Skip to main content

गुंतण

लेखक pj यांनी गुरुवार, 07/04/2016 01:23 या दिवशी प्रकाशित केले.
आणि अचानक तो बिलोरी आरसा हाती लागला पुरातन पण जादुई, अगदी परीकथेतल्या सारखा यौवनाच्या मंतरलेल्या दिवसात स्वप्नात भेटलेला आज माझ्या हातात हसत अलगद विसावलेला थरथरत्या हातानी, साशंक मनानी समोर धरला आणि माझच एक आगळं रूपडं आलं भेटीला अगदी नितळ, प्रफुल्लित, अन् आकंठ तृप्तता धडधडत्या उराशी त्याला गच्च कवटाळला हळूहळू त्यावरही काळाची काळी पुट चढू लागली तर पारा उडू नये म्हणून इकडे माझी वेडी काळजी त्यातल्या रुपड्यात कुठेशी उदासीची छटा दिसली तर माझीच नजर अंधूक, अशी समजूत काढली असं त्या आरश्यात गुंतण आता जड जातय दिवसरात्र जीवाची तडफड आता असह्य होतेय ते रुपड का तो आसरा प्रिय, हा पडलाय प्रश्न उत्तराची साशंकता, अन् काहूर माजलयं विचारांच हातावर वळ ही न उमटता कसा धरू मी आरसा रुपड्याला सोडून फक्त आरसा कसा म्हणू माझा बुद्धत्वाच्या वाटेवर गुंतण्याला त्यानं दिली तिलांजलि पण सामान्यत्व माझ्यातलं कशी चढेल ती पायरी -PJ
लेखनविषय:

वाचने 1188
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

छान जमलय. मिपावर स्वागत आणि पुढील लेखनास शुभेच्छा!

चांगलीये.

आवडली कविता. शेवटच्या चार ओळी खासच. -दिलीप बिरुटे

उत्तम कविता!