दहावीला असताना कोसला पहिल्यांदा वाचली, आणी त्या कथेच्या नायकाचा आणि त्याचा विचारांचा माझ्या मनावर खूप परिणाम झाला. नौकरी मिळाल्यानंतर एक एक करून त्यांच्या सर्व पुस्तकांचे पारायण केले आणि मी भालचंद्र नेमाडेंची फ्यान झाले. माझ्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या स्वप्नांपैकी एक, म्हणजे एकदा नेमाडेंना भेटणे आणि त्यांच्या पुस्तकांविशयी माझ्या मनातले सर्व प्रश्न त्यांना विचारणे हे होते.
काही महिन्यांपूर्वी शिमल्यातल्या 'Indian Institute Of Advanced Studies' येथे नेमाडे सध्या असल्याचे कळाले, पूर्वीही अनेकदा त्यांच्याशी पत्रव्यवहार झालेलाच होता, म्हणून यावेळी एक पत्र टाकून मी त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. अगदी काही आठवड्यात त्यांचे उत्तर आले आणि पत्रात त्यांनी फक्त त्यांच्या शिमल्यातल्या निवासस्थानाचा पत्ता लिहून 'You are always welcome!' एवढेच लिहिले होते. पत्र हातात पडले, आणि मी आनंदाने उडीच मारली. हापिसात तीन दिवसांची सुट्टी टाकून लगेचच दुसऱ्यादिवशी सकाळी पावणे सातची औरंगाबाद ते दिल्ली फ्लाईट आणि दिल्ली ते शिमला रेल्वेची तिकीटं बुक केली. शिमल्यात राहण्यासाठी हाटेल बुक केले. दिल्लीत पोहचल्यावर तीन साडे तीन तास थांबावे लागले, दुपारी छोले कुलचा खाउन वरून दोन ग्लास गारेगार बदाम थंडाई घेतली व मी रेल्वेत बसले. रात्री जवळपास नऊ वाजता शिमल्यात टेकले, आता थेट हाटेलात जावे असे ठरवले. ओला क्याब ची भलीमोठ्ठी जाहिरात रेल्वे स्टेशनमध्ये पाहून फार बरे वाटले, मग क्याबने आमची स्वारी दहाच्या आसपास हाटेलात आली. अप्रतीम दालखिचडी व छान मोकळी, मोठ्या खिडक्या असलेली हेवेशीर व स्वछ खोली यांच्यात माझा प्रवासाचा सगळा थकवा कुठच्या कुठे पळून गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळी हाटेलात नाश्ता करताना असे ठरवले की नेमाडे सरांकडे चार साडे चार वाजता जावे, शक्यतो ते दिवसभर व्यस्त असतील. तोपर्यंत दिवसभर शिमला पाहून घेता येईल. मग शिमला मस्तपैकी हिंडून घेतला, खाणे पिणे ही चालूच होते.साडेचार वाजण्याच्या सुमारास शोधत-शोधत मी 'वीरभद्र' नावाच्या बंगल्यावर पोहचले. मग संकोच वाटत असतानाही मी कशीबशी बेल वाजवली.
कोणीतरी साठीतल्या आजींनी दरवाजा उघडला आणि, "यस?" असे बोलल्या.
"नेमाडे सर इथेच राहतात का?" असे विचारून मी जीभ चावली आणि पुन्हा तोच प्रश्न इंग्रजीत विचारला.
"हो इथेच राहतात, बोला" असे मराठीतले उत्तर ऐकून माझा आत्मविश्वास वाढला. मग नेमाडे सरांचे पत्र दाखवून मी त्यांना भेटायला आले आहे असे सांगितले.
"औरंगाबादहून आलीस?"
"हो" मी हळूच दारातून आत डोकावत बोलले.
"एकटीच?" त्या आज्जी नवलाने म्हणाल्या.
"हो!" मी परत घरात डोकावत बोलले.
"सर नाहीयेत घरात, पण येतीलच एवढ्यात. ये, आत ये." असे म्हणून आजींनी मला घरात बोलावले.
अगदी टापटीप घर, भिंती वरती काही जुन्या फोटोजच्या फ्रेम लटकावलेल्या होत्या, सोफ्यावर बसून मी त्याकडे पाहून वेळ घालवू लागले. कुणीतरी एक दुसरीच बाई येउन माझ्या समोर चहाचा कप ठेऊन गेली. नंतर पुढची पाच मिनिटे पूर्ण हॉलमध्ये मी सोडून कोणीच नव्हते, मग हातात चहाचा कप घेऊन त्या आज्जी आल्या.
"मग काय करतेस औरंगाबादला? शिक्षण वैगेरे घेतेस का?"असे सोफ्यावर बसून चहा पीत-पीत टिपिकल आज्जीसारख्या स्वरात बोलल्या.
"शिक्षण झाले, सध्या नौकरी करते"
"कसली?"
"प्रोग्रामिंग हेड आहे, एका रेडीओ केंद्रावर" मी बोलले!
"छान! आणि शिमल्याला काय फक्त सरांना भेटायला आली होतीस?"
"हो तेही कारण होतेच, म्हटले सोबत शिमलाही पाहता येईल"
"बरं केलंस. तू बस, मी आलेच" असे बोलून त्या आज्जी परत आत गेल्या.
दहा मिनिटानंतर बेल वाजली. ती दुसरी, मला चहा देणारी बाई पळत आली आणि तिने दार उघडले. कुणीतरी एक चाळीशीतली व्यक्ती आत आली, आणी त्यांच्या पाठोपाठ उंच, हडकुळे व झुपकेदार मिशांचे साक्षात नेमाडे सर!
ती चाळीशीतली व्यक्ती माझ्याकडे पाहून किंचित हसली व थेट आत गेली. नेमाडेसर येउन सोफ्यात बसून त्यांच्या जवळची पिशवी चाळू लागले. मला नेमके काय बोलावे ते कळेना, आणि सरही माझ्याशी काहीच न बोलता, त्यांचे पिशवीतून काही कागद काढून चाळत होते. मग त्या आज्जी आल्या व माझ्या शेजारी बसल्या!
"सर, ही कुठली पद्धत आहे?" त्या आज्जी किंचित मिश्किल सुरात बोलल्या!
"आं? काय झाले?" कागदातून डोके वर काढत सर बोलले.
"दीड हजार किलोमीटरवरून तुम्हाला भेटायला आलेल्या तुमच्या वाचकाला काहीच न बोलता तुम्ही काम करत बसलाय?" हे ऐकल्यावर मात्र या आज्जी नेमक्या कोण असाव्यात हा प्रश्न पडला..
"मला भेटायला? कोण, या? चुकलेच, मला वाटले तुमच्याच स्नेही आहेत!" असे म्हणून त्यांनी ते कागद काळजीपूर्वक परत त्या पिशवीत घातले!
"काय नाव म्हणालात?"
"अमृता जोशी"
"अरे हो, काही आठवड्यांपूर्वीच पत्र मिळाले होते तुमचे!" सर बोलले. सरांना माझे नाव लक्षात आहे हे ऐकून मला भारी वाटले!
"या, मोकळ्या हवेला बसू" असे म्हणून आम्ही थेट बंगल्यामागे असलेल्या लॉन मध्ये ठेवलेल्या खुर्च्यांवर जाउन बसलो.
मग तासभर मी घरून विचारायचे ठरवून आलेले जवळपास सगळे प्रश्न आठवून आठवून विचारात होते. पूर्ण संभाषणात मला त्यांनी अगदी मोकळेपणाने उत्तरे दिली, मला बिलकुल असे वाटू दिले नाही की मी एका ज्ञानपीठ विजेत्या साहित्यीकासोबत बसले आहे. बोलता बोलता मला कळले की ती चाळीशीतली व्यक्ती म्हणजे नेमाडेंचे चिरंजीव प्रा.हर्षल नेमाडे हे आहेत. ते IIT गुवाहाटी येथे प्राध्यापक आहेत व त्या आज्जी म्हणजे नेमाडेंच्या पत्नी सौ.प्रतिभा आहेत. थोडावेळ बसून आणखीन एकदा चहा घेऊन साडेसहा च्या आसपास, मी जायला निघाले. त्या आज्जी, नेमाडे सर व हर्षल सर यांच्यासोबत एक छानसा फोटो काढला. जाताना नेमाडेसरांनी ऑटोग्राफ केलेला 'देखणी' हा काव्यसंग्रह मला भेट म्हणून दिला. त्या आज्जी गेटपर्यंत सोडायला आल्या. बाहेर आल्यावर एक वेगळीच उर्जा अंगात संचारल्या सारखे झाले! थंड हवा, किंचीतसा अंधार आणि आनंदाने तुडुंब भरलेले मन!
(नेमाडेसरांसोबत झालेल्या चर्चेवर एक वेगळा धागे वेळ मिळेल तेव्हा काढेल!)
