Skip to main content

होळीचे रंग

लेखक nashik chivda यांनी बुधवार, 23/03/2016 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, लिहण्याचा पहिल्यापासूनच कंटाळा असल्याने फ़क्त होळीचे रंग दाखवणारी छाया चित्रे प्रकाशित करीत आहे स्थळ - बरसाने, मथुरा कॅमेरा - निकोंन डी ७५० ५० मीमी आणि २४-१२० . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .

वाचने 8625
प्रतिक्रिया 37

प्रतिक्रिया

खल्लास एकदम समयोचित , रेफ्रेशींग धागा. सगळे फोटो अप्रतिम आलेत जियो

आनंद उडे, उडे रंग, रंग होळीचा... होळीच्या रंगात कुणी ना पाहिला अश्रू माझ्या डोळीचा! तो फोटो काळजाला हात घालणारा वाटला! :( Sandy

अरे, मस्त एकदम. मथुरेतली ही रंगपंचमी नेहमीच आकर्षण ठरत आली आहे, पण या ना त्या कारणाने काहीकेल्या जाणं झालं नाही. प्रत्येक क्षण टिपण्याची धडपड, धुळवडीचा धुराळा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, कॅमेरा सांभाळण्याचं कसब पणाला लावणं. धमाल एकदम.... धन्स... फोटो इथे डकवल्याबद्दल.. बादवे, कॅमेरा सर्विसिंगला किती खर्च आला?? :)

फोटो खूपच छान आले आहेत. एक स्वागतार्ह बदलः या वर्षी प्रथमच वृंदावनात रहाणार्‍या विधवांना प्राचीन गोपिनाथ मंदीरात होळी खेळण्यासाठी परवानगी देण्यात आली. सुलभ फाउंडेशनच्या श्री. बिंदेश्वर पाठक यांनी या साठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी चालवलेल्या विधवाश्रमात गेले काही वर्षे हा सोहळा चालू केला गेला होताच. पण आता त्याबाहेर गोपिनाथ मंदीराला पण सामावून घेतले. त्या निमित्ताने विधवांना वाळीत टाकणारी अमानुष प्रथेचे दहन झाले तर ते स्वागतार्ह असेल... Vrindava दुवा

लहान मुलीचा डोकावून पाहतानाचा, लहानग्याचा आणि दाढीवाल्या बाबांचा दिलखुलास हसतानाचे फोटो आवडले.

वाह, अप्रतिम फोटोज आहेत सर्वच. डोकावणार्‍या मुलीचा फोटो खूपच आवडला.

फोटो? ही सर्व तर सुरेख अशी तैलचित्रे वाटली. परत परत पाहावी अशी. नाशिकचिवडा चन्यवाद.