कै. डॉ .श्रिकांत जिचकार यांचे लेखन पहावे. त्यांनी वेगळ्या विदर्भाच्या मुद्याला काँग्रेसचे मंत्री असताना सकारात्मक प्रतिसाद दिला होता परंतु आत्ता ही योग्य वेळ नाही असे म्हणले होते असे आठवते. समर्थनार्थ एकच मुद्दा आकडेवारी सहीत दिला होता तो असा वेगळा विदर्भ केल्यास विधानसभा आहे, राजधानी आहे पण सनदी अधिकार्यांचे पगार देता येतील इतके उत्पन्न नाही. राज्याच्या उत्पन्नाची सर्व मोठी साधने पश्चिम महाराष्ट्रात एकवटली आहेत.
राजकीय विरोध तर आहेच पण हा मुद्दा सुध्दा महत्वाचा आहे. आजही विदर्भात कारखाने नाहित ज्यातुन विक्रीकर किंवा अन्य करातुन राज्याला उत्पन्न मिळेल. जे काय उत्पन्न आहे ते शेतीवर आधारीत ज्यावर कोणताही कर लागु शकत नाही आणि उलट हमी भाव देण्यासाठी सरकारला बाजारभावापेक्षा जास्त दराने ते खरेदी करावे लागते.
समजा जर झालेच तुकडे तर ह्या नव्या राज्यांची नावे काय असतील? वेगळ्या राज्यांच्या राजधान्या कोणत्या होतील? पश्चिम महाराष्ट्राच्या राजधानीचा मान कुनाला मिळेल? बेळगाव चा समावेश कुठल्या संयुक्त लघुराष्ट्रात होईल? विदर्भाची मागणी खुप जुनी आहे मग एखादे महाराष्ट्र गीतासारखे विदर्भ गीत प्रचलीत आहे का?प्राथमीक शिक्षणासाठी बोलीभाषांचा विचार होईल का? मुंबई कोणाची .....?
मिपाआजोबा मंडळाच्या प्रतीक्षेत
बाब्या
समजा जर झालेच तुकडे तर ह्या नव्या राज्यांची नावे काय असतील? - १) महाराष्ट्र, २) पास, ३) पास
वेगळ्या राज्यांच्या राजधान्या कोणत्या होतील? - १) मुंबई २) पास ३) पास
पश्चिम महाराष्ट्राच्या राजधानीचा मान कुनाला मिळेल? - मुंबई
बेळगाव चा समावेश कुठल्या संयुक्त लघुराष्ट्रात होईल? - कर्नाटक
विदर्भाची मागणी खुप जुनी आहे मग एखादे महाराष्ट्र गीतासारखे विदर्भ गीत प्रचलीत आहे का? - पास
प्राथमीक शिक्षणासाठी बोलीभाषांचा विचार होईल का? - पास. विदर्भ मराठवाडावाले बघून घेतील
मुंबई कोणाची .....? - १०५ की १०७ हुतात्मे देणार्यांची. अर्थात महाराष्ट्राची.
प्रतिक्रिया
वेगळा विदर्भ
अरे!
लघुराष्ट्र
समजा जर झालेच तुकडे तर ह्या
In reply to लघुराष्ट्र by भीमराव
...