दूरदर्शन महाचर्चा :
आज बऱ्याच दिवसांनी सह्याद्री महाचर्चा पाहण्याचा योग आला.
गेल्या काही वर्षात इतर वाहिन्यांवर अशा चर्चा जास्त पहिल्या गेल्या ज्यांचे रुपांतर शेवटी धुळवडीमध्ये(चिखलफेक) होते आणि तोच त्यांचा मुख्य व्यवसाय आहे मग त्या चर्चेचे भांडणामध्ये रुपांतर करण्यासाठी अनेक उपाय आहेत.
१) पुर्वागृह्दुषित विचारी व्यक्तीला सहभागी करणे
२) द्वेषाच्या पायावर चालणाऱ्या संस्था आणि व्यक्तीला सहभागी करणे..
३) कोणालाही अभ्यासू म्हणून उभे करणे
४) निवेदकाने मुद्दाम काही वाक्ये मान्यवरांच्या तोंडी घालणे किंवा त्यांच्याकडून मुद्दाम वादग्रस्त वाक्ये वदवून घेणे.
एकंदर अशा वांझोट्या चर्चा पाहणे केव्हाच बंद केले आहे ज्यामध्ये मते तयार होण्यापेक्षा बुद्धिभेद जास्त होवू शकतो...
असो... आता मुख्य विषय:
आजच्या सह्याद्री महाचर्चा मधील विषय होता "होळी आणि पर्यावरण"
१) सूत्रसंचालक प्रदीप भिडे हे फक्त प्रश्न विचारण्याचे काम करत होते... कोणाच्या तोंडी कोणती वाक्ये टाकण्याचा प्रयत्न करत नव्हते.
२) फक्त दोनच मान्यवर आणि ते देखील विषयाला अनुसरून पर्यावरण क्षेत्रामध्ये अनेक वर्ष काम करणारे व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाशी सलग्न.
३) कार्यक्रमाचा संपूर्ण रोख हा सणापासून उत्सवाकडे जाण्यासंबंधी होता..थोडक्यात बहुतेक सणाला विकृतीच्या विळख्यातून बाहेर पडणे या बद्दलच्या उपाययोजना करणे यावर बेतला होता..
४) होळी हा एक सण आहे आणि तो एक भावनिक विषय आहे त्यामुळे तो नाजूक पद्धतीने हाताळयाचा असतो याचे भान निवेदकाला संपूर्ण चर्चेत दिसले.
बाप रे.. बरेच लिहावे लागत आहे...
आता मुद्दे:
१) होळी:
- पानझड झाल्यामुळे आजूबाजूला जो कचरा होतो तो होळीसाठी वापरणे अपेक्षित असते.
- प्रतिष्ठेसाठी उंच होळी करणे ही सामाजिक विकृती आहे. परंपरेनुसार कुठेही होळीच्या आकारावरून त्याचे महत्त्व सांगण्यात आले नाही.
- होळी हा समाजाला एकत्र आणणारा सण आहे आणि असे असताना एका भागामध्ये ३-४ होळी पेटवायच्या ही सामाजिक विकृती आहे.
२) रंग:
- धुलीवंदन व रंगपंचमी साजरी करण्यामध्ये या मान्यवरांनी कोणतीही हरकत घेतली नाही उलटपक्षी त्यामध्ये नैसर्गिकतेकडून रासायनिकतेकडे हा सण कसा ओढला गेला आहे पुन्हा त्याला मूळरुपामध्ये आणणे हे या पिढीतील सर्वांचे प्रमुख उद्दिष्टे असली पाहिजेत.
- रासायनिक रंग रंगपंचमीच काय कुठेही वापरले तरी त्याचे शरीरावर दुष्परिणामच होतात.
- पाणी घालून रंग शरीराला लावणे हे कसे अपायकारक आहे याबद्दल माहिती देण्यात आली.
- पाणी फक्त धुलीवंदन किंवा रंगपंचमीला नव्हे तर दैनंदिन जीवनातसुद्धा वाचवले पाहिजे
कार्यक्रमातील तात्पर्य:
- सण, उत्सव आणि परंपरा यांना सरसकट वाईट न म्हणता यामध्ये लोकांनी विकृती आणलेली आहे ती दूर केली पाहिजे.
- सण व उत्सव ही समाजाची गरज आहे तरच समाज एकत्र येवून काही विधायक कामे हाती घेवू शकतो.
- उगाच अध्यात्मिक किंवा विज्ञानवादी भावनिकता न घेता खरा विवेकी दृष्टीकोन दिसत होता
- प्रबोधन हा मार्ग असे सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी उपयुक्त असतो.
हे फक्त प्रमुख मुद्दे आहेत..इतरही भरपूर शास्त्रीय माहिती या कार्यक्रमात मिळाली जी सगळी इथे सांगणे कठीण आहे.
सर्वांना होळी, धुळवड व रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.. आपले सण समजून त्यांचे उत्सवामध्ये रुपांतर करूया...
वाचन संख्या
3539
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडले
धन्यवाद
In reply to आवडले by पैसा
सह्याद्रीच्या महाचर्चा ह्या
गाभा स्वरुपातील लेख आवडला.
धन्यवाद.
In reply to गाभा स्वरुपातील लेख आवडला. by प्रकाश घाटपांडे
म्हणुनच . . . फक्त दर्जेदार
धन्यवाद
In reply to म्हणुनच . . . फक्त दर्जेदार by चौथा कोनाडा