Skip to main content

होळी, रंगपंचमी आणि पर्यावरण - प्रबोधन

Published on शुक्रवार, 25/03/2016
दूरदर्शन महाचर्चा : आज बऱ्याच दिवसांनी सह्याद्री महाचर्चा पाहण्याचा योग आला. गेल्या काही वर्षात इतर वाहिन्यांवर अशा चर्चा जास्त पहिल्या गेल्या ज्यांचे रुपांतर शेवटी धुळवडीमध्ये(चिखलफेक) होते आणि तोच त्यांचा मुख्य व्यवसाय आहे मग त्या चर्चेचे भांडणामध्ये रुपांतर करण्यासाठी अनेक उपाय आहेत. १) पुर्वागृह्दुषित विचारी व्यक्तीला सहभागी करणे २) द्वेषाच्या पायावर चालणाऱ्या संस्था आणि व्यक्तीला सहभागी करणे.. ३) कोणालाही अभ्यासू म्हणून उभे करणे ४) निवेदकाने मुद्दाम काही वाक्ये मान्यवरांच्या तोंडी घालणे किंवा त्यांच्याकडून मुद्दाम वादग्रस्त वाक्ये वदवून घेणे. एकंदर अशा वांझोट्या चर्चा पाहणे केव्हाच बंद केले आहे ज्यामध्ये मते तयार होण्यापेक्षा बुद्धिभेद जास्त होवू शकतो... असो... आता मुख्य विषय: आजच्या सह्याद्री महाचर्चा मधील विषय होता "होळी आणि पर्यावरण" १) सूत्रसंचालक प्रदीप भिडे हे फक्त प्रश्न विचारण्याचे काम करत होते... कोणाच्या तोंडी कोणती वाक्ये टाकण्याचा प्रयत्न करत नव्हते. २) फक्त दोनच मान्यवर आणि ते देखील विषयाला अनुसरून पर्यावरण क्षेत्रामध्ये अनेक वर्ष काम करणारे व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाशी सलग्न. ३) कार्यक्रमाचा संपूर्ण रोख हा सणापासून उत्सवाकडे जाण्यासंबंधी होता..थोडक्यात बहुतेक सणाला विकृतीच्या विळख्यातून बाहेर पडणे या बद्दलच्या उपाययोजना करणे यावर बेतला होता.. ४) होळी हा एक सण आहे आणि तो एक भावनिक विषय आहे त्यामुळे तो नाजूक पद्धतीने हाताळयाचा असतो याचे भान निवेदकाला संपूर्ण चर्चेत दिसले. बाप रे.. बरेच लिहावे लागत आहे... आता मुद्दे: १) होळी: - पानझड झाल्यामुळे आजूबाजूला जो कचरा होतो तो होळीसाठी वापरणे अपेक्षित असते. - प्रतिष्ठेसाठी उंच होळी करणे ही सामाजिक विकृती आहे. परंपरेनुसार कुठेही होळीच्या आकारावरून त्याचे महत्त्व सांगण्यात आले नाही. - होळी हा समाजाला एकत्र आणणारा सण आहे आणि असे असताना एका भागामध्ये ३-४ होळी पेटवायच्या ही सामाजिक विकृती आहे. २) रंग: - धुलीवंदन व रंगपंचमी साजरी करण्यामध्ये या मान्यवरांनी कोणतीही हरकत घेतली नाही उलटपक्षी त्यामध्ये नैसर्गिकतेकडून रासायनिकतेकडे हा सण कसा ओढला गेला आहे पुन्हा त्याला मूळरुपामध्ये आणणे हे या पिढीतील सर्वांचे प्रमुख उद्दिष्टे असली पाहिजेत. - रासायनिक रंग रंगपंचमीच काय कुठेही वापरले तरी त्याचे शरीरावर दुष्परिणामच होतात. - पाणी घालून रंग शरीराला लावणे हे कसे अपायकारक आहे याबद्दल माहिती देण्यात आली. - पाणी फक्त धुलीवंदन किंवा रंगपंचमीला नव्हे तर दैनंदिन जीवनातसुद्धा वाचवले पाहिजे कार्यक्रमातील तात्पर्य: - सण, उत्सव आणि परंपरा यांना सरसकट वाईट न म्हणता यामध्ये लोकांनी विकृती आणलेली आहे ती दूर केली पाहिजे. - सण व उत्सव ही समाजाची गरज आहे तरच समाज एकत्र येवून काही विधायक कामे हाती घेवू शकतो. - उगाच अध्यात्मिक किंवा विज्ञानवादी भावनिकता न घेता खरा विवेकी दृष्टीकोन दिसत होता - प्रबोधन हा मार्ग असे सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी उपयुक्त असतो. हे फक्त प्रमुख मुद्दे आहेत..इतरही भरपूर शास्त्रीय माहिती या कार्यक्रमात मिळाली जी सगळी इथे सांगणे कठीण आहे. सर्वांना होळी, धुळवड व रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.. आपले सण समजून त्यांचे उत्सवामध्ये रुपांतर करूया...

वाचन संख्या 3539
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

आवडले. प्रदीप भिडे यांचा एकूण वावर नेहमी आवडण्यासारखा असतो. होळीबद्दलची चर्चाही आवडेली. अशी सुसंवादी भूमिका कोणी क्वचितच घेताना दिसतात.

In reply to by पैसा

आपले म्हणणे खरे आहे आपले म्हणणे.

सह्याद्रीच्या महाचर्चा ह्या खरोखरच छान व उच्च दर्जाच्या असतात. ही चर्चाही तुम्ही म्हणता तशी खरोखरीची विवेकवादी झाली. अडचण अशी आहे की लोकांना फक्त धुराळा उडवणारी भांडणे व सनसनाटीपणा आवडतो.

गाभा स्वरुपातील लेख आवडला. सणांचे विकृतीकरण थांबवून त्याला कालसुसंगत असा पर्यावरणस्नेही पर्याय दिला तर नक्कीच ते उपयुक्त ठरेल. बरेच लोक हे परंपरा पाळण्याच्या बाबत मेंढरे असतात. त्यांना विचार करायला प्रवृत्त करायला पाहिजे. पण त्यांच्या धार्मिकतेला धर्मांधतेकडे घेउन जाण्यात सनातनी यशस्वी होतात.

In reply to by प्रकाश घाटपांडे

खरे आहे. मूलतत्त्ववादी होणे आणि अति पुरोगामी होवून संपूर्ण संस्कृतीला नवे ठेवणे हे दोन्ही समाजासाठी घातकच आहे.

म्हणुनच . . . फक्त दर्जेदार टिव्ही चॅनल्स व त्या वरिल सुयोग्य चर्चा कार्यक्रम पहावेत. आज काल इतरcचॅनेल्स वरच्या चर्चा नावाखाली हाणामा-या पहायचा वीट आलाय. लेख छान आहे. महाराष्ट्र भुमी ही त्यातल्या त्यात प्रागतिक विचाराची असल्या मुळे टप्प्या टप्प्याने आश्वासक बदल नक्की होतील.

In reply to by चौथा कोनाडा

महाराष्ट्र भुमी ही त्यातल्या त्यात प्रागतिक विचाराची असल्या मुळे टप्प्या टप्प्याने आश्वासक बदल नक्की होतील.
हो मी आशावादी आहे गरज आहे बुद्धिभेद होण्यापासून वाचण्याची.