✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मेट्रो प्रवासात मनुस्मृति वर चर्चा - ब्राम्हण आणि शुद्र

व
विवेकपटाईत यांनी
Fri, 03/25/2016 - 11:01  ·  लेख
लेख
आपल्या देशातल्या एका मोठ्या प्रसिद्ध विश्वविद्यालय जेथून समाजात बदल घड्विनारे अनेक बुद्धिमंद तैयार होतात. तेथील विद्यार्थांनी मनुस्मृति जाळली. तेथे उपस्थित असलेल्या अधिकांश विद्यार्थांनी मनुस्मृति कधी वाचली हि नसेल. मनुस्मृति जाळण्याचे कारण काय बरे असेल. विद्यार्थांच्यामते शूद्रांचे शोषण करण्यासाठी ब्राह्मणांनी लिहिलेला ग्रंथ अश्यारीतीची काही त्रोटक माहितीच या ग्रंथा बाबत विद्यार्थांना असेल. कदाचित त्या वरून त्यांनी मनुस्मृति जाळण्यातचे ठरविले असेल किंवा कुणी आपल्या स्वार्थासाठी त्यांचा वापर केला असेल. जिथे मनुष्यच परिपूर्ण नाही तिथे मनुष्याने लिहिलेला कुठला हि ग्रंथ परिपूर्ण राहू शकत नाही. बाबासाहेबांनी लिहिलेल्या आपल्या संविधानात हि आपल्याला संशोधन करावेच लागतात. तसेच मनुस्मृति हि परिपूर्ण नाही. मनुस्मृति हा फार जुना ग्रन्थ आहे. बहुतेक श्रुति-स्मृतिच्या काळात मनुस्मृतिची रचना सुरु झाली असेल आणि गेल्या ३००-४०० वर्षांआधी पर्यंत होत राहिली असेल. अनेक सुलेखक आणि स्वत:ला न्याय आणि धर्मशास्त्रात पारंगत समजणार्यांनी यात आपले योगदान दिले असेल. काळाप्रमाणे अनेक नवीन विचारांना (चांगले आणि वाईट) मनुस्मृतित स्थान मिळाले असेल. तरीही इतर प्राचीन धर्मग्रन्थ आणि न्याय शास्त्रातील ग्रंथांकडे पाहिले तर मनुस्मृति ही उजवीच ठरेल. हा लेख लिहिण्याचे कारण असे, कालच कार्यालयातून घरी येताना मेट्रोत ३-४ तरुण विद्यार्थी भेटले. त्यांनी मला बसायला जागा हि दिली (दिल्लीत याला एडजष्ट करणे असे हि म्हणतात). मनुस्मृतिचा विषय निघाला ब्राह्मणांनी शूद्रांना छळण्यासाठी मनुस्मृतिची निर्मिती केली आहे, अशी या विद्यार्थांची धारणा. मी त्यांना विचारले तुम्ही मनुस्मृति वाचली आहे का? अपेक्षेप्रमाणे नाही हे उत्तर आले. पण त्यांना परमेश्वराने ब्राह्मण आणी शुद्र यांची निर्मिती कशी केली या बाबत थोडी माहिती होती. माहितीचा आधार ब्राह्मण द्वेष हाच होता. एका जवळ टेबलेट होती. मी त्याला मनुस्मृतिनुसार शुद्र आणि ब्राह्मण कोण याची माहिती काढायला सांगितली. मी हि माहिती सांगू शकत होतो. पण म्हणतात ना “हात कंगन को आरसी क्या, पढ़े लिखे को फारसी क्या”. मनुस्मृतितील अणि इतर ग्रंथातील काही मन्त्र अर्थांसकट त्याना सापडले. पुढील १५-१६ मिनिटे आमची यावर चर्चा झाली. आपल्या परीने त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. शूद्रो ब्राह्मणतामेति ब्राह्मणश्चैति शूद्रताम। क्षत्रियाज्जातमेवं तु विद्याद्वैश्यात्तथैव च। (10/65) महर्षि मनुच्या अनुसार कर्मानुसार व्यक्ती ब्राह्मण, क्षत्रिय वैश्य आणि शुद्र म्हणून ओळखला जातो. विद्या आणि योग्यततानुसार एका वर्णातला व्यक्ती दुसर्या वर्णात जातो. कर्मानुसार सत्यकाम जाबाली आणि विश्वामित्र ब्राह्मणत्वला प्राप्त झाले आणि इक्ष्वाकु वंशातला एक राजा कल्माषपाद वर्ण व्यवस्था बाहेर राक्षस म्हणून ओळखला गेला. पण हि वर्णव्यवस्था आली कुठून. यावर शोध घेताना त्या विद्यार्थांना हा मन्त्र सापडला. ब्राह्मणोंSस्य मुखमासीद् बाहू राजन्यः कृतः. ऊरु तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत. (यजुर्वेद: ३१/११) या मंत्रात परमात्म्याच्या मुखातून ब्राह्मण, बाहूतून क्षत्रिय, उरातून वैश्य आणि पायातून शुद्र यांची निर्मिती झाली आहे. ब्राह्मण मुखातून उत्पन्न झाला याचा अर्थ काय. जुन्याकाळात गुरुकुलात आचार्याच्या मुखातून निघालेली वाणी अर्थात प्रवचन ऐकून विध्यार्थी शिकायचे. अथाधिविद्यम. आचार्यःपूर्वरूपम. अंतेवास्युत्तर रूपम्. विद्या संधि:. प्रवचन संधानम. इत्यधिविद्यम्. (तैत्तिरीय उपनिषद ३/४) त्या काळी विद्वान आणि वेदशास्त्र संपन्न व्यक्तीला समाजात ब्राह्मणाचा दर्जा मिळायचा. आज हि आपण विद्वान माणसाचा समोर पंडित हि विरुदावली लावतोच. क्षत्रियाचा जन्म बाहूतून. ज्या व्यक्तीचे बाहू मजबूत असेल, तोच सुरक्षा देऊ शकतो. हे त्रिकाल सत्य आहे. आज हि मजबूत, स्वस्थ्य लोक सेन्यात किंवा इतर सुरक्षा दलात जातात. वैश्यचा जन्म जंघेतून झाला. ज्या माणसाच्या उरू अर्थात जंघा मजबूत असेल तो अविरत मेहनत करू शकतो. असा व्यक्ती थोडे बहुत पारंपारिक ज्ञान असेल तर शेतीबाडी, पशुपालन, व्यापार, उद्योग धंधा उत्तम रीतीने करू शकतो. अश्या व्यक्तींना वैश्य म्हणून संबोधित केले आहे. शुद्र हा परमेश्वराच्या पायातून उत्पन्न झाला. ज्ञानहीन आणि शक्तिहीन व्यक्ती ही दुसर्यांची सेवा करून पोट भरू शकतो. सरकार दरबारातील चपरासी, दरबान किंवा जुन्या काळात राज दरबारातील सेवक, साफ सफाई, झाडू-पोंछा, इतर घरगुती अणि छोटे मोटे कामे करणार्यांना शुद्र म्हणून संबोधित केले आहे. आपण मंदिरात परमेश्वराच्या पायांवर डोके ठेवतो. कारण परमेश्वर आपली सेवा करून आपले दुःख दूर करतो. त्याचाच चरणांपासून उत्पन्न झालेले, आपली सेवा करणारे (शुद्र) मग ते कुठल्या ही जातीचे का असेना. श्रेष्ठच आहेत. मनुस्मृतितल्या या मंत्रानुसार जन्मापासून कुणीच शुद्र किंवा ब्राह्मण नाही आहे. कर्मानुसारच माणसाची जात ठरते. हे सर्व मनुस्मृतित लिहिले आहे, या वर त्यांचा विश्वास बसायला वेळ लागला. पण गुगल गुरु खोटे बोलत नाही यावर त्यांचा विश्वास होता. शिवाय हे मंत्र त्यांनीच शोधलेले होते. प. जनकपुरीच्या मेट्रो स्टेशन वर ते सर्व उतरले. उतरताना त्यातला एकाने म्हंटले, अंकल अभी तक हमें टीवी से ही अपने धर्म के बारे में आधी अधूरी थोड़ी बहुत जानकारी थी. कभी भी हमने अपने धर्मग्रंथो को नहीं पढ़ा. पर अब एकबार मनुस्मृति पढ़कर जरुर देखूंगा. मी हि हसून त्यांना धन्यवाद दिला. निश्चितच आजपासून आपल्या पुरातन पुस्तकांबाबत त्यांची धारणा थोडी तरी बदलली असेलच.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
27205 वाचन

💬 प्रतिसाद (115)

प्रतिक्रिया

मनुस्मृतीबाबत माझं काहीसं

प्रचेतस
Fri, 03/25/2016 - 11:19 नवीन
मनुस्मृतीबाबत माझं काहीसं तुमच्यासारखंच मत होतं. पण जेव्हा कुरुंदकरांचं मनुस्मृती वाचलं तेव्हा त्यातले उघडेनागडे सत्य कळून आले व मनुस्मृतीबाबत माझं मत अत्यंत प्रतिकूल बनलं.
  • Log in or register to post comments

सम्पूर्ण सहमत!

अत्रुप्त आत्मा
Fri, 03/25/2016 - 13:51 नवीन
सम्पूर्ण सहमत! ज्याला ज्याला मनुस्मृती हा काय प्र'ताप आहे,हे खरच समजून घ्यायचं असेल त्याने त्याने कुरुंदकर लिखित सदर पुस्तक अभ्यासलच पाहिजे. @मनुस्मृतितल्या या मंत्रानुसार जन्मापासून कुणीच शुद्र किंवा ब्राह्मण नाही आहे. कर्मानुसारच माणसाची जात ठरते. >>> पण ते कर्म काय असावे!? ,हे मात्र मनुस्मृतीतील टनाटनी मतांनुसारच ठरते. एक दोन उदा.अपवादात्मक असली तरी! कारण तस तर पाकिस्तातही हिंदू मंदिरे आणि थोडे हिंदू शिल्लक ठेवलेले आहेत. (अजून!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मनुस्मृती ही एक चांगली पंचिंग

प्रकाश घाटपांडे
Fri, 03/25/2016 - 12:02 नवीन
मनुस्मृती ही एक चांगली पंचिंग बॆग आहे.मनुवादी मनुवादी असे म्हणून पंच करताना चांगला व्यायाम होतो. हे खेळणे काढून घेतले तर नवीन पर्याय काय? तळागाळात काम करणारे एक राजकीय नेते पानसरेंना आदरांजली देण्याच्या कार्यक्रमात असे म्हणाले होते की रस्त्यावर जाणार्‍या येणार्‍या सर्वसान्मान्य माणसांना विचारा बर तुला मनुस्मृती माहित आहे का? आणि आज तू जे व्यवहारात वागतो ते मनुस्मृतीत सांगितले आहे म्हणून वागतोस का? हे नेते कॉंग्रेसचे होते. त्या अगोदर बी जी कोळसे पाटील बोलले होते व त्यात मनुवादी मनुवादी असे म्हणून इतरांना झोडपत होते. त्याला हा टोला होता. खर तर एक प्राचीन साहित्य म्हणुन फार फार तर त्याकडे पहावे.
  • Log in or register to post comments

खर तर एक प्राचीन साहित्य

नाना स्कॉच
Fri, 03/25/2016 - 12:19 नवीन
खर तर एक प्राचीन साहित्य म्हणुन फार फार तर त्याकडे पहावे. +1234567890
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 03/25/2016 - 13:19 नवीन
सहमत. काय शोषण केलं, काय अन्याय केला, कशी विषमता होती हे सर्व चिड येण्यासारखा असलं तरी त्याचाही आता कंटाळा यायला लागला आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

ह्या थर्डक्लास पोथीच्या ××××.

एस
Fri, 03/25/2016 - 12:14 नवीन
ह्या थर्डक्लास पोथीच्या ××××....
  • Log in or register to post comments

देवदत्त पटनाईक यांचे मत

गॅरी शोमन
Fri, 03/25/2016 - 12:27 नवीन
मी मुळ लेखकाच्या मताशी सहमत आहे की " जिथे मनुष्यच परिपूर्ण नाही तिथे मनुष्याने लिहिलेला कुठला हि ग्रंथ परिपूर्ण राहू शकत नाही. " हिंदु तत्वज्ञान वेद, पुराणे , श्रूती आणि स्मृती यातुन येते. जसे जे वेदोक्त नाही परंतु कुणाचे तरी एखाद्या श्लोकावरचे इंटरप्रिटेशन आहे जे स्मृती सदरात मोडते. पुढे हे सर्व विचार मनुच्या काळात संपादीत झाले असतील म्हणुन मनुस्मृती झाली असेल. देवदत्त पटनाईक हे उडीया भाषेत लेखन करतात. मराठीतही बोलतात. मध्यंतर बहुदा ग्रेट भेट मध्ये ते म्हणाले की हे सर्व पौराणीक लेखन ही प्रश्नपत्रिका मानुन आपण उत्तरे शोधावीत. अनेक गोष्टी हिंदुंना पवित्र अश्या ग्रंथात प्रतिपादीत आहेत म्हणुन काय सर्वच गोष्टींचे व्यवहारात पालन हिंदु करतील असे नाही. उदा. रामायणात राम एकपत्नीव्रताचे पालन कर्ता होते. हा आदर्श मानुन सर्वच हिंदु धर्मपालन म्हणुन ते करतील असे नाही. ( आता कायद्याने बंदी आली आहे हा भाग सोडला तरी ) महाभारतात बहु पतित्व होते जे परत अपवादाने सुध्दा कोणत्याही कथेत दिसत नाही कारण ते अव्यवहार्य किंवा त्यावेळेस अपरिहार्य असेल. याच धर्तीवर राजनखान यांनी एका दिवाळी अंकात अश्या प्रकारची कथा लिहली आहे. ज्यात पंचायत अपवादात्मक म्हणुन दोन पुरुषांना एका स्त्री बरोबर संसाराची अनुमती देते. सबब, जे व्यवहार्य नाही ते घेतले जात नाही. ब्राह्मणांनी शूद्रांना छळण्यासाठी मनुस्मृतिची निर्मिती केली आहे, अशी या विद्यार्थांची धारणा. आता फक्त विरोध दर्शविण्यासाठी चर्चीली जाते. 'चातुर्वर्ण्यमयासृष्टं गुणकर्म विभागशः'. अर्थात गुण-कर्मों के अनुसार चारों वर्ण मेरे द्वारा ही बनाये गये हैं। स्पष्ट है कि वर्ण जन्म पर आधारित नहीं था। हे वचन गीतेत आहे. यावरुनही असा वर्ण बदलाचे स्वातंत्र्य होते असा अर्थ प्रकट होतो. यावर मुळ घागा लेखकाने उदाहरणे दिली आहेत ज्यात वर्ण बदल संभव झाला आहे हे अधोरेखीत होते. चाणाक्याने ज्याला गादीवर बसवले आणि पुढे त्याचा महांमंत्री म्हणुन कार्य केले तो राजा सुध्दा क्षत्रीय नव्हता. सबब, आज तर कायद्याने जातीय उल्लेखाला मान्यता नसताना असे वाद निर्माण करणे म्हणजे केवळ समाजात भ्रम निर्माण करायचा असे सुत्र आहे. जातीभेदामुळे जर स्वातंत्र्यपुर्व काळात समाजाची अधोगती झाली असे मान्य केले तर असे वाद आता ही तेच करत आहेत असेच म्हणावे लागेल.
  • Log in or register to post comments

+११२२२२२२२११३३

DEADPOOL
Fri, 03/25/2016 - 12:43 नवीन
+११२२२२२२२११३३
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी शोमन

एवढे ऐकून घेणारे आणि चर्चा

अत्रे
Fri, 03/25/2016 - 13:08 नवीन
एवढे ऐकून घेणारे आणि चर्चा करणारे तरुण मिळाले, ही खूपच चांगली गोष्ट आहे!
  • Log in or register to post comments

नुकतेच डॉ. इंदुभूषण बडे

सतिश गावडे
Fri, 03/25/2016 - 13:11 नवीन
नुकतेच डॉ. इंदुभूषण बडे संपादीत "मनुस्मृति" वाचायला सुरुवात केली आहे. त्यातील प्रस्तावनेनुसार मनु हा ब्राम्हण नसून राजा होता. आणि मनुस्मृति ही तत्कालीन धर्मशास्त्र होते. पहील्या अध्यायात सृष्टीची निर्मिती कशी झाली याचे विवेचन आहे. जे आपल्या आकलनापलिकडचे आहे ते प्रिहिस्टोरीक माणूस कल्पना करुन कसे समजून घेण्याचा प्रयत्न करत असे याचा उत्तम नमुना म्हणजे ही मनुस्मृतिच्या पहील्या अध्यायातील विश्वनिर्मितीची कथा. जर वर्णव्यवस्था गुण आणि कर्मावर आधारीत होती तर माशी कधी आणि कुठे शिंकली ज्यामुळे गुणकर्माधारीत वर्णव्यवस्था जन्माधारीत झाली? या जन्माधारीत वर्णव्यवस्थेला कर्मविपाकाच्या सिद्धांताचे बळ देऊन तिला बळकट कुणी केली?
  • Log in or register to post comments

कुरुंदकरांच्या मनुसमृतीत

प्रचेतस
Fri, 03/25/2016 - 13:20 नवीन
कुरुंदकरांच्या मनुसमृतीत ह्याची सगळी उत्तरे मिळतील. मला आठवते त्याप्रमाणे आपणाकडे देखील हे पुस्तक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

होय. आठवले. मी तसेच ठेऊन दिले

सतिश गावडे
Fri, 03/25/2016 - 13:31 नवीन
होय. आठवले. मी तसेच ठेऊन दिले आहे घेतल्यानंतर. आता मनुस्मृति वाचून झाली की वाचेन ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मी काय म्हणतो प्रचेतसभौ

बोका-ए-आझम
Sun, 03/27/2016 - 10:51 नवीन
कुरुंदकर विद्वान होतेच पण त्यांचं प्रत्येकच म्हणणं बरोबर असेल किंवा त्यांच्या पुस्तकात सगळ्याची उत्तरं मिळतील असं म्हणणं हे कितपत बरोबर आहे? शेवटी तेही माणूसच होते. त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं सर्व काही शंभर टक्के factual तर असू शकत नाही. शिवाय कुरुंदकर मार्क्सवादी होते.हा ideological bias कुठेतरी मनुस्मृतीवर लिहिताना आला असणारच. त्यामुळे त्यांनी लिहिलंय, मान्य. चांगलं लिहिलंय, हेही मान्य पण त्यातून सगळ्याची उत्तरं मिळतील असं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

बोकाशेठ +१११११११११११११

DEADPOOL
Sun, 03/27/2016 - 10:58 नवीन
बोकाशेठ +१११११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

खिक्क...

भाऊंचे भाऊ
Sun, 03/27/2016 - 11:09 नवीन
श्रीकृष्ण होतेच पण त्यांचं प्रत्येकच म्हणणं बरोबर असेल किंवा गीतेत सगळ्याची उत्तरं मिळतील असं म्हणणं हे कितपत बरोबर आहे? शेवटी तेही माणूसच जन्मात होते. त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं सर्व काही शंभर टक्के factual तर असू शकत नाही. शिवाय ते हिंदू होते.हा ideological bias कुठेतरी गीता सांगाताना आला असणारच. त्यामुळे त्यांनी लिहिलंय, मान्य. चांगलं लिहिलंय, हेही मान्य पण त्यातून सगळ्याची उत्तरं मिळतील असं नाही. म्हनुनच गीता सर्व प्रश्नांची उत्तरे देत नाही इतकच काय हां आयडी ओलोजिकल बियास त्या हिन्दू ब्रम्हवाणिलाही लागू होतो ज्यातून मस्म्रू आकाराला आली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

कुरुंदकर डाव्या विचारांचे

प्रचेतस
Sun, 03/27/2016 - 12:22 नवीन
कुरुंदकर डाव्या विचारांचे होतेच यात वाद नाही शिवाय त्यांचं सगळं बरोबर असेल असंही नाही मात्र ते एक बुद्धीवादी विचारवंत होते ह्यात कसलाच संशय नाही. डावे किंवा मार्क्सवादी इस्लामविषयी बोलताना बिचकतात किंवा त्यांचा टिकात्मक भर हा प्रामुख्याने हिंदू धर्मावर असतो मात्र कुरुंदकरांनी इस्लामवरही तितक्याच निर्भिडतेने आपली मते मांडली आहेत. मात्र तुम्ही हे पुस्तक आवर्जून वाचाच. ह्यात अगदी १००% नाही पण बऱ्याच प्रश्नांची उत्तरे निश्चित मिळतील असे ठामपणे म्हणावेसे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

+१

बोका-ए-आझम
Sun, 03/27/2016 - 12:50 नवीन
जरुर वाचेन. सांगितल्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

↓

चेक आणि मेट
Fri, 03/25/2016 - 13:19 नवीन
मनुस्मृतीमध्ये चांगल्या गोष्टी आहेत,पण ठराविक वाईट गोष्टींमुळे त्या पूर्ण ग्रंथाला काहीच किंमत राहत नाही. मनुस्मृती म्हणजे संविधान नव्हे,जाळणार्यांना जाळू देत. त्यामुळे मनुस्मृतीचे उदात्तीकरण व्यर्थ आहे.
  • Log in or register to post comments

// मी त्यांना विचारले तुम्ही

जयंत कुलकर्णी
Fri, 03/25/2016 - 13:37 नवीन
// मी त्यांना विचारले तुम्ही मनुस्मृति वाचली आहे का? अपेक्षेप्रमाणे नाही हे उत्तर आल///// हेच हिंदू धर्माचे वैशिषठ्य असावे बहुदा.... कालबाह्य्य गोष्टींना (किंबहुना ज्याने काही अडत नाही अशा) येथे फाट्यावर मारले जाते.... हा धर्म फार म्हणजे फारच डायनॅमिक असावा...
  • Log in or register to post comments

>>मनुस्मृतीमध्ये चांगल्या

सतिश गावडे
Fri, 03/25/2016 - 13:37 नवीन
>>मनुस्मृतीमध्ये चांगल्या गोष्टी आहेत,पण ठराविक वाईट गोष्टींमुळे त्या पूर्ण ग्रंथाला काहीच किंमत राहत नाही. थोडेसे अवांतर*: हिटलरचे उदात्तीकरण करणारी पुस्तके पाहीली की मलाही हेच वाटते. त्याचे देशप्रेम कितीही उदात्त असले तरीही त्याने माणुसकीला कालीमा फासला या अपराधापुढे त्याचे हे देशप्रेम कवडीमोलाचे आहे. *खरं तर हा मुद्दा अवांतर नाही. हिटलरचा वंशाचा अभिमान हे वर्णप्रेमाचेच एक रुप आहे.
  • Log in or register to post comments

+1111

नाना स्कॉच
Fri, 03/25/2016 - 13:40 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

भल्यामोठ्या ग्रंथातुन 2 चार

नाना स्कॉच
Fri, 03/25/2016 - 13:42 नवीन
भल्यामोठ्या ग्रंथातुन 2 चार सोइस्कर दाखले काढून त्यावर रचलेला धागा! असो
  • Log in or register to post comments

लेखकाचे बरेच मुद्दे

उगा काहितरीच
Fri, 03/25/2016 - 13:53 नवीन
लेखकाचे बरेच मुद्दे पटण्याजोगे आहेत. वाचूनच न पहाता उगाच टीका करावी हे बरोबर नाहीच. पण माझ्या मते मनुस्मृती हा ग्रंथ आजच्या काळात जवळजवळ आऊटडेटेड झालाय. त्यात सांगितल्याप्रमाणे वागणे , शिक्षा देणे , सामाजिक व्यवहार करणे हे आजच्या काळाला सुसंगत असेलच असे नाही. त्यामुळे विनाकारण त्या ग्रंथाची जाळपोळ करणे वा त्या ग्रंथाचा उदोउदो करणे दोन्हीही गोष्टी व्यर्थ आहेत. हं याचा अर्थ असा नाही हा ग्रंथ टाकाऊच आहे. त्याकाळातील जीवन , समाज वगैरे गोष्टींचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकासाठी कदाचित उपयुक्त असेलही तो ग्रंथ .
  • Log in or register to post comments

सहमत आहे.

सतिश गावडे
Fri, 03/25/2016 - 14:03 नवीन
सहमत आहे. आजच्या घडीला मनुस्मृतीचे उदात्तीकरण किंवा तिची प्रत जाळणे या दोन्ही बाबी खुळचटपणा ठरेल. मात्र जरी हा ग्रंथ कालबाह्य झाला असला तरीही समाजशास्त्राच्या अभ्यासकांसाठी हा एक उत्तम दस्तऐवज ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

मनुस्म्रूती जाळणे हे

मितभाषी
Fri, 03/25/2016 - 14:40 नवीन
मनुस्म्रूती जाळणे हे प्रतिकात्मक आहे. भटी गाॅडबंगालीला दिलेले आव्हान आहे. बाकी मनुस्म्रूती व संविधान यांची तुलना पाहून वारल्या गेलो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

का बरे वारल्या गेला ?

भाऊंचे भाऊ
Fri, 03/25/2016 - 16:55 नवीन
त्यापूर्वी चुकांची शिक्षा राजाची मर्जी ठरवत असे अथवा मेल्यानंतर स्वर्ग अथवा नरक भोग.... आणि या दोन्ही बाबी शिक्षेची ठोस खात्री देत नाहीत त्यापेक्षा एखादे पुस्तक जे लिखित स्वरूपात अमुक चुकीला अमुक शिक्षा ते सुध्दा याच जन्मी अन याच देहिअसे सुस्पष्टपणे सांगते तेंव्हा ती जगातली पहिली राज्यघटना ठरायला काय अडचण आहे ? अर्थात म्हणून मनुस्मृती ही तिरस्करणीय नाही असे मी चुकुनही ठरवणार नाही. जे चुक अन त्याज्य ते चुक अन त्याज्यच यात मात्र दुमत। नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी

मनुस्मृती अन्यायकारक होती हा

सतिश गावडे
Sun, 03/27/2016 - 14:25 नवीन
मनुस्मृती अन्यायकारक होती हा मुद्दा बाजूला ठेवला तर तो ग्रंथ तत्कालिन "घटना" होती.
मनुस्म्रूती जाळणे हे प्रतिकात्मक आहे.
बाबासाहेबांनी ज्या काळात मनुस्मृती जाळली त्या काळी त्या प्रतिकात्मक दहनाला अर्थ होता. कारण तेव्हा अन्यायकारक नियम असणारी मनुस्मृती ही "घटना" म्हणून वापरली जात होती. आज स्वतंत्र भारताचे संविधान अस्तित्वात असताना आणि देश या संविधानानुसार चालत असताना मनुस्मृती जाळण्याला काहीच अर्थ नाही. आजच्या घडीला मनुस्मृती हा एक कालबाह्य संस्कृत श्लोकसंग्रह आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी

मनुस्मृतीचे कॉपीराईट फ्री

माहितगार
Fri, 03/25/2016 - 14:06 नवीन
मनुस्मृतीचे कॉपीराईट फ्री असलेले मराठी अनुवाद आंजावर उपलब्ध आहेत का ?
  • Log in or register to post comments

आजच्या आपल्या संविधानावर

विवेकपटाईत
Fri, 03/25/2016 - 17:01 नवीन
आजच्या आपल्या संविधानावर आधारित न्याय व्यवस्थेत हि आपण काही स्त्रियांना न्याय देऊ शकत नाही. (वोट बँक मजबुरी ही). असो. हे २१व्या शताब्दीत शिकलेल्या लोकांना जमत नाही. विचार करा ५०० वर्ष आधीची परिस्थिती काय असेल. सनातन धर्माच्या धुर विरोधी, आर्यसमाज प्रवर्तक स्वामी दयानंद सरस्वती यांनी सुद्धा सत्यार्थ प्रकाश मध्ये मनुस्मृतीतील काही चांगल्या बाबींना मान्यता दिली आहे. बाकी आपण भाजी-पाला बाजारातून आणतो, तो हि स्वच्छ करून धुऊन, शिजवून खातो. बाकी जुन्या ग्रंथांच्या बाबतीत दुसर्याच्या चष्म्यातून नव्हे तर स्वत:च्या डोळ्यांनी आणि डोक्यानी विचार करून आपले विचार ठरविले पाहिजे. जे लोक मनुस्मृति जाळतात, त्यांना त्या पेक्षा कितीतरी खालच्या दर्जाचे न्यायिक ग्रंथ आहेत. JNU वाले त्या वर चूप राहतात. हाच ढोंगी पणा. आदर करायचा आहे तर सर्व ग्रंथांचा करा,. एकाचाच विरोध का. हाही प्रश्न आहेच.
  • Log in or register to post comments

महाराज रुपेरी किनार

भाऊंचे भाऊ
Fri, 03/25/2016 - 17:05 नवीन
कितीही देखणी असली तर ढग काळाच असतो तर त्याला काळाच म्हननार ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

अन मुळात करमा धारित वरण व्यवस्थाही थोतांडच

भाऊंचे भाऊ
Fri, 03/25/2016 - 17:09 नवीन
कारण कर्म विचारांवर अन विचार भोवतालची परिस्थिति अन पाजलेल्या उपदेश डोसानवर अवलंबून असतात परिणमी यातली एकही गोष्ट मनुक्षाचा वरन ठरवायला पुरेसी नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ

समानतेची मंजील अभी बाकी है

माहितगार
Fri, 03/25/2016 - 17:37 नवीन
जे लोक मनुस्मृति जाळतात, त्यांना त्या पेक्षा कितीतरी खालच्या दर्जाचे न्यायिक ग्रंथ आहेत. JNU वाले त्या वर चूप राहतात. हाच ढोंगी पणा. आदर करायचा आहे तर सर्व ग्रंथांचा करा,. एकाचाच विरोध का. हाही प्रश्न आहेच.
पटाईतजी, १) एका चुकीने दुसर्‍या चुकीचे समर्थन होत नाही. एकांगी टिकांचा मी समर्थक नाही पण तुम्हालाही दुसर्‍या ग्रंथांवर अभ्यासपुर्ण टिका करण्यास कुणी आडवलेले नाही. (जिथपर्यंत माझ्या वाचनात आले विद्यार्थ्यांनी आख्ख्या ग्रंथाला जाळलेले नाही तर केवळ आक्षेप असलेल्या पृष्ठांना जाळलेले असावे चुभूदेघे) २) विषमता आणि अंधश्रद्धांमधील अघोरी भाग या नि:संशय नाकारल्या गेल्या पाहीजेत. दुसर्‍यांकडे बोट दाखवण्यात अर्थ नाही इट इज टाईम टू चेंज. उदाहरणार्थ हि पोप फ्रांसीस मधील बदलाची ताजी बातमी पहा. (कदाचित दिखाऊ असेल पण बदलाचा संदेश देण्याची तयारी आहे.) अलिकडे मध्य प्रदेशात काँग्रेस संघ कार्यालयावर तिरंगा फडकवण्यासाठी गेली संघ कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्वागत करुन स्वतःच्या कार्यालयावर भगव्या सोबत तिरंगा लावून काँग्रेस सोबत ध्वज वंदनात सहभाग घेतला. तुम्ही म्हणताय तसे तुम्ही खरेच मनुस्मृतीचा अभ्यास केला असेल तर त्यातील विषमतेचाही किमान निषेध करण्यास मागे पुढे पहाण्याचे काय कारण आहे ? एकदा चुकले ते चुकले म्हणून मग त्यात हे चांगले सुद्धा आहे म्हणून सांगा आणि मनाचा मोठेपणा दाखवा ना जरा. भारतात आ.ह. साळुंखे अद्याप शंकराचार्यांशी शास्त्रार्थाच्या संधीची वाट पहात आहेत. शंकराचार्यांच्या पुढील पिढीत आ.ह.साळूंखे सारखे ब्राह्मणेतर शंकराचार्यपदावर पोहोचतील तेव्हा भारतातील जातीयवाद संपण्याची खरी सुरवात झालेली असेल. बरेच काही सकारात्मक बदल झाले आहेत पण समानतेची मंजील अभी बाकी है.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

ह्याबद्दल

अनिरुद्ध.वैद्य
Sun, 03/27/2016 - 13:01 नवीन
अधिक वाचावयास आवडेल: जे लोक मनुस्मृति जाळतात, त्यांना त्या पेक्षा कितीतरी खालच्या दर्जाचे न्यायिक ग्रंथ आहेत. काही संदर्भ\लेख आदींचे दुवे दिल्यास आभारी. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

जेएनयु वाल्यांच्या पोथ्या

आनन्दा
Sun, 03/27/2016 - 13:38 नवीन
जेएनयु वाल्यांच्या पोथ्या तपासा म्हणजे मिळतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

हरकत नाही,

नाना स्कॉच
Sun, 03/27/2016 - 13:46 नवीन
हरकत नाही, अगोदर, जनेवि अन न्याय विषयक साहित्य ह्याचा अर्थाअर्थी संबंध काय ते जरा उलगडुन सांगू शकाल का आनंदा भाऊ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

मी उघडपणे नाव घेऊ इच्छित नाही

आनन्दा
Sun, 03/27/2016 - 18:02 नवीन
मी उघडपणे नाव घेऊ इच्छित नाही, पण दगडाने ठेचून मारणे, सार्वजनिक ठिकाणी सुळावर चढवणे, किंवा इन्क्विझिशन, किंवा एखाद्याला देशद्रोही ठरवून त्याला सैबेरियात पाठवणे वगैरे शिक्षा सांगणारे ग्रन्थ, असे मला इन जनरल म्हणायचे आहे. जनेवि मध्ये आजपर्यंत अश्या ग्रंथांचे दहन झाल्याचे ऐकण्यात नाही, तेव्हा ते त्यांना न्याय ग्रंथ म्हणून मान्य असावेत असे वाटते. अवांतर - मनुस्मृतीमध्ये अश्या प्रकारच्या शिक्षा नाहीतच असे नाही, किंबहुना यापेक्षा भयंकर शिक्षा आहेत (उदा. कानात उकळते तेल ओतणे वगैरे) पण म्हणूनच ती आजच्या काळाच्या कसोटीवर टिकत नाही. पण या आधारावर मनुस्मृती जाळणारे याच आधारावर समान नागरी कायद्याचा पुरस्कार करतील काय? (करत असतील तर मी माझे शब्द मागे घेतो)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

माझा यशवंत मनोहरांचा दुवा

माहितगार
Fri, 03/25/2016 - 17:16 नवीन
माझा यशवंत मनोहरांचा दुवा देणारा एक प्रतिसाद प्रकाशित झाला नाही का उडाला, काय झाले ? प्रश्नांकीत झालेला माहितगार
  • Log in or register to post comments

उडाला नाय

पैसा
Fri, 03/25/2016 - 17:40 नवीन
उडाला नाय. फांदीवर बसलाच नाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

धन्यवाद. यशवंत मनोहरांच्या

माहितगार
Sat, 03/26/2016 - 13:47 नवीन
धन्यवाद. यशवंत मनोहरांच्या पुस्तिकेचा हा ऑनलाईन उपलब्ध दुवा केवळ संदर्भासाठी म्हणून देण्याचा प्रयत्न कालच्या एका प्रतिसादाच्या वेळी केला समहाऊ प्रकाशित होऊ शकला नव्हता. मे बी आंतरजाल जोडणीतली गडबड असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

सहमत

hmangeshrao
Fri, 03/25/2016 - 18:38 नवीन
मनुस्मृती पूर्ण वाचल्याखेरीज त्यावर टीका करु नये. ... इस्लाम , औरंगजेब यावर टीका करणारे संबंधित समग्र वांगमय वाचून टीका करतात की काय ? ..... लिहायचे तेही अगम्य कोड ल्यांग्वेजात . ती भाषाच मुळात इतराना शिकु द्यायची नाही. थोडंफार समजुन अनुभवुन विरोध करणार्‍याला बोलायचं की तू मूळ पुस्तक समग्र वाचले आहेस का ? त्याने हो म्हणुन ठासुन सांगितलेच तर बोलायचे की तू वाचलेस ते प्रक्षिप्त आहे . ओरिजिनल नाही. ....
  • Log in or register to post comments

औरंगजेब यावर टीका करणारे

DEADPOOL
Fri, 03/25/2016 - 19:54 नवीन
औरंगजेब यावर टीका करणारे संबंधित समग्र वांगमय वाचून टीका करतात की काय ?>>>>>>>> नवा अवतार चाणाक्ष मंडळींच्या लक्षात आला असेलच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hmangeshrao

अग्गोबै !

hmangeshrao
Fri, 03/25/2016 - 20:39 नवीन
उदाहरण म्हणुन ते लिहिले होते . त्या नावानी मिर्च्या झोंबत असतील तर गांधी नेहरु / रेखा अमिताभ / मोदी हेडली / हिटलर साने गुरुजी / मंगळ व कृष्णविवर / भुमिती व युक्लिड ...... अषी कोणतीही एक दोन किंवा जास्त नावे त्या वाक्यात टाकू शकता .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DEADPOOL

@त्याने हो म्हणुन ठासुन

अत्रुप्त आत्मा
Fri, 03/25/2016 - 20:10 नवीन
@त्याने हो म्हणुन ठासुन सांगितलेच तर बोलायचे की तू वाचलेस ते प्रक्षिप्त आहे . ओरिजिनल नाही. >> अगदी असाच अनुभव मला कुराणा'बाबत तीन चारदा आलेला आहे. एकदा माझ्या एका क्लाएंटकडे आलेल्या मौलवीकडून. दुसऱ्यांदा माझ्या भावाच्या मित्राकडून. तिस्यरंदा पूना कॉलेजात एक इस्लामविषयक भाषण देणाय्रा एका वकत्याकडून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hmangeshrao

मोगाखान, तुम्ही लिहा ना शुद्ध

तर्राट जोकर
Fri, 03/25/2016 - 20:13 नवीन
मोगाखान, तुम्ही लिहा ना शुद्ध मराठीत इथे मिपावर. सग्ळ्यांना वाचता येईल आणी समजेल. कुराण हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hmangeshrao

हमकू वो पढने लिखने की जरुरत नै !

hmangeshrao
Fri, 03/25/2016 - 20:48 नवीन
कल बेगम ने शिरा नैवेद्य दिखाया ... गुरुवार दत्तगुरु को. बाकी छे दिन खुदा के ! शिरा और शीरखुर्मा चखने को तुमको गीता कुरान की जरुरत लगती है क्या ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

गीता कुरान की जरुरत शिरा और

तर्राट जोकर
Fri, 03/25/2016 - 21:05 नवीन
गीता कुरान की जरुरत शिरा और शिरखुर्मा के लिये नही, लडने झगडने के लिये लगती है.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hmangeshrao

hmangeshrao,

खालीमुंडी पाताळधुंडी
Fri, 03/25/2016 - 21:20 नवीन
hmangeshrao, अगर सच्चा मुस्सलमान बनना चाहते हो,तो पहले खतना करके आवो, अगर किया है तो रहने दो,हम सबूत नही पूछेंगे| सलाम आलेकुम | | | गोल मुंडी टोपी गुंडी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hmangeshrao

साहेब

सुबोध खरे
Sat, 03/26/2016 - 11:04 नवीन
साहेब तुम्ही त्या मोगा खान च्या नादाला कशाला लागतांय? ते भारतात राहून पूर्वेकडे तोंड करून नमाज पढतात आणी पश्चिमे कडे तोंड करून सकाळी सूर्याची पूजा करतात. सोडून द्या झालं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी

ते भारतात राहून पूर्वेकडे

आनन्दा
Sat, 03/26/2016 - 12:49 नवीन
ते भारतात राहून पूर्वेकडे तोंड करून नमाज पढतात आणी पश्चिमे कडे तोंड करून सकाळी सूर्याची पूजा करतात.
१ लंबर.. जाम हसलो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हसून हसून बेजार झालो

काळा पहाड
Sun, 03/27/2016 - 00:46 नवीन
हसून हसून बेजार झालो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा