Skip to main content

आई पी एल-२०१६

लेखक DEADPOOL
Published on बुधवार, 06/04/2016
आताच ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषकाचे भूत उतरत नाहीच, तोवर इंडिया का त्योहार असलेलं आई पी एल हजर! यावेळी अतिबलाढ्य चेन्नई व राजस्थान नसणार! मात्र गेलेली पुणे टीम परत आल्याचा आनंद आहे. माझ्या मताप्रमाणे : धोनी पुण्याला विजय (की पुणेरी बाण्याला अनुसरून पुणे धोनीला विजय)मिळवून देऊ शकेल. मुम्बई कागदावर तरी संतुलित आहे दिल्ली मला सगळ्यात कमज़ोर टीम वाटते हैदराबाद पूर्णपणे गोलंदाजवर अवलंबून आहे राजकोटही पावरफुल वाटते. कोलकता अंदरडोग ठरू शकते पंजाबही फलंदाज बाबतीत ताकदवान आहे बेंगलोर सगळ्यात बलाढ्य वाटते, पण मालक पळून गेल्याने मनोमन खच्चिकरण झालच असेल! चला मिपाकर, लागा कामाला! ९ एप्रिल जवळच आहे!!!

वाचन संख्या 9510
प्रतिक्रिया 65

प्रतिक्रिया

देव करो आणि उच्च न्यायालय उद्या गरज भासल्यास रात्रंदिवस काम करुन आय पी एल महाराष्ट्राबाहेर खेळ्ण्याच्या याचिकेवर सकारात्मक निर्णय देवो. सर्वोच्च न्यायालयाचीए लुड्बूड या निर्णयात न होवो. पुढील वर्षापासुन आय पी एल बारीबारीने सर्व क्रिकेटींग नेशन्स मध्ये खेळली जावो.

वल्डकप मध्ये चांगले खेळणारे खेळाडू पण नशिबाने त्यांची आय.पी.ल मध्ये निवड होऊ शकली नाही. त्यांच्या बाजूने कोणीच बोली लावली नाही. ते खेळाडू खालील प्रमाणे : १) Martin Guptill (Base price INR 50 lakhs) २) Usman Khawaja (Base price INR 1 crore) ३) Johnson Charles (Base price INR 30 lakhs) ४) Tillakaratne Dilshan (Base price INR 1.5 crores) ५) Darren Sammy (Base price INR 50 lakhs) ६) Sulieman Benn (Base price INR 30 lakhs) ७) Darren Bravo (Base price INR 50 lakhs) ८) Chris Jordan (Base price INR 1 crore) ९) Marlon Samuels (Base price INR 50 lakhs)

मागील आयपीएलसाठी "साधा मुलगा" यांनी फँटसी लीग मध्ये मिसळपाव लीग तयार केली होती. त्यात १०-११ जणांनी सहभाग घेतला होता. यावर्षी कोणी लीग तयार करणार आहे का?

In reply to by श्रीगुरुजी

नक्की नाही हो , मधेच काम आले तर राहून जाते, प्रत्येक सामन्याला टीम बदलणे होत शक्य नाही, तुम्ही चालू करा पाहिजे तर , पण शेवट पर्यंत खेळीन याची ग्यारंटी नाही, पण मजा येते, मागच्या वर्षी चांगला प्रतिसाद मिळाला होता.

In reply to by श्रीगुरुजी

मिपा वर फक्त वाचनमात्र आहे म्हणुन मला कोणी ओळखत नाही. पण फँटसी लीग कोणी तयार करत असल्यास सहभाग घ्यायला आवडेल.

