Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by रमेश भिडे on Tue, 04/05/2016 - 23:17
भारतावर मुस्लिमांचे आक्रमण झाले व मंदिरावर हल्ले होऊन मंदिर पाड़ण्याल्या सुरुवात झाली . मंदिर हे भारतीय श्रद्धा स्थानाचे केंद्र बिंदुच आहे. त्या मागे शास्त्रिय कारण ही आहे मात्र अशा आपल्या श्रद्धा स्थानांवर मुस्लिम टोळक्यानि नेहमीच हल्ले केले आता ही असे अतिरेकी करतच आहेत. यात आपल्या काही महत्वाच्या मंदिराना कायमच नुकसान सहन कराव लागल. सध्या जे काही मंदिर प्रवेशा बाबत सुरु आहे तेहि काही असच आहे मंदिरात प्रवेशा च्या नावाखाली जो गोंधळ घातला जात आहे तो चिड निर्माण करणारा आहे. याला कारण हे असले आंदोलन करणारे पुरोगामी. आंदोलन करणाऱ्या महिला या नेहमी मंदिरात जाणाऱ्या व खरोखर देवभक्ति असणाऱ्या अथवा संत मीरा सारख्या कृष्ण वेड्या किंवा पांडुरंग प्रेमी जनाबाई सारख्या असत्या तर त्याचा हट्ट प्रत्यक्ष देवाला ही पुरवावा लागला असता मात्र आंदोलन कोणत्या महिला करत आहेत ज्यांचा व देव धर्माचा काडिमात्र ही संबंध नाही ज्या समलैंगिगतेच्या समर्थनासाठी भर रसत्यात एकमेकिना चुम्बन करतात अशा महिलांना मंदिर प्रवेश हवा आहे हेतु यांचा हेतु स्पष्टच आहे प्रसिद्धि आणि भक्तिच वातावरण गढुळ करणे याला मंदिर प्रशासन आपल्या पद्धतीने विरोध करत ही आहे पन काही गोष्टींचा विचार मात्र गम्भीरतेने होणे अनिवार्य आहे मंदिर समित्यानि मंदिरा मधे काही नियम कड़क करण्याची गरज आहे. आज किती मंदिर समिति मधे धर्मशास्त्र जाननारे सभासद आहेत त्यांची संख्या अजिबात नाही असेच म्हणावे लागेल समिति मधे धर्मशास्त्राच् अध्ययन केलेले विद्वान असतील तर देवतेला अनुकूल असे नियम बनवता येतील तिथे असणाऱ्या पूजकांची शुद्धता देखील पाहणे अनिवार्य आहे , मूर्ति शास्त्रातील माहिती किती जनाना असते हे सगळ लक्षात घेण्याची वेळ आली आहे या साठी दक्षिण भारतातील मंदिरांचा आदर्श घ्यायला हवा . आपण जर देवकलेची शुद्धता ठेवली तर लाखो आक्रमण सहन करण्याची व परतून लावण्याची ताकद तो ईश्वर आपणास देईल या साठी आपण ही शुद्धता व पवित्रता याचं पालन करायला हव देव मूर्तिला स्पर्श करण्या आधी आपण खरोखर किती शुद्ध अवस्थेत आहोत याचा विचार प्रत्येकाने करावा मंदिर हे ऊर्जा स्थान आहे तिथे प्रवेश केला की आपोआप च ती ऊर्जा तुम्हाला भेटनार आहे त्या गाभार्यात प्रवेश पहिंजे हा हट्ट का ? आणि खर तर जे मनापासून देवाला मानतात ते असल्या मुर्ख पणाच्या मागण्या करणार ही नाहीत या मागण्या करणारे कोण आहेत हे सामान्य लोक ओळखून आहेत मात्र आता सर्वानी जागे होण्याची वेळ मात्र नक्कीच आली आहे साभार-© तीर्थराज पैठणकर गुरुजी .
  • Log in or register to post comments
  • 19937 views

प्रतिक्रिया

Submitted by तर्राट जोकर on Wed, 04/06/2016 - 11:48

Permalink

ह्या हिंदुंशी संबंधित

ह्या हिंदुंशी संबंधित धाग्यांवर मुस्लिमांबद्दल मुद्दा मांडून विषय भरकटवला जातोय. सहज आपलं नोंद करावी म्ह णून प्रतिसाद दिलाय. बाकी चलुद्या.
  • Log in or register to post comments

Submitted by अमित_निंबाळकर on Wed, 04/06/2016 - 12:27

Permalink

आज मंदिरात प्रवेश मिळावा

आज मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून राडा करतात आहेत .. उद्या मंदिर समिती , तसेच इतर मंदिरातील पदे यासाठी राडा करतील ..यांचा हेतू ...देव भक्ती नसून पैसा भक्ती आहे ..
  • Log in or register to post comments

Submitted by lgodbole on Wed, 04/06/2016 - 12:31

In reply to आज मंदिरात प्रवेश मिळावा by अमित_निंबाळकर

Permalink

..

