शेवग्याच्या शेंगांची भजी-दोन प्रकार.
कोकणपट्ट्यातल्या बायका सुगरणी खऱ्याच.एकाच भाजीचे वेगवेगळे प्रकार करून संसार चालवणे यांना उपजतच जमते. प्रत्येक दारात शेवग्याचे झाड असतेच. आणि नसलेच तरी एका घरी शेंगा काढल्या की त्याचा वानवळा वाडीवरच्या बाकीच्या घरातून चार चार शेंगा दिल्याशिवाय झाडाच्या मालकिणीलाही काही त्या घशाखाली उतरायच्या नाहीत.
शेवग्याची शेंग कशातही रमते बटाट्यासारखीच,पण बटाटा कसा?आपली चव बदलून ज्यासोबत आहे त्याची चव घेणारा.”जिसमे मिला दो लागे उस जैसा”आणि शेवग्याची शेंग मात्र कोणतीही भाजी असो,कोलंबी,तिसऱ्या सारखे मासे असोत,त्यांना 'मी प' म्हणत स्वत:ची चव देणार.ज्यांना या शेंगा नुसत्या चोखून न खाता चावून खायला आवडतात,त्यांना ही भजी फारच आवडतात.
ही भजी माझ्या एका मावसासासूबाईंनी शिकवली होती.जेव्हा पाहिल्यांदा खाल्ली तेव्हाच मला ती आवडली होती.पण त्यासाठी लागतात त्या जून,जाड शेंगा आणि त्या मिळण्यासाठी ज्यांच्याकडे झाड आहे अशी व्यक्ती तुमच्या ओळखीत असायला हवी.त्यामुळे बऱ्याच वर्षांनी एका सुहृदाच्या घरी गेले असताना हव्या तशा शेंगा मिळाल्या आणि ही भजी केली.त्याची पाककृती मिपाकरांसाठी.
साहित्य:-
१. दोन/तीन शेवग्याच्या शेंगा.
२. एक वाटी डाळीचे पीठ.
३. एक चहाचा चमचा मिरचीपूड.
४. अर्धा चहाचा चमचा हळदपूड.
५. अर्धा चमचा चमचा हिंगपूड.
६. अर्धा चमचा चहाचा साखर.
७. चवीनुसार मीठ.
८. तळण्यासाठी तेल.
कृती:-
१. शेंगा तासून त्यांचे नेहमीप्रमाणे तुकडे करावेत.
२. पाण्यात थोडेसे मीठ घालून हे तुकडे उकडावे.
३. पाणी वेळून तुकडे थंड झाल्यावर मधल्या बिया काढून त्या एका तुकड्याचे तीन तुकडे करावे.
४. अनुक्रमांक दोन ते सात एकत्र करून त्यात पाणी घालून भज्यांचे सरसरीत पीठ तयार करावे.
५. तेल गरम करून त्यात हे तुकडे पिठात बुडवून मंद आचेवर तळावेत.
६. ओल्या खोबऱ्याच्या चटणीसोबत वाढावेत.
दुसरा प्रकार:-
हा मात्र माझा शोध आहे. असे जाहीर करून मीच मला सुगरण म्हणवून घेतेय.असो.
वरच्या कृतीतील एक ते तीन पर्यंतच्या कृतीनंतर मिरचीपूड,हळदपूड,हिंगपूड,मीठ सरळ तुकड्यांना चोळून घ्यावे,आणि मंद आचेवर शॅलो फ्राय करावेत.मस्त कुरकुरीत होतात.हवे हसेल तर बेसनात किंवा तांदुळाच्या पिठात घोळवून तळल्यासही छान लागतात. मला नुसतेच आवडतात.पसंद अपनी अपनी,खयाल अपना अपना.चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सुरेख लागतात.
वाचने
11495
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारी!
घशात अडकत नाही का ? च्युयी
माशांचे काटे दोन प्रकारे सहन
In reply to घशात अडकत नाही का ? च्युयी by उगा काहितरीच
तेच तर नाही ना जमत मला :-( .
In reply to माशांचे काटे दोन प्रकारे सहन by आनंदी गोपाळ
बोणलेस खा मग! रावस, सुरमई,
In reply to तेच तर नाही ना जमत मला :-( . by उगा काहितरीच
अगदी बरोबर,आनंदी गोपाळ.
In reply to माशांचे काटे दोन प्रकारे सहन by आनंदी गोपाळ
मस्तं आहे. वेगळीच पाककृती.
+१ वेगळीच पाकृ.छान आहे.
धन्यवाद...
अरे वा ! पाकृ तर छान च पण
सृजा, मी पहिल्यांदा खाल्ली
In reply to अरे वा ! पाकृ तर छान च पण by स्रुजा
क्या बात !
In reply to सृजा, मी पहिल्यांदा खाल्ली by नूतन सावंत
बेस्ट पाकृ
.
मस्त गं सुरंगीतै. प्रकार १
क्या बात है !
वोईच मय बी
In reply to क्या बात है ! by वेल्लाभट
याचे
In reply to वोईच मय बी by अत्रन्गि पाउस
उगा काहीतरीच,वेल्लाभट,अत्रंगी
In reply to याचे by नाखु
ओक्के ! धन्यवाद ...
In reply to उगा काहीतरीच,वेल्लाभट,अत्रंगी by नूतन सावंत
सुरेख सादरीकरण !
खूप छान..
अरे...
झक्कास.. असं काहीतरी खायला
शेवग्याच्या शेंगांची भजी ?
अरे वाह डाब्यांची भजी. एकदा