Skip to main content
लेखक साहना यांनी रविवार, 27/03/2016 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या सर्वांना हे माहिती आहेच की युधिष्ठीर दुर्योधनाशी द्यूतात द्रौपदी हरला. दुर्योधनाने मग दुष्यासनाला सांगितले की द्रौपदीला धरून ओढत फरपटत दरबारात घेऊन यावे. तिला तिथे आणल्यावर दुर्योधनाने दुष्यासनाला द्रौपदीला विवस्त्र करायला सांगितले. द्रौपदीने सर्वांकडे मदतीची याचना केली - आपले पती, भीष्म पितामह, राजा धृतराष्ट्र, परंतु कोणीही हा अन्याय, अनर्थ थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. त्या क्षणी त्या ठिकाणी कृष्णाने शपथ घेतली की तो तिथे उपस्थित असलेल्या त्या सर्व लोकांचे प्राण घेईल ज्यांनी द्रौपदीच्या या बेअब्रू होण्याचा देखावा पाहिला आणि तिची मदत केली नाही. कृष्णाने पांडवांचे देखील प्राण घेतला असता , परंतु द्रौपदीचे कुंकू, तिचे सौभाग्य असल्यामुळे ते वाचले. पांडवांच्या व्यतिरिक्त एक आणखी असामी होती जी त्याच्या क्रोधापासून बचावली - ते होते कृपाचार्य. कारण जेव्हा द्रौपदी सगळ्यांकडे मदत मागत होती तेव्हा त्यांनी एक बोट दर्शवून तिला इशारा केला होता की सर्वांकडे मदतीची याचना करण्यापेक्षा त्या एका शक्तीकडे मदत माग. द्रौपदीला त्यांचा इशारा क्षणात समजला आणि तिने स्वतःला कृष्ण्चरणी अर्पण केले. "आम्हाला काळजी नाही त्याची, त्याला आपली काळजी आहे आपल्या प्राणांचा रक्षक सुदर्शन चक्रधारी आहे" केवळ कथा आहे. काथ्याकुट करायची गरज नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 24208
प्रतिक्रिया 128

प्रतिक्रिया

In reply to by तर्राट जोकर

धन्यवाद....
श्रीकृष्ण म्हणतो मी तर प्रत्येक ठिकाणी आहे पण अज्ञानी जनास दिसत नाही. पांडव अज्ञानी होते म्हणून द्युतास सामोरे गेले, हे त्यांचे कर्मच आहे, हे कर्म स्वत: भगवानांनी करुन घेतले. त्यानंतर झालेले दुष्परिणाम हेही भगवंतांचीच लिला आहे. मग अशा वेळेस भगवंत तिथे नव्हते असे कसे म्हणायचे?
म्हणजे जे झाले, होत आहे आणि होणार आहे हे सगळेच भगवंत "नियंत्रीत" करतो....मग आपण देव मला गरज असताना आला नाही असे बोलू नये...कधी कोणती गोष्ट करावी अथवा करू नये हे आपल्यापेक्षा देवाला जास्त समजते...तस्मात तुम्ही, मी अथवा आणखी कोणी...कितीही चर्चा केल्या तरी त्यामुळे देवाच्या प्लानिंगमध्ये शष्प फरक पडणार नाहिये....त्यामुळे माझा इथे पास

In reply to by तर्राट जोकर

आयला...मी बॅटिंगला आलो की असे बॅट-बॉल घेउन "आई बोलावतेय" म्हणत जायचे नाही ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊ

In reply to by टवाळ कार्टा

आता तुम्हीच पास बोल्ले तर काय येकटाच खेळत बसू?

In reply to by टवाळ कार्टा

केवळ कथा आहे. काथ्याकुट करायची गरज नाही याचा अर्थ "इष्टार्ट, आणि बारीक कूटा हं" असा आहे एवढी आज ज्ञानात भर पडली

In reply to by टवाळ कार्टा

अहो साहेब मला तर मराठी पण येत नाही. केवळ कथा आहे, काथ्याकुट करायची गरज नाही याचा अर्थ "इष्टार्ट, आणि बारीक कूटा हं" असा आहे हे आजच समजलो.

मुळात रावण एक मर्यादापुरुषोत्तम, पण तसे दाखवले तर रामाचा इम्पॉर्टन्स कमी होइल म्हणून शापाची ष्टुरी. _____/\_____ नाहि तजो आता दंडवत स्विकाराच. "रावण एक मर्यादापुरुषोत्तम" ह्याचा काहि विदा मिळेल का :)

In reply to by होबासराव

आपण मूळ रामायण वाचले तर समजेल. तुलसीरामायणाच्या रचनेनंतर श्रीरामाचे दैवतीकरण झाले, त्याचे नायकत्व अधिकाधिक उजळ दिसण्यासाठी रावणाला अधिकाधिक खलनायक ठरवण्यात पुरक भाकड कथा रचण्यात आल्या. मर्यादापुरुषोत्तम चा तुमचा अर्थ काय ते सांगा मग माझ्या विधानाचा विदा देतो. अण्डरस्टँडींगमें लोच्या नै मंगता बाबा.

हजारो शेकडो वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टी आताच्या आपल्या समजुती आणि निकषांनुसार कश्या चुकीच्या आहेत हे सांगण्याची सध्या फ्याशन आहे. त्यातही हिंदू देवदेवता आले की मग तर काय सगळंच चुकीचं आणि कपोलकल्पित असतं.

In reply to by ट्रेड मार्क

सहमत. अश्यांच्या तोंडाला लागू नये यातच शहाणपणा आहे ! माध्यांनीं थुंकितां सूर्यावरी| तो थुंका पडेल आपणांच वरी | दुसऱ्यास चिंतितां अंतरीं| आपणास घडे ||९-३-२७||

गुज्जु जेंव्हा जय श्रीकृष्ण म्हणतात तेंव्हा ते जयश्री कृष्ण असे ऐकू येते. तसे त्यांना सांगितले तरी त्यातला फरक कळत नाही.

In reply to by तिमा

ते असे ऐकू येते : १) जेशी कश्ण २)जेशी करश्ण ३)जेशी क्रश्ण ४)जेसी कश्ण ५) जेसी करश्ण ६)जेसी क्रश्ण काही काही वेळा नुसतेच जेसी म्हणून मान हलवतात. म्हणजे पुढचे म्हटले आहे असे समजायचे.

In reply to by राही

यात 'श'च्या जागी 'स' टाकले तर आणखी सहा काँबिनेशन्स होतात. शिवाय 'ण'ऐवजी 'न' म्हणणारेही काही असतात.

तर्राट जोकर, रावण म्हणजे मर्यादापुरुषोत्तम? मग लंकेतल्या यच्चयावत लोकांनी सांगितल्याप्रमाणे सीतेला परत का धाडली नाही रामाकडे? आ.न., -गा.पै.

In reply to by तर्राट जोकर

तर्राट जोकर, म्हणजेच रावण मर्यादापुरुषोत्तम नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

तुम्ही वाटेल ते समज करुन घ्या. आपला काय विरोध नाहि. रावणालाही नाही. =))

In reply to by तर्राट जोकर

तजो, मीही हेच म्हणतो. आपला पण काहीही विरोध नाही. अगदी रावणालाही नाही. त्याची कर्मं निस्तरायला तो समर्थ आहे. :-) आ.न., -गा.पै.

In reply to by तर्राट जोकर

तर्राट जोकर, रामाला नावं ठेवल्यावर लोकं का भडकतात ते सांगतो. त्याचं काय आहे की रामायणाने भारत जोडलेला आहे. रामावर अनाठायी टीका केली की लोकांना तो भारतमातेचा अपमान वाटतो. म्हणून लोकं भडकतात. हे बरोबर की चुकीचं ते मला माहीत नाही. पण आहे ते असं आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

ओके म्हणजे जगात धार्मिक कारणावरुन भडकण्याचे कारण समान आहे तर. धन्यवाद ;)

In reply to by तर्राट जोकर

तजो, माफ करा, पण तुमच्या निरीक्षणाशी मी असहमत आहे. हिंदू भडकत नाहीत. अगदी भडकायला हवेत तेव्हाही भडकत नाहीत. म्हणूनच तर सगळा लोच्या झालाय. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

हा हा हा. सेल्फ गोल होतोय हे लक्षात आल्यावर पलटी खाल्ली. मला अगदी हेच हवे होते. धन्स ;-) तो प्रश्न सापळा होता, तुम्ही अडकलात. गुडलक नेक्स्ट टाइम! =))

In reply to by तर्राट जोकर

तर्राट जोकर, हा सापळा बिपळा नसून माझ्या दिलदारपणाची साक्ष आहे. तुम्हाला जितं मया म्हणायला मिळावं म्हणून मी केलेला त्याग आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

दिलदारपणा????? पाकिस्तान प्रत्येक वर्ल्डकपमधे भारताला दाखवतो तोच ना? गुड. थ्यांक्स. ;)

In reply to by तर्राट जोकर

ते तर रावणच सांगू शकेल
=)) =)) 'नरम गरम' मधला शॉटगन सिन्हा आणि निळु भौ चा रामलीला सीन आठवला =))

In reply to by गामा पैलवान

सोपे आहे. रावण मर्यादा पुरुषोत्तम होता आणि राम होता "स्त्रियांची पिळवणूक करणारा". सीता मातेची हि पिळवणूक रावनाच्याने बघवेना म्हणून तर तो डोळ्यांत पाणी आणून पर्णकुटीच्या बाहेर येवून सीता मातेच्या विनवण्या करत होता. रामा प्रमाणे धनुष्य वगैरे उचालानाचे misogynist खेळ त्याने नाही केले उलट सीतामातेला First Class पुष्पक विमानात बसवून बीच फ्रंट घरांत घेवून गेला. विमान हे मर्यादा पुरुषोत्तमा कडे असते misogynist लोक घोडी वगैरे वापरतात. त्याशिवाय रावण हा निसर्ग प्रेमी होता. गोल्बल वर्मीन होवू नये म्हणून तो मूर्ख ऋषी मुनीचे प्रदूषण करणारे यज्ञ वगैरे बंद पाडीत असे. थोडक्यांत काय तर रावण हा त्या काळचा चाचा नेहरू होता.

In reply to by साहना

_/\_ अहो गेला बाजार शशी थरूर नाव घ्यायचं, चाचांच नाव ...आता 'तिरकी रेघ', 'उल्टा चश्मा' वाल्या मिपाकरांचं मोहोळ उठवलंत की हो

मी एवढेच म्हणेल एकदा तरी रामायण किंवा महाभारत वाचून पहा. गीता प्रेसची वाचली तरी चालेल. मूर्खपणाच्या शंका तरी दूर होतील. बाकी मिसळपाव वर सारेच चालते. कधी तिखट जास्ती तर कधी कमी.

कृष्णाला देव मानले तर यादव वंशांचा नाश का झाला. कृष्णाचा अंत सामान्य फासेपारध्याच्या हाताने का झाला.

In reply to by हेमंत लाटकर

यादवीवर लिहिलेला हा लेख कदाचित तुम्हाला आवडेल - http://www.misalpav.com/node/26948