✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सांधीकोपरं

ज
जव्हेरगंज यांनी
गुरुवार, 04/14/2016 - 23:47  ·  लेख
लेख
बाई मरुन गेली. अन घराचं सांधीकोपरं काळवंडलं. मधल्या वाश्याच्या खोबणीत एका भुंग्यानं साम्राज्य थाटलं. लाकडाची भुकटी करुन मग आत खोलवर पसरवलं. खालच्या आड्याला काळ्या कातळाचं गठळं साचलं. सुर्य सकाळी उगवायचा अन पारुश्या घरात येऊन तापायचा. त्याच्या रोगट उन्हाचा सडा छपरा-भिंतीवर पडायचा. म्हातारी आपलं भुंडं केस विचरत ओट्यावर बसून राहायची. खुडूक कोंबडी सारखी. उघड्या दरवाज्यातनं गांधीलमाशी आत यायची अन वळचणीला जाऊन भिरभिरायची. दिवळीच्या आत तिनं पण भोकं भोकं करुन ठेवलेली. त्यात जाऊन लपायची. एकदा कोळ्याच्या जाळ्यात सापडली अन मरुन गेली. मागे भोकाभोकातली अंडीपिल्ली ठेवून तशीच गेली. तिचं पार्थिव शरीर जाळ्यात कधीकधी थरथरतं. एके दिवशी तेही नाहिसं झालं. म्हातारीला उठवणी यायचं. घरात येऊन मग ती कपभर चहा करुन प्यायची. खरकटी भांडी खंगाळताना मग एकटीच हातवारे करून बोलत बसायची. देवपूजा तिच्याच्यानं होत नव्हती. पण जपमाळ ओढत उन्हात जाऊन बसायची. भुंगा रोजच यायचा. लाकूड भरडून आतला भुसा बाहेर टाकायचा. त्याचा किरकीट आवाज रात्री बेरात्री ऐकू यायचा. कुणी एक सुतारपक्षी दुपारचं गोठ्यातल्या बांबूवर आपली चोच अशीच आपटायचा. म्हातारीला आताशा जास्त करणं होत नाही. कसलसं निदान झालं अन एके दिवशी तीही मरुन गेली. घरामागच्या झेंडूच्या फुलांनीही माना टाकल्या. गोठ्यावर शेकारलेलं पाचूट उडून गेलं. लिंबूनीचं एक रोप लावलेलं ते कधी उगवलंच नाही. घरामागची बाभळ मात्र ताडमाड उभी होती. परवा वादळी वाऱ्यात ते घर म्हणे पडून गेलं. अन बाईची एकमेव अस्तित्वखूण पुसून गेली.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
5459 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

जबरदस्त ताकदीचे लिखाण ...

उगा काहितरीच
Fri, 04/15/2016 - 00:16 नवीन
जबरदस्त ताकदीचे लिखाण ...
  • Log in or register to post comments

_/\_

रातराणी
Fri, 04/15/2016 - 01:06 नवीन
_/\_ नाव का असे दिले आहे पण? अर्थ नाही कळला...
  • Log in or register to post comments

आता फक्त भुंग्याचा रव ऐकू

कंजूस
Fri, 04/15/2016 - 05:22 नवीन
आता फक्त भुंग्याचा रव ऐकू येतोय.
  • Log in or register to post comments

टोकदार

नाखु
Fri, 04/15/2016 - 08:29 नवीन
आणी जव्हेरगंज शैली म्हणतात ती हीच.
  • Log in or register to post comments

+१

तुषार काळभोर
Fri, 04/15/2016 - 10:49 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

+१

नीलमोहर
Fri, 04/15/2016 - 17:33 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

जबरदस्त!!!

साहेब..
Fri, 04/15/2016 - 08:43 नवीन
जबरदस्त
  • Log in or register to post comments

अप्रतिम... जबरदस्त...

विजय पुरोहित
Fri, 04/15/2016 - 10:51 नवीन
अप्रतिम... जबरदस्त...
  • Log in or register to post comments

अमूर्त....

IT hamal
Fri, 04/15/2016 - 10:55 नवीन
नाव व लेखनाचा अमूर्त सम्बन्ध आम्हा पामरान्ना समजून सान्गावा....ही नम्र विनन्ति
  • Log in or register to post comments

_/\_

DEADPOOL
Fri, 04/15/2016 - 12:43 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments

बाई आणि म्हतारी हे दोन पात्र

मराठी कथालेखक
Fri, 04/15/2016 - 12:47 नवीन
बाई आणि म्हतारी हे दोन पात्र आहेत की एकच ? बाकी भकास आणि एकाकी आयुष्य दिवस छान रेखाटला आहे.
  • Log in or register to post comments

बाई आणि म्हतारी ही दोन

जव्हेरगंज
Fri, 04/15/2016 - 18:12 नवीन
बाई आणि म्हतारी ही दोन वेगवेगळी पात्रं आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

धन्यवाद

मराठी कथालेखक
Fri, 04/15/2016 - 18:34 नवीन
धन्यवाद त्या दोघींचं एकमेकांशी काय नातं होतं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

जबरदस्त!

चैतू
Fri, 04/15/2016 - 14:23 नवीन
मस्त लिखाण.
  • Log in or register to post comments

कथा आवडली

पैसा
Fri, 04/15/2016 - 16:10 नवीन
कथा आवडली. पण कथांची शीर्षके चमकदार करायच्या नादात तुम्ही कधी कधी जास्तच चमकदार करता!
  • Log in or register to post comments

सहमत आहे. यावेळी जरा हुकलच.

जव्हेरगंज
Fri, 04/15/2016 - 18:10 नवीन
सहमत आहे. यावेळी जरा हुकलच. बदलण्याची विनंती केली आहे. सर्वांचा आभारी आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

एक नंबर

आनंद कांबीकर
Fri, 04/15/2016 - 23:50 नवीन
एकदम जव्हेरछाप आवडली
  • Log in or register to post comments

वाह, छानच

कविता१९७८
Sun, 04/17/2016 - 08:32 नवीन
वाह, छानच
  • Log in or register to post comments

भन्नाट कथा

शैलेन्द्र
Tue, 04/19/2016 - 11:08 नवीन
भन्नाट कथा
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा