कॉम्प्युटर/ व्हिडीओ गेम्स.....भाग १ (मारीयो)
१९९० च्या दशकात जन्म झालेल्या लोकांना मी नशीबवान समजतो. कारण या अगोदरच्या पिढीतल्या लोकांना मोबाईल, काँप्युटर थोडेसे उशीरा मिळाले. त्यामुळे ते लोक मोबाईल, संगणक( हाच शब्द सोपा आहे टाईप करायला ;) ) वगैरे वापरायला तितकेसे उत्साही नसतात. २००० नंतरच्या पिढीला जन्मापासुनच मोबाईल वगैरे वापरायला मिळतो त्यामुळे इतर मैदानी खेळाला वगैरे ही पिढी तितकीसी उत्साही नसते. पण ही जी ९० च्या दशकातली पिढी आहे ना त्यांनी शिवणा-पाणी , विष-अम्रुत, लपंडाव हे ज्या उत्साहाने खेळले त्याच उत्साहाने मारीयो, कॉन्ट्रा , SD fighter , vice city खेळले.
चला तर मग आमच्या पिढीने खेळलेले काही क्लासीक गेम्स पाहुया...
इतर बर्याच लोकांसारखीच माझी पण गेम खेळन्याची सुरुवात "मारीयो" नी झाली. बहुतेक चौथी - पाचवीच्या उन्हाळी सुट्ट्या असाव्यात दिवसभर उन्हात गोट्या नाहीतर क्रिकेट खेळत होतो. मग एक दिवस मोठा मावसभाऊ बोलला, माझ्या मित्राने कुठलातरी गेम आणलाय रे , जा पाहुन ये. त्या मित्राकडे काहीसा असा गेम होता टिव्हीला जोडलेला...
व त्यावर मारीयो चालू होता तेच त्याचे झालेले पहिले दर्शन ! बटण दाबलं की मारीयो पळतो, उड्या मारतो हीच मुळात गंमतच होती त्या वेळी. मग काय ? दुपारचे क्रिकेट बंद अन् मित्राकडे पडिक! पण मित्राकडे किती खेळणार ना ?म्हणुन मग स्वतःचा गेम घेण्याची खटपट चालु झाली . मग रितसर त्याने कसा मानसीक विकास होतो ? शैक्षणीक प्रगतीच्या आड कसा येत नाही ? हे आई-वडीलांना समजाऊन झाले. नंतरचा अध्याय म्हणुन रडणे , मार खाणे वगैरे साग्रसंगीत कार्यक्रम पार पडल्यावर एकदाचा स्वतःचा गेम मिळाला. आणी एका वेगळ्याच विश्वात प्रवेश केला.
तसा मारीयो हा काही अगदिच नविन नाही . मारीयो पहिल्यांदा दिसला तो Donkey Kong या गेम मध्ये . तेही १९८१ ला. मारीयोचे पप्पा (designer) आहेत Shigeru Miyamoto आणी याचा जन्म झाला Nintendo या कंपनीत. या मारीयोचे "मारीयो" असे बारसे होण्याच्या अगोदर Mr. video, jumpman असे काही नावं होती. तसे मारीयोचे बरेच गेम्स आले. मारीयो वेगवेगळ्या गेम्समध्ये दिसला . पण मारीयोला प्रसिद्धी मिळाली ती Super Mario Bros.या गेम मुळे.
या गेम मध्ये "किंग कूपा" नावाचा व्हिलन "राजकुमारी पीचला" त्याच्या "मशरूम किंग्डम" मध्ये डांबुन ठेवतो . व मारीयोला तिला सोडवायचे असते . या प्रवासात त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागतो. या गेम मध्ये एकुण ८ राउंड होते प्रत्येक राउंड मधे ४ स्टेजेस. सुरुवातीला ३ चान्सेस असतात . पण नंतर ते वाढू शकतात. जशी जशी गेम मध्ये प्रगती करणार तशी संकटे कठिण होत जाणार पण वेगवेगळे सिक्रेट मार्ग , बोनस, १ अप , इत्यादी गोष्टींमुळे रोचक पण होत जातो.
मारीयो...
सुपर मारीयो ब्रॉस गेमची काहि द्रुश्ये...
१)
२)
सुपर मारीयो ब्रॉस गेमप्ले...
(या सिरीज मध्ये मुख्यतः संगणकावरील गेम्स बद्दल लिहिण्याचा विचार आहे. जसेकी vice city, tod, nfs, EA चे काही गेम्स, far cry इत्यादी. अर्थात तुम्हाला आवडेल तरच...काही सुचना असतील तर जरुर सांगाव्यात.)
(सर्व चित्रे जालावरुन साभार...
संदर्भ: १) https://en.wikipedia.org/wiki/Mario
२) https://en.wikipedia.org/wiki/Mushroom_Kingdom
३) https://en.wikipedia.org/wiki/Shigeru_Miyamoto
४) https://en.wikipedia.org/wiki/Nintendo )

वर्गीकरण
प्रतिक्रिया
वो उगा भौ...
कहर आवडीचा विषय...
लै लवकर आटोपलात.. पुढचे लेख
बरोबर!
Moon mario असं नाव होतं
बरोबर.. हा मारिओ असला की हसत
आईशप्पथ! :)
टीव्ही ला जोडून खेळता येणारा
बहुतेक पिंपरीमध्ये प्रत्येक खेळण्याच्या दुकानात मिळेल
छान लेख.एक 64 in 1 कॅसेट
मारियोनामक ह्या प्लंबराने मला
माझा पॉकेमॉन सगळ्यात आवडता!
सहीच
डेव्ह , प्रिन्स विसरलोच होतो
एक नंबर !!!
wrestling games हि त्या
गेम्स म्हणजे जीव कि प्राण
एक्झ्याटली!
वा ! प्रतिसाद आवाडला .
मस्त :)
या धाग्यावर सगळ्यात जास्त प्रतिक्रिया माझ्याच होणार बहुतेक! ;)
होय. माझ्याकडे होता त्या
गणामास्तराने विचारलय ते
माझ्याकडे SUBOR कंपनीचा होता.
Nes ,snes ,gba
गेमिंगच्या दुनियेशी फारसा
सुपर मारियो रॉक्स.
सुपर मारीयो ब्रदर्स..
जुन्या आठवणी ताज्या केल्यात
यावरनं आठवलं
जुन्या आठवणी ताज्या केल्यात उका!
उत्तम सुरुवात
उत्तम सुरुवात केली आहे.
गेमींग कंसोल बद्दल जास्त काही
झैरात करुन घेतो
घरातला पहिला काँप्युटर
तुमच्या-माझ्यासारखे खूप वेडे
प्रिन्स ऑफ पर्शिया
मला फक्त गेम्स चे वॉलपेपर
तो कॕन्डी क्रश मला पण नाही
१२०६ वार स्टार्स! आता बोला!
बाबौ ! कोणता क्लॕन ? #tag
अरे वा
# Tag दिलाय...भेट द्या . लिडर
Lvl 130
मारिओ मारिओ मारिओ...
नॉर्मल संगणकावर खेळता येतात
आइ ग्ग कीती जिव्हाळ्याचा विषय
Coc town hall level 10 आहे
बाकी मिळेल हो . (जेम्स घालून