कवी रामनाथ सिंग जे अदम गोंडवी ह्या नावाने प्रसिद्ध आहेत त्यांच्या अनेक जबरदस्त कवितांपैकी ही एक कविता. शिर्षकासारखी ही थोडी लांबलचक आहे. पण वाचली पाहिजेच. मूळ कविता इथे दिली नाही कारण ती खरंच दिर्घ आहे. मूळ कवितेचा दुवा इथे आणि अदम गोंडवी साहेबांबद्दल विस्तृत माहिती इथे.
--------------------------------------------------------------------
मी चांभारगल्लीपर्यंत घेऊन चलतो तुम्हाला
या, अंगावर घ्या ह्या भाजत्या उन्हाला मी चांभारगल्लीपर्यंत घेऊन चलतो तुम्हाला ज्या गल्लीत उपासमारीच्या छळाला कंटाळून मेली ती फुलाबाई बिचारी विहीरीत उडी टाकून आहे डोक्यावर नीट धरुन काटक्याची मोळी येत आहे समोरुन ती पोरगी तुक्याची भोळी चालते अशी की छंद वृत्तांना देते दिशा मी म्हणतो हिला शरयूपारची मोनालिसा कशी भयभीत आहे ही हरीणी घाबरलेली भासते कळी जणू वेलीवरची कुरतडलेली कालपर्यंत तर बडबडी होती आज कशी शांत आहे माहित आहे का कोण ह्या मौनाच्या कारणांत आहे होते ते पावसाळी दिवस तुक्या होता बाजारहाटा झोपली होती म्हातारी टाकून ओसरीत खाटा मावळत्या सूर्याची किरणे उतरत होती बांधावरुन चार्याचा भारा घेऊन ती येत होती शेतावरुन येत होती ती चालत मग्न आपल्या विचारात काय माहित तिला, आहे कोणी लांडगा पवित्र्यात दैवगतीपासून अजाण कृष्णा अजाणत्या रस्त्यांमधे वळणावर फिरता तोच कळले आहे अनोळखी हातांमधे किंकाळी मारलीही पण ओंठातच मिटून राहिली धडपडली आधी मग थकली मग पडून राहिली सुर्यकिरणे नदीवर खेळत होती, केव्हाची मावळून गेली वासनांच्या अंध ज्वाळांमधे तिची शुचिता जळून गेली आणि त्या दिवशी हा वाडा हसत होता खुशीत शुद्ध आली तेव्हा कृष्णा होती बापाच्या कुशीत जमला जमाव असला घनघोर महापूर होता जो असो तो आपलेच ऐकवण्या आतुर होता पुढारुन मंगलने विचारले काका असा मौन का विचार पोरीला अखेर तो नराधम कोण होता असो संघर्ष कोणताही आम्ही मागे फिरणार नाही कच्चंच खावून टाकू जीवंत त्यांना सोडणार नाही दैवगती असे म्हणून कसे काय आम्ही हे टाळावे आणि त्या हराम्यांनी मायबहीणींना विटाळावे म्हटले कृष्णाला ताई झोप मी म्हणतो म्हणून बचाव शक्य नाही त्या पाप्याचा माझ्यापासून झुळूक ह्या वार्याची पोचली ठाकुरांच्या दारी ते सगळे जमले होते आले सरपंच्याच्या घरी डोळे आहेत रोखलेले भाल्याच्या लांबट पात्यावर बघा सुखराज सिंग बोलले खर्रा ठोकून हातावर काय सांगू सरपंचभाऊ काय दिवस आलेत बघा कालपतुर जे पायाखाली ते साहेब झालेत बघा म्हणते सरकार की आपसात मिळून मिसळून राहा डुक्करांच्या पिल्लांना आता गुलाम नाही हरिजन बोला हेच बघा ना ही कृष्णा आहे ना चांभारांमधे पडला शिंपल्यातला मोती कसा गावंढळांमधे जशी पावसाळी नदी अल्लड नशेत धुंद आहे हाथ ठेवू देत नाही कुल्ह्यांवर गर्व प्रचंड आहे पाठवत पण नाही सासरला हिला हा तुका मग धरले मिठीत कोणी तर काय त्या चुका आज शरयुपलिकडे आपल्या श्यामला धडकली कळत नकळत तीनेही जीवनाची मजा चाखली ते तर मंगल ने बघितले म्हणून बाहेर फुटले नाहीतर त्या मरतुकडीने काहीच नसते म्हटले आपल्याला तर माहित आहे मंगलच एक कपटी आहे त्याच्या बळावर पोलिसांत जाण्याची तुक्याची युक्ती आहे उद्या सकाळी जर बाप लेकाच्या हाताला बेडी पाहील गावाच्या गल्लीबोळांतून तुमची इभ्रत काय राहील बोलण्याचा ढंग असा की तावात सगळे आले हवा गरम झाली मिशांवर हात फिरते झाले क्षणिक आवेशाच्या त्या गरमीत प्रत्येक तरूण आंधळाच होता हो, पण विधात्याने लिहिलेला खेळ मात्र काही वेगळाच होता रात्रीला न आलेलं ते वादळ, आता घोंगाळलं होतं सकाळ होता होता तिथलं दृश्य ओंगाळलं होतं डोक्यावर टोपी वेताची लाठी धरलेली हाताशी एक डझन शिपाई होते ठाकुरांच्या दिमतीशी घेरलेले वस्तीला बोलला फौजदार ताठ्यात "कोण आहे मंगल, बाहेर निघ ये पुढ्यात" निघाला मंगल झोपडीची पाल थोडी उघडून एका शिपायाने तेव्हाच हाणली लाठी धरुन खाली पडला मंगल तर कपाळ बुटावर आपटले ऐकु आले मग, "त्या चोरीच्या मालाचे काय केले" "कसली चोरी, माल कोणता" त्याने जसे हे म्हटले एक लाठी आणखी पडली बस भान असे गळपाटले शुद्ध हरपून तो पडला जसा झोपडीच्या दारावर ओरडून मग निरिक्षक कडाडला त्या ठाकुरांवर "काय बघताय माझ्या थोबाडाकडं! थुंका ह्याच्या तोंडावर पेटवून आणा काहीतरी आणि टाका ह्या झोपडीवर " आणि मग सूडाची वावटळ तिथे वळवळू लागली असहाय दुर्बलांची झोपडी जळू लागली लहानगं बाळ व म्हातारा जो अजुन तिकडे अडकला होता तो अभागी जीव आता हिंसक गर्दीत सापडला होता घरटे जळतांना बघून ती त्राण जाऊन पडू लागली काही मनातल्या मनात मात्र काही जोराने रडू लागली "सांगा ह्या कुत्र्याच्या पिल्लांना की भाव खाऊ नका माझ्या हुकुमाशिवाय इथून कुणी कोठेही जाऊ नका" हे निरिक्षक साहेब होते ओठांतून शब्दफुलं टपकवत फिरत होते लोकांना आपल्या दंडुक्याने फटकवत मग कडाडले, "ह्यांना दंडुक्यांनीच सुधारला पाहिजे ठाकुरांशी ठणकेल जो कोणी त्याला मारला पाहिजे" एक शिपाई बोलला, "सायकल कुठे ओढून नेऊ शुद्धीत आला नाही मंगल म्हणाल तर सोडून देऊ" बोलला ठाणेदार, "पोपटासारखा नको बोंबलून शुद्धीत नाही आला तर लाठ्यांवर घे करकचून हे समजतात की ठाकुरांशी भिडणे हातावरचा मळ अशा हलकटांना, घर नको, पुरे तुरुंगातला खळ" विचारत असतात मला लोक नेहमीच हा सवाल "कसाय सांगाना शरयुपारच्या कृष्णाचा हालहवाल" त्यांच्या उत्सुकतेला शहरी नग्नतेच्या तापांना सडत चाललेल्या लोकतंत्राच्या कपटी दलालांना धर्म संस्कृती आणि नैतिकतेच्या ठेकेदारांना राज्याच्या मंत्रीमंडळाला केंद्राच्या सरकारांना मी निमंत्रण देत आहे - या माझ्या गावात नदीच्या किनार्यांवर घनघोर आमराईच्या छायेत गाव जिथे आज पांचाली नागडी केली जात आहे किंवा अहिंसेची जिथे नथ उतरवली जात आहे तडफडतात कितीतरी मंगल ढुंगण झाकायच्या कापडासाठी विकतात शरीर कितीतरी कॄष्णा भाकरीच्या तुकड्यासाठी ____________________________________________ कवितेत काही शब्द बदलून घेतले आहेत, कथन प्रवाही ठेवण्यासाठी अगदी शब्दशः भाषांतर टाळण्याचा प्रयत्न केला आहे.
वाचने
7312
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
कानसुलं गरम केलीत हो तजो!!
म्हणूनच तर फुलनदेवी पैदा
आणि महाराष्ट्राने स्वतःला
In reply to म्हणूनच तर फुलनदेवी पैदा by एस
तजो,
जर वादविवादात वेळ घालवला
In reply to तजो, by जयंत कुलकर्णी
धन्यवाद जयंतजी, गेल्या तीन
In reply to तजो, by जयंत कुलकर्णी
+१००
सुन्न करणारी कविता. अप्रतिम
जमलंय.
राहीजी, धन्यवाद. तुमचं म्हणणं
In reply to जमलंय. by राही
जमलेय जमलेय जोकरभाव.
In reply to जमलंय. by राही
धन्स अभ्याभौ, डोस्कं खाणार्
In reply to जमलेय जमलेय जोकरभाव. by अभ्या..
जबर जमलीय ही ! वाह.
सुपर्ब तजो!
.
नाना स्कॉच, एस, अनुप ढेरे,
सुन्न करणारी कविता
:(
अप्रतिम काम केल आहे!
येस्सार. धन्स! :-)
In reply to अप्रतिम काम केल आहे! by चांदणे संदीप
__/\__
अरेव्वा. ;-)
In reply to __/\__ by जव्हेरगंज
ऊत्तम भावानुवाद ! मूळ
( जर वादविवादात वेळ घालवला नाहीईत तर !) :-)वादविवाद हे जिवंत लोकशाहीचे लक्षण आहे, त्यामुळे तो थांबविणे योग्य होणार नाही. परंतु, वादविवादाच्या गरमागरमीत, "योग्य उत्तराचा शोध घेणे" हा वादविवादाचा खरा उद्येश विसरला जाऊन तो बर्याचदा कळत-नकळत "काहीही करून स्वतःचा मुद्दा जिंकणे" असा कधी होतो हे ध्यानात येत नाही. तसे झाले की तो लोकशाहीला मारक ठरतो. इतके भान ठेवणे खूप जरूरीचे आहे. हे तुम्हाला नाही तर उर्धृत वचनामुळे आठवलेले एक सर्वसामान्य निरिक्षण आहे. :)धन्यवाद डॉक्टरसाहेब. :)
In reply to ऊत्तम भावानुवाद ! मूळ by डॉ सुहास म्हात्रे
अतिशय प्रभावी!
सुन्न :(
रातराणी, पैसाताई, साहेब..,
दाहक वास्तव आहे हे. अनुवाद
लिहीत रहा,
_/\_
फार भयानक, सुन्न करणारा अनुभव