वा ! छान छंद आहे.
आम्ही लहानपणी लहान होतो तेव्हा असाच छंद आम्हाला पण होता.
बसची तिकिटे, माचिस पेट्या, सिगारेट पाकिटे, वगैरे गोळा करण्याचा छंद होता.
पुढे सिगारेटच्या पाकिटापेक्षा आतली वस्तु जास्त चांगली असल्याचा साक्षात्कार झाला आणि पाकिटांचा, छंद सुटला.
हळुहळु माचिसपेक्षा लायटर सोपे पडु लागले तर तोही छंद सुटला.
असो. आपल्या छंदासाठी शुभेच्छा!!!
(फुकाड्या) अवलिया
अवलियाची अनुदिनी
वा ओंकार!!!!
चांगली आठवण करुन दिलीत. मला देखील काड्यापेट्यांचे कव्हर (ज्याला आम्ही टिक्के म्हणायचो) गोळा करायचा नाद होता. आम्ही अक्षरशः उकीरडे सुद्धा पालथे घातले आहेत. (सगळ्यात जास्त टिक्के उकीरड्यावरच मिळतात असा माझा अनुभव आहे.)
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
प्रतिक्रिया
वा ! छान छंद
वा