फूसभाजी(कोवळ्या फणसाची भाजी).
मांसाहारी लोक शाकाहारी लोकांना ‘घासफूस खानेवाले’ म्हणतात हे अगदी म्हणजे अगदी खरंय.पण घास म्हणजे शब्दश: गवताच्या जातकुळीतली फोडशीची भाजी आणि शब्दश: फूसभाजी हेच नाव असलेली फणसाची भाजी खाताना मांसाहारी लोकही ‘घासफूस खानेवाले’च होतात हे विसरूनच जातात.
फूसभाजी फणसाची भाजी असते पण हा फणस इतका कोवळा असावा लागती कि त्यात गरे धरले नसले पाहिजेत.त्याला ‘कुवरी’ याच योग्य नावाने ओळखले जाते.म्हणतात.कुवरी म्हणजे कुमारी.ही कुवरी पण कोणी भेट दिली असेल तर त्याची चव अजूनच न्यारी असते.
माझ्याकडे अजूनही आजोळाहून रामनवमीनंतर पहिली कुवरी भेट म्हणून येते.पण यावर्षी एका सुहृदाकडून आधीच ही भेट आली नि मन पोचलं आजोळी.आजोबांनी बांधलेल्या राममंदिरात रामजन्माचा उत्सव साजरा होतो.लहानपणी.परीक्षा लवकर संपून आम्ही सगळी मामे, मावस भावंडं,लग्न झालेल्या मावसबहिणी ,मामेबहिणी,त्याच्या मुलांसह ,शिवाय सगळ्या मामीच्या बहिणी त्याच्या मुलासह,मामांचे मित्र सह्कुटुंबअसत आणि उत्सवानिमित्त होणाऱ्या श्रीराम प्रासादिक मंडळाच्या नाटकात जरी गावातलीच मंडळी काम असली तरीही मुंबईतून काम करणारे आणि मामाच्या मित्रपवारातले नाटकातून काम करणारे व्यावसायिक काही नट,नट्या आणि तेही सहकुटुंब,असा भला मोठा गोतावळा नजरेसमोर दिसायला लागतो.
मी लहान असताना या सर्व नटमंडळीना काका आत्या,मावशी अशा घरगुती संबोधनाने हाकारण्याचा शुभ योग माझ्या जीवनात होता.त्यात चित्तरंजन कोल्हटकर,शंकर घाणेकर,नीलम प्रभू,नीलप्रभा भरडकर अशा अनेक मान्यवरांसोबातच्या आठवणीही आहेत.
तिथे मोसामातली पहिली फूसभाजी खायला मिळत असे.त्याला म्हणायचं फणसाचा नवा केला.मग येताना आजी सोबतही कुवऱ्या देत असेच.आता आजीच काय पण दोन मामा,दोन मामी,तीन मावशा,आई,यापैकी फक्त एक मामी आहेत.आणि त्या आठवणीने दरवर्षी कुवरी पाठवतात आणि भाजी ताटत पडते.
आमच्याकडे या भाजीला लसूण फोडणीवर घालून त्यावर कांदा परतून भाजी टाकायची.वर मसाला घालून झाकण द्यायचे.एक दोन वाफा आल्या की, मीठ घालून उतरायची.वाढताना भरपूर ओले खोबरे घालून वाढायची.
ही पद्धत मात्र माझ्या एका एका महाविद्यालयीन मैत्रीण निमा महाडीकच्या आईची.ही भाजी नुसती बशीत घेऊन पोह्यांप्रमाणे खायलाही मस्त लागते नि मला तशी खायलाही आवडतेच. चला तर, तुम्हालाही खायची असेल तर साहित्य गोळा करा.बाकी सर्व साहित्य घरात असतेच फक्त कुवरी आणायला बाजारात जावे लागेल.
साहित्य:-
१. एक कुवरी(कोवळा फणस).
२. लसूणपाकळ्या गरजेप्रमाणे.
३. लाल सुक्या किंवा ओल्या मिरच्या.माझी आवड ओल्या लाल मिरच्या.
४. कांदे
५. ओले खोबरे भरपूर
६. कोथिंबीर
७. तेल
८. चीनुसार मीठ आणि साखर.
९. हळद पूड
कृती:-
१. आधी हाताला आणि विळीला तेल चोळून घ्या.
२. फणसाच्या चकत्या कापा.
३. एका मोठ्या पातेल्यात त्यात फणसाच्या चकत्या बुडतील इतके पाणी घालून त्या उकडा.
४. पाणी वेळून थंड करा.
५. थंड झाल्यावर चकत्यांचा कडेची साल काढा.
६. आता पाट्यावर किंवा किचन कट्ट्यावर ठेवून एकेक चकती ठेचून मोकळी करावी किंवा हाताने पिंजून काढावी.
७. आता ही भाजी फोडणीवर टाकायला तयार झाली.(या टप्प्यावर ही भाजी हवाबंद करून फ्रीजरमध्ये साठवू शकता,हवी तेव्हा रूम टेम्परेचरला आणून पुढची कृती करू शकता.)
८. वाटीने मोजून घ्या.जितक्या वाट्या होतील त्या मापाने कांदे,मिरच्या व लसूणपाकळ्या घ्याव्यात.माझी भाजी चार वाट्या झाली.एका वाटीला अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी तेल,चार मध्यम लसूणपाकळ्या आणि चार मिरच्या हे निमाच्या आईचे प्रमाण.मी तेच वापरते,तुम्ही आवडीनुसार कमीजास्त घेऊ शकता.
९. मिरच्या आणि लसूणपाकळ्यांचे खसखशीत वाटण पाणी न घालता करा.
१०. गॅसवर कढई ठेऊन तेल घाला.
११. तेल तापले की,त्यात हे वाटण घालून परता.
१२. खरपूस परतून त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परता.
१३. त्यात हळदपूड घालून परता.
१४. आता ठेचलेली भाजी घालून परता.
१५. चवीनुसार मीठ व साखर घालून परतत रहा.
१६. खोबरे,कोथिबीर घालून सजवा.(कोथिंबीर माझी अॅडिशन आहे.)
१७.आता थांबू नका.भाकरी,पोळी,पुरी कशाहीसोबत किंवा नुसतीच खायला सुरुवात करा. माझी आवड कोणत्याही पिठाची भाकरी किंवा नुसतीच.
वाचने
16494
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
खतरनाक रेसिपी!!!
छ्या ! आम्हाला कधी खायला
हो
In reply to छ्या ! आम्हाला कधी खायला by स्रुजा
हो? मग सुरंगी ताई या पाकृ
In reply to हो by सामान्य वाचक
सुस्वागतम् सृजा.
In reply to हो? मग सुरंगी ताई या पाकृ by स्रुजा
मस्त
नेहेमी काहितरी नवच देतेस तु
भारी पाक्रु आहे.
अत्याचार ...अत्याचार ... एवढा
उगा काहीतरीच,
In reply to अत्याचार ...अत्याचार ... एवढा by उगा काहितरीच
वा मस्तच. ही नवी पद्धत...
तुमच्या पद्धतीने कधी करणार
In reply to वा मस्तच. ही नवी पद्धत... by स्नेहश्री
सुरंगीतै, येवाली आणि तुझीवाली
यशो, बदल मूळ फणसातच आहे.या
In reply to सुरंगीतै, येवाली आणि तुझीवाली by यशोधरा
वाह
मस्तच....
नंदादीप,असेलही तुम्ही म्हणता
In reply to मस्तच.... by नन्दादीप
ही भाजी कोकणी लोकांनाच जमते
ये ग.ठरवा कट्टा.कृतीत अनु
ताई मस्तच.. लाल मिरची ठेचुन
विशाखा,ही भाजी बहुतेक
In reply to ताई मस्तच.. लाल मिरची ठेचुन by विशाखा राऊत
विशाखा,ही भाजी बहुतेक
In reply to ताई मस्तच.. लाल मिरची ठेचुन by विशाखा राऊत
मधला गोल भाग नाही काढत का ताई?
अगदी कोवळ्या फणसाची पाव
In reply to मधला गोल भाग नाही काढत का ताई? by अनन्न्या
स्लर्र्र्र्र्र्र्प!
मी गेल्या आठवड्यात केली ही
सुरंगीताई,तो फणस कोवळा आहे (
भिंगरी,या दिवसांत कोवळेच
छानच की,
जरुर कर नीमो आणि इथे फोटो टाक
In reply to छानच की, by नीलमोहर
मस्त... :)
भाजी चविष्ट असणार यात शंकाच नाही.
वा झकास दिसतए भाजी :)