पुरुष बायकाना विरोध करताहेत म्हणजे पुरुषानाही त्या जागा बळकवायच्या आहेत. असे म्हणायचे का?
  • Log in or register to post comments

Submitted by अमित_निंबाळकर on Wed, 04/06/2016 - 12:41

In reply to .. by lgodbole

Permalink

पुरुष पूर्वीपासून त्या पदांवर

पुरुष पूर्वीपासून त्या पदांवर आहेत ते का विरोध करतील ?? महिलांना प्रवेश हवा आहे पण का ?? याने काय सध्या होणार आहे ??
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Wed, 04/06/2016 - 12:48

In reply to पुरुष पूर्वीपासून त्या पदांवर by अमित_निंबाळकर

Permalink

मंदिरातल्या प्रवेशाच मागाहून

मंदिरातल्या प्रवेशाच मागाहून बघू; मंदिर समिती, तसेच इतर मंदिरातील पदे आणि तेथील स्वच्छ अथवा भ्रष्ट जो काही कारभार असेल त्यात महिलांना वाटा का नको ? ते तर आधी सांगा !
  • Log in or register to post comments

Submitted by अमित_निंबाळकर on Wed, 04/06/2016 - 16:50

In reply to मंदिरातल्या प्रवेशाच मागाहून by माहितगार

Permalink

पुरुष आणि स्त्री यात काही

पुरुष आणि स्त्री यात काही भिन्नता आहेत ... समानता कोणत्या पातळीवर हवी आहे स्त्रियांना हे अगोदर स्त्रियांनी ठरवायला हवे आहे ...उद्या पुरुष देखील त्यांच्या समानतेसाठी स्त्रियानकडे मागण्या करतील .. पण काही गोष्टी विज्ञानाला धरून तसेच भावनिक पातली समजून केल्या पाहिजेत. मंदिराची रचना त्याचा प्राचीन काल त्यावेळेची परिस्थिती हि काय होती हे तपासाव लागेल ..महिलांना प्रवेश का नको हे तेव्हाच समजेल .. पण एखादी पद्धत बदलायची असेल तर ती आंदोलनच्या मार्गातून बदलाने हे चुकीचे ...विषय चव्हाट्यावर आला कि शेंबड पोरगपण त्यावर बोलू लागत ..त्याचे परिणाम चागले होतात असे नाही ??
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Wed, 04/06/2016 - 16:57

In reply to पुरुष आणि स्त्री यात काही by अमित_निंबाळकर

Permalink

मंदिर समिती, तसेच इतर

मंदिर समिती, तसेच इतर मंदिरातील पदे आणि तेथील स्वच्छ अथवा भ्रष्ट जो काही कारभार असेल त्यात महिलांना वाटा का नको ? याचे उत्तर बाकी आहे अमितजी, . . . . बाकी कायदा त्याची त्याची वळणे घेतो त्यामुळे मंदिर प्रवेशाचे कायद्याने काय ते होईल. * कायदे विषयक एक सर्वसाधारण लक्षवेध ** समताधिष्ठीत मंदिर प्रवेश विरोधात कुणी मांडणी करत असेल आणि ती अबेटमेंट ऑफ ऑफेन्स कुप्रोत्साहक/कुप्रेरक ठरलीतर दि बॉम्बे हिंदू प्लेसेस ऑफ पब्लिक वरशीप (एंट्री ऑथोरायझेशन अ‍ॅक्ट), १९५६ च्या कलम ५ मध्ये अबेटमेंट ऑफ ऑफेन्स (कुप्रोत्साहक/कुप्रेरकास) मुळ गुन्ह्या एवढेच शिक्षेचे बहुधा प्रावधान आहे. तेव्हा लेखन करताना सुयोग्य काळजी घ्यावी वाटल्यास पहावे. *संदर्भ : http://bombayhighcourt.nic.in/libweb/acts/1956.31.html संबंधीत संस्थळ दुवा पान दिनांक ६ एप्रिल २०१६ रोजी दुपारी १३ वाजुन ४५ मिनीटांनी जसे दिसले ** उत्तरदायकत्वास नकार (माहितगारकृत) लागू
  • Log in or register to post comments

Submitted by अमित_निंबाळकर on Wed, 04/06/2016 - 17:22

In reply to मंदिर समिती, तसेच इतर by माहितगार

Permalink

मंदिर शेकडो वर्षापूर्वी बनले

मंदिर शेकडो वर्षापूर्वी बनले कायदा आजच्या युगातला ?? मग कसा apply होणार ?? समंजस पणा आणायला हवा .. काही विशिष्ट मंदिरातच स्त्रियांना प्रवेश नाकारण्यात येतो .. स्त्री आणि पुरुष यात भिन्नता आहे ..म्हणून काहीतरी करणे असावीत जेणेकरून प्रवेश निषिद्ध ठरवण्यात येतो .. आपल्या देशात अनेक संप्रदाय आहेत .. प्रत्येकाची वेगवेगळी विचारधारा आहे .. अनेक साम्प्रयानी वेगवेगळे प्रयोग त्यांच्या संप्रदायात केले आहेत ..व ते त्या वेळेस ते यशश्वी हि झाले आहेत .. पण बदल अश्या मार्गाने अनुचित आहे .. याने भारतीय संकृतीचीच बदनामी होते .. विचार परिवर्तन करायला हवे अगोदर .. मग आपले घर हि मंदिरच आहे हे कळेल ..आपले शरीर हि मंदिरच आहे ..
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Wed, 04/06/2016 - 18:51

In reply to मंदिर शेकडो वर्षापूर्वी बनले by अमित_निंबाळकर

Permalink

मंदिर समिती, तसेच इतर

मंदिर समिती, तसेच इतर मंदिरातील पदे आणि तेथील स्वच्छ अथवा भ्रष्ट जो काही कारभार असेल त्यात महिलांना वाटा का नको ? याचे उत्तर अद्यापही बाकी आहे अमितजी,
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Wed, 04/06/2016 - 13:00

In reply to आज मंदिरात प्रवेश मिळावा by अमित_निंबाळकर

Permalink

तुमचा संपूर्ण प्रतिसाद मूळ

तुमचा संपूर्ण प्रतिसाद मूळ लेखात मांडलेल्या भावनेच्या विपरित आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Wed, 04/06/2016 - 16:21

Permalink

ते जौ दे,

तीर्थराज पैठणकर गुरुजींनी श्री रमेश भिडे यांना हा लेख मिपावर प्रकाशित करायला परवानगी दिलीय का ?
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Wed, 04/06/2016 - 16:56

In reply to ते जौ दे, by सस्नेह

Permalink

तेच म्हणणार होतो, आता भिडे

तेच म्हणणार होतो, आता भिडे साहेबांचे स्वतःचे हे मत नसल्याने आपण शांत बसलोय.
  • Log in or register to post comments

Submitted by सौंदाळा on Wed, 04/06/2016 - 16:38

Permalink

अजुन ५० वर्षांनी...

अजुन ५० वर्षांनी... देवळात शिरा, लाडु, खोबरे प्रसाद म्हणुन तेच तेच का खायचे? आम्हा मांसाहारी प्रेमींना प्रसाद म्हणुन चिकन नगेट्स, चमचाभर खिमा मिळाले पाहिजेत.
  • Log in or register to post comments

Submitted by भंकस बाबा on Wed, 04/06/2016 - 17:17

In reply to अजुन ५० वर्षांनी... by सौंदाळा

Permalink

सहमत सौदाळा,

इकदम परफेक्ट उत्तर पेज3 महिलांना!
  • Log in or register to post comments

Submitted by राही on Wed, 04/06/2016 - 19:13

In reply to अजुन ५० वर्षांनी... by सौंदाळा

Permalink

काय हरकत?

मांसाहारामुळे माणूस अपवित्र होतो काय? आणि देव तर बिचारा काहीच खात नाही. त्याला सगळे समान. गाभार्‍यात उंदिर झुरळे पाल असली काय आणि माणसे असली काय. त्याच्या लेखी हे सगळे जीवच. इतकेच नव्हे, तर जडचेतनामध्येसुद्धा फरक ईश्वर का करेल?
  • Log in or register to post comments

Submitted by सौंदाळा on Wed, 04/06/2016 - 19:43

In reply to काय हरकत? by राही

Permalink

तेच तर मी म्हणतोय

तेच तर मी म्हणतोय तुम्ही व्हा नगेट्स तळायला पुढे मी येतोच मागुन (खायला)
  • Log in or register to post comments

Submitted by भंकस बाबा on Wed, 04/06/2016 - 19:59

In reply to काय हरकत? by राही

Permalink

राहिजि , असं होय!

मग बसा एखाद्या मंदिराबाहेर मांसाहारी पदार्थ घेऊन, हाय नाय ती सहिष्णुता फटक्यात रंग बदलते की नाही ते बघा! असा कोणता क्रांतिकारी बदल घडून येणार आहे चौथर्यावर गेल्यावर? हे लोक असे दाखवत आहे की आम्हीच सुधारणा घडवून आणत आहोत. जरा तो मुम्बईतला स्त्रीपुरुष रेशो बघा, मुलींचे प्रमाण अजुन कमी आहे. त्यासाठी काहीतरी कराना.
  • Log in or register to post comments

Submitted by राही on Wed, 04/06/2016 - 21:04

In reply to राहिजि , असं होय! by भंकस बाबा

Permalink

माझा अजेंडा

मी काय करावं हे मला ठाऊक आहे असं मला वाटतं. मी इथे कोणताही अजेंडा मांडलेला नाही. म्हणजे कोणी मंदिराबाहेर काही तळत बसावं वगैरे. इथे सहिष्णुतेचा वादही मी आणलेला नाही किंवा स्त्रीपुरुष रेशिओही. त्याही आघाडीवर अनेकांचे काम सशक्तपणे चालू आहेच. आणि केवळ मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रातही रेशिओ कमीच आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. ज्याला इच्छा आहे तो प्रत्येकजण आपापलं लहानमोठं वर्तुळ निवडून काही ना काही करत असतोच. सगळ्यांनी एकाच विषयावर (तेही दुसर्‍याने सुचवलेल्या) काम करावं असं घडत नसतं. परंपरा सतत बदलत असतात हे सांगायचं होतं. आणि बदलास प्रतिकार जितका जास्त तितका तो बदल झपाट्याने घडतो हेही अनेक वेळा दिसून आलेले आहे. 'केला जरी पोत बळेंच खालें, ज्वाळा तरी ते वरती उफाळे', हे स्वयंसिद्ध आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by भंकस बाबा on गुरुवार, 04/07/2016 - 08:46

In reply to माझा अजेंडा by राही

Permalink

राहिजि , तुमच्या मताला ....

काडीचीही किमंत कट्टर हिंदुत्ववादी देणार नाही. सहिष्णुता तुमची नाही तर हिंदुत्ववादयाची बिथरेल. प्रतिसादातला विनोद लक्षात घ्या. थंड डोक्याने विचार करा. अनेक समाज उपयोगी कामे असताना मंदिरप्रवेश सारख्या क्षुल्लक गोष्टीवर रान माजवु नका. माझे म्हणने असे आहे की या महिलांनी गर्भलिंग परीक्षा, मुलींचे शाळेतील ड्रॉपआउट, त्यांचे कुपोषण, त्यांची परवड यासारख्या ज्वलन्त मुद्द्यावर काम करावे. त्यांच्या कामाने एकदा काय या महिलेंचि ओळख झाली तर कोणीही माईचा लाल त्यांना मंदिर प्रवेशापासून रोखु शकणार नाही. उदाहरण पाहिजे तर अण्णा हजारेकडे पहा. त्यांनी फक्त वाचाळविराचे काम केले नाही तर राळेगणसिद्धिसारख्या गावाचा कायापालट केला. आता हजारेना शिंक जरी आली तरी सरकारला त्याची दखल घ्यावी लागते. ह्या महिला महाराष्ट्रमधील गड़ किल्ले सोडून डायरेक्ट एवरेस्टवर चढ़ाई करायला बघत आहेत. दमाने घ्या एवरेस्टपण दूर नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by राही on गुरुवार, 04/07/2016 - 11:11

In reply to राहिजि , तुमच्या मताला .... by भंकस बाबा

Permalink

किंमत

प्रतिसाद मला उद्देशून आहे म्हणून उत्तर देणे भाग आहे. प्रतिसादातला 'विनोद' आणि त्याची गर्भित धार लक्ष्यात आली. एक तर कोणी काही किंमत द्यावी म्हणून मी लिहीत नाही. दुसरे म्हणजे अनेक क्षेत्रात महिलांचे अनेक समाजोपयोगी विषयांवर हिरिरीने काम चालू आहे याची माहिती आपणास नसेल तर त्याची जंत्री इथे देण्यात मला स्वारस्य नाही. केवळ हिंदूच नव्हे तर इतर धर्मांतल्या सुधारणावाद्यांना बळ देण्याचे काम गाजावाजा न करता सुरू असते हे मला माहीत आहे. आपण उल्लेख केलेल्या प्रत्येक मुद्द्यावर समविचारी महिलांकडून काम होत आहे. त्या त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात इतक्या मग्न आहेत की कदाचित हे अनाहूत सल्ले विचारात घेण्याइतका वेळही त्यांच्यापाशी नसेल. आणि अण्णा हजारेंचे गैरलागू उदाहरण हेच दाखवून देते की महिला किती वेगवेगळ्या आघाड्यांवर काम करीत आहेत याची माहिती एकतर आपल्याला नाही किंवा माहीत असूनही आपण दुर्लक्ष्य करीत आहात. आणि शिवाय, मंदिरप्रवेशाच्या आंदोलनाची दखल सरकारला, न्यायसंस्थेला घ्यावी लागली आहे. असो. आता नेहमीप्रमाणेच, अधिक काही लिहिण्याची इच्छा नाही. प्रतिसाद देण्या न देण्याचा हक्क राखून ठेवीत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by भंकस बाबा on गुरुवार, 04/07/2016 - 14:14

In reply to किंमत by राही

Permalink

राहिजि ,

मी तुम्हाला असे कुठेच् सुचवले नाही आहे की महिला समाजोपयोगी काम करतच नाही. त्या करतात व् अनेकदा पुरुषापेक्षा चांगले करून दाखवतात. माझा मुद्दा आहे हे जे आता शनिशिंगणापुरमधे ज्या महिला आंदोलन करत आहेत त्याबद्दल आहे. तुम्हाला पुढे एवरेस्टचे उदाहरण देखिल दिले. अन्ना हजारेचे उदाहरण एक जनरल गोष्ट म्हणुन तुम्ही घेतले पाहिजे. आज सरकार( त्यात आजी माजी दोन्ही आले, स्पष्ट करतो नाहीतर परत तुमचा गोंधळ उडायचा) कित्येक गावात हागनदारी मुक्त गाव, चराइबन्दी, सामजिक वनीकरण याचा प्रचार करते. यश किती मिळते त्यांना? पाच टक्के तरी आहे का? हे हजारेंनि सहज करून दाखवले. त्याचे फायदे त्यांनी लोकांना पटवून दिले. ते पुरुष आहेत म्हणुन त्यांचे उदाहरण नाही दिले.
  • Log in or register to post comments

Submitted by राही on Fri, 04/08/2016 - 21:08

In reply to राहिजि , by भंकस बाबा

Permalink

महिलांना चौथराप्रवेश मोकळा

अखेर शिंगणापूर ग्रामस्थांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शनिचौथर्‍यावर स्त्री-पुरुष असा भेदभाव न करता सर्वांना प्रवेश देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. सर्व संबंधित यासाठी अभिनंदनास पात्र आहेत. न्यायालयात लढणार्‍या विद्या बाळ आणि त्यांच्या सहकारी, सामाजिक दबाव आणणार्‍या तृप्ती देसाई आणि त्यांची संघटना, अनेक अप्रसिद्ध महिलागट यांनी हा प्रश्न लावून धरला. डोळस न्यायसंस्था, विवेकी सरकार आणि समजूतदारपणा दाखवणारे ग्रामस्थ यांमुळे तिढा समजुतीने सुटला. या सर्वांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Fri, 04/08/2016 - 21:12

In reply to महिलांना चौथराप्रवेश मोकळा by राही

Permalink

त्रिवार अभिनंदन! आता शनीचा

त्रिवार अभिनंदन! आता शनीचा काही कोप-बीप होत नाही ह्या अंधश्रद्धेला सुरुंग लागून वर धाग्यात जी मुक्ताफळे उधळली आहेत त्याला सणसणीत चपराक बसेल.
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Sat, 04/09/2016 - 02:16

In reply to महिलांना चौथराप्रवेश मोकळा by राही

Permalink

काय बकवास लावलाय

राही, शिंगणापूरची प्रथा स्त्रियांवर अन्याय करण्यासाठी मुद्दाम तर उत्पन्न केली नव्हती ना? मग ती मोडल्याने काय मोठी समानता साधली जाणार आहे? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by बाळ सप्रे on गुरुवार, 04/07/2016 - 11:43

In reply to राहिजि , तुमच्या मताला .... by भंकस बाबा

Permalink

माझे म्हणने असे आहे की या

माझे म्हणने असे आहे की या महिलांनी गर्भलिंग परीक्षा, मुलींचे शाळेतील ड्रॉपआउट, त्यांचे कुपोषण, त्यांची परवड यासारख्या ज्वलन्त मुद्द्यावर काम करावे. त्यांच्या कामाने एकदा काय या महिलेंचि ओळख झाली तर कोणीही माईचा लाल त्यांना मंदिर प्रवेशापासून रोखु शकणार नाही.
अच्छा म्हणजे आंदोलन कोण करतयं त्याच्यावर ठरणार की अन्याय बंद करायचा की नाही!! म्हणजे मुळात अन्याय आहे हे मान्य आहे .. पण इगो दुखावतोय तो कोणितरी ऐरागैरा (/ऐरीगैरी??) येउन सांगतोय म्हणून :-))
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on गुरुवार, 04/07/2016 - 12:05

In reply to माझे म्हणने असे आहे की या by बाळ सप्रे

Permalink

येनकेन प्रकारेण महिलाप्रवेश

येनकेन प्रकारेण महिलाप्रवेश टाळेन =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by भंकस बाबा on गुरुवार, 04/07/2016 - 14:31

In reply to येनकेन प्रकारेण महिलाप्रवेश by तर्राट जोकर

Permalink

तजो साहब, सुप्रभात

मंदिरप्रवेश टाळण्याचा नाही तर तो का करावा याची जनतेला माहिती करून देने आवश्यक आहे. तुम्ही व् मी बोलून हा प्रश्न सुटनारा नाही. जी लोक तिथे वर्षानुवर्षे रहातात ज्यात महिलादेखिल आहेत त्यांचे मत देखिल ग्राह्य धरले पाहिजे. पुष्कळ भक्ताची ही धारणा असते की शनिदेवाचा कोप झाला तर आपले आयुष्य बरबाद होईल. मझ्यासारख्या नास्तिक व् तुमच्यासारख्या विद्ववान माणसाने कितीही कंठशोष केला तरी त्यांना ते पटवून देने कठिन आहे. अगदी उद्या शनिमंदिर सर्वाना खुले केले व् गावातील काही जणांवर काही अरिष्ट आले ज्याचा प्रवेशाशी काही संबंध नाही, जर अशा लोकांनी हाय खाल्ली तर त्याला जबाबदार कोण? मंदिर प्रवेश बंदीपासून असा कोणताही फरक या पेज 3 महिलांना पडणार नाही आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Wed, 04/06/2016 - 22:24

In reply to काय हरकत? by राही

Permalink

मांसाहारामुळे माणूस अपवित्र

मांसाहारामुळे माणूस अपवित्र होतो काय?
आणि देव तर बिचारा काहीच खात नाही.
जडचेतनामध्येसुद्धा फरक ईश्वर का करेल?
आमचा देव करतो. पटत नसेल तर मुसलमान व्हा.
  • Log in or register to post comments

Submitted by राही on Wed, 04/06/2016 - 22:51

In reply to मांसाहारामुळे माणूस अपवित्र by काळा पहाड

Permalink

तुमचा सल्ला

तुमचा सल्ला मी का मानावा? आणि आता तर मुसलमान व्हा, पाकिस्तानात जा ह्या आज्ञा वापरून वापरून अर्थहीन झाल्या आहेत. दुसरे काहीतरी ज्वलज्जहाल आदेश/फर्माने काढा बुवा. आमचा देव फरक करत नाही. आणि मी हिंदु आहे. आता हे हिंदूंच्या देवाचे वागणे पटत नसेल तर बघा बुवा. मी काही आदेश देत नाही अमुक करा तमुक करा म्हणून.
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on गुरुवार, 04/07/2016 - 00:25

In reply to तुमचा सल्ला by राही

Permalink

तुम्ही हिंदू असाल तर एकच करा.

तुम्ही हिंदू असाल तर एकच करा. मांसाहारी प्रसाद घेवून महाराष्ट्रातल्या दगडूशेठ, महालक्श्मी, कुठलाही गणपती, शंकर, दुर्गा, साईबाबा वगैरे मंदिरात देवाला दाखवून पहा. नै म्हणजे तिथे असलेले हिंदू लोक तुमच्याशी सुरवातीला ज्या वेळी वाद घालतील, त्यावेळी हाच प्रतिवाद करा. परतलात तर मग बोलू.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on गुरुवार, 04/07/2016 - 01:33

In reply to तुम्ही हिंदू असाल तर एकच करा. by काळा पहाड

Permalink

हिंदूंच्या देवांना मांसाहारी

हिंदूंच्या देवांना मांसाहारी नैवेद्याचे वावडे नसते ही माहिती एका कट्टर हिंदूला नक्कीच असायला हवी अशी माझी भाबडी आशा होती.
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on गुरुवार, 04/07/2016 - 07:48

In reply to तुम्ही हिंदू असाल तर एकच करा. by काळा पहाड

Permalink

गौरी-गणपती

गौरीला कोकणात अनेक घरात मटणाचा नैवेद्य असतो.
  • Log in or register to post comments

Submitted by अद्द्या on गुरुवार, 04/07/2016 - 12:44

In reply to तुम्ही हिंदू असाल तर एकच करा. by काळा पहाड

Permalink

देवी समोर बकरा मारतात तो

देवी समोर बकरा मारतात तो चालतो का ? इथे लक्ष्मीच्या जत्रेत जवळपास २५ बकरी मारून पूर्ण गावाला " प्र सा द " म्हणून दिलेला आहे लोकांनी . मुद्दा काय आहे, तुमच चाललाय काय
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंत लाटकर on Wed, 04/06/2016 - 16:39

Permalink

चिक्की ताईंनी शनि चौथर्यावर

चिक्की ताईंनी शनि चौथर्यावर जाऊन शनि महाराजांचे दर्शन घेतले.
  • Log in or register to post comments

Submitted by DEADPOOL on Wed, 04/06/2016 - 17:36

In reply to चिक्की ताईंनी शनि चौथर्यावर by हेमंत लाटकर

Permalink

ही काडी आहे!

ही काडी आहे! आता भाजपवाले येणार!
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Wed, 04/06/2016 - 17:34

Permalink

विषमता कुठे शोधाल?

रमेश भिडे, लेखात व्यक्त केलेल्या भावनेशी सहमत आहे. विषमता दूर करायला थुक्टीढोसईछाप ढोरोगाम्यांना मंदिरेच का सापडतात? देवाशी निगडीत जी काही पद्धती वा परंपरा आहे तिला स्त्रीपुरुष विषमतेच्या चष्म्यातून बघायचा अट्टाहास का? उद्या असाही आरोप करता येईल की, सगळ्या स्त्रियांनी पुरुषांविरुद्ध कट करून मुलं जन्माला घालायचं रहस्य दडवून ठेवलंय बघा ! आ.न., -गा.पै. विशेष सूचना : १. थुक्टीढोसई म्हणजे ढोस ढोस दारू ढोसून ठिकठिकाणी थुंकत जाणारी व्यक्ती. दहापैकी नऊ घोट गिळणार आणि एक घोट थुंकून दारू त्यागल्याचा आव आणणार. हिचा तृप्ती देसाई यांच्याशी काहीही संबंध नाही. २. ढोरोगामी म्हणजे ढोर आणि माणूस यांत धर्मामुळे फरक पडतो हे न जाणणारे. हे ढोराप्रमाणे निर्बुद्धपणे मार्गक्रमण करतात. यांचा स्वयंघोषित पुरोगाम्यांशी घनिष्ट संबंध आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by राही on Wed, 04/06/2016 - 19:07

In reply to विषमता कुठे शोधाल? by गामा पैलवान

Permalink

खेद

असे निंदाव्यंजक शब्द कुणाच्याही बाबतीत वापरू नयेत असे मत 'महत्त्वाची सूचना' धाग्यावर प्रगट झाले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by lgodbole on Wed, 04/06/2016 - 20:12

In reply to खेद by राही

Permalink

...

त्यांचा आयडी उडाला तरी पुन्हा बाइज्जत बरी होतो.
  • Log in or register to post comments

Submitted by नाना स्कॉच on गुरुवार, 04/07/2016 - 08:55

In reply to विषमता कुठे शोधाल? by गामा पैलवान

Permalink

अच्छा म्हणजे ह्या असल्या

अच्छा म्हणजे ह्या असल्या कॉमेंट लिहिताना तुम्ही थुक्टीढोसई झालेलात तर!! उत्तम शब्दच खुंटले! तरीही एक शेवटचा प्रयत्न, मुद्द्यावर बोला हो वैयक्तिक शेरेबाजी करून काही साध्यहोत नाही, वरतुन ज्या महान धर्माची आपण होलसेल डीलरशिप घेतल्यागत वागता आहात त्याला होलसेल मधे कमीपणा येतो!. असो!!
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on गुरुवार, 04/07/2016 - 17:54

In reply to अच्छा म्हणजे ह्या असल्या by नाना स्कॉच

Permalink

माझी थुक्टीढोसई झाली?

स्कॉचनाना, माझी थुक्टीढोसई झाली म्हणता? १. मी दहापैकी नऊ घोट दारू गिळल्याचं दाखवा. २. मी दारूचा दहावा घोट थुंकल्याचं दाखवा. ३. मी दारूचा त्याग केल्याचा आव आणलेला दाखवा. वरील तिन्ही दावे सफल असतील तर आणि तरंच माझी थुक्टीढोसई झाल्याचं मान्य करेन. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by नाना स्कॉच on गुरुवार, 04/07/2016 - 19:03

In reply to माझी थुक्टीढोसई झाली? by गामा पैलवान

Permalink

माफ़ करा चुक झाली आपण महातप्त

माफ़ करा चुक झाली आपण महातप्त प्रकाशमान धर्मसूर्य आहात अन आपण नसता हिंदु धर्म रसातळाला जाईल. _______________/\__________________
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on गुरुवार, 04/07/2016 - 19:10

In reply to माफ़ करा चुक झाली आपण महातप्त by नाना स्कॉच

Permalink

शाब्बास !

शाब्बास स्कॉचनाना ! असाच लीन भाव ठेवत चला. आम्ही प्रसन्न आहोत. भगवान आपले भले करोत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by नाना स्कॉच on गुरुवार, 04/07/2016 - 20:56

In reply to शाब्बास ! by गामा पैलवान

Permalink

हां हां हो हो पोचले का, हॅलो!!!

हॅलो!! हां पोचलात न हरभर्याच्या झाडावर!! बरंय बरंय नीट बसा हं पड़ताल नाहीतर नेमक्या ऊंचीवरुन अन नेमकेच प्रकरण शेकेल! :D जरा सांभाळून बरंका हो धर्मयोद्धे!.
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on गुरुवार, 04/07/2016 - 22:06

In reply to हां हां हो हो पोचले का, हॅलो!!! by नाना स्कॉच

Permalink

हरभऱ्याच्या झाडावर चढून देखील....

स्कॉचनाना, हरभऱ्याच्या झाडावर चढून देखील आम्ही तुमच्या खुशालीचं कंत्राट भगवंतांच्या हवाली केलं आहे. हे तुम्हाला कळलं असेलंच! तसे तुम्ही हुशार आहात. बघितलंत? असा लीन भाव ठेवावा म्हणतो मी. बाकी चालू द्या. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by गरिब चिमणा on Wed, 04/06/2016 - 17:41

Permalink

लेख नक्की कशावर लिहायचा याचा

लेख नक्की कशावर लिहायचा याचा लेखकाचाच गोंधळ उडालेला आहे,या लेखात मुस्लिमांना आणण्याचा काही एक संबंध नव्हता.मुस्लिम शासकांनी मंदीरे पाडली याला कोणताही पुरावा नाही,काही मंदिरात अमाप संपत्ती असायची ,ती लुटण्याच्या वळेस काही मंदीरांची मोडतोड मुस्लिम शासकांनी केली असेल, याचा अर्थ सगळे मुस्लिम शासनकर्ते हिंदूविरोधी होते असा होत नाही.मध्ययुगात मुस्लिम शासकांनी काही मंदिरे तोडलीही असतील,त्याचा दाखला देऊन सांप्रत काळच्या मुस्लिमांना टारगेट करणे योग्य नव्हे.
  • Log in or register to post comments

Submitted by अमित_निंबाळकर on Wed, 04/06/2016 - 17:46

In reply to लेख नक्की कशावर लिहायचा याचा by गरिब चिमणा

Permalink

त्यावेळेचा मुस्लिमही कुराणाचे

त्यावेळेचा मुस्लिमही कुराणाचे पालन करत होता आणि आजचा मुस्लिम हि कुराणाच follow करतो .. इस्लाम मूर्तीपूजा मनात नाही .. म्हणून बहुतेक मंदिर मुस्लिम शासकानीच उद्धवस्त केली
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Wed, 04/06/2016 - 17:51

In reply to त्यावेळेचा मुस्लिमही कुराणाचे by अमित_निंबाळकर

Permalink

बहुतेक मंदिर मुस्लिम शासकानीच

बहुतेक मंदिर मुस्लिम शासकानीच उद्धवस्त केली नक्की काय म्हणायचे आहे? खालच्या दोन पैकी काय? १. उद्धवस्त केलेल्यातली बहुतेक मंदिरं मुस्लिमांनी उद्धवस्त केली. २. व्यवस्थित असलेल्यांपैकी बहुतेक मंदिरं मुस्लिमांनी उद्धवस्त केली.
  • Log in or register to post comments

Submitted by अमित_निंबाळकर on Wed, 04/06/2016 - 17:56

In reply to बहुतेक मंदिर मुस्लिम शासकानीच by तर्राट जोकर

Permalink

२. व्यवस्थित असलेल्यांपैकी

२. व्यवस्थित असलेल्यांपैकी बहुतेक मंदिरं मुस्लिमांनी उद्धवस्त केली.
  • Log in or register to post comments

Submitted by अमित_निंबाळकर on Wed, 04/06/2016 - 17:56

In reply to बहुतेक मंदिर मुस्लिम शासकानीच by तर्राट जोकर

Permalink

२. व्यवस्थित असलेल्यांपैकी

२. व्यवस्थित असलेल्यांपैकी बहुतेक मंदिरं मुस्लिमांनी उद्धवस्त केली.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Wed, 04/06/2016 - 18:00

In reply to २. व्यवस्थित असलेल्यांपैकी by अमित_निंबाळकर

Permalink

धन्यवाद!

धन्यवाद! बहुतेक म्हणजे किमान ५१% टक्के. व्यवस्थित असलेल्यांपैकी किमान ५१% मंदिरं मुस्लिमांनी उध्वस्त केली ह्याबद्दल कुठेतरी विदा आहे की हे आपले वैयक्तिक मत आहे? लक्षात घ्या. 'मुस्लिमांनी मंदिरांना हातसुदिक लावला नाय' असल्या भ्रमात मी नाही. मला सत्य जाणून घ्यायचे आहे.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com