Skip to main content

मातृभूमीला 'माँ' म्हणण्याची गरज का?

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 13/04/2016 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् वर्ष तत् भारतं नाम भारती यत्र संततिः समुद्राच्या उत्तरेला आणि हिमाद्रीच्या दक्षिणेतल्या भू भागाला भारत असे म्हणतात. या भारतभूमीची संतति इथे निवास करते. अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. हे लक्ष्मणा, सुवर्ण लंकेचा राजा बनण्यापेक्षा अयोध्येत भरताच्या अधीन सेवक राहणे अधिक रास्त कारण माता आणि मातृभूमी स्वर्गापेक्षा हि महान आहे. पुरातन काळापासूनच आपण आपल्या भरत भूमीला आई म्हणतो. युरोपियन लोक हि देशाला पितृभूमी म्हणतात. एकदा का देशाला आपण माता /पिता मानले कि देशात बंधुत्वाचे वातावरण आपसूक निर्मित होते. जिथे सोख्य असेल तिथे शांती, आणि समृद्धी हि आलीच प्रकृतीने हिमालयापासून समृद्रापर्यंत एक विशिष्ट भूभागाची रचना केली आहे. या भू-भागात अनेक भाषा-भाषी, पंथ आणि जातींचे लोक राहतात. एकाच राजाचे राज्य नेहमीच या भूभागावर राहील, हे संभव नाही. सत्तेसाठी युद्ध हे अटळ आहेच. आपल्या देशात सत्ता बदलली तरी लोकांवर जास्त अत्याचार होत नव्हते. कारण लोकांमध्ये बंधुत्व भाव आहे. आपले ऋषी-मुनि दूरदर्शी होते. धर्म आणि जातीच्या नावाने संपूर्ण भरत भूमीत राहणार्या लोकांना सांस्कृतिक दृष्ट्या एक सूत्रात बांधणे शक्य नाही हे त्यांना माहित होते. प्रत्येकाला त्याचीच भाषा, जाती आणि पंथ श्रेष्ठ वाटतो. पण देशाच्या मातीप्रती लोकांच्या मनात आत्मीयता उत्पन्न करणे शक्य होते. आपल्या ऋषींनी हेच केले. सकाळी म्हणण्याचे श्लोक म्हणजे प्रात:स्मरणची रचना केली. लोकांच्या मनात देशाची माती आणि तिथे जन्मलेल्या महापुरुषांप्रती आदर भाव जागृत करणे हाच दूरदर्शी ऋषींचा उदेष्य हेतू होता. उदा: गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती. नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधि कुरु. महेन्द्रो मलय: सह्ये देवतात्मा हिमालय:. ध्येयो रैवतको विन्ध्यो गिरिश्चारावलिस्तथा. अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका. पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिका. रोज सकाळी प्रात:स्मरण केल्याचा परिणाम, लोकांच्या मनावर नकळत होतोच. घरात नळाच्या पाण्याने किंवा गावात विहिरीच्या पाण्याने, स्नान करत असताना आपण देशातील सर्व नद्यांच्या पाण्याने आंघोळ करण्याचा आनंद घेतो. यमुनेच्या पाण्यात स्नान करताना माझ्या मनात कावेरी नदीत स्नान करण्याची इच्छा उत्पन्न होते. सर्व पर्वतांचे आणि नगरांचे दर्शन घेण्यासाठी यात्रेची इच्छा होणारच. भरतभूमी वर जन्म घेणार्या आपल्या पूर्वजांप्रती आपल्या मनात आदर आणि श्रद्धा निर्माण करण्याचे काम हि आपल्या ऋषींनी केले. भारतभूमीत जन्म घेणारी महान विभूती मग ती स्त्री असो वा पुरुष, त्यांची स्मृती नेहमी आपल्याला राहावी म्हणून त्यांना हि प्रात:स्मरणात स्थान दिले. आयुष्यभर संघर्ष करून आपले उद्दिष्ट साध्य करणार्या आपल्या ५ महान स्त्रियांचे आपण रोज प्रात: स्मरण करतो: अहल्या द्रोपदी सीता तारा मंदोदरी तथा. पंचकन्या स्मरेनित्यं महापातक नाशनम्. तसेच पुण्यश्लोको नलो राजा... ‘अश्वत्थामा बलिर्व्यासो... सारांश अश्यारीतीने पुरातन ऋषींनी आपल्या मनात या देशाच्या माती आणि पूर्वजांच्या प्रती आपल्या मनात आदर आणि भक्तीभाव उत्पन्न केला. आज आपण आपल्या पूर्वजांची पूजा करतोच मन देशाच्या मातीला ‘भारत माँ’ संबोधून तिची हि पूजा करतो. जेंव्हा देशाचे राजकीय दृष्ट्या शेकडों तुकडे झालेले होते, त्याच वेळी आदी शंकराचार्यांनी देशाच्या चारी भागात चार मठांची स्थापना केली. चार धाम यात्रेची सुरवात बहुधा आदी शंकराचार्यांमुळेच सुरु झाली असेल. शाक्त पंथीयांनी देशात विभिन्न भागात (पाकिस्तान सहित) ५२ शक्तीपीठांची स्थापना केली. शैवांनी देशात विभिन्न प्रांतात १२ ज्योतिर्लिंगांची स्थापना केली. जवळपास सर्व हिंदू तीर्थ क्षेत्री जैनांनी सुद्धा आपली मंदिरे उभारली. गुरु गोविंद जर काही काळ आणिक जिवंत राहिले असते तर निश्चित कन्याकुमारीला हि एक गुरुद्वारा बांधला असता. असो. आज हि विभिन्न स्थानांवर भरणार्या कुंभ मेळ्यात देशातील सर्व ठिकाणाहून यात्रेकरू येतात, सर्व पंथीय साधू सन्यासी, यात्री एकत्र बसून चर्चा करतात. अश्यारितीने देशातील सर्वपंथांनी, या मातीप्रती लोकांचे प्रेम, श्रद्धा आणि आदरण निर्माण करण्यात महत्वाचे योगदान दिले आहेत. देशाला मातृभूमी किंवा आई मानण्याने, देशात राहणार्या लोकांमध्ये बंधुभाव निर्माण होतोच या शिवाय एक राजनीतिक सत्ता स्थापन करण्यात हि यश येते. आपल्या देश्यात शेकडों चक्रवर्ती झाले. एकदा दिल्ली काबीज केली कि संपूर्ण देशाची सत्ता सहज प्राप्त होत होते हे आपण इतिहासात पाहिलेच आहे. आत्ताचेच उदाहरण घ्या. देशाला स्वतंत्रता मिळण्याच्या वेळी देशात ६०० पेक्षा जास्त राजे-महाराजे होते. त्यातील अधिकांश राजा-महाराजांनी स्व:खुशीने आपल्या राज्यांचे भारतात विलीनीकरण केले. तेथील जनतेने हि विरोध केला नाही. कारण विभिन्न राज्यात राहणारी लोक या देशाला ‘भारत माँ’ म्हणून ओळखत होते. भारतमाते प्रती त्यांच्या मनात श्रद्धाभाव होता. इस्लाम मध्ये देशाला मातृभूमी मानण्याची अवधारणा नाही. पण धर्मावर आधारित बंधुभावाची अवधारणा आहे. त्यांच्या मनात आपल्या गैर इस्लामिक पूर्वजांप्रती सम्मानाची भावननेला हि स्थान नाही. तेथील जनतेला एकत्र ठेवण्याचा कुठलाच दुआ उरलेला नाही. एकाच देशात राहणारे लोक, एकच धर्म मानणारे, पंथ, कबीला, जातीच्या नावावर एका दुसर्याच्या विरुद्ध लढत आहे. कोण स्वकीय आणि कोण परीकीय हे कळण्याची बुद्धी हि त्यांच्यात उरलेली नाही. जे लोक त्यांच्या कबील्याचे किंवा पंथाचे नाही, त्यांची हत्या करण्यात त्यांना काहीच वाईट वाटत नाही आहे. मग लहान मुले असो किंवा स्त्रिया सर्वांचाच वध होतो. लाखोंच्या संख्येने लोकांना आपली जन्मभूमी सोडून शरणार्थी बनावे लागले आहे. ह्या देशांचा संपूर्ण विनाश झालेला आहे. एकच धर्म मानणारे बंधुभावाने राहू शकतात, हि अवधारणा फोल ठरली आहे. गेल्या शतकात दोन विश्व युद्ध इसाई धर्म मानणार्या युरोपियन देशांत झाले. नेपाल हिंदू धर्मावलंबी असला तरी भारताशी त्याचे संबंध चांगले नाही. इस्लामी देशांची परिस्थिती तर आपण पाहताच आहोत.. ज्या देशांत त्यांची पूर्वजांना सम्मान दिल्या जातो, तेथील परिस्थिती वेगळी आहे. इराणी लोक आज हि अग्निपूजक जाल, रुस्तम, सोहराब यांचे तराणे गातात, तिथे शांती आहे. ५००० पेक्षा जास्त द्वीपसमूह आणि भारताप्रमाणे भिन्न-भिन्न जनजातीय असलेल्या इंडोनेशियात लोक एकत्र राहतात. रामायण आणि महाभारतातल्या कथांनी आणि चीनी परंपररेनी तिथल्या लोकांना एकत्र जोडलेले आहे. मिस्त्रच्या लोकांना आपल्या पिरामिड आणि त्यांना बनविणार्या पूर्वजांवर गर्व आहे. नील नदी प्रती त्यांच्या मनात आदर भाव आहे. परंतु आजकाल इस्लामी कट्टरता त्यांच्या मनात त्यांच्या पूर्वजांप्रती अनादर निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचेच परिणाम आज मिस्त्रचे लोक भोगत आहेत. १९४७ मध्ये भारताच्या ज्या भागात इस्लाम मानणारे लोकांची संख्या जास्त होती, तो भूभाग देशापासून वेगळा झाला त्याचे कारण हेच. पण हे इथेच थांबणार नाही, देशाच्या मातीप्रती आदर नसल्यामुळे पाकिस्तानचे भविष्यात आणखीन हि तुकडे होण्याची संभावना नाकारता येत नाही. आज तिथे अराजकतेचे वातावरण आहे. बलूच, पठाण, पंजाबी, शिया, सुन्नी सर्वच दुसर्याला आपले शत्रू समजतात. जर इस्लामी जगात शांतता प्रस्थापित करायची असेल तर मातृभूमीला आईचे स्थान देण्याची अवधारणा इस्लाम मध्ये समाविष्ट करावी लागेल. अर्थात हे कार्य इस्लामी विद्वानांच करावे लागेल. एकदा देशाला आई म्हंटले कि त्या भूमीत जन्म घेणार्या सर्व पंथीय आणि जातीय लोकांविषयी बंधुत्व भाव आपसूक निर्माण होतो. लोक एका दुसर्याला जाणण्याचा प्रयत्न करतात. देशात शांती प्रतिस्थापित होते. आज आपल्या देशाला ‘भारत माता’ म्हणण्याचा विरोध काही अतिशहाणे पुरोगामी करीत आहे. एक तर त्यांना इतिहासाचे ज्ञान नाही. होणार तरी कसे? अंग्रेजानी देशावर राज्य करण्यासाठी ‘फूट डालो राज करो’ च्या नीतीचे अवलंबन केले होते. त्या साठी त्यांनी आपल्या पुरातन इतिहासालाच खोटे ठरविले. हेतू आपल्या पूर्वजांप्रती आपली श्रद्धा नष्ट करणे. एकदा लोकांच्या मनात ते वेगवेगळे आहेत, हि भावना रुजविली कि त्यांच्यात दुही माजविण्यात यश येतेच. त्याच साठी देवासुर संग्राम म्हणजे आर्य आणि द्रविडांचे युद्ध. असा इतिहास शिकवणे सुरु केले. आज देशाला स्वत्रंत होऊन हि ७० वर्षे झाली तरी हि आपल्याला पूर्वजांचा खरा इतिहास शिकविला जात नाही. अंग्रेजानी त्यांच्या स्वार्थासाठी तैयार केलेला खोटा इतिहास शिकून तैयार झालेले अतिशहाणे आपल्या भूमीला ‘माता’ कसे मानणार. भारत मातेच्या बर्बादीचे नारे लावणारे त्यांचे हिरो झालेले आहे. या विद्वानांना एवढे हि कळत नाही, एकदा भारत माते विषयी आपली श्रद्धा नष्ट झाली तर या मातीचे शंभर तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. मग लिबिया आणि इराक सारखी आपली गत व्हायला कितीस वेळ लागेल. हे टाळायचे असेल, तर उद्यापासूनच आपल्या मुला-बाळांना प्रात: स्मरणीय श्लोक शिकवा. आपल्या देशातील नद्या, पर्वत, पवित्र सरोवरे, पुरातन ऋषी-मुनि, राजा-महाराजा, बादशाह आपले सणवार त्यांच्या मागच्या कहाण्या इत्यादी बाबत माहिती दिली तरी चालेल.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 32732
प्रतिक्रिया 184

प्रतिक्रिया

In reply to by पैसा

खरं आहे, पण तोच तर प्राॅब्लेम आहे ना! उसके लिए दिल बडा होना चाहिए|

In reply to by पैसा

रहमानने माँ असा शब्द वापरलाय , पण विशिष्ट एखादी मूर्तीचा आग्रह नाही.

In reply to by mugdhagode

मग? भरतमातेची विशिष्ट मूर्ती असते का?

In reply to by पैसा

रहमानने म्हंटल म्हणून प्रत्येकाने म्हणावे असा आग्रह धरण्यात अर्थ नाही. किंवा कुणी तसे म्हणत नाही म्हणून तो देशद्रोही ठरत नाही. तसे मुंबईत अनेक इतर धर्मी गणेशोत्सवही साजरा करतात. म्हणून प्रत्येकाने केला पाहिजे असे नाही. आपल्या प्रतिज्ञेतही कुठेच भूमीला माता म्हंटलेले नाही.

In reply to by दिग्विजय भोसले

हीच ती भारतमाता!! तिने 15 ऑगस्ट इसवी सन 1947 रोजी इंग्लंडच्या गोर्या दैत्याचा वध केला. हीच ना?

In reply to by प्रदीप साळुंखे

लोल =(( चक्क दहा हात!!!

In reply to by पैसा

चित्रातल्या मागच्या नकाशाच्या सीमा बघा.. सगळ्या त्या घाणीसकटच भारतवर्षाची स्वप्न बघणारे आहे बरेच जण :-)

In reply to by बाळ सप्रे

पाकिस्तान आणि बांगलादेश कुठे दाखवलेत त्यात? काश्मीर पूर्ण दाखवलेला आहे पण तो तसाही अधिकृत नकाशांमध्ये दाखवला जातोच.

In reply to by दिग्विजय भोसले

एका मातीत जन्मलेल्या लोकांची पूजा पद्धती वेगळी असली तरी ते याच भूमीचे पुत्र आहे. भारत मातेच्या हातात क्रॉस, कडा किंवा चांद सितारा दाखविला तात्पर्य वेगवेगळ्या वस्त्रांत दाघ्विली तरी ती भारत माताच राहणार. हे समजणे आवश्यक आहे.

In reply to by mugdhagode

संपादकीय मधून डांबरट शेलकी भाषा वापरून इतरांवर टिकेची झोड उटवणे हेच "शो"सेनेचे काम हाय. राम मंदिर हा भाजपचा मुख्य अजेंडा असणार नाही हे चांगलेच झालं कि? त्यांना विकासाच्या अजेंड्यावरच लोकांनी सत्ता दिली आहे केंद्रात.

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

विरोधात होते तेंव्हा ते बोलायचे सत्ता द्या , मंदिर वही बनायेंगे. सत्ता मिळायावर बोलले की पूर्ण्बहुमत नाही. आता सत्ता व पूर्ण बहुमत दोन्ही आहे. आता बोलतात की राम व विकास यांचा संबंध नाही. ! यांची बदलती रूपं पाहून साक्षात मारीचही ढसाढसा रडेल.

In reply to by mugdhagode

हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्या साठी सुद्धा आपण सरकार, भाजपा आणि संघ यांनाच जबाबदार धरणार काय ?

In reply to by mugdhagode

यांची बदलती रूपं पाहून साक्षात मारीचही ढसाढसा रडेल.
तुमचे डू आयडी बघून तो इतका रडला की त्याला dehydration झालं, हे तुम्हाला माहित आहे का?

मां नको तर मुस्लिमांनी अम्मी म्हणावं, क्रिश्चनांनी मम्मी म्हणावं. हा.का.ना.का. आणि जमत नसेल तर बॅगा भराव्यात. चपला घालाव्यात आणि शेजारच्या देशात अथवा रोमला फुटावं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

तुम्हाला मुद्दा कळाला नाही. त्याला धर्माचं अधिष्ठान आहे,भूमीला/प्रांताला/देशाला अम्मी असं नाही म्हणत ते!! ते एकेश्वरवादी आहेत,अल्लाह सोडून दुसर्या कोणाचं गुणगान/पूजा ते करीत नाहीत,मात्र त्यांचं देशावर प्रेम आहे असे ते वारंवार सांगतात कि शिवाय जय हिंद ही घोषणासुद्धा देतात. : : बाहेर जा असे म्हणणे म्हणजे थोडं अतिच होतयं.

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

ओह त्यांची विचारसरणी म्हणजे धार्मिक अधिष्ठान आणि हिंदु विचारसरणी म्हणजे भगवा दहशतवाद हे विसरलो होतो. माफ करा हां. मी कुठे त्यांना देशद्रोही म्हणतोय? मी सांगतोय चार लोकं जसे वागतायत तसे वागा. उगीचं वेगळा बुट काढुन तेढ कशाला वाढवायची? एवढी वर्षं कोणी भारतामाता, इंडिया, हिंदुस्थान वगैरे नावांनी बोलत होते तेव्हा कोणाला शष्प काय फरक पडत नव्हता. आताचं आम्ही मां म्हणणार नाही, भारत माता म्हणणार नाही वगैरे मुद्दे चव्हाट्यावर मांडायची काय गरज होती? म्हणु नका पण बोंबलुन जाहिर करुन वाद निर्माण करायच्या मागचं राजकारणं लैचं वाकडं आहे हे वेगळे सांगणे नं लगे. बाकी वमनटंकनसुरांनी बुचाचं औषधं घ्यावं असं सुचवतो. म्हणजे धाग्यावर अवांतर पातळ होणार नाही.

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

दर्गा काय असतो? अल्ला समोर मस्तक झुकल पाहजे ,मग मोइदुन चिश्तिच्या नावाने का गळे काढले जातात? दयेवर जगणं पाप आहे तर मग सबसिडी घेताना धर्म बूड़त नाही काय? इथे हजची व् इतर सर्व सब्सिडी गृहीत धरली आहे. देहदान ही संकल्पना मुस्लिम मौलवी वा विचारवंत कधी चर्चतील का? जर हे निकष लावले गेले तर अवयव दानासाठी मुस्लिम कधीच पात्र ठरू शकणार नाही. इतर अनेक प्रश्न आहेत. आपल्या मिपावर अनेक जानकार आहेत, वेळोवेळी त्यांना पुळका येत असतो. जरा स्पष्ट करतील काय?

In reply to by भंकस बाबा

खरं आहे. घोषणा देणार नसतील तर त्यांनी गप्प बसावे,उगाच गाजावाजा करून फतवे काढायची गरज नव्हती. पण तुम्ही दुसरी बाजू समजून घेणार आहात का? कोणत्याही गोष्टीचं दैवतीकरण करण्याची गरज काय? देशाला देवीसारखं मूर्त स्वरूप कशासाठी? भारतमातेचं मंदीर कशासाठी ? मग उद्या मंदीराबाहेर दुकाने लागतील.धूप,अगरबत्ती,फुले वाहिली जातील.आपण त्या पुराणवृत्तीतून बाहेर कधी पडणार? देश हा देश आहे, दॅट्स ऑल!

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

देशाला देवीसारखं मूर्त स्वरूप कशासाठी? भारतमातेचं मंदीर कशासाठी ? मग उद्या मंदीराबाहेर दुकाने लागतील.धूप,अगरबत्ती,फुले वाहिली जातील.आपण त्या पुराणवृत्तीतून बाहेर कधी पडणार?
ह्या गोष्टीशी सहमत. लोकं कशाचा बाजार बनवतिल ते काही सांगता येत नाही. तुम्ही म्हणता तसं होउही शकेल. पण तरीही देश हि संकल्पना धर्मापेक्षा मोठी असायलाचं हवी.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

पण तरीही देश हि संकल्पना धर्मापेक्षा मोठी असायलाचं हवी. प्रचंड सहमत! अन माझ्यामते हाच खाल मुंडी... साहेब ह्यांचा मुद्दा आहे! देश हा धर्मापेक्षा मोठा असला पाहिजे, हे समान लागु असेल जे भारताला माता म्हणू इच्छित नाहीत त्यांना सुद्धा अन जे भारतमातेला अष्टभुजा महिषासुर मर्दिनीच्या रुपात पाहतात त्यांना सुद्धा! 'भारत माता की जय' न म्हणणाऱ्या जनतेने त्यांचे धर्मादेश त्यांच्या घरात ठेवावे हे जितके सत्य तितकेच तिला दैवी मूर्ती म्हणून दर्शवणाऱ्या जनतेने 'तिचे त्याच रुपात अभिवादन करा नाहीतर तुम्ही देशभक्त नाही किंवा तुम्ही चालते व्हा' असे म्हणू नये हे देखील सत्य!. पुन्हा एकदा बोलतो की आपापल्या वैयक्तिक आयुष्यात ज्याला जसे वाटेल त्याने तशी राष्ट्राची आराधना करावी / करू नये . त्याला आक्षेप घ्यायचा कोणालाच अधिकार नसावा कारण तो एक मुलभुत संवैधानिक हक्क असेल किंबहुना आहेच.

In reply to by नाना स्कॉच

हे खरं आहे पण असं होत नाही. धर्म ही संकल्पना देशापेक्षा जुनी आहे. इस्लाम आणि ख्रिश्चानिटीमध्ये तर ती अनेक देशांना व्यापून उरलेली आहे. त्यामुळे देश हा धर्मापेक्षा मोठा असतो, असायला पाहिजे हे मान्य पण तसं होणं कठीण आहे.

In reply to by नाना स्कॉच

strong>जे भारताला माता म्हणू इच्छित नाहीत त्यांना सुद्धा अन जे भारतमातेला अष्टभुजा महिषासुर मर्दिनीच्या रुपात पाहतात त्यांना सुद्धा! 'भारत माता की जय' न म्हणणाऱ्या जनतेने त्यांचे धर्मादेश त्यांच्या घरात ठेवावे हे जितके सत्य तितकेच तिला दैवी मूर्ती म्हणून दर्शवणाऱ्या जनतेने 'तिचे त्याच रुपात अभिवादन करा नाहीतर तुम्ही देशभक्त नाही किंवा तुम्ही चालते व्हा' असे म्हणू नये हे देखील सत्य हे मान्य परंतु भारतीय घटनेपेक्षा आमच्या धर्माचे पुस्तक जास्त श्रेष्ठ आणी आमच्या वैयक्तिक कायद्यात ढवळाढवळ करण्याचा घटनेलाही अधिकार नाही असे म्हणणार्याबद्दल आपले काय म्हणणे आहे? ज्यांना या भूमिचे कायदे मान्य नाहीत त्यांनी तरी येथून चालते व्हा असे आपण म्हणणार? का त्यांना पण आपली घटना, आपले कायदे यांची पायमल्ली करूनही राहू द्या (सहिष्णूपणाचे धोरण ठेवून) असे म्हणणार?

In reply to by सुबोध खरे

चतुराईने दोन असंबद्ध मुद्दे एकत्र आणून एक दुसर्‍यास जोडून हवे तेच प्रक्षेपित करणे हा जुना खेळ झाला आता खरे साहेब. 'भारतमाताकी जय म्हणा नाही तर चालते व्हा' हे म्हणणे आणि 'देशाचे कायदे पाळा अन्यथा चालते व्हा' हे म्हणणे दोन अतिशय वेगळ्या गोष्टी आहेत. एकास विरोध म्हणजे दुसर्‍यास सहमती असा अर्थ तर होत नाहीच. घटना, कायदे, पायमल्ली इत्यादी शब्द खुबीने पेरलेत. असे वा तसे, तुम्हाला भारतात मुस्लिमच नको आहेत हे एकदाचे स्पष्ट बोलून टाका आता. म्हणजे कोणाला देशभक्ती, सहिष्णुता, पुरोगामीपणाचे सर्टीफिकेट्स वाटत बसण्याची गरजच पडणार नाही.

In reply to by तर्राट जोकर

strong>जे भारताला माता म्हणू इच्छित नाहीत त्यांना सुद्धा अन जे भारतमातेला अष्टभुजा महिषासुर मर्दिनीच्या रुपात पाहतात त्यांना सुद्धा! 'भारत माता की जय' न म्हणणाऱ्या जनतेने त्यांचे धर्मादेश त्यांच्या घरात ठेवावे हे जितके सत्य तितकेच तिला दैवी मूर्ती म्हणून दर्शवणाऱ्या जनतेने 'तिचे त्याच रुपात अभिवादन करा नाहीतर तुम्ही देशभक्त नाही किंवा तुम्ही चालते व्हा' असे म्हणू नये हे देखील सत्य हे मान्य हे वाचले नाही काय? पहिला भाग STRONG केला होता तो आला नाही हे दुर्दैव. परंतु जे AIMPLB ( मुस्लीम वैयक्तिक कायदा मंडळ) आम्ही "भारतमाता की जय" म्हणणार नाही म्हणते तेच फतवा काढून सांगत आहे कि "तीन वेळा तलाक मध्ये आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मानणार नाही". आपण "एकाच" मंडळाबद्दल बोलत आहोत तेंव्हा मुद्द्यात घोळ नाही. तुम्हाला AIMPLB ( मुस्लीम वैयक्तिक कायदा मंडळ) "आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मानणार नाही" म्हणते त्याबद्दल काय म्हणायचे आहे ते स्पष्ट म्हणा.

,

लोकहो, मुस्लिमांनी मातृभूमीला आई म्हणण्यावरून इतकं चर्वितचर्वण झालं हे पाहून मौज वाटली. मातृभूमीच्या नावाने राजकीय पक्ष तुर्कस्थान, अझरबैजान, रशिया, युक्रेन आणि चक्क मंगोलियामध्येही आहेत. तिथे कुठेही इस्लाम खतरेमे पडंत नाही. इथल्या मुसलमानांना काय धाड भरलीये भारतमाताकी जय बोलायला? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

देशातल्या सगळ्या मुसलमानांचे तुमच्याकडे प्रतिज्ञापत्र पोचले काय? उगा आपले सेन्सेशनल बुद्धीभ्रम करणारे विषय काडायचे आणि असा नाय तर तसा मुसलमानांवर ठपका ठेवायचे निमित्त उकरुन काडायचे. चर्चितचर्वण नक्की कोण करत आहे ह्याचा जरा तुम्हीच विचार करा पैलवान. कोनतरी बोलतो भारतमाताकी जय म्हटलंच पाहिजे त्यावर दुसरा बोलतो नाय बोलनार ज्जा. कोनतरी टीनपाट फतवे काडनार, कोनतरी मुखमंत्री देशात राहण्याचा अधिकार नाही बोलनार, कोनतीतरी पार्टी कायदा करायचं बोलनार, कोनतरी फुटपट्टी घेउन बसनार कोन देशभक्त कोन नाय. २०१५ च्या शंभर वर्षांपासुनच्या आधीपासून लोक भारतमाताकी जय बोलत आलेत, हिंदू-मुस्लिम-शीख-इसाई. सगळे भारतीय. तेव्हा बहुतेक हे आज शिकवणी घ्यायला उपटलेले झोपलेले असतील. परत झोपलेत निवांत, तर आनंद होईल.

In reply to by तर्राट जोकर

हा लेख केवळ आपल्या देशाच्या संबंधित नाही अपितु सर्व देशांच्या जनतेच्या दृष्टीकोनातून लिहिला होता. मुख्य म्हणजे सिरीया, इराक यथे जे चालले आहे, त्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

In reply to by विवेकपटाईत

दोन समुदाय एकमेकांना भीडतात तेथे प्रत्येकदा मायभूमी हा संदर्भ नसतो. धर्म हा ही संदर्भ नसतो. ज्यांना भिडायचेच आहे त्यांना कुठलेही कारण पुरते. आपला लेख फारफेच्ड वाटला. असो हे माझे वैयक्तिक मत.

In reply to by तर्राट जोकर

तजो, १. >> देशातल्या सगळ्या मुसलमानांचे तुमच्याकडे प्रतिज्ञापत्र पोचले काय? नाही हो. माझ्याकडे फक्त दारूल उलूमचा फतवा पोहोचलाय. २. >> उगा आपले सेन्सेशनल बुद्धीभ्रम करणारे विषय काडायचे आणि असा नाय तर तसा मुसलमानांवर ठपका >> ठेवायचे निमित्त उकरुन काडायचे. मुसलमानांवर सरसकट ठपका येऊ नये म्हणून तर मातृभूमी पक्षाची उदाहरणे दिली आहेत. जर तुर्कस्थानात मातृभूमी पक्ष उभारी घेऊ शकतो तर भारतात का नाही? ३. >> चर्चितचर्वण नक्की कोण करत आहे ह्याचा जरा तुम्हीच विचार करा पैलवान. दारूल उलूमला कसलीही चर्चा न करता सरळ फतवा काढायची काय गरज होती? ४. >> कोनतरी बोलतो भारतमाताकी जय म्हटलंच पाहिजे त्यावर दुसरा बोलतो नाय बोलनार ज्जा. कोनतरी टीनपाट >> फतवे काडनार, कोनतरी मुखमंत्री देशात राहण्याचा अधिकार नाही बोलनार, कोनतीतरी पार्टी कायदा करायचं >> बोलनार, कोनतरी फुटपट्टी घेउन बसनार कोन देशभक्त कोन नाय. वरील कथनात 'भारतमाताकी जय' च्या जागी 'पाकिस्तान पाहिजे' टाका. कोणतरी टिनपाट म्हणजे महमंदअली जिना समजा आणि कोणतरी मुख्यमंत्री म्हणजे बंगालचा मुख्यमंत्री सुहरावर्दी म्हणून धरा. बघा, असाच गोंधळ १९४६ साली उडलेला होता. त्यातूनच पुढे पाकिस्तानची मागणी लादण्यात आली. सदैव सावध राहिलेले बरे, नाहीका? ५. >> २०१५ च्या शंभर वर्षांपासुनच्या आधीपासून लोक भारतमाताकी जय बोलत आलेत, हिंदू-मुस्लिम-शीख-इसाई. >> सगळे भारतीय. तेव्हा बहुतेक हे आज शिकवणी घ्यायला उपटलेले झोपलेले असतील. परत झोपलेत निवांत, >> तर आनंद होईल. सहमत. दारूल उलूम गप्प राहायला शिकले तर सगळीकडे आनंदी आनंद होईल. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बरोबर आहे. तुम्ही दारुल उलुम ला सिरियसली घेणार, ओवेसीला सिरियस्ली घेणार कारण तुमची इच्छित कर्मे ते लोक करत आहेत. सगळ्या पांढर्‍या कागदावरचा छोटासा डाग तो तुम्ही दाखवणार आणि बोलणार हे बघा हा अख्खा कागद काळा आहे. तुम्ही ठरवूनच टाकले तर अधिक काय बोलणे. असो. धन्यवाद!

In reply to by तर्राट जोकर

तजो, >> सगळ्या पांढर्‍या कागदावरचा छोटासा डाग तो तुम्ही दाखवणार हे बरोबर बोललात. पाकिस्तान आधी छोटासा डागच होता. खुद्द पाकिस्तानी प्रांतातल्या मुस्लिमांनाही पाकिस्तान नकोच होता. तरीपण असंख्य हिंदूंचे बळी घेऊन उत्पन्न झालाच ना? शत्रू, आग, साप आणि कर्ज कधी छोटे म्हणू नयेत. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

शत्रू, आग, साप आणि कर्ज कधी छोटे म्हणू नयेत. ह्याच्याशी बाडिस. आता फक्त प्रश्न दोनच १. भारतातल्या मुस्लिमांना तुम्ही शत्रु समजता काय? २. हिंदूंमधले जे काही साप, शत्रु, इत्यादी आहेत त्याबद्दल आपले वरचे मत तसेच राहिल काय?

तर्राट जोकर, तुमच्या प्रश्नांची यथामती उत्तरे देतो. १. भारतातल्या मुस्लिमांना तुम्ही शत्रु समजता काय? उ. : भारत तोडणारा कोणीही माझा शत्रूच आहे. स्वत:ला मुस्लिम म्हणवणारे काही गट (उदा.:आयसिस) मला शत्रू समजून माझी हत्या करायला टपलेले आहेत. त्यांना मी शत्रू मानतो. २. हिंदूंमधले जे काही साप, शत्रु, इत्यादी आहेत त्याबद्दल आपले वरचे मत तसेच राहिल काय? उ. : होय. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

१. हे माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही. प्रश्न परत वाचा. तुम्ही कोनाला शत्रु मानता हे विचारलेले नाही. २. धन्यवाद. पण अशी साप शत्रु ह्यांची तुमची व्याख्या नक्की काय? म्हणजे कधी तुम्ही अशांबद्दल लिहितांना दिसला नाहीत.