21/2009 - 13:31
असे प्रश्न थेट विचारायचे नसतात. मध्यंतरी आय. टी. वाल्यांच्या कामाविषयी आणि आरामाविषयी काथ्याकूट झाला आहेच. आयटी वालाच नितिन.

अनिल हटेला Sat, 01/17/2009 - 07:58
>>>म्हणजे मग हापिसात का जाता? मिपा वर लॉग इन व्हायला !! ;-) काम भी कोइ करनेकी चीज है ? :-D बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

चतुरंग Sat, 01/17/2009 - 11:40
साधारण तीन-चार महिन्यापर्यंत रोज ३-४ तास असायचो. नंतर भरती ओसरली आणि आता साधारण ३० मिनिटे ते १ तास संपूर्ण दिवसात मराठी आंतरजालावर असतो. (शुक्रवार रात्र, शनिवार, रविवार नक्कीच जास्ती म्हणजे साधारण २ तास असतो.) पण एकूण सरासरी लक्षात घेता पहिला पर्याय निवडलाय. चतुरंग

निखिलराव Sat, 01/17/2009 - 11:56
हापीसात असताना वेळ मिळेल तेव्हा मिपावरच पडीक असतो. तरी पण नक्की सांगता येणे कठीण. कधी एक तास तर कधी कधी ४-५ तास. म्हणून सरासरी काढून १-३ तास ह्या पर्यायाला मत दिले आहे.

घाटावरचे भट Sat, 01/17/2009 - 12:01
मला पण सध्या काही कामधंदा नसल्याने मी मिपावर पडीक असतो. बाकीच्या संकेतस्थळांवर फार फार तर १५-२० मिनिटे.

Sat, 01/17/2009 - 12:09
साधारण एक तास मिपा वर येणे होते. नवीन असल्याने सध्या फक्त वाचनातच वेळ जातो.

मी नोकरी लागल्यापासून मिपावर पडीक असते; पण आता काम वाढल्यापासून ऍक्टीव्ह फारच कमी वेळ असते, साधारण सरासरी एक ते दीड तास! त्यामुळे मत दुसर्‍या पर्यायाला दिलंय. अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

हपिसात पुर्ण वेळ पडीक असतो......त्यानंतर घरी गेल्यावर देखील :) एवढ्या पुर्ण वेळात संकेतस्थळांवर सरासरी फार तर २-३ तास ऍक्टीव्ह (कार्यरत) असतो. - टिंग्या अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट! अवांतर : इतर संकेतस्थळांवर टिका-टिपण्णी करण्यासाठी कृपया याचा वापर करू नये! ही ही ही! हे आवडलं बरं का :)

In reply to by ब्रिटिश टिंग्या

सखाराम_गटणे™ Sun, 01/18/2009 - 11:38
>>हपिसात पुर्ण वेळ पडीक असतो......त्यानंतर घरी गेल्यावर देखील सहमत ऑफीसमध्ये असताना, मी खालील वेळी मिपावर असतो १. कोड कंपाइल होत असताना, किमान ३-४ मिनीटे लागतात २. फोन होल्ड वर असताना ३. बिनमहत्वाचा फोन चालु असताना, पण जो फोन घ्यावाच लागतो ४. जेवण झाल्यावर झोप येत असताना ५. खुप मोठी ऑफीसची ई-मेल वाचुन झाल्यावर ६. सॉफ्ट्वेअर इन्स्टॉल करताना. ७. मधल्या सुट्टीत ८. खुप उशीरापर्यंत काम केले आणि काम करुन थकल्यावर अजुन आठवतील तशे टाकतो. ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

कोलबेर Sat, 01/17/2009 - 21:12
मिपा सदस्य 'सखाराम गटणे' ह्यांचे खरे नाव सुद्धा 'विकास' आहे असे त्यांच्या व्यक्तिरेखेवरुन समजते. एकुणच तुम्हा दोघांचा कौल काढण्याचा उत्साह बघता अशी आणखी साम्यस्थळे शोधायला आवडतील. :) हलकेच घ्या हं! बाकी ह्या कौलातुन मिळणारा विदा नक्की काय कामाचा? अशी एक शंका देखिल डोकावली.

In reply to by कोलबेर

बाकी ह्या कौलातुन मिळणारा विदा नक्की काय कामाचा? अशी एक शंका देखिल डोकावली. अशी शंका माझ्याही मनात डोकावलीच होती ! विकासरावांचा काय उद्देश असेल माहित नाही. ( पण उद्देशाशिवाय ते काही टाकणार नाही ) पण 'कोलबेरा, संस्थळावर आपण वावरतो किती वेळ, किती वेळ दिला पाहिजे. आपल्या वेळेचा किती सदुपयोग करता येतो ! करावा काय ? या आणि असंख्य प्रश्नाच्या उत्तराचे सिंहावलोकन करण्यास मदत होईल असे वाटले. उदा. माझेच सांगतो..कधी-कधी चार-पाच तास असे मत टाकल्यावर खूप वेळ वावरतो असेच वाटले. मिपावर किंवा अन्य संस्थळावर असतो तेव्हा या काही तासात काय मिळवलं ! आनंद आणि ज्ञान सोडता ( कधी कधी खूप पश्चाताप, नाहक वैताग धरुन ) या विदाचा स्वतःसाठी तरी उपयोग व्हावा असे वाटले ! काय म्हणता ? -दिलीप बिरुटे

In reply to by कोलबेर

अहो सर, पण बाकिचे किती वेळ पडिक असतात ह्या विदाचा तुम्हाला काय उपयोग? हम्म ! तेही खरं आहे !!! :( पण ते आपापल्या कामात उर्जा मिळावी म्हणून इथे पडिक असतात असा पॉझीटीव्ह अर्थ आपण घेऊ या !!!

In reply to by कोलबेर

असे कसे. बाकीचे कितीवेळ पडीक असतात यावरून महत्वाचा डेटा काढून त्याविषयी आपली परखड मते व्यक्त करता येतात ना!(इतर स्थळांवर) पुण्याचे पेशवे Since 1984

In reply to by llपुण्याचे पेशवेll

कोलबेर Tue, 01/20/2009 - 01:57
मला नाही वाटत विकासरावांचा ह्यामागे असला काही हेतू असेल. तुमच्याकडे ह्याचा काही पुरावा आहे का?

In reply to by कोलबेर

विकासरावांचा नाही हो पण इतर कोणाचा असू शकत नाही असे नाही. मी फक्त असा डेटा जमा करण्याचे फायदे (?) सांगतो आहे. :) पुण्याचे पेशवे Since 1984

In reply to by llपुण्याचे पेशवेll

कोलबेर Tue, 01/20/2009 - 02:31
अच्छा, म्हणजे अश्या कौलांचे 'साईड इफेक्ट्स' सांगत होता होय तुम्ही ;) पण मी उपयोगां विषयी विचारत होतो हो!

In reply to by कोलबेर

कोणताही कौल हा पुर्णपणे निरउपयोगी सतो, तो कमी जास्त उपयोगी असतो गटण्याच्या प्रतिक्रियेतून साभार शेवटी इफेक्ट साईडइफेक्ट हा पॉइंट ऑफ व्ह्यू वर अवलंबून आहे. :) पुण्याचे पेशवे Since 1984

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकास Sat, 01/17/2009 - 22:44
संस्थळावर आपण वावरतो किती वेळ, किती वेळ दिला पाहिजे. आपल्या वेळेचा किती सदुपयोग करता येतो ! करावा काय ? या आणि असंख्य प्रश्नाच्या उत्तराचे सिंहावलोकन करण्यास मदत होईल असे वाटले. बरोबर आहे सर! एक विरंगु़ळा म्हणून हा कौल घालत असताना असे सिंहावलोकन आपसूक होऊ शकेल असे वाटल्याने कौल घातला इतकेच.

In reply to by कोलबेर

विकास Sat, 01/17/2009 - 22:41
बाकी ह्या कौलातुन मिळणारा विदा नक्की काय कामाचा? सामाजीक संकेतस्थळे ज्यात मिपा प्रमाणे अन्यही मराठी संकेतस्थळे आहेत, तेथे जे काही लिहीले जाते, खरडले जाते, कुरघोड्या केल्या जातात, वगैरे वगैरे, त्या तरी नक्की काय कामाच्या असतात हे सांगता येईल का? :-) अहो कौल हा कशातच घालता येत नाही (कॅटॅगराइझ्ड करता येत नाही), नाहीतर विरंगुळा म्हणून घातला असता. कुणाला कौल टाकायला आवडतात तर कुणाला संपादीत केलेली छायाचित्रे टाकायला आवडतात. त्यात ज्यांना प्रतिसाद देयचा असतो ते तेथे देतात... सोप्पे आहे! मिपा सदस्य 'सखाराम गटणे' ह्यांचे खरे नाव सुद्धा 'विकास' आहे असे त्यांच्या व्यक्तिरेखेवरुन समजते. एकुणच तुम्हा दोघांचा कौल काढण्याचा उत्साह बघता अशी आणखी साम्यस्थळे शोधायला आवडतील. अवश्य शोधा! संशोधन कसे करायचे हे आपल्याला सांगायची गरज नाही असे वाटते ;) हवा असल्यास त्यावर एखादा कौल टाकून बघा सोपे जाते का ते :-)

In reply to by विकास

कोलबेर Sat, 01/17/2009 - 22:49
हा प्रतिसाद आम्ही जसाच्या तसा गटणेंना धाडून देणार आहोत. त्यांना त्यांच्या कौलांवर कुणी उड्या मारू लागले की शाकारणी करायला हा प्रतिसाद उपयोगी पडेल असे वाटते :)

In reply to by विकास

सखाराम_गटणे™ Sun, 01/18/2009 - 12:36
प्रत्येकाचे कौल टाकण्याचे उद्देश वेगवेगळे असतात. मी कौल हे इतर लोकांच्या एकाद्या विषयाबद्दलच्या प्रतिक्रिया आजमावुन पहाणे व त्याचा विदा जमवणे ह्या साठी टाकले होते. मला असे वाटत नाही की कोणताही कौल हा पुर्णपणे निरउपयोगी असतो, तो कमी जास्त उपयोगी असतो. कौलामुळे, लोक एकाद्या प्रश्नाकडे कोणत्या नजरेने पाहतात हे समजता येते. ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

In reply to by सखाराम_गटणे™

मी कौल हे इतर लोकांच्या एकाद्या विषयाबद्दलच्या प्रतिक्रिया आजमावुन पहाणे व त्याचा विदा जमवणे ह्या साठी टाकले होते. मला असे वाटत नाही की कोणताही कौल हा पुर्णपणे निरउपयोगी असतो, तो कमी जास्त उपयोगी असतो हे मात्र खरे. ज्याच्या त्याचा दृष्टीकोण. जर आपल्याला कौल निरर्थक वाटला तर मत देऊ नये. सोप्पे. पुण्याचे पेशवे Since 1984

अवलिया Sat, 01/17/2009 - 22:55
मी पहील्यांदाच मिपावर आणि मराठी संकेतस्थळावर आत्ता प्रवेश केला आहे. त्यामुळे कल्पना नाही कौलारु विकास यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!! --अवलिया अवलियाची अनुदिनी

In reply to by अवलिया

विकास Sat, 01/17/2009 - 22:57
कौलारु विकास यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!! नक्की कोणत्या विकास बद्दल बोलत आहात?

In reply to by अवलिया

विनायक पाचलग Sun, 01/18/2009 - 12:01
आम्हाला व्यसनमुक्ती केंद्रात धाडा खायची आणि वाचायची मिसळ अती खाणे पुर्वी ४ ४ तास असायचो आता अभ्यास वाढलाय आता कंटाळा आला की मिपा प्रेम उतु जाते रविवारी जरा जास्तच विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले

मॅन्ड्रेक Mon, 01/19/2009 - 18:02
नक्की सांगता येणे कठीण. काही दिवशी मुश्किलीने अर्धा तास तर कधी सहज ४-५ तास. म्हणून सरासरी काढून १-३ तास ह्या पर्यायाला मत दिले आहे. सहमत. kinnari एक क्षण भाळ्ण्याचा - बाकि सारे सांभाळ्ण्याचे.

एकलव्य Tue, 01/20/2009 - 02:25
मिपाकरांवर किती वेळ गेला याचा पत्त्ताच लागला नाही असे म्हणण्याची पाळी येऊ नये असा हेतू असावा. (विकासकृपे अंतर्मुख) एकलव्य

In reply to by एकलव्य

सर्किट Wed, 01/21/2009 - 01:33
मिपाकरांवर किती वेळ गेला याचा पत्त्ताच लागला नाही असे म्हणण्याची पाळी येऊ नये असा हेतू असावा. एक सुधारणा: पाळी येऊ नये असे वाटण्यासाठी वेळ जाऊन उपयोग नाही. दिवस जावे लागतात. -- सर्किट