काल आम्ही नेहमी प्रमाणे चौपाटीवर फिरायला गेलो . तेथे आम्ही दोन अजोबांच्या चाललेल्या गप्पा ऐकल्या आणि नंतर जे काही झाले त्याने आमची हसून हसून मुरकुंडी वळाली.......
चौपाटीवर जमले होते काल दोन थेरडे
गार्हाणी आणि सांगत होते एकमेकांकडे
एक म्हणाला राहून गेली पुजा तरुणपणी
दुज्या म्हणाला पुजेवाचून अडले कोणीकडे?
पुजा पण ती पूर्णं करावी मनात आहे आता
बावीस वर्षांनी देवीला घालावे साकडे
बेत ठरवला जंगी अन, अग्निरथाचा आम्ही
बतावणी ही करून झाली लगेच सगळीकडे
दुसरा हसला आणि म्हणाला जरा काळजी घ्या
प्रवास, पुजा म्हणजे दमणूक तुटेल कंबरडे
खाण्याची ही आबाळ होईल प्रवासात तुमची
उपाय यावरी जवळ बाळगा हवाबाण हरडे
पहिला म्हटला नका काळजी तब्बेतीची करू
व्यायामाने मजबूत कोठा मजबूत ही हडे
सात्त्विक गप्पा दोघाच्या रंगल्या होत्या अशा
ऐकत मी होतो पकडून शेजारील बाकडे
तितक्यातच अन तेथे आला हलकट वेडा कुणी
आणि फेकला दगड तयाने त्या दोघ्यांच्याकडे
सल्ला देणार्याला बसला दगड नेमका शिरी
टेंगूळ आला टकलावरी म्हणून तो चरफडे
थयथयाट मग त्याने केला चौपाटीच्यावरी
निषेध ही त्याने केला चौपाटीवाल्याकडे
बघून सारा थयथयाट तो वळली मुरकुंडी
हसता हसता "केश्या" आणिक बाकावरुनी पडे
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4183
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाह्हाहा..
आम्ही
झकास ...
च्या मारी
हे हे हे हे!!
+१
In reply to हे हे हे हे!! by चतुरंग
खो खो खो
>>तसे
In reply to खो खो खो by कोलबेर
तसे
In reply to खो खो खो by कोलबेर
हम्मम!
In reply to तसे by विसोबा खेचर
आम्ही तर
In reply to हम्मम! by कोलबेर
"विकृत
In reply to हम्मम! by कोलबेर
विकृत
In reply to "विकृत by विसोबा खेचर
सहमत
In reply to विकृत by कोलबेर
व्हाईट लिस्ट
In reply to खो खो खो by कोलबेर
झकास,
मला आधि काय कळलंच नाही
मस्त
हम्म
धन्यवाद!!
तिच्यायला
In reply to धन्यवाद!! by केशवसुमार