In reply to by अमेय देव

यावर्षी क्रिकइन्फोची लीग जरा विचित्र आहे. लीगला जॉईन होण्यासाठी लीगनुसार पैसे द्यावे लागणार आहेत. त्याऐवजी आयपीएलची स्वतःची एक वेगळी लीग आहे. त्यात स्वतःची प्रायव्हेट लीग तयार करता येते. दुर्दैवाने ती साईट सकाळपासून नीट चालत नाही. त्यामुळे अजूनतरी मिसळपाव लीग तयार करता आलेली नाही. तुम्हाला जमल्यास इथे जाऊन लीग तयार करा. fantasy.iplt20.com

In reply to by अमेय देव

ती साईट कालपासून चालत नाही. त्यामुळे मला टीम निवडताच येत नाही. टीम निवडल्याशिवाय लीग तयार करता येत नाही. त्याऐवजी मी क्रिकइन्फोवर टीम तयार केली आहे व MNO1460201769 हा कोड असलेल्या लीगला जॉईन झालो आहे.

In reply to by स्पा

ह्या आईपिएल मुळेच क्रिकेट च जे काहि वेड होत ते सुटल बघ माझ. त्यामुळे जे आपण बघतच नाहि त्याविषयाच्या धाग्यावर प्रतिसाद तरि काय दयायचा अस विचार केला होता. तु व्यक्त केलेल्या भावनेशी आणि प्रतिसादाशि प्रचंड सहमत.

In reply to by होबासराव

+१०००० मला राव ह्या IPL पेक्षा आपली देशी मातीतली मशाल स्पोर्ट्स प्रमोटेड "प्रो कबड्डी लीग" जास्त आवडते.

In reply to by नाना स्कॉच

क्रिकेटरसची चांदी,आयोजक्+राजकारणी+बोर्ड्+उद्योजकांची सोने आणि भारतीय क्रिकेटची फक्त माती करण्यासाठी जन्माला आली आहे. माकडचेष्टा न पाहणारा नाखु

In reply to by नाखु

रच्याकने आपल्याला सल्ला देण्यात आला आहे कि जर तुम्हाला आयपीएल आवडत नसेल तर ह्या धाग्यावर प्रतिसाद देण्याचे कष्ट तरि का घेता म्हणुन :( माकडचेष्टा न पाहणार्‍या नाखुन काकांशि दणकुन सहमत असलेला होबासराव

In reply to by नाखु

अगदी सहमत ! मझ्या मते आय पी एल हे एका बिग बजेट मुव्हे सारखे आहे. चित्रपटासाठी एक जबरदस्त स्टार कास्ट लागतो. आणि त्यातील गर्दी खेचणारे नायक भरपूर पैसे घेतात. चित्रपटाचीजबरस्दस्त जाहिरात केल्या जाते. प्रसिद्धी आणि प्रमोशन वर भरपूर पैसे खर्च केले जातात. तसेच प्रत्यक्ष चित्रपटात प्रेक्षकांना आवडतात म्हणुन सेक्स, हाणामारी, नग्न दृषे घातली जातात जेणे करुन चित्रपट भरपूर गल्ला जमवु शकेल. पटकथा लिहीण्यासाठी उत्तम लेखक निवडले जातात. त्यातही महानायक आपल्या सोयीचे प्रसंग टाकायला लावतात, हवे तसे संवाद लिहुन घेतात. इतके जबरदस्त आयोजन केले जाते की जेणेकरुन चित्रपट नक्की हिट व्हावा. आय पी एल यच्याही काही पावले पुढे आहे. प्रत्यक्ष मैदानावर जे काही घडते ते सुद्धा एका व्यवस्थीत लिहीलेल्या पटकथेचा भाग असतो असे का समजु नये ? जो पर्यन्त म्याच फिक्सीन्ग बद्दल चा घोटाला, माहिती बाहेर येत नाही तोवरच आपण अमुक चांगला खेळला असे म्हणू शकतो. ज्या सामन्यांबद्दल अशी माहिती बाहेर येत नही ती व्यवस्थीत रितीने गुप्त ठेवली जाते. ज्या सामन्यांचे आर्थिक गणित जमत नाही ( एखाद्या खेळाडुला किंबा इतर कोणत्याही घटकाला) त्या बद्दल अशी माहिती 'लीक' केली जाते आणि त्याची वाट लावण्यात येते. आय पी एल मधे जेवढा पैसा आहे, त्याच्या एक शंभरांश भागासाठी खुन पाडले जाऊ शकतात मग एवढ्या पैश्यासाठी काय काय केले जात असेल ? त्यातही परत करमणूक कर बुडवणे , माफ करुन घेणे असा भिकारपणा केला जातो.

इंडिया का त्योहार, कमज़ोर, पावरफुल, अंदरडोग हे अमराठी शब्द! शिवाय लिखाणात मराठी व्याकरणाच्या असंख्य चुका! जर दहा वाक्य शुध्द मराठीत लिहिता येत नसतिल तर मराठी संस्थळावर इतका टुकार धागा काढायची इतकी घाई कशाला?

In reply to by भाते

प्रचंड सहमत! झालं समाधान? एकदा मोबाईलवर टाईप करून बघा!

In reply to by DEADPOOL

http://www.misalpav.com/node/35305 भाते सरांचा हा धागा आणि सदस्यांचे प्रेमळ प्रतिसाद अवश्य वाचावेत डेडपूल.

In reply to by भाते

भाते सर खुद्द आपल्या प्रतिसादात मला: जर दहा वाक्य शुध्द मराठीत लिहिता येत नसतिल तर मराठी संस्थळावर इतका टुकार धागा काढायची इतकी घाई कशाला? १) दहा वाक्य ऐवजी दहा वाक्ये असे पाहिजे, २) नसतिल ऐवजी नसतील असे पाहिजे, अशा एका वाक्यात दोन चुका सापडल्या. गंमतच आहे की राव!

अतिक्रिकेट होतयं, प्रत्येक टीमचे आठच सामने असावेत.आणि दोन महिन्याऐवजी एकाच महिन्यात कार्यक्रम उरकावा. काही सामने पहायला मज्जा जरूर वाटते,पण हे सगळं हेल्दी काँपीटिशन असावं,कारण जेव्हा आपलेच खेळाडू एकमेकांबरोरबर वाद घालत बसतात तेव्हा ते सगळं निरर्थक वाटतं. हरभजन श्रीशांतला थप्पड काय मारतोय अन् गंभीर कोहलीची बाचाबाची काय होते!!! हे सगळं अप्रस्तुत वाटतं.

कोणी काहिहि म्हणुदे, ह्या आयपिएल मुळे सारखे सारखे बार मध्ये जाणे होतेच, (पाउलेच वळतात म्हणा) बार मध्ये जाउन एक एक लार्ज पेग बरोबर मोठ्या स्क्रिन वर समस्त तळिरमांसोबत आयपिएल च्या म्याच बघन्याच आनंद निराळाच आहे.

In reply to by यमगर्निकर

कोणी काहिहि म्हणुदे. लाख भिकार म्हणूदेत, पण आयपिएल म्हणालं की आय पक्षी मी 'पिएल' :)

वर ऑल आउट होणार बहूतेक .

मी fantasy.iplt20.com वर Misalpav (कोड - 280052-64480) ही लीग तयार केली आहे. इच्छुकांनी जॉईन व्हावे.

In reply to by श्रीगुरुजी

आज संध्याकाळी सहभागी होतो.

In reply to by अमेय देव

पहिल्या सामन्याच्या वेळी fantasy.iplt20.com ही साईट अतिगर्दीमुळे क्रॅश झाल्याने संघ निवडता आला नाही. दुसर्‍या सामन्यासाठी संघ निवडता आला, परंतु त्यांच्या सॉफ्टवेअरमधील घोळामुळे संघातले बदल सेव्ह झालेच नाहीत व सामन्यानंतरचे गुण सुद्धा रेकॉर्ड्वर आले नाहीत. काल तिसर्‍या सामन्याच्या वेळी सुद्धा साईट डाऊन असल्याने संघ निवडता आला नाही. आजही ही साईट बंदच आहे. एकंदरीत त्यांच्या लीगमध्ये किती मोठ्या संख्येने इच्छुक सामील होतील याचा अंदाज चुकल्याने त्यांची साईट, सर्व्हर व सॉफ्टवेअर क्रॅश झाले आहे. आता ३ सामने संपल्यानंतर लीग सुरू करण्यात अर्थ नाही. क्रिकइन्फोची लीग देखील यावर्षी सुरू नाही. त्यामुळे या दोन्ही लीगमध्ये मी यापुढे सहभागी न होण्याचे ठरविले आहे. अधूनमधून सामने बघीन परंतु लीगमध्ये जाणार नाही.

आयपीएलच्या प्राथमिक फेरीतील ५६ सामने संपले असून आता प्लेऑफचे फक्त ४ सामने शिल्लक आहेत. गतवर्षीच्या विजेत्या मुंबई चॅम्पियन्सला प्लेऑफ मध्ये स्थान मिळविण्यात अपयश आले आहे. नव्याने स्थापन झालेल्या पुणे संघाचा शेवटून दुसरा क्रमांक आला. धोनी कर्णधार असूनही या नवीन संघाला चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. ४ परदेशी खेळाडू जखमी झाल्याचाही फटका बसला. दुसरीकडे पंजाबची कामगिरी पुन्हा एकदा निष्प्रभ ठरली. सर्व १४ सामन्यात अपयशी ठरलेल्या डेव्हिड मिलरला काही सामन्यानंतर वगळून दुसर्‍या खेळाडूला संधी द्यायला हवी होती. दिल्लीच्या संघाला यावेळी नवीन कर्णधार (झहीर) व नवीन मेंटॉर (द्रविड) लाभला होता. त्यांनी १४ पैकी ७ सामने जिंकले. परंतु प्रत्येक सामन्यात संघात बदल केल्याने हा संघ कधी स्थिरावलाच नाही व त्यामुळे ते प्लेऑफ मध्ये येऊ शकले नाहीत. मुंबईला मलिंगाची उणीव जाणवली. हरभजनही बहुतेक सामन्यात अपयशी ठरल्यामुळे त्यांनीदेखील १४ पै़की फक्त ७ सामने जिंकले. दुसरीकडे नव्याने स्थापन झालेल्या गुजरात संघाने प्रथम क्रमांक मिळविला. अर्थात सुरवातीच्या धडाक्यानंतर त्यांची कामगिरी खालावली. पहिल्या ७ पैकी ६ सामने जिंकल्यावर उर्वरीत ७ पैकी फक्त ३ सामने त्यांना जिंकता आले. या संघात ड्वेन स्मिथ, मॅकलम्, रैना, फिंच, ड्वेन ब्राव्हो असे धडाकेबाज खेळाडू आहेत. बंगळूर संघात गेल, कोहली, डीव्हिलिअर्स, वॉटसन इ. तगडे फलंदाज असूनही पहिल्या १० सामन्यातील फक्त ४ सामने त्यांना जिंकता आले होते. मात्र शेवटचे चारही सामने जिंकून त्यांनी दुसरा क्रमांक मिळविला. कोहलीने जवळपास प्रत्येक सामन्यात खोर्‍याने धावा केल्या. हैद्राबादतर्फे कर्णधार वॉर्नरने धडाकेबाज धावा करून प्रथम ४ संघात स्थान मिळविले. वॉर्नरबरोबर भुवनेश्वर, मुस्तफिजूर, बरिंदर स्रान, नेहरू इ. मध्यमगती गोलंदाज हीच या संघाची खरी ताकद आहे. कलकत्त्याची खरी ताकद त्यांच्या फिरकी गोलंदाजात आहे. सुनील नरिने, शकिब, ब्रॅड हॉग, चावला इ. गोलंदाजांच्या जोरावरच त्यांनी देखील प्रथम ४ संघात स्थान मिळविले. रसेलच्या अष्टपैलू खेळाची देखील त्यांना खूप मदत झाली. या आठवड्यात उर्वरीत ४ सामने आहेत. बहुतेक गुजरात किंवा बंगळूर संघ यातील एक विजेता होईल असे वाटते.

In reply to by श्रीगुरुजी

गुजरात X बंगळूर = गुजरात कलकत्ता X हैद्राबाद = हैद्राबाद हैद्राबाद X बंगळूर = हैद्राबाद गुजरात X हैद्राबाद = गुजरात माझे आपले अंदाज :)

In reply to by साहेब..

बेंगळूरु.. फायनल मारल्याशिवाय कोहली काही थांबत नाही.

In reply to by शलभ

कोहली सध्या अशक्य आणि स्वप्नवत फॉर्मात आहे. १४ सामन्यात ९००+ धावा व त्यात ४ शतके ही अशक्यप्राय कामगिरी आहे. बहुतेक सर्व सामन्यात त्याला यष्टीरक्षक राहुल व गेल/वॉटसन/डीव्हिलिअर्स यापैकी किमान १ जण यांची जोरदार साथ मिळत आहे. गोलंदाजीत श्रीनाथ अरविंद व चहल हमखास बळी मिळवून देत आहेत. डीव्हिलिअर्स अशक्यप्राय झेल घेतो. एकंदरीत हा संघ खूप तगडा आहे. अर्थात गुजरातकडेही तगडे फलंदाज आहेत व प्रवीणकुमारची गोलंदाजी आहे. हैद्राबादकडे फलंदाजीत मुख्यत्वेकरून वॉर्नर असला तरी त्यांची गोलंदाजी खूप तगडी आहे. कलकत्त्याकडे अत्यंत प्रभावी फिरकी गोलंदाज आहेत. एकंदरीत सर्व ४ संघ तुल्यबळ आहेत.

काल आरसीबीने अत्यंत कठीण परिस्थितीतून सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. आता आज कलकत्ता वि. हैद्राबाद सामना आहे.

बहुतेकांचे अंदाज खोटे ठरवित सनरायझर्सने चुरशीच्या सामन्यात बलाढ्य बेंगळूरचा ८ धावांनी पराभव करून ९ व्या आयपीएल स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. या संघाने प्रथमच विजेतेपद मिळविले आहे. यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघाने ५ वेळा अंतिम फेरीत प्रवेश करून २ वेळा विजेतेपद मिळविले होते (या संघाच्या विजेतेपदाबद्दल आणि एकूणच कामगिरीबद्दल शंका आहे. या संघाचा मालक श्रीनिवासन व त्याचा जावई गुरूनाथ मयप्पन मॅच फिक्सिंग मध्ये गुंतल्याचे न्यायालयात सिद्ध झाल्याने आता या संघावर २ वर्षे व मयप्पनवर तहहयात बंदी आहे.). कलकत्त्याने २ वेळा अंतिम फेरीत प्रवेश करून दोन्ही वेळा विजेतेपद मिळविले होते. मुंबई इंडियन्सने ३ वेळा अंतिम फेरीत प्रवेश करून २ वेळा विजेतेपद मिळविले होते. पूर्वीच्या डेक्कन चार्जर्स व राजस्थान रॉयल्स संघांनी एकेकदा अंतिम फेरीत प्रवेश करून विजेतेपद मिळविले होते. बंगळूरने ३ वेळा अंतिम फेरीत प्रवेश करून तीनही वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला. यावेळी नव्याने तयार झालेल्या गुजरात लायन्स संघाने स्पर्धेच्या पूर्वार्धात जबरदस्त कामगिरी केली. परंतु उत्तरार्धात ते ढेपाळले. नव्याने तयार झालेला अजून एक संघ म्हणजे पुणे सुपरजायंटस्. या संघाच्या नावात पुणे असले तरी पुणे व महाराष्ट्राचा या संघाशी सुतराम संबंध नव्हता. नावात पुणे असूनसुद्धा या संघाला पुण्यातून सुद्धा प्रेक्षकांचा फारसा पाठिंबा मिळाला नाही. या संघातील अनेक खेळाडू अपयशी ठरून सुद्धा त्यांनी शेवटपर्यंत संघात फारसे फेरफार केले नाहीत व एकही स्थानिक खेळाडूला संधी दिली नाही. बंगळूर व गुजरात संघांकडे अत्यंत तगडे फलंदाज होते, परंतु त्यांची गोलंदाजी दुर्बल होती. त्याचाच त्यांना फटका बसला. ट-२० सामन्यात बहुतांशी फलंदाजांचे वर्चस्व असले तरी ज्या संघाकडे चांगले गोलंदाज आहेत तो संघच शेवटी पुढे जातो हे यावर्षीही दिसून आले. हैद्राबाद व कलकत्त्याकडे बंगळूर व गुजरातच्या तुलनेत कमी तगडे फलंदाज होते. परंतु त्यांची गोलंदाजी चांगलीच भक्कम होती. त्यामुळेचे ते प्लेऑफमध्ये येऊ शकले. हैद्राबादने काल २०८ धावा करूनसुद्धा गेल व कोहलीने तुफान फलंदाजी करून सामना जिंकण्याच्या अवस्थेत आणला होता. परंतु हैद्राबादच्या गोलंदाजांनी डेथ ओव्हर्समध्ये अचूक गोलंदाजी करून विजय मिळविला. मुंबईचा संघ समतोल असलात तरी त्यांना मलिंगाची उणीव जाणवली. हरभजन व पोलार्ड यावर्षी बहुतेक सामन्यात अपयशी ठरूनसुद्धा त्यांना बहुतेक सामन्यात खेळविले गेले. सलामीला पार्थिव पटेल व नंतर हार्दिक पंड्याही अपयशी ठरले. त्यामुळे त्यांना प्लेऑफमध्ये जाता आले नाही. पंजाबकडे डेव्हीड मिलर जवळपास सर्व सामन्यात अपयशी ठरला. तरी त्याला सर्व सामन्यात घेतले होते. मॅक्सवेलही बहुतेक सामन्यात अपयशी ठरला. त्यांच्याकडे मोहीत शर्मा व अक्षर पटेल हे बर्‍यापैकी गोलंदाज असूनही बरेच फलंदाज अपयशी ठरले. दिल्लीने प्रत्येक सामन्यात घाऊक बदल केल्याने त्यांचा संघ शेवटपर्यंत स्थिरावला नाही. त्याचाच त्यांना फटका बसला. एकंदरीत यावेळची स्पर्धा चांगलीच चुरशीची झाली.

अवांतर : श्रीगुरुजी, मुंबई संघाचं नाव इंडियन्स का ठेवलं असावं? दुसरं कुठलं शहर मिळालं नाही का? खरं तर दिल्ली इंडियन्स शोभून दिसलं असतं. क्रिकेटच्या आडून वेगळ्या हालचाली तर चालू नाहीत? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

प्रांतीय अस्मितेपक्षा राष्ट्रीय अस्मिता बरी! आणि पूर्वीचे pune worriers india बद्दल काय? बाकिच्या ipl संघांनी महाराष्ट्राकडून हे शिकण्यासारखे आहे विशेषतः पंजाब्यांनी.त्यांना फार कौतुक असतं पंजाबी असण्याचं.

चेक आणि मेट, तुम्ही म्हणताय तशी राष्ट्रीय अस्मिता बरी. फक्त ती इतर संघांच्या नावांतून दिसंत नाही. तशी दिसलेली आवडेल बघायला मला. आ.न., -गा.पै.