उन्हाची झळ बसायला सुरुवात झाली की गारम गार काय काय खाता येईल ह्याचा विचार सतत चालू असतो. खादाडीची आवड असणाऱ्यांचा (माझ्यासारख्यांचा) जरा जास्तच.
त्यातलेच एक सर्वांचेच प्रिय कलिंगड. बाजारात गेल्यावर जड कलिंगड वाहून आणल्यावर ते कधी एकदा कापून मस्त गार करून खातो/ते असे प्रत्येकालाच होत असते. खर्र की नाही? पण मग त्याचा तो जाड जाड सालींचा पसारा उचलून टाकताना अर्धे पैसे वाया गेले म्हणून वाईट वाटत असेल तर आता मी त्यावर एक उपाय सांगते जो तुम्हाला नक्की आवडेल.
१. किसणी घेऊन त्या सालींचा सगळा पांढरा गर किसून घ्या.
२. आता त्यात अर्धी वाटी नारळाचा चव + एक चमचा हिरव्या ओल्या मिरच्यांचे भरड + अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर + चवीपुरते मीठ आणि थोडीशी साखर घालून सगळे एकजीव करा.
३. आता त्यात मावेल इतका बारीक रवा (नसल्यास तांदळाचे पीठ चालेल पण रव्यामुळे कुरकुरीतपणा येतो तेव्हा शक्यतो रवाच) घाला. मावेल इतका म्हणजे हाताने मिश्रण उचलून तव्यावर थापता आले पाहिजे.
४. थालीपीठ करतो त्याप्रमाणे मध्यम आचेवर करावे. फरक इतकाच की थेट तव्यावर थापावे.
टीप -श्रावण महिन्यात बाजारात मोठी काकडी मिळते. तिचे पण अगदी असेच करावे. फक्त साले वापरू नयेत तर काकडी वापरावी. त्याला तवसोळी असे म्हणतात.
जातीचा डंका पिटायचा म्हणून नाही पण तरीही प्रत्येक पाकृचे वैशिष्ट्य आणि उगमस्थान असते म्हणून सांगते की हे सारस्वत घरांमध्ये खासकरून बनते. तुम्हाला आवड असल्यास खास सारस्वत पद्धतीच्या 'हटके' पाकृ मी लिहू शकेन.
फोटो


वाचने
15570
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान वाटतेय पाकृ,
केला प्रयत्न पण नाही जमले. :(
In reply to छान वाटतेय पाकृ, by नीलमोहर
फोटो फ्लिकर / पिकासा / गूगल
In reply to केला प्रयत्न पण नाही जमले. :( by उल्का
छान,ज्वारीचे किंवा भाजणीचे
आधी ह्या पद्धतीने करून बघा
In reply to छान,ज्वारीचे किंवा भाजणीचे by पिनू
जाड जाड सालींचा पसारा
:)
In reply to जाड जाड सालींचा पसारा by रामदास
असेच धपाटे करते माझी आजी
बर्र नक्की :)
माझी आईही करत असे हा प्रकार
हुश्श! :) :)
गोडही बनवतात हे. दोन्ही
माझ्या साबा तिखट-गोड बनवतात.
In reply to गोडही बनवतात हे. दोन्ही by यशोधरा
साखर नव्हे, गूळ घालून
In reply to माझ्या साबा तिखट-गोड बनवतात. by उल्का
छान आहे.
तव्यावर सहज थापता येते. घाबरू
In reply to छान आहे. by सस्नेह
धन्यवाद.
In reply to तव्यावर सहज थापता येते. घाबरू by उल्का
मला वाटले भाजेल म्हणून भिती
In reply to धन्यवाद. by सस्नेह
वेगळा..
हम्म..
In reply to वेगळा.. by स्वाती दिनेश
अगदी अगदी, मलाही. हा पदार्थ
In reply to वेगळा.. by स्वाती दिनेश
मला वाटते
In reply to अगदी अगदी, मलाही. हा पदार्थ by पूर्वाविवेक
हे धोंडस कलिंगडाच्या सालीचा
हे धोंडस कलिंगडाच्या सालीचा
मस्तंय पाकृ.सारस्वत पाकृ येऊ
मस्त पाकृ
चला फोटो आला, आता कवतिक
छान पाकृ
कालच कलिंगड विकत घेतले होते.
तुम्हा सर्वांचे
हाहा!
In reply to तुम्हा सर्वांचे by उल्का
हि घ्या रेसिपी. खांडवी
In reply to हाहा! by पैसा
खांडपोळी
In reply to तुम्हा सर्वांचे by उल्का
हाहाहा
In reply to खांडपोळी by राही
..
In reply to तुम्हा सर्वांचे by उल्का
अग्ग बाइ हे अस पन असत का काही
...