पुणे कट्टा वृत्तांत - २० मार्च २०१६ पाताळेश्वर मंदीर, पुणे
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
एक मस्त स्नेहसंमेलन झाले आज पुणॆ कट्ट्याच्या निमित्ताने .
ठरलेल्या वेळात म्हणजे दुपारी ४.२० ला मी जंगली महाराज मंदिरात पोहोचलो. सुरुवातीला मी जंगली महाराज आणि पाताळेश्वर मंदिरात दर्शन घेतले व नम्दिमण्डपाजवळ बसलो. लगेचच मागेच बसलेल्या प्रसाद को यांनी मला
फोन केला आणि आम्ही गप्पांना सुरुवात केली. पाककृती वाचता वाचता ते कसे
आपल्या उत्कृष्ठ मिपा कडे वळले याबद्दल सांगितले. मिपावरील अनेक पाक कृतींची त्यांनी मुक्तकण्ठे प्रशंसा केली . खरेच मीही अशीच एक पाककृती वाचून मिपाचा वाचक झालो आणि नंतर रीतसर सभासद झालो हे मी नमूद केले. मग थोड्याच वेळात वसंत चव्हाण आले आणि त्यांनीही मिपावरील रावण पिठले ह्या पाककृतीबद्दल भरभरून सांगितले. खरेच अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि या अन्नानेच आपल्याला मिपा ची ओळख करून दिली आहे याबाबत सर्वांचे एकमत झाले. मग अभिजित खांबे आले आणि गप्पांना रंग आला.
यानंतर स्वीट टोकर आणि सौ स्वीट टोकर आले मग गप्पाच गप्पा . आम्हाला वल्ली यांची प्रतीक्षा होती आणि ते थोड्याच वेळात आले वल्लिं नी मग आम्हाला पाताळेश्वर मंदिराबद्दल माहिती सांगितली मीही तीन चार वर्षांनी या मंदिरात गेलो होतो आणि खूप छान वाटले. मंदिराबाहेर एक शिलालेख आहे त्यावर काय लिहिले आहे याबद्दल माहिती नाही तसेच नंदी मंडप अलीकडच्या काळात बनवला असून त्याठीकाणी संगीत मंडप असण्याची शक्यता आहे ही माहिती मिळाली . त्यानंतर काही प्रकाशचित्रे घेऊन आम्ही मंदिराबाहेर पडलो. थंडगार वाळा सरबत घेऊन आम्ही संभाजी उद्यानाकडे प्रस्थान केले.वल्ली यांना जरुरी काम असलेने त्यांनी आमचा निरोप घेतला.
लवकरच अंबरनाथ कट्टा घेतला जाईल असे त्यांनी सांगितले.
नंतर संभाजी उद्यानात तर गप्पांची मेजवानीच झाली. सौ स्वीट टोकर यांनी कसे त्यांनी जगाची सफर करण्याची इच्छा असलेने मर्चंट नेव्हीतील साथीदार निवडला याबद्दल सांगितले. स्वीट टोकर यांनीही मर्चंट नेव्ही एक सुंदर जग आहे याबद्दल सांगितले. आपण त्यांची लेखमाला वाचतो अहोतच.
मग निघोज येथील रांजन खळगे, दिवेआगर , निळ्कंठेश्वर या ठिकाणांची चर्चा झाली. अभिजित खांबे आणि प्रसाद को यांनी दिवेआगर येथे बीचवर कशा मोटारी फसतात आणि त्या काढून देण्याचे काम हा व्यवसाय झाला आहे याबद्दल सांगितले. वसंत चव्हाण यांनीही निलकंठेश्वर या प्रेक्षणीय स्थानाबद्द्दल माहिती दिली. प्रसाद को यांनी दापोलीजवळ कोळ्थरे या निसर्गरम्य ठिकाणाबद्दल सांगितले.
सौ स्वीट टोकर यांनी कट्ट्यावर एक सुंदर कविता रचून सांगितली. ती मिपा करता लिहिण्याची मी त्यांना विनंती करतो.
मग आम्ही अल्पोपाहाराकरता समोरील शिवसागर येथे गेलो. तेथे तवा इडली ,
कांचीपुरम इडली , पालक डोसा व थंड कोफी या पदार्थांचा पुरेपूर आस्वाद घॆतला.
सौ स्वीट टोकर यांनी टिश्शू कागदापासून एक सुंदर ओरिगामी फुल बनवले.
एकंदरी तच या स्नेह संमेलनात खूप मजा आली. आम्ही नाखू यांना खूप मिस केले. सर्वांनी एकमेकांचा आनंदाने निरोप घेतला आणि भेटीगाठी चालूच ठेवण्याबद्दल ठरले.
सौ स्वीट टोकर यांचे विशेष आभार कारण नुकताच महिला दिन साजरा झाला व
त्यांनी महिलांची प्रतिनिधी म्हणुन या कट्ट्याला हजेरी ला.ली
कट्ट्याला आलेल्या सर्वांनी भरभरून मिपावर लेखन करावे अशी मी विनंती केली.
हा आहे संक्षिप्त वृत्तांत. लवकरच प्रकाशचित्रे डकवण्यात येतील.
डावीकडून : अभिजित खांबे, वसंत चव्हाण, वल्ली, मी, प्रसाद को
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
डावीकडून : अभिजित खांबे, वसंत चव्हाण, वल्ली, मी, प्रसाद को
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
प्रतिक्रिया
छान झाला कट्टा!
फोटो एकही दिसत नाहीये.
तुमची पत्रिका दाखवून घ्या.
फोटोंचे स्क्रीनशॅाट्स ( कमी
कंजूसभौंना
पहिल्या फोटोत सगळ्यात
दिसले ब्वा एकदाचे!! धन्यवाद.
हो नाखू काका. आपण अगोदर
कविता
सुरेख शब्द , सुंदर कविता !
धयवाद सुंदर कविता!
धयवाद सुंदर कविता!
प्रचि दिसलेल्या सर्वांचे
मागच्या महिन्यातील पुणे
अर्रे वा वा!
+१
स्वीट टोकर छान कविता
सोलापुर चे अभ्या आहेत.
भावकीत काय कट्टा करायचा? ;)
आम्ही
Pagination