वाचने
8680
प्रतिक्रिया
59
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा छान !हरकत नसेल तर(च) फोटो
काही हरकत नाही हो.. :-)
In reply to वा छान !हरकत नसेल तर(च) फोटो by उगा काहितरीच
उदाहरणार्थ छान वगैरे. ;-)
:-)
In reply to उदाहरणार्थ छान वगैरे. ;-) by एस
हेवा वाटला :-)
पण नेमाडे शिमल्याला का राहतात
२००७ पासून ते तिथेच आहेत.
In reply to पण नेमाडे शिमल्याला का राहतात by आदूबाळ
ह्या Institute चा परिसर
In reply to २००७ पासून ते तिथेच आहेत. by अमृता_जोशी
नक्की माहित नाही. मी तिथे
In reply to ह्या Institute चा परिसर by यशोधरा
हो. सर्वांना खुला आहे. अर्थात
In reply to ह्या Institute चा परिसर by यशोधरा
इतक्या सुंदर निसर्गरम्य भव्य
In reply to हो. सर्वांना खुला आहे. अर्थात by गवि
अस का?
In reply to हो. सर्वांना खुला आहे. अर्थात by गवि
ओहो, मस्त! धन्यवाद गवि, जाईन
In reply to हो. सर्वांना खुला आहे. अर्थात by गवि
शिमला
In reply to पण नेमाडे शिमल्याला का राहतात by आदूबाळ
मस्त!
छान व्रुत्तांत.
छान वृत्तांत. काय बोलणे झाले
कथन आवडले. काय गप्पा झाल्या
भारीच!
धागा शीर्षक वाचून वाटले
सहमत
In reply to धागा शीर्षक वाचून वाटले by अजया
चांगला विषय !
ClickBait Title ला मराठीत काय
अरे वा!! चक्क! छान छान !
अरे वा!
कधी?
In reply to अरे वा! by पैसा
पैसा येणार आहेत पण त्या नै आल्या तर....
In reply to कधी? by अमृता_जोशी
डन
In reply to पैसा येणार आहेत पण त्या नै आल्या तर.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सोमवार? म्हणजे ४ तारखेला?
In reply to पैसा येणार आहेत पण त्या नै आल्या तर.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
होय. तोच चौक....
In reply to सोमवार? म्हणजे ४ तारखेला? by अमृता_जोशी
जर सहाच्या आस-पास ची वेळ असेल
In reply to होय. तोच चौक.... by बाबा योगिराज
प्रा डॉ.
In reply to जर सहाच्या आस-पास ची वेळ असेल by अमृता_जोशी
Ok
In reply to जर सहाच्या आस-पास ची वेळ असेल by अमृता_जोशी
क्षमस्व.
In reply to Ok by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छे. मला वाटले होते आज होईल
In reply to क्षमस्व. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आज आमच्या नशिबात कट्टा नव्हता
In reply to क्षमस्व. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान भेटवृत्तांत. आता पुढील
बाकी अवांतर प्रश्न..
नसतील भेटत कुणालाही .
In reply to बाकी अवांतर प्रश्न.. by आनन्दा
ह्म्म.. ते कुणालाही भेटत असती
In reply to नसतील भेटत कुणालाही . by उगा काहितरीच
इतर सेलेब्रटीमधे व लेखकांमधे
In reply to ह्म्म.. ते कुणालाही भेटत असती by आनन्दा
इतरांविषयी मला फार काही
In reply to बाकी अवांतर प्रश्न.. by आनन्दा
ओक्के मग ठीक आहे.. बाकी
In reply to इतरांविषयी मला फार काही by अमृता_जोशी
आवडला लेख. पुढील भागाच्या
आणि इतक्या सहज शिमल्याला जाऊ
In reply to आवडला लेख. पुढील भागाच्या by रातराणी
खरच हेवा वाटला. चर्चे संबधी
चर्चेतील ......
ह्म्म....
:-P
In reply to ह्म्म.... by विटेकर
नेमाडेंशी काय चर्चा झाली ते
:D
In reply to नेमाडेंशी काय चर्चा झाली ते by विशाखा पाटील
पुढील भाग औंदा का पुढील वर्षी
साहित्य संमेलन
अमृता तै...
चालेल कधी ?
In reply to अमृता तै... by बाबा योगिराज
योगीबाबा,
In reply to चालेल कधी ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छानच की!
In reply to अमृता तै... by बाबा योगिराज
आम्ही वाट पाहात आहोत ?
In reply to छानच की! by अमृता_जोशी
खुप आवड्ले.. अतिअवांतर-