Skip to main content

हिंदुत्व आणि असहिष्णुता! - भाग १

लेखक DEADPOOL यांनी गुरुवार, 24/03/2016 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात म्हणे असहिष्णुता वाढीस लागली आहे! जर भारतात असहिष्णुता आहे तर बोंबाबोंब करणाऱ्यानी खालील प्रश्नाची उत्तरे द्यावीत! १.क्षणोक्षणी बाबरीचा उल्लेख करणाऱ्यानी आजपर्यंत प्रत्येक इस्लामिक शासकांनी किती मंदिरे पाडलीत याचा हिशेब द्यावा! २. जर असहिष्णुता वाढली असेल तर हिंदूंचा आराध्य प्रभु श्रीराम याचा अत्यंत अपमानास्पद उल्लेख करणाऱ्या ओवेसीवर एकाही हिंदूने हल्ला केला का? ३. भारतात ८० कोटी हिंदू आहेत तरीही यू आर अनंतमूर्ती यांचे विधान ऐकून किती हिंदूनी दंगली केल्या? ४. सरकार उजवे आहे व अल्पसंख्यविरोधी आहे तर अजूनपर्यंत अल्पसंख्य आरक्षण का संपवले नाही? ५. दादरी प्रकरनाचा गाजावाजा करतांना तुम्हाला मुम्बईची दंगल आठवत नाही? ६. असहिष्णुता वाढली आहे म्हणून देश सोडून जाऊ म्हणणारे किती लोक देश सोडून गेले ७. देव देवतांची नग्न चित्र काढणारा हुसैन याला आपल्या धर्माच्या प्रेषितची चित्र काढण्याची का बुद्धि सुचली नाही? ८. आणि चार्ली हेब्दो च्या हल्याची तुलना करता हिंदूंनी हुसैनला कोणती शिक्षा दिली? ९. आपण भारत माता की जय ही घोषणा का देतो हा प्रश्न हिंदूंना का पडला नाही? १०. तथाकथित धर्मचिकित्सक व विचारवंत हिंदूधर्माचीच का चिकित्सा करतात? (दुसऱ्या शब्दात का टीका करतात?) अजूनही बरेच प्रश्न आहेत पण त्याबद्दल नंतर!

वाचने 62702
प्रतिक्रिया 482

प्रतिक्रिया

इतका स्फोटक लेख अन् आत्तापर्यंत एकही प्रतिक्रिया नाही ? ये तो बहोत नाइन्साफी हुई ।

असे डायरेक्ट प्रश्न विचारल्यावर काय उत्तर देतात ते बघू. अजून एक प्रश्न - २००२ सालची गुजराथमधील फक्त दंगल आणि मारले गेलेले मुसलमान आठवतात पण त्या आधी जाळलेला रेल्वेचा डबा आणि त्यातील हिंदू नाही आठवत.

उत्तरे क्रमानुसार..... इस्लामी शासकांनी कीती मंदिरे पाडली याचा विदा द्यावा.पवित्र कुराण ए शरीफ ईतर धर्मांचा आदर करायला शिकवते, त्यामुळे इस्लामि शासकांनी मंदीरे पाडली हा खोटा आरोप आहे. ओवेसीवर हिंदूंनी हल्ला केला नाही याचा अर्थ जनाब अकब्रुद्दीन ओवैसी यांनि असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. हिंदूनी कायदा का हातात घ्यावा ! हा प्रश्न मोदीकाकांना विचारा ,कलम ३७० रद्द करायचे धाडस का दाखवले नाही त्यांनी अजुन? PDP शी युती का करत आहेत! मुंबैइची दंगल का आठवावी ! त्यात काय आहे आठवण्यासारखे!! काय माहीत नाय ब्वा,तुमचे नागपुरचे केंद्र विदा ठेवत नाही काय ! हुसैन साहेबांनी हिंदू देवतेचे नग्न चित्र काढले,तर एकाही हिंदू चित्रकाराला आपल्या ब्रशने त्याला उत्तर द्यायचे धाड्स् का झाले नसावे बरे!!!!!! एका विख्यात चित्रकाराला देश सोडावा लागला या सारखी मोठी शिक्षा कोणती! अनेक हिंदूंना हा प्रश्न पडतो, बाबासाहेब आंबेडकरांनाही हा प्रश्न पडला होता,I have no homeland असे ते म्हणायचे. अनेक खुळचट समजूती हिंदू धर्मात असल्याने विचारवंत हिंदू धर्माची चिकीत्सा करतात.

In reply to by गरिब चिमणा

इस्लामी शासकांनी कीती मंदिरे पाडली याचा विदा द्यावा.पवित्र कुराण ए शरीफ ईतर धर्मांचा आदर करायला शिकवते, त्यामुळे इस्लामि शासकांनी मंदीरे पाडली हा खोटा आरोप आहे.

हा घ्या विदा

Menara Kudus Mosque Masjid Menara Kudus in Indonesia, with its original tower. One of Indonesia's most famous mosques, Menara Kudus has retained much of its former Hindu character. Although the main building has been reconstructed, its iconic minaret and front gates are believed to be relics of a Hindu site.https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/8/85/Masjid_Menara_Kudus.jpg/800px-Masjid_Menara_Kudus.jpg Quwwat Al-Islam MosqueThis Jamii Masjid built in the months of the year 587 (hijri) by the Amir, the great, the glorious commander of the Army, Qutb-ud-daula wad-din, the amir-ul-umara Aibeg, the slave of the Sultan, may God strengthen his helpers! The materials of 27 idol temples, on each of which 2,000,000 Deliwal coins had been spent were used in the (construction of) this mosque.https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/6/66/Intricate_stone_carvings_in_the_cloister_of_Quwwat_ul-Islam_mosque%2C_near_Qutub_Minar.jpg/450px-Intricate_stone_carvings_in_the_cloister_of_Quwwat_ul-Islam_mosque%2C_near_Qutub_Minar.jpgअशी अजून शेकडो उदाहरणे आहेत मी फक्त झलक दाखवली आहे. मला इथे कोणत्याही वादाला तोंड फोडायचे नाहीये फक्त आपली माहिती चुकीची आहेत एवढेच सांगायचे आहे.

In reply to by गणेश उमाजी पाजवे

देवळापेक्षा मशीदच जास्त देखणी व मस्त वाटतेय. .... इस्लामी राजानी युद्धात ते प्रदेश जिंकून मग तिथे हे उद्योग केले ना ? युद्धात जिंकलेल्या प्रदेशाचं काय करायचं हे जेताच ठरवणार ना ? हरलेले राजे का हरले म्हणे ? ग्लानिर्भवती होऊन पडले होते की काय ?

In reply to by hmangeshrao

कशाला नव्या आइडिचीही इज्जत काढ्तायेत. आधी उत्तर द्या खाली विचारलेल्या प्रश्नांची. आणि पेशवे, विजयनगरचे राजे आणि छत्रपतीनी का मशिदी पडल्या नाहीत!

In reply to by hmangeshrao

भेंडीबाजार, बेहरामपाड़ा भागात मुस्लिम महिला जेव्हा कपडे घ्यायला जातात तेव्हा कपडा कसाहि असुदे फ़क्त तो चमकीला असला पाहिजे याकडे त्यांचे लक्ष असते. असे कपड़े घरी आणून त्याला चमकणारे आरसे, खड़े लावले की खाला , आपा, मौतर्मा याना जन्नत मिळाल्याचे सुख मिळते, तुम्ही पण त्यातले काय हो? नाय ते चमकीले मीनार बघुन चेकाळलात म्हणुन विचारले.

In reply to by hmangeshrao

भेंडीबाजार, बेहरामपाड़ा भागात मुस्लिम महिला जेव्हा कपडे घ्यायला जातात तेव्हा कपडा कसाहि असुदे फ़क्त तो चमकीला असला पाहिजे याकडे त्यांचे लक्ष असते. असे कपड़े घरी आणून त्याला चमकणारे आरसे, खड़े लावले की खाला , आपा, मौतर्मा याना जन्नत मिळाल्याचे सुख मिळते, तुम्ही पण त्यातले काय हो? नाय ते चमकीले मीनार बघुन चेकाळलात म्हणुन विचारले.

In reply to by गरिब चिमणा

१.इस्लामी शासकांनी कीती मंदिरे पाडली याचा विदा द्यावा.पवित्र कुराण ए शरीफ ईतर धर्मांचा आदर करायला शिकवते, त्यामुळे इस्लामि शासकांनी मंदीरे पाडली हा खोटा आरोप ----१. सोमनाथ मंदिर २. राम मंदिर ३. मूर्तिभंजक तैमूर अजून बरेच आहेत हो, किती विदा द्यावा! २. लिंक घ्या! vnd.youtube:7ukTXuzXb2o?vndclient=mv-google&vndel=watch&vndapp=youtube_mobile ३. हा प्रश्न मोदीकाकांना विचारा ,कलम ३७० रद्द करायचे धाडस का दाखवले नाही त्यांनी अजुन? PDP शी युती का करत आहेत! कारण त्यांना कश्मिरात अस्थिरता ठेवायची नाहीये, तुमच्या भाऊबंदकीच्या लोकांना घुसखोरी करण्यासाठी! ४. मुंबैइची दंगल का आठवावी ! त्यात काय आहे आठवण्यासारखे!!>>>>>>> अशावेळी आपला नेहमीच गजनी होतो. ५.नागपूरच्या केंद्राने का विदा ठेवावा? त्यानी देश सोडून जायला सांगितले नाही! ६. हुसैन साहेबांनी हिंदू देवतेचे नग्न चित्र काढले,तर एकाही हिंदू चित्रकाराला आपल्या ब्रशने त्याला उत्तर द्यायचे धाड्स् का झाले नसावे बरे!!!!!!>>>>>>>>कारण आम्ही सर्व धर्मांचा मान ठेवतो, जे तुमच्या धर्माला अमान्य आहे! यालाच सहिष्णुता म्हणतात. ७. एका विख्यात चित्रकाराला देश सोडावा लागला या सारखी मोठी शिक्षा कोणती!>>>>>>चार्ली हेब्दो वरील हल्यात तर लोकांना जग सोडावे लागले ही मोठी शिक्षा नाही का? आणि हा हुसैन या उपद्व्यापामुळेच विख्यात (कु) झाला. ८.आम्बेड्कर हिंदू होते? ९. अनेक खुळचट समजूती हिंदू धर्मात असल्याने विचारवंत हिंदू धर्माची चिकीत्सा करतात. >>>>>> का तुमच्या धर्माची चिकित्सा केल्यावर डोके उडवले जाईल अशी भीती असते?

इस्लामी शासकांनी कीती मंदिरे पाडली याचा विदा द्यावा.पवित्र कुराण ए शरीफ ईतर धर्मांचा आदर करायला शिकवते, त्यामुळे इस्लामि शासकांनी मंदीरे पाडली हा खोटा आरोप आहे. सिरिया मध्ये यजदि महिलांची विक्री हे कुराणाचा आदर्श ठेवणारे का करीत असावे।

सिरिया मध्ये यजदि महिलांची विक्री हे कुराणाचा आदर्श ठेवणारे का करीत असावे।>>>>>..>> ते पवित्र कुराण ए शरीफला मानत नाहीत.

In reply to by गरिब चिमणा

एक विकीपेडिया नामक संस्थळ आहे. त्यावर इसिस बद्दल माहिती विचारली तर खालील माहिती मिळते इसिस इस्लामीक फंडालीझम मानते आणि ते म्हणजे कुराण जसे आहे तसे घेऊन त्याप्रमाणे वागावे असे सांगते. म्हणजे काय तर जे इस्लाम आणि कुराण मानत नाहीत त्या सर्वांचा नाश करावा. जरा शोधून बघा नाही मिळालं तर मग मी URL देईन. तुम्ही असे कशाच्या जोरावर म्हणता की हे लोक कुराण मनात नाहीत? दुसरे काय मानतात मग?

In reply to by ट्रेड मार्क

विकीपिडीयाची आर्टीकल कुणीही एडीट करु शकतो,हे ईस्लाम व पवित्र कुराण ए शरीफला बदनाम कराय्चे कारस्थान आहे हे सम्जून घ्या.

In reply to by गरिब चिमणा

विकिपीडिया ची आर्टिकल्स राहूद्यात पण तुम्हाला इसीस आणि इस्लाम बद्दल एवढा विश्वास ?कुरानातच लिहिले आहे कि या पृथ्वीवर इस्लाम शिवाय कोणताच धर्म नाही आणि इस्लामेतर व्यक्ती हे सगळे काफिर असून आपण जिहाद करून त्यांचा नाश केला पाहिजे.

In reply to by गणेश उमाजी पाजवे

कुरानातच लिहिले आहे कि या पृथ्वीवर इस्लाम शिवाय कोणताच धर्म नाही आणि इस्लामेतर व्यक्ती हे सगळे काफिर असून आपण जिहाद करून त्यांचा नाश केला पाहिजे.>>>>>>>>>कुराण ए शरीफमध्ये इस्लामची व्याख्या दिली आहे ,जो सज्जन आहे ,सचोटीने वागतो ,अन्यायाविरोधात पेटून उठतो तो खरा मुसलमान आहे.जो दुष्ट आहे अन्यायी आहे त्याला काफीर संबोधले आहे.सचोटीने वागणारा प्रत्येकजण मुस्लिमच आहे,आपणही या व्याख्येत बसत असाल तर आपण काफीर नसून सच्चे मुस्लिमच आहात.

In reply to by गरिब चिमणा

ते बाकीच्या धर्माचे पाठिराखे काय भजि तळत बसणार काय? काय पण!☺ कुराणातल्या अनेक गोष्टि आता कालबाह्य झाल्या आहेत. पण मुस्लिम तेच जर घेऊन जगणार असतील तर अल्ला मालिक!

In reply to by गरिब चिमणा

मिपावर हे प्रबोधन करण्यापेक्षा तुम्ही या दहशतवाद्यांचे प्रबोधन का करत नाही? गरीब बिचारे असंच मानून चाललेत की ते कुराणात सांगितल्याप्रमाणे वागत आहेत. या बदल्यात तुम्हाला जन्नत हासिल होऊन ७२ हूर प्राप्त होतील.

In reply to by गरिब चिमणा

आहे हे असे आपले मत आहे? विकी इसिस किंवा बाकी कोणाही मुस्लिमांना वापरायला बंदी आहे का? जर एवढेच चुकीचे आहे तर कोणी जाउन बदल का केला नाही. असो. विकी सोडून द्या, जालावर कुठेही इसिस , LeT व बाकी समस्त दहशतवादी संघटना आणि त्याबद्दलची माहिती उपलब्ध आहे. तुनळी वर videos आहेत ते बघा. तुमच्याकडे प्रत्यक्ष अनुभवाची काही क्षणचित्रे, चलतचित्रे असतील तर ती पण दाखवा. आणि मग हे लोक्स कुराण नाही तर काय मानतात ते सांगा.

In reply to by गरिब चिमणा

कुणीही एडिट करू शकत नाही! विदा आणि रेफरेन्स असावा लागतो! आइसिस च्या धाग्यावर असलेल्या रेफरेन्स ची यादी बघा!

In reply to by DEADPOOL

ग चि , त जो आणि सर्व तथाकथित सेकुलर मंडळी , कधीतरी उत्तर द्या कि. कि मिपावर फक्त दुसर्यांना विदा आणि संदर्भ मागण्याचा धंदा करता तुम्ही ? तुमची काही ठेवणीतली उत्तरे जी प्रत्येक वेळी देऊन तुम्ही निसटून जाता. "ते" पवित्र कुराण ए शरीफला मानत नाहीत. "ते" भरकटलेले मुस्लिम आहेत "ते" खरा इस्लाम जाणत नाहीत "त्यांनी" जे केले ती फक्त एक नैसर्गिक प्रतिक्रिया होती . इस्लाम मध्ये असे काहीच नहिये. इस्लाम हा शांती चा धर्म आहे. हे ईस्लाम व पवित्र कुराण ए शरीफला बदनाम कराय्चे कारस्थान आहे सगळी चूक अमेरिकेची आहे. अशी ठेवणीतली उत्तरे आता बस करा आणि मुद्द्याचे काय ते बोला. आणि एवढेच जर तत्वज्ञानी असाल तर इथे जसा आम्हाला शिकवता तसे शिकवण्यासाठी , "खरा इस्लाम" नावा ने क्लासेस काढा, आणि पहिल्यांदा आपण ज्यांची वकिली करता ( दहशतवादि ) त्यांना शिकवा. प्रत्येक विद्यार्थ्याच्या फी चे पैसे आम्ही द्यायला तयार आहोत. :)

In reply to by बाप्पू

इथे मला उद्देशून प्रतिसाद द्यायचे कारण कळले नाही. गरिब चिमणा ह्यांचे वक्तव्य माझ्या नावावर लावण्याचे कारण कळले नाही. वरील आठ वाक्यांपैकी एकही वाक्य मी कधीच कुठेच वापरलेले नाही. नको ते आरोप करण्याची गरज नाही.

मला कधी कधी असे वाटते कि गरीब चिमणा हे झाकीर नाईक असावेत किंवा नाईकांनी परकाया प्रवेश केला असावा।

"इस्लामी शासकांनी कीती मंदिरे पाडली याचा विदा द्यावा.पवित्र कुराण ए शरीफ ईतर धर्मांचा आदर करायला शिकवते, त्यामुळे इस्लामि शासकांनी मंदीरे पाडली हा खोटा आरोप आहे." @गरीब चिमणा : 'हैबत झरा बघ' च्या तालावर 'चिमण्या डोळे आणि कान उघड आणि आजू बाजूला काय चालले आहे ते पहा.' माझी प्रतिक्रिया जर अपमानकारक वाटत असेल तर.......हेतू तोच होता :-). ज्या विषयावर हा धागा काढलाय त्याचे जिवंत उदाहरण तुम्ही देताय. हिंदू रयतेने वेगवेगळी आक्रमणे सहन केली आणि मान खाली घालून काम(!) करत राहिली. शिवाजी आणि पेश्व्यान्सारखे अपवाद सोडले तर यवनांनी या देशात जो धुमाकूळ घातला तो साहेबाच्या कारामातीन्पेक्षा जास्त आहे हे इतिहासाची २-३ पुस्तके वाचलेले शेंबडे पोर देखील सांगेल. साहेबांनी रस्ते आणि दळणवळण सुरळीत करून देशाला एक दिशा तरी दिली. यवनांची देणगी म्हणजे जमिनीत गाडलेले भग्नावशेष आणि पळवून नेलेले गुलाम. वाईट गोष्ट हि आहे कि हे सगळे ज्ञात असूनही याला प्रतिप्रश्न करणारे लोक (आपल्यासारखे)! युरोपात 'होलोकस्ट डिनायाल' वर एक कायदा आहे (खोलात जात नाही, जमले तर शोधून पहा), तसे काही कायदे तुमच्यासारख्या 'ज्ञानी' लोकांसाठी या देशात असायला हवेत असे वाटायला लागले आहे आता.

In reply to by मम्बाजी सर्वज्ञ

तळटीप : मला स्वतःला हिंदू धर्मातील अंधश्रद्धा आणि काही विचित्र प्रथांबद्दल चीड आहे पण म्हणून सगळ्या पंथाला लाथा मारणे योग्य वाटत नाही. जर हा निकष बाकीच्या धर्मांना लावला तर पृथ्वीवर बोटांवर मोजण्या इतके धर्म सुधा शिल्लक राहणार नाहीत. दोन गोष्टींची तुलना करताना पहिली दुसर्यापेक