✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

इंडीयाचे नाव बदलावे का

क
कपिलमुनी यांनी
गुरुवार, 03/31/2016 - 17:00  ·  लेख
लेख
आपल्या देशाचे सध्याचे नाव रिपब्लीक ऑफ इंडिया आहे. स्वातंत्रांनंतर हे नाव घेण्यात आले. सर्वसाधारणपणे आपला देश ' इंडिया' म्हणून ओळखला जातो. ब्रिटीशांनी ठेवलेले इंडिया नाव बदलावे का ? काहीजण हिंदुस्थान नाव वापरतात पण सर्वसमावेशक भारत हेच योग्य वाटते . श्रीलंकेने सिलोन हे नाव बदलले , बॉंबे, मद्रास , कलकत्ता यांची नावे बदलली तसे इंडियाचा भारत करावे का ?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
21950 वाचन

💬 प्रतिसाद (99)

प्रतिक्रिया

बुरखा

रमेश आठवले
Mon, 04/04/2016 - 20:20 नवीन
बुरखा दत्त हिनी mass communication ची पदवी जामिया मिलिया इस्लामिया या विद्यापीठातून घेतली आहे. तिचा विवाह आधी मीर नावाच्या आणि नंतर हसीब दाब्रु नावाच्या गृहस्थांशी झाला होता . हे दोघेही कश्मीरी मुसलमान आहेत अशी माहित नेट वरून मिळते .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

बरं मग?

नाना स्कॉच
Mon, 04/04/2016 - 23:47 नवीन
तिचे 20 नवरे असुदेत, ती काही देव नाही ! तिच्या वैयक्तिक जीवनात हात घालायचा खरेतर आपल्याला कोणालाच हक्क नाही अन समजा FoE वापरून असला आगाऊपणा केलाच तर काय होते म्हणे नेमके आठवले सर? 1 बरखा चा पत्रकार म्हणून मुलाखती घ्यायचा हक्क हिरावला जातो? की 2 तिला शरीफ ची तिसरी बेटी वगैरे म्हणणे वैलिड होते?? वैदिक बायस्ड नाहीत ह्याची हमी आपण घेता का? कुठल्याच बाबतीत? जर वैदिक बायस्ड असतील असे आपण शक्यतेत जरी मानत असलात तरी मग शिव्या फ़क्त बरखालाच का म्हणे? ते ही नावाचे बुरखा वगैरे विकृतीकरण करून??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

पूर्वग्रह

रमेश आठवले
Tue, 04/05/2016 - 05:01 नवीन
कोणत्याही पत्रकाराची मते वाचताना किंवा ऐकताना त्याच्या मांडणी मागे त्याचे पूर्वग्रह काय असतील हे समजले तर बरे असते. नवर्यांची संख्या महत्वाची नाही पण पत्रकाराने कोण कुठले निवडले हे जाणून घेण्याने पूर्वग्रह समजण्यास मदत होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

असेच बॅकग्राउंड चेक जर मी

नाना स्कॉच
Tue, 04/05/2016 - 07:28 नवीन
असेच बॅकग्राउंड चेक जर मी वैदिक ह्यांचे करायचे ठरवले तर तो हक्क मला मिळेल काय??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

मौनमोह्न

रमेश आठवले
Tue, 04/05/2016 - 19:48 नवीन
मला वैदिक कोण हे माहीत नाही.. आपण मनमोहन सिंग यांचे नाव मौनमोह्न सिंग असे उच्चारलेले किंवा लिहिलेले पाहिले असेलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

आपल्याला कितिहि वाटत असले तरी

शान्तिप्रिय
गुरुवार, 03/31/2016 - 22:43 नवीन
आपल्याला कितिहि वाटत असले तरी तसे होणार नाही कारण मूर्ख क्रिकेट्पटु , हिंदी अभिनेते , अमेरिकेतील भारतीय , कोन्व्हट्ट मधील मुले भारत म्हणणे कमिपणाचे समजतात. आणि या लोकांना सामान्य माणसे आदर्श समज्तात.
  • Log in or register to post comments

मूर्ख क्रिकेट्पटु ,

दिग्विजय भोसले
गुरुवार, 03/31/2016 - 22:48 नवीन
मूर्ख क्रिकेट्पटु , >>> भारत हरलाय म्हणून अशी प्रतिक्रिया आली असावी.
  • Log in or register to post comments

इंडिया नाव सिंधूवरून पडलेले आहे

गामा पैलवान
गुरुवार, 03/31/2016 - 23:32 नवीन
कपिलमुनी, हिंदू या नावाप्रमाणे इंडिया हे नाव देखील सिंधू नदीवरून पडलेले आहे. इंडस्ट्री आणि इंडीजिनस हे शब्ददेखील सिंधू नदीच्या पूर्वेस असलेल्या प्रदेशांवरून पडलेले आहेत. भारत हे नाव दुष्यंत व शकुंतलेच्या भरत या पुत्रावरून पडलेले आहे. अर्थात, इंडिया हे नामदेखील भारत या नावाइतकेच जवळचे आहे. बदलायचे झाले तर हिंदवीय असे बदलावे. जेणेकरून भारताचा हिंदूंशी असलेला गाढ संबंध व्यक्त व्हावा. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

साउथ एशिया

नन्द्या
गुरुवार, 03/31/2016 - 23:48 नवीन
इथे कॅलिफोर्निया मधे एक प्रस्ताव आहे की या इंडिया ला साऊथ एशिया असे नाव पाठ्यपुस्तकात असावे. हळू हळू भारतातले लोकहि भारत इंडिया विसरून साऊथ एशिया असेच म्हणू लागतील. पण जर ट्रंप राष्ट्राध्यक्ष झाला तर तो भारतातील कॉल सेंटर व एच १ बी विसा यात खूप कपात करेल. मग भारतातल्या लोकांना तसे म्हणण्याचा मोह होणार नाही. :)
  • Log in or register to post comments

कशाला ?

भाऊंचे भाऊ
Fri, 04/01/2016 - 00:01 नवीन
इंडिया नाव सुरेख आहे सगले रिटर्न भरणारे सुध्दा मी इंडियन आहे असे जाहिरातीत अभिमानाने म्हणतात.
  • Log in or register to post comments

'इंडीया' हा आयडी उडाला की मग

रामपुरी
Fri, 04/01/2016 - 02:06 नवीन
'इंडीया' हा आयडी उडाला की मग 'भारत' हा डु आयडी घेता येईल.
  • Log in or register to post comments

माझा एक छोटासा र्पश्न विचारौन

तर्राट जोकर
Fri, 04/01/2016 - 06:36 नवीन
माझा एक छोटासा र्पश्न विचारौन घेतो. प्रश्न विचारण्याची हीच खरी जागा आहे म्हणून इथे नैतर तिथे अ‍ॅपच्या धाग्यावर अवांतर काय करतो म्हणुन..... असो. http://www.misalpav.com/comment/823866#comment-823866 IIT Bombay हे जागेचे नाव नसून विशेष नाम आहे. शहराचे नाव बदलले म्हणून इतर विशेष नामे बदलली जातातच असे नाही. जागेचे नाव हे विशेषनाम असते की नसते? आणी श्रीदेवीचा प्रश्नही, ते द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका चा द कशासाठी?
  • Log in or register to post comments

ईंग्रजी व्याकरणानुसार

अभिजितमोहोळकर
Fri, 04/01/2016 - 07:27 नवीन
द अनेक ठीकाणी वापरले जाऊ शकते. त्यातील एक वापर म्हणजे Use "the" with countries that include the words "republic", "kingdom", or "states" in their names. ह्यानुसार जर भारताचा वा इंडिया ह्या नावाचा उल्लेख रिपब्लीक ऑफ इंडीया असा केला तर द वापरावे लागेल म्हणजे द रिपब्लीक ऑफ इंडीया असे म्हणावे लागेल. द च्या वापराबाबत ह्या दुव्यावर चांगली माहीती आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

अमेरिकेत (अमेरिका खंडात)

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 04/01/2016 - 22:38 नवीन
अमेरिकेत (अमेरिका खंडात) इतरही अनेक राष्ट्रे (उदा कॅनडा, मेक्सिको, इ) आहेत... त्यातली एकाच राष्ट्राच्या झेंड्याखाली एकत्र झालेली राष्ट्रे म्हणजे "द ('ती राष्ट्रे' या अर्थाने) युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका".
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

@ अभिजित व म्हात्रेसर,

तर्राट जोकर
Fri, 04/01/2016 - 22:48 नवीन
@ अभिजित व म्हात्रेसर, धन्यवाद. एक प्रश्न क्लिअर. दुसर्‍या प्रश्नाचे उत्तर मिळेल काय - जागेचे नाम हे विशेष नाम का काय ते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

जागेचे विषेशनाम बदलले तर

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 04/01/2016 - 23:00 नवीन
जागेचे विषेशनाम बदलले तर त्यावरून तयार झालेली नावे सर्वसाधारणपणे बदलली जातात. त्यात बदला म्हणणार्‍यांच्या आणि नको म्हणणार्‍यांच्या रस्सीखेचीत जो गट यशस्वी होतो त्याप्रमाणे घडते. उदा : "युनिव्हर्सिटी ऑफ पुना" चे "पुणे युनिव्हर्सिटी" झाले व नंतर "सावित्रिबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी" पण झाले; "युनिव्हर्सिटी ऑफ बाँबे" चे "युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई" झाले; पण "बॉम्बे हायकोर्ट" आपले तेच नाव राखून आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

धन्यवाद. उपयुक्त उत्तर. :)

तर्राट जोकर
Fri, 04/01/2016 - 23:14 नवीन
धन्यवाद. उपयुक्त उत्तर. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

हिन्दीया करा आणि हिंगील्श ला

साहना
Fri, 04/01/2016 - 06:51 नवीन
हिन्दीया करा आणि हिंगील्श ला राष्ट्रभाषा ! बाय द वे ? लेखकांच्या हातात आहे का देशाचे नाव बदलणे (उपरोध)
  • Log in or register to post comments

नंदनवन

नाखु
Fri, 04/01/2016 - 08:15 नवीन
नंदनवन असे नाव ठेवावे म्हणजे आनंदी-आनंद होईल. नावालाच जागलेला मिपाकर नाखु
  • Log in or register to post comments

पण नंदनवन आणि चंदनवन हि दोन

sagarpdy
Fri, 04/01/2016 - 11:03 नवीन
पण नंदनवन आणि चंदनवन हि दोन टोके झाली नं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

हो बदल हवा

अमित_निंबाळकर
Fri, 04/01/2016 - 17:40 नवीन
भारत नाव सर्वसमावेशक आणि साविधानिक आहे
  • Log in or register to post comments

india that is Bharat हे आहे

पुंबा
Fri, 04/01/2016 - 18:35 नवीन
india that is Bharat हे आहे शासकिय नाव. संविधानात असाच उल्लेख आहे. republic of india असे आपल्या देशाचे नाव नाही(माझ्या माहितीनुसार).
  • Log in or register to post comments

Republic of India

फेरफटका
Fri, 04/01/2016 - 20:18 नवीन
पासपोर्ट वर तरी असंच छापतात (Republic of India)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

ह्म्म्म

इरसाल
Sat, 04/02/2016 - 12:08 नवीन
हिंदुमुस्तान बरे पडेल !!!!!!
  • Log in or register to post comments

हिंमुशीजैबुख्रीस्तान का नसावे

उगा काहितरीच
Sat, 04/02/2016 - 12:39 नवीन
हिंमुशीजैबुख्रीस्तान का नसावे मग ? हघ्या. ;-) . . रच्याकने पहिल्या प्रयत्नात वाचता आले तर सांगावे . ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

व्हय जी

इरसाल
Sat, 04/02/2016 - 14:14 नवीन
नवे सापडले हिंदु, मुस्लिम, सीख, ईसाई वरुन हिंमुसीई........हिंमुसीई.........हिंमुसीई.......!!!!!!! इतर धर्मीय जर % ने वाढले तर ते बी अ‍ॅडवण्यात येतील. नोंद असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

कम ओन् ... मिपाकर्स

माझीही शॅम्पेन
Sat, 04/02/2016 - 12:15 नवीन
कम ओन् ... मिपाकर्स भारत यू सी वेरी ओल्ड फॅशन यार ..... इंडिया साउंड्स सो कूल :)
  • Log in or register to post comments

नो वे बडी... इंडिया साउंड्स

तर्राट जोकर
Sat, 04/02/2016 - 12:35 नवीन
नो वे बडी... इंडिया साउंड्स लाईक थर्ड वर्ल्ड कन्ट्री. स्टेट्स इज कूल .... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

कपील मुनी

नाखु
Sat, 04/02/2016 - 15:46 नवीन
"अरे कपील तुला काय इतक्यात ष्टांप व्हेंडरची एजन्सी मिळालीय का? असे हे विचारत होते कालच मोगाभाऊजींना, बाकी कसे चाललेय एकदा ये हितेस बरोबर चहाला" सार्वकालीन माई
  • Log in or register to post comments

!

सुधीरन
Sat, 04/02/2016 - 22:36 नवीन
>>>"India, that is Bharat, shall be a Union of States." खरेतर 'इंडिया'च, तुम्हाला कळावे म्हणून 'भारत'!
  • Log in or register to post comments

भारताचे नाव "विदर्भ " असे

विजुभाऊ
Sun, 04/03/2016 - 09:31 नवीन
भारताचे नाव "विदर्भ " असे करुयात. अनुशेष संपून जाईल सगळा
  • Log in or register to post comments

और ये लगा सिक्सर....!

उगा काहितरीच
Sun, 04/03/2016 - 10:23 नवीन
और ये लगा सिक्सर....!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

इंडिवृता हे नाव कसे वाटते ?

प्रसाद गोडबोले
Sun, 04/03/2016 - 10:44 नवीन
इंडिवृता हे नाव कसे वाटते ?
  • Log in or register to post comments

नर्मदेच्या वरच्या भागाला

मालोजीराव
Mon, 04/04/2016 - 14:56 नवीन
नर्मदेच्या वरच्या भागाला हिंदुस्थान म्हणत पूर्वी , देशाला हिंदुस्थान नाव दिलं तर आपण दक्खनी लोकं काय करणार
  • Log in or register to post comments

भारत माता की जय...

मदनबाण
Tue, 04/05/2016 - 05:08 नवीन
मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- कधी कधी नजर का भिजते... :- इरादा पक्का
  • Log in or register to post comments

सौदी मध्ये सुद्ध्या भारत माता की जय !

मदनबाण
Tue, 04/05/2016 - 05:17 नवीन
मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- कधी कधी नजर का भिजते... :- इरादा पक्का
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

ब्रिटीशांनी ठेवलेले इंडिया

मोदक
Tue, 04/05/2016 - 09:06 नवीन
ब्रिटीशांनी ठेवलेले इंडिया नाव बदलावे का ? नक्को. यमक जुळायला सोपे पडते, उदा. "इंदिरा इज इंडिया" भारत नांव ठेवले तर यमक कसे जुळणार? ;)
  • Log in or register to post comments

जुळेल जुळेल मोदका

इरसाल
Tue, 04/05/2016 - 11:03 नवीन
बघ, एन्ना राऊला(सौथ इंड्यन स्टाइल) इस इंडिया ! बोल आता ???????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

ओ, ते इंडियाच ऱ्हायला बगा.

sagarpdy
Tue, 04/05/2016 - 11:59 नवीन
ओ, ते इंडियाच ऱ्हायला बगा. भारत आणायचय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

यमक जुळायला सोपे पडते, उदा.

श्रीगुरुजी
Tue, 04/05/2016 - 14:50 नवीन
यमक जुळायला सोपे पडते, उदा. "इंदिरा इज इंडिया" भारत नांव ठेवले तर यमक कसे जुळणार? ;)
जमतंय की. "भागवत इज भारत"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

एकच नंबर =))))

प्रसाद गोडबोले
Tue, 04/05/2016 - 16:45 नवीन
एकच नंबर =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

लोलच लोल !!

सस्नेह
Tue, 04/05/2016 - 15:27 नवीन
धागा आणि प्रतिसाद वाचून व्हिंदमाता लाजून कोनाड्यात तोंड लपवून आडवी झाली बघा !!
  • Log in or register to post comments

सर्वानुमते

नाखु
Tue, 04/05/2016 - 15:29 नवीन
शेवटी ठरलं तर

मिसळपाव

नाव ठेवायचे ते ! म्हणजे पाव इंग्रजांचे प्रतीक तर मिसळ सगळ्या भाषा/प्रांत संस्कृतीचे हा का ना का !!!!
  • Log in or register to post comments

एकच नंबर नाखु =))))

प्रसाद गोडबोले
Tue, 04/05/2016 - 16:44 नवीन
एकच नंबर नाखु =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

शिवाय

नाखु
Tue, 04/05/2016 - 16:58 नवीन
पाव चा हिंदीतला भावर्थ उमगून पाक झाल्याचे समाधान ते वेगळेच, हो का नाही ?? अर्थाने अचंबित नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

ब्रिटीशांनी ठेवलेले इंडिया

बिटाकाका
Wed, 02/14/2018 - 17:11 नवीन
ब्रिटीशांनी ठेवलेले इंडिया नाव बदलावे का ?
याला काही संदर्भ? मला कुठेतरी वाचल्याचं आठवतंतय कि अगदी ख्रिस्तपूर्व वर्षांपासून इंडिया हे नाव होतं. नंतर ते ज्यांनी राज्य केलं त्यानुसार येत जात राहिलं!
  • Log in or register to post comments

...... कुठेतरी वाचल्याचं

चौथा कोनाडा
Fri, 02/16/2018 - 14:50 नवीन
...... कुठेतरी वाचल्याचं आठवतंतय कि अगदी ख्रिस्तपूर्व वर्षांपासून इंडिया हे नाव होतं.
पाश्चात्यांनी सिंधू नदी मधल्या सिंधूचा उच्चार इंडू व त्यावरून इंडस व त्यावरून इंडिया हे नाव तयार झाल्यांच म्हाइत्येय, पण वरिजलीच ख्रिस्तपूर्व वर्षांपासून इंडिया असल्यांच पहिल्यांदाच वाचतोय. काही ठोस संदर्भ?
  • Log in or register to post comments

मूळ लेख सापडत नाहीये, २-३

हतोळकरांचा प्रसाद
Fri, 02/16/2018 - 15:19 नवीन
मूळ लेख सापडत नाहीये, २-३ वर्षांपूर्वी असाच INDIA चा लॉन्ग फॉर्म इंडिपेंडंट नेशन डिक्लेर्ड इन ऑगस्ट वगैरे फॉर्वर्डस चालू होते तेव्हा वाचला होता. पण हे विकिपेडियाचं पेजही साधारण तसंच सांगतंय बहुतेक! Indía in Koine Greek denoted the region beyond the Indus (Ἰνδός) river in the Pakistan, since Herodotus (5th century BC) https://en.wikipedia.org/wiki/Names_for_India
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

नाव बदलायला किती खर्च येईल?

चामुंडराय
Sun, 02/18/2018 - 22:59 नवीन
नाव बदलायला किती खर्च येईल? नाव बदलावे कि नाही हा मुद्दा थोड्यावेळ बाजूला ठेवून या साठी किती खर्च येईल हे जाणण्याची उत्सुकता आहे. काय काय बदलावे लागेल? स्टेशनरी, पाट्या, सर्व लिखित गोष्टी, जगभरातील दूतावासातील पाट्या.... इ. इ. काही अंदाज??
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा