✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कुंजविहारी हसे का मनी -

व — विदेश, Sun, 03/27/2016 - 00:25
कुंजविहारी हसे का मनी - निद्राधीन ती राधा बघुनी नयनी उतरे शाममुरारी हळूच नकळत स्वप्न होऊनी स्वप्नामधली राधा बावरी गेली सगळे सत्य समजुनी हसे खुदुखुदू झोपेमधुनी खट्याळ कृष्णाची मोहिनी देशी रे किती त्रास तू मजला वदते राधा जात मोहुनी मोरपीस मग अलगद गाली कान्हा हसतो लबाड फिरवुनी खोड्या वाढता म्हणते राधा जा तू आता निघून येथुनी स्वर राधेला गोड ऐकवी मुरलीधर हळु पावा काढुनी नयने उघडी राधा अपुली मधुर सूर ते पडता कानी आत्ता होता कुठे कन्हैया शोधत हसते घरभर फिरुनी लबाड आणि खट्याळ लीला आठवे राधा स्वप्नी रंगुनी .. . http://mee-videsh.blogspot.in/

प्रतिक्रिया द्या
2899 वाचन

💬 प्रतिसाद (11)

:-)

विद्यार्थी
Sun, 03/27/2016 - 05:45 नवीन
:-) राधा आणि कृष्ण हा विषय कवी आणि वाचकांसाठी कधीच जुना होणार नाही. मस्त कविता, एकदम आवडली.
  • Log in or register to post comments

सुरेख!

रातराणी
Sun, 03/27/2016 - 07:15 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments

.

कवितानागेश
Sun, 03/27/2016 - 08:14 नवीन
गोड लिहिलंय.
  • Log in or register to post comments

छान!

प्राची अश्विनी
Sun, 03/27/2016 - 08:27 नवीन
छान!
  • Log in or register to post comments

छान

पाषाणभेद
Sun, 03/27/2016 - 08:49 नवीन
छान
  • Log in or register to post comments

मस्त. आवडली

अभ्या..
Sun, 03/27/2016 - 11:15 नवीन
मस्त. आवडली
  • Log in or register to post comments

अत्तिशय सुंदर.

अत्रुप्त आत्मा
Sun, 03/27/2016 - 11:25 नवीन
अत्तिशय सुंदर.
  • Log in or register to post comments

आभार -

विदेश
Sun, 03/27/2016 - 14:27 नवीन
विद्यार्थी, रातराणी, लीमाउजेट, प्राची अश्विनी, पाषाणभेद, अभ्या, आत्मबंध --- प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार !
  • Log in or register to post comments

वा! कवी जयदेवांच्या काव्याची

एस
Sun, 03/27/2016 - 14:29 नवीन
वा! कवी जयदेवांच्या काव्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

खुपच छान लिहिली आहे.

उल्का
Mon, 03/28/2016 - 14:51 नवीन
खुपच छान लिहिली आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद -

विदेश
Mon, 03/28/2016 - 20:31 नवीन
एस, उल्का - प्रतिसादासाठी धन्यवाद !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा