Skip to main content

मेट्रो प्रवासात मनुस्मृति वर चर्चा - ब्राम्हण आणि शुद्र

लेखक विवेकपटाईत यांनी शुक्रवार, 25/03/2016 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या देशातल्या एका मोठ्या प्रसिद्ध विश्वविद्यालय जेथून समाजात बदल घड्विनारे अनेक बुद्धिमंद तैयार होतात. तेथील विद्यार्थांनी मनुस्मृति जाळली. तेथे उपस्थित असलेल्या अधिकांश विद्यार्थांनी मनुस्मृति कधी वाचली हि नसेल. मनुस्मृति जाळण्याचे कारण काय बरे असेल. विद्यार्थांच्यामते शूद्रांचे शोषण करण्यासाठी ब्राह्मणांनी लिहिलेला ग्रंथ अश्यारीतीची काही त्रोटक माहितीच या ग्रंथा बाबत विद्यार्थांना असेल. कदाचित त्या वरून त्यांनी मनुस्मृति जाळण्यातचे ठरविले असेल किंवा कुणी आपल्या स्वार्थासाठी त्यांचा वापर केला असेल. जिथे मनुष्यच परिपूर्ण नाही तिथे मनुष्याने लिहिलेला कुठला हि ग्रंथ परिपूर्ण राहू शकत नाही. बाबासाहेबांनी लिहिलेल्या आपल्या संविधानात हि आपल्याला संशोधन करावेच लागतात. तसेच मनुस्मृति हि परिपूर्ण नाही. मनुस्मृति हा फार जुना ग्रन्थ आहे. बहुतेक श्रुति-स्मृतिच्या काळात मनुस्मृतिची रचना सुरु झाली असेल आणि गेल्या ३००-४०० वर्षांआधी पर्यंत होत राहिली असेल. अनेक सुलेखक आणि स्वत:ला न्याय आणि धर्मशास्त्रात पारंगत समजणार्यांनी यात आपले योगदान दिले असेल. काळाप्रमाणे अनेक नवीन विचारांना (चांगले आणि वाईट) मनुस्मृतित स्थान मिळाले असेल. तरीही इतर प्राचीन धर्मग्रन्थ आणि न्याय शास्त्रातील ग्रंथांकडे पाहिले तर मनुस्मृति ही उजवीच ठरेल. हा लेख लिहिण्याचे कारण असे, कालच कार्यालयातून घरी येताना मेट्रोत ३-४ तरुण विद्यार्थी भेटले. त्यांनी मला बसायला जागा हि दिली (दिल्लीत याला एडजष्ट करणे असे हि म्हणतात). मनुस्मृतिचा विषय निघाला ब्राह्मणांनी शूद्रांना छळण्यासाठी मनुस्मृतिची निर्मिती केली आहे, अशी या विद्यार्थांची धारणा. मी त्यांना विचारले तुम्ही मनुस्मृति वाचली आहे का? अपेक्षेप्रमाणे नाही हे उत्तर आले. पण त्यांना परमेश्वराने ब्राह्मण आणी शुद्र यांची निर्मिती कशी केली या बाबत थोडी माहिती होती. माहितीचा आधार ब्राह्मण द्वेष हाच होता. एका जवळ टेबलेट होती. मी त्याला मनुस्मृतिनुसार शुद्र आणि ब्राह्मण कोण याची माहिती काढायला सांगितली. मी हि माहिती सांगू शकत होतो. पण म्हणतात ना “हात कंगन को आरसी क्या, पढ़े लिखे को फारसी क्या”. मनुस्मृतितील अणि इतर ग्रंथातील काही मन्त्र अर्थांसकट त्याना सापडले. पुढील १५-१६ मिनिटे आमची यावर चर्चा झाली. आपल्या परीने त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. शूद्रो ब्राह्मणतामेति ब्राह्मणश्चैति शूद्रताम। क्षत्रियाज्जातमेवं तु विद्याद्वैश्यात्तथैव च। (10/65) महर्षि मनुच्या अनुसार कर्मानुसार व्यक्ती ब्राह्मण, क्षत्रिय वैश्य आणि शुद्र म्हणून ओळखला जातो. विद्या आणि योग्यततानुसार एका वर्णातला व्यक्ती दुसर्या वर्णात जातो. कर्मानुसार सत्यकाम जाबाली आणि विश्वामित्र ब्राह्मणत्वला प्राप्त झाले आणि इक्ष्वाकु वंशातला एक राजा कल्माषपाद वर्ण व्यवस्था बाहेर राक्षस म्हणून ओळखला गेला. पण हि वर्णव्यवस्था आली कुठून. यावर शोध घेताना त्या विद्यार्थांना हा मन्त्र सापडला. ब्राह्मणोंSस्य मुखमासीद् बाहू राजन्यः कृतः. ऊरु तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत. (यजुर्वेद: ३१/११) या मंत्रात परमात्म्याच्या मुखातून ब्राह्मण, बाहूतून क्षत्रिय, उरातून वैश्य आणि पायातून शुद्र यांची निर्मिती झाली आहे. ब्राह्मण मुखातून उत्पन्न झाला याचा अर्थ काय. जुन्याकाळात गुरुकुलात आचार्याच्या मुखातून निघालेली वाणी अर्थात प्रवचन ऐकून विध्यार्थी शिकायचे. अथाधिविद्यम. आचार्यःपूर्वरूपम. अंतेवास्युत्तर रूपम्. विद्या संधि:. प्रवचन संधानम. इत्यधिविद्यम्. (तैत्तिरीय उपनिषद ३/४) त्या काळी विद्वान आणि वेदशास्त्र संपन्न व्यक्तीला समाजात ब्राह्मणाचा दर्जा मिळायचा. आज हि आपण विद्वान माणसाचा समोर पंडित हि विरुदावली लावतोच. क्षत्रियाचा जन्म बाहूतून. ज्या व्यक्तीचे बाहू मजबूत असेल, तोच सुरक्षा देऊ शकतो. हे त्रिकाल सत्य आहे. आज हि मजबूत, स्वस्थ्य लोक सेन्यात किंवा इतर सुरक्षा दलात जातात. वैश्यचा जन्म जंघेतून झाला. ज्या माणसाच्या उरू अर्थात जंघा मजबूत असेल तो अविरत मेहनत करू शकतो. असा व्यक्ती थोडे बहुत पारंपारिक ज्ञान असेल तर शेतीबाडी, पशुपालन, व्यापार, उद्योग धंधा उत्तम रीतीने करू शकतो. अश्या व्यक्तींना वैश्य म्हणून संबोधित केले आहे. शुद्र हा परमेश्वराच्या पायातून उत्पन्न झाला. ज्ञानहीन आणि शक्तिहीन व्यक्ती ही दुसर्यांची सेवा करून पोट भरू शकतो. सरकार दरबारातील चपरासी, दरबान किंवा जुन्या काळात राज दरबारातील सेवक, साफ सफाई, झाडू-पोंछा, इतर घरगुती अणि छोटे मोटे कामे करणार्यांना शुद्र म्हणून संबोधित केले आहे. आपण मंदिरात परमेश्वराच्या पायांवर डोके ठेवतो. कारण परमेश्वर आपली सेवा करून आपले दुःख दूर करतो. त्याचाच चरणांपासून उत्पन्न झालेले, आपली सेवा करणारे (शुद्र) मग ते कुठल्या ही जातीचे का असेना. श्रेष्ठच आहेत. मनुस्मृतितल्या या मंत्रानुसार जन्मापासून कुणीच शुद्र किंवा ब्राह्मण नाही आहे. कर्मानुसारच माणसाची जात ठरते. हे सर्व मनुस्मृतित लिहिले आहे, या वर त्यांचा विश्वास बसायला वेळ लागला. पण गुगल गुरु खोटे बोलत नाही यावर त्यांचा विश्वास होता. शिवाय हे मंत्र त्यांनीच शोधलेले होते. प. जनकपुरीच्या मेट्रो स्टेशन वर ते सर्व उतरले. उतरताना त्यातला एकाने म्हंटले, अंकल अभी तक हमें टीवी से ही अपने धर्म के बारे में आधी अधूरी थोड़ी बहुत जानकारी थी. कभी भी हमने अपने धर्मग्रंथो को नहीं पढ़ा. पर अब एकबार मनुस्मृति पढ़कर जरुर देखूंगा. मी हि हसून त्यांना धन्यवाद दिला. निश्चितच आजपासून आपल्या पुरातन पुस्तकांबाबत त्यांची धारणा थोडी तरी बदलली असेलच.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 27390
प्रतिक्रिया 115

प्रतिक्रिया

In reply to by अर्धवटराव

अर्धवटराव. मी पौरोहित्य करण्याच्या पात्रतेबद्दल विचारत नाही. अ‍ॅफिडेविट फाईल करुन आडनाव बदलेल. पण जात बदलत नाही. तुम्ही पुरोहित भटजी ब्राह्मण इत्यादी कसे व्हायचे ते सांगत आहात, तसे करुन तो व्यवसाय करण्याची पात्रता येईल फारतर. असे जातनिरपेक्ष पुरोहित तयार करण्याचे उल्लेखनिय काम गेली अनेक वर्ष गायत्री परिवार करत आहे. जसे कधीकाळी पौरोहित्य करनार्‍या खापरपणजोबाचा खापरपणतु भले भारतीय लष्करात सैनिक असेल तरी तो ब्राह्मणच. त्याचा मुलगाही ब्राह्मणच, क्षत्रिय नाही होत. किंवा त्याने उद्या कपडे शिवायचे दुकान टाकले तरी तो शिंपी नाही होत. माळ्याचा डिप्लोमा करुन सरकारी नोकरीत बागेचा माळी म्हणून जॉइन झाला तरी तो ब्राह्मणच राहतो. त्याचे सगळे जीवंत नातेवाईकांत आता कोणीही पौरोहित्य करत नाही तरी ते सगळे ब्राह्मणच. आज अनेक कुटूंबे त्यांच्या सर्व जीवंत पिढ्या ओरिजिनल काम करतच नाहीत तरी त्या त्याच जातीच्या म्हणवल्या जातात. हेच सगळ्या जातींसोबत घडते. मग मनुस्मृती म्हणते की व्यवसाय किंवा गुणांनुसार जात ठरते ते कसे? किंवा मनुस्मृती कालबाह्य झाली म्हणजे नक्की काय झाले आहे? मग ही आजची कंपार्टमेंट अवस्था कोठून आली? गोंधळ झालाय सगळा. माझा प्रश्न खरंच गंभिर आहे. जाणकारांनी कृपया उत्तर द्यावे.

In reply to by तर्राट जोकर

आता माझा पण गोंधळ झाला आहे. तुमचा नेमका प्रश्न मला कळला नाहि. शूद्र, फॉर दॅट मॅटर इतर कुठल्याही जातीत जन्म घेतला तर ब्राह्मण जातीत कसं परिवर्तन करायचं असच म्हणताहात ना? त्याचच उत्तर दिलय कि. थोडं इलॅबोरेट करायचं म्हटलं तर.. १) व्यवसाय निमीत्त करुन जात बदलायची झाल्यास (सो कॉल्ड) ब्रह्मकर्म करुन जात बदलता येते २) अ‍ॅक्च्युअल शारीरीक पुनर्जन्म (जवळपास) अशक्य आहे, त्यामुळे द्वीज संस्कार घेऊन व्हर्च्युअल पुनर्जन्माद्वारे जात बदलता येते ३) वरीलपैकी कुठल्याही प्रकाराने समाजमान्य जातबदल होऊ शकतो (१००% समाजमान्यता मिळणार नाहि... अगदी देशस्थ, सारस्वत, द्विवेदी, शर्मा, मैथीली वगैरे समाजगटांना ब्राह्मण म्हणावं कि नाहि याबद्दल ब्रह्ममिपाजगात धाग्यांचे काश्मीर झालेले आहेत) ४) सरकार दरबारी प्रमाणपत्रावर जात कशी बदलतात माहित नाहि

In reply to by तर्राट जोकर

आज हा बदल सोपा आहे.. पण जर एखाद्या ब्राह्मणाला शूद्र व्हायचे म्हटले तर ते अजिबात शक्य नाही. ह. घ्या.

In reply to by आनन्दा

अर्धवटराव व आनन्दा, ते मी उदाहरण म्हणून दिले आहे. आज कोणालाही रितसर व कायदेशीररित्या जात बदल करणे शक्य आहे का एवढेच विचारले आहे.

In reply to by तर्राट जोकर

वर साहना यांनी उदाहरण दिलेले आहे.. जर तुम्ही आत्तापासून तुम्ही ब्राह्मण आहात म्हणून सांगायला सुरुवात केलीत तर कदाचित पुढच्या २५ वर्षात तुम्ही पूर्ण ब्राह्मण बनून जाल.. पण अन्यथा तुम्ही म्हणता ते बरोबर आहे - भारतीय कायदा जात बदलायची सवलत देत नाही. तेव्हा जात ही जन्मानेच ठरते. (किमान कायद्याच्या दृष्टीने). पण हा कायदा मुख्यत्वे आरक्षणाचा अपलाभ घेतला जाऊ नये यासाठी आहे. त्यामुळे ब्राह्मणेतरांनी मी ब्राह्मण आहे असे ठोकून दिले तरी कोणीही पुरावा मागणार नाही. मला आजपर्यंत मी ब्राह्मण असल्याचा पुरावा द्यावा लागलेला नाही.

In reply to by आनन्दा

असं नसतं दादा. तुम्हाला मुद्दा कळला नाही काय? माझा प्रश्न फार महत्त्वाचा आणि गंभीर आहे. वर साहना यांनी जे उदाहरण दिलंय ते फार जुनं आहे. तेव्हा तसं व्हायला काही विशिष्ट अपवादात्मक परिस्थिती कारणीभूत होती. आता ते शक्य नाही. भारतीय कायद्याचं सोडा. असं कोणाला कोणीही आपल्या जातीमधे घेऊ शकतं काय? जातीबाहेर काढण्याचे खूप कार्यक्रम चालत असतात भारतात. जन्माने जात ठरते ते कोण्या कायद्याने नाही. ते तसे आहे म्हणून कायदा बनलाय. जन्माने जात ठरणे स्वतंत्र भारताचे इन्वेन्शन नाही. अमूक एका विधीने कोण्या शुद्राला, मराठ्याला ब्राहमण जातीत घेऊ शकतो का? मला आजपर्यंत मी ब्राह्मण असल्याचा पुरावा द्यावा लागलेला नाही. >> बरोबर आहे. पण काही प्रसंग असे माहिती आहेत जिथे ब्राह्मण नसल्याचा पुरावा द्यावा लागलेला आहे व असल्याचाही. म्हणूनच म्हटले तुम्हाला हे कळणे शक्य आहे काय?

In reply to by तर्राट जोकर

अमूक एका विधीने कोण्या शुद्राला, मराठ्याला ब्राहमण जातीत घेऊ शकतो का?
मला वाटतं, नाही. अर्थातच, कुठलाही मराठा शुद्राला, ब्राहमणाला जातीत घेवू शकत नाही. शुद्रांबाबतही तेच.

In reply to by तर्राट जोकर

असं कोणाला कोणीही आपल्या जातीमधे घेऊ शकतं काय?
हे सामान्यपणे बरोबर आहे. सामान्यपणे जात रोटीबेटी व्यवहारांनी ठरत असे. त्यातले रोटी व्यवहार आता कालबाह्य झालेत. बेटी व्यवहार अजूनही आहेत. बाकी तुमच्या माहितीसाठी - ब्राह्मण जात पाळणारे अजूनही जर मुलगा ब्राह्मण पण मांसाहारी असेल तर आपली मुलगी देत नाहीत. आता तुमच्या प्रश्नाचे उत्तर - तुम्ही जर ब्राह्मणाच्या मुलीशी लग्न केलेत, तर तुम्ही नाही, पण तुमची मुले नक्कीच ब्राह्मण बनू शकतात.
पण काही प्रसंग असे माहिती आहेत जिथे ब्राह्मण नसल्याचा पुरावा द्यावा लागलेला आहे व असल्याचाही
हे थोडे स्पष्ट केलेत तर बरे होईल. कदाचित तुम्हाला मंदिर पूजेबद्दल म्हणायचे असेल - त्याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही. माझ्या व्यक्तिगत अधिकारात जे असेल त्यात मी व्यक्तीची जात पाहण्यापेक्षा त्याचा अधिकारच बघेन. असो - इति लेखनसीमा, नाहीतर विषय दुसरीकडे जाईल.

In reply to by तर्राट जोकर

आज कोणालाही रितसर व कायदेशीररित्या जात बदल करणे शक्य आहे का एवढेच विचारले आहे.
तजो, कुणी जात बदलून मागेल का हा प्रश्न बाजूला ठेऊ; भारतीय राज्य घटनेच्या आर्टीकल १९ मधील पुढील बाबी एकत्र ठेऊन पहा, All citizens shall have the right (a) to freedom of speech and expression; (मी स्वतःला काय म्हणवून घ्यायचे जाहीर करायचे याचे तत्वतः स्वातंत्र्य असणे अभिप्रेत आहे (डॉक्टर नसताना स्वतःला हेतु पुरस्सर तसे भासवणे इत्यादी गोष्टींना हे स्वातंत्र्य कदाचित लागू होणार नाही पण मी स्वतःला शूद्र, ब्राह्मण, क्षत्रीय अथवा अजून कुणा अमुक जातीचे म्हणून घेतले तर त्यावर बंधन घालणे शक्य नसावे, माझे करीअर सेल्स आणि बिझनेस डेव्हलेप्मेंटचे आहे क्वचित कुणि जातीचा उल्लेख केला तर मी स्वतःला गंमतीने वैश्य म्हणून सांगतो आणि माझ्या असे सांगण्यावर कायद्याचे सहसा बंधन येणार नाही) (g) to practise any profession, or to carry on any occupation, trade or business भारतीय जाती बर्‍याच प्रमाणावर ऑप्क्युपेशन रिलेटेड होत्या मी समजा स्वतःला सुतार जाहीर केले मे बी मी फक्त पेंसील छिलण्यापलिकडे कोणतेही सुतारकाम करत नाही तरीही भारतीय घटना मला सुतार म्हणवून घेण्याचे स्वातंत्र्य देते. शिवाय मला धर्म विषयक Which includes freedom of conscience and free profession, practice, and propagation of religion, अशा स्वरुपाचे स्वातंत्र्य आहे मी माझ्या एकट्याने स्वतःला अमुक जातीचा जाहीर केले आणि ती जात हा माझा conscience आहे म्हटले की संपले. हं विशीष्ट गोष्टींचा जसे की आरक्षणादी अथवा स्वतःला डॉक्टर नसाता डॉक्टर दाखवणे अशा हेतुपुरस्सर फायदा घेण्याचा मी प्रयत्न केल्यास तसे मला न करता येण्या इतपत मर्यादा असू शकतात. चुभूदेघे रितसर व कायदेशीररित्या जात बदल करणे

In reply to by माहितगार

राज्यघटनेनुसार दिलेले आपले उत्तर योग्य आहे. तसेच काहीसे उत्तर अर्धवटराव यांनीही दिले. अर्थात ही कायद्याची एक बाजू झाली व तसेही कायदा जातपात मानत नाही (आरक्षणाच्या संदर्भात सोडून) तर समाज मानतो. शहरी व प्रगत भागातला नाही मानत पण इतर भागात हे प्रमाण कट्टर आहे. दुसरी बाजू अशी की जसे खाली श्रीगुरुजींनी दत्तक विधान व विवाह ह्या दोन पद्धती सांगितल्या ज्यात एका क्षणापासून प्रस्तुत जातसमुदाय संबंधित व्यक्तीला आपल्यात सामिल झाला आहे असं मान्य करतो. जेव्हा एखाद्या समुदायात जन्म होतो तेव्हा आपसुक गोतावळा विशिष्ट जातीचाच मिळतो. विवाह व दत्तक विधानातही हे होते. ह्याशिवाय दुसरी पद्धत असू शकते का हा शोध सुरु आहे.

In reply to by तर्राट जोकर

ओके धार्मीक बाजूने म्हणताय ना ? टेक्नीकली हिंदू धर्मात कुणिही स्वतःला इश्वर म्हणूनही जाहीर करु शकते आणि माझ्यात आलेल्या इश्वराने माझी जात बदलली कोणाची आहे का मजाल ? बर तेही नाही तर तुमचे गुरु -गुरु कुणाला करायचे याचेही सातंत्र्य आहे- तुम्हाला हवीती उपाधी देण्यास स्वतंत्र असतात, तिसरा मार्ग ब्राह्मणांच्या स्थायी इश्वर आहे असा नियम वापरात आणला तर कोणत्याही ब्राह्मण माझ्यातल्या इश्वराने समोरच्या व्यक्तीची अथवा अख्य्ख्या समुदायाची जात बदलली अथवा धर्मात घेतले म्हटले तर हिंदू धर्माकडे यावर काही रास्त प्रतिवाद कितपत उपलब्ध असेल याची शंका वाटते.

In reply to by तर्राट जोकर

दुसरी बाजू अशी की जसे खाली श्रीगुरुजींनी दत्तक विधान व विवाह ह्या दोन पद्धती सांगितल्या ज्यात एका क्षणापासून प्रस्तुत जातसमुदाय संबंधित व्यक्तीला आपल्यात सामिल झाला आहे असं मान्य करतो. जेव्हा एखाद्या समुदायात जन्म होतो तेव्हा आपसुक गोतावळा विशिष्ट जातीचाच मिळतो. विवाह व दत्तक विधानातही हे होते. ह्याशिवाय दुसरी पद्धत असू शकते का हा शोध सुरु आहे. माझ्या मोघम अल्पमतीनुसार आडनावही न बदलता निव्वळ अफ़ेडेविटवर व 5 नवीन जातबंधुच्या ना हरकत व स्वीकृति प्रमानपत्रावर आपल्या जातीची कायदेशीर नोंद बदलणे बेकायदेशीर ठरू नये

In reply to by तर्राट जोकर

बाकी सगळे सोडा. मुद्द्याचा सवालः आज मी शुद्र जातीत जन्माला आलो तर ब्राह्मण जातीत बदल करुन मिळेल काय?
बदल करण्याचे दोन मार्ग आहेत. एखाद्या ब्राह्मण कुटुंबात दत्तक जाणे हा पहिला मार्ग. दुसरा मार्ग फक्त स्त्रियांसाठी आहे. एखाद्या अब्राह्मण स्त्रीने ब्राह्मण पती केला तर विवाहपश्चात ती ब्राह्मण होते.

In reply to by श्रीगुरुजी

बाकी सगळे सोडा. मुद्द्याचा सवालः आज मी शुद्र जातीत जन्माला आलो तर ब्राह्मण जातीत बदल करुन मिळेल काय?
जिथपर्यंत भारतीय घटना आणि कायद्यांचा प्रश्न आहे, मी सरकार पुरस्कृत विशीष्ट फायदे घेण्यासाठी म्हणून करत नसेन तर मी स्वतःला काय जाहीर करावे याच्याशी कायद्याला काहीही देणे घेणे नाही. मी स्वतःला अगदी ब्राह्मण घोषीत करु शकतो, अगदी कॉपीराईटेड ज्ञान सुद्धा (जो पर्यंत चार्जेस भरण्यास तयार आहे) ते सक्तीने उपलब्ध करवून घेऊ शकतो (संदर्भ कॉपीराईट कायदा), जे कॉपीराईट फ्री आहे त्यांच्या संबंधात तर प्रश्नच येत नाही उघड उघडपणे वापरु शकतो, मला व्यवसाय स्वातंत्र्य सुद्धा भारतीय घटना देते मी स्वतःला इर्रिस्पेक्टीव्ह ऑफ माय पार्श्वभूमी पुरोहीत जाहीर करुन पौराहीत्याचा व्यवसाय करु शकतो मला भारतात पौराहीत्य करायचे आहे का क्लिनींग एजन्सी चालवायची आहे याचे पूर्ण स्वातंत्र्य आहेच. एवढेच नाही मी इतरांना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य झाल्याची प्रमाणपत्रे फुकटातही आणि पैसे घेऊनही वाटू शकेन. भारतीय घटना स्वतःला इश्वर, प्रेषित, संत, गुरु जाहीर करण्याचे स्वातंत्र्य देतेच, पण दुर्दैवाने असे काही केल्यास कायदा हातात घेऊन अगदी दर दोन मिनीटाला घटनेची तुम्हाला आठवण देणारी मंडळी दुसर्‍या क्षणाला पलटून तुमच्या जिवावरही उठू शकतात हे भारतातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील सावट उठण्यास अद्याप लांबची मजल आहे हे निश्चित

प्रतिसादा बाबत धन्यवाद. आपले जुने ग्रंथ आपला ठेवा आहेत. प्रत्येकाच्या दृष्टीने काही चांगले आणी काही वाईट त्यात सर्वकाही असेल. बाकी एकदा द्रोणाचार्य यांनी दुर्योधनाला एक चांगला मनुष्य आणि युधिष्ठिरला एक वाईट माणूस शोधायला पाठवले. दोघेही रिकाम्या हाताने परत आले. एवढेच.

In reply to by hmangeshrao

@ hmangeshrao पटाईतांनी दिलेली स्टोरी दोनच वाक्याची असलीतरी नीट वाचल्यास गोंधळ होणार नाही किंवा कसे

In reply to by विवेकपटाईत

बाकी एकदा द्रोणाचार्य यांनी दुर्योधनाला एक चांगला मनुष्य आणि युधिष्ठिरला एक वाईट माणूस शोधायला पाठवले. दोघेही रिकाम्या हाताने परत आले. एवढेच.
:) पटाईतजी हि गोष्ट अजून दोनदा वाचावी, एवढ्याच गोष्टीचा विचार केल्यास दुर्योधन राजा होण्यास ठिक आहे आहे आणि युधिष्ठीर साधू होण्यास ठिक आहे. राजाचे कामच न्याय देणे असते. त्याच प्रमाणे समाज शास्त्रज्ञांचे आणि समीक्षकांचे टिकाकारांचे कामच समिक्षा आणि टिका करणे असते, त्यांनी (टिकाकारांनी) त्यांच्या टिकेच्या धर्माला अनुसरुन असूनही टिका न करणे योग्य नाही, अगदी गुणकर्म विभागशः वाला नियम लावला तर मनुस्मृतीवर टिकाकारांनी टिका केलीच पाहीजे कारण ते त्यांच्या आयुष्याचे इतिकर्तव्यही असेल. काय म्हणताय ?

क्षत्रियाचा जन्म बाहूतून. वैश्याचा जन्म जंघेतून झाला. शुद्र हा परमेश्वराच्या पायातून उत्पन्न झाला हे भारतापुरतच मर्यादित आहे ना? भारतीयांचा परमेश्वर वेगळा,आणि बाहेरच्यांचा वेगळा?मज्जाच हाय कि! : : सबका मालिक एक|

आजही मनुस्म्रूती चे गोडवे गाणारे माणसं (? ) आहेत म्हणायच. यातून मनोव्रूत्ती दिसून येते. आज सर्वच समाज सुशिक्षित झाल्यामूळे त्यांना गंडवणे अवघड झाले आहे. भारतीय समाज जातीयवादी शक्तींना कधीच थारा देत नाहीत. मोदीकडे पाहूण ह्यावेळेस संधी दिली आहे. जातीयवाद्यांनी असाच उच्छाद मांडला तर पुढच्या पंचवार्षिक ला जनता यांना घरी बसवेल.

मनुस्मृती खरच कालबाह्य झाली म्हणतात मग मनुस्मृतीवर शासनाने बंदी घालूनही पुनःप्रकाशन करायचा उद्देश काय असेल बरं?

In reply to by सत्याचे प्रयोग

मनुस्मृतीवर शासनाने बंदी घालूनही..
@ सत्याचे प्रयोग, १) कृ. संदर्भ नमुद कराल काय. २) आणि मनुस्मृतीवर टिका लेखन अधिक आहे का समर्थन विषयक ? मला वाटते टिकात्मक लेखन अधिक असावे. टिकालेखन झाले आहे आणि टिका लेखनाबाबत समाजात सजगता आहे तरी सुद्धा मनुस्मृतीच्या प्रकाशनाची आपण भिती बाळगता का.

In reply to by माहितगार

आपणास मनुस्मृतीवर बंदी असलेचा जी. आर. अपेक्षित आहे की सध्या बाजारात मनुस्मृती मिळतेय याचा संदर्भ

हजारो वर्षापुर्वीच्या गोष्टी उकरून काढण्यात काय अर्थ आहे. इतके प्राचीन पुस्तके हल्लीची मुले वाचतात तरी का? अभ्यास करता करता तंगून जातात. ही सगळी काॅग्रेसची खेळी आहे. पक्षाला वाचविण्यासाठी मरमर चालली आहे.

In reply to by हेमंत लाटकर

हजारो वर्षांपूर्वीची जात आजही पाळली जाते. प्रत्यक्ष जीवनात ज्या गोष्टी आहेत त्याची पाळेमुळे खणुन काढण्याला का विरोध आहे?

In reply to by तर्राट जोकर

पाळेमुळे खणून काढणे म्हणजे नक्की काय करणार? लोकांच्या खाजगी जीवनात एका मर्यादेपलिकडे जाता येत नाही. सरकार जे प्रयत्न करतं ते प्रबोधनात्मक असतात. पण जातीचं वलय आणि त्याचे आर्थिक फायदे पहाता लोक असे प्रयत्न फाट्यावरच मारत असणार. शिवाय प्रत्येक जातीला स्वतःची जात सर्वश्रेष्ठ वाटते. जरी ते तथाकथित रित्या निम्न जातीत जन्माला आले असले तरी. त्याचं काय? जात एकाच प्रकारे जावू शकत होती की जातीचे सर्व उल्लेख सार्वजनिक जीवनातून नाहीसे करणे. तसं होतंय का? आरक्षण, निवडणुका, जात पंचायती वगैरे मुळे जात संस्था उलट जास्त उल्लेखनीय, अ-लवचिक आणि प्रखर झाली आहे. तेव्हा मुदलातल्या घोळामुळे व्याजावर परिणाम झाला आहे.

In reply to by काळा पहाड

तो प्रश्न नव्हता. शास्त्रोक्त पद्धतीने जातबदल करणे शक्य आहे का? सगळे जे जातीपातीवरुन ओरडतात त्या सगळ्यांना एकजात ब्राह्मण करुन टाका काही शुद्धीकरण, बदलीकरण विधी असतील तर. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. आसेतु हिमाचल सग्ळे हिंदु एकाच जातीचे. सग्ळेच ब्राह्मण. बाबासाहेबांनी धर्मांतर केले. आता जात्यांतर होऊ देत.

In reply to by तर्राट जोकर

एक आधार कार्ड वाटायचं तर हजार भानगडी झाल्या. इथे किती घोळ होतील! तेव्हा हा प्रकार अव्यावहारिक आहे. शिवाय लोकांची मानसिकता एका पिढीत बदलली जाणं शक्य नाही. यासाठी प्रबोधन आणि शिक्षण हेच फक्त उपयुक्त आहे. दुरदैवाने, शिक्षण घेवून सुद्धा मानसिकता बदलेल असं नाही. सुशिक्शित लोक आपल्या मानसिकतेच्या टोळ्या तयार करतात. अनेक बाईक्स वर आणि कार्स वर सध्या ||मराठा|| असे बोर्ड दिसतायत. जणू की ती काही एक शूरवीर असल्याची पावतीच आहे. अजून मी ब्राम्हण, माळी, महार असे बोर्ड बघितले नाहीत पण ते दिवसही फार दूर नसावेत. शिवाय ब्राम्हणांचं तरी सुद्धा ठीक आहे. पण ब्राम्हण झालेले मराठा आणि ब्राम्हण झालेले महार किती एकत्र बसू शकतील याबद्दल मला शंका आहे. प्रत्यक जातीची वेगळी वैशिष्ट्ये, कुलदेवता, आचार, विचार, आहार, पद्धती आहेत. सगळे लोक एकदम शाकाहारी होतील? नसल्यास तसं करण्याला काय अर्थ आहे?

In reply to by काळा पहाड

ते गाड्यांवर नावं लावणे तर बुद्धीहिन चळवळ आहे नुसती. ;-) प्रत्येक जातीचीच काय प्रत्येक घराण्याची वेगळी वैशिष्ट्ये, कुलदेवता, आचार, विचार, आहार, पद्धती आहेत तरी ती शंभर, दोनशे, हजार कुटुंबे एकाच जातीचे नाव लावतात. एकाच कुटुंबाच्या वेगवेगळ्या शाखांमधेही हे वैविध्य दिसून येतं तरी आम्ही शाहण्णव कुळी, तमके मराठा, अमके ब्राह्मण असे बिरुदं लोक चिकटवतांना दिसतात. तरी ही लोक एकत्र बसू शकतात. अर्थात तुम्ही म्हणताय तीच रीअ‍ॅलिटी आहे. पण मुक्तकल्पनारंजनातुन काही हाती लागेल काय हाही विचार आहे.

In reply to by हकु

जसे कधीकाळी इंग्रज राज्य करीत होते तसं.... फक्त एकच प्रॉब्लम आहे इंग्रजांचे कायदे कानून मानवनिर्मित तर मनुस्मृती 100% तशी म्हणता येत नाही अन प्रश्न हां येतो की त्याचे प्रेरक निर्माते आजही अस्तित्वात आहेत की कधीच न्हवते यावर तुम्ही काय विश्वास ठेवता

In reply to by भाऊंचे भाऊ

बरं. मग त्याचे प्रेरक निर्माते आज अस्तित्वात आहेत असं वाटतंय का? जर हो, तर ते कोण ? ते अजूनही मनुस्मृती नुसार वागण्यासाठी सांगत आहेत का? मग जाळपोळ करून विरोध नक्की कोणाला?

In reply to by हकु

पण आजही कोणी नाझिवाद प्रमाण मानत असेल जोपासत असेल तर केला जाणारा विरोध मेलेल्या हिटलरला नक्कीच नसावा नाहिका ?

In reply to by हकु

वर बॅटमॅनयांचा प्रतिसाद पहा. पूर्ण कायदा नाही पण वारस कायदे बनवताना मनुस्मृतीचा आधार घेतलेला आहे.

In reply to by अनुप ढेरे

"१. मनुस्मृती, मिताक्षरा, इ. हिंदू धर्मशास्त्रावरच्या ग्रंथांमधील काही भाग आज भारताच्या सिव्हिल लॉ चा भाग आहे."
बॅटमॅन यांचा हा मुद्दा जर इथे लक्षात घेतला तर मग मला सांगा की हा हिंदू धर्माशास्त्रावरील काही भाग ग्राह्य धरण्यास संमती कोणी दिली ? घटनाकारांनी का? जर तसे असेल तर मग मनुस्मृतीस विरोध हा घटनाकारांना केलेला विरोध म्हणायला हवा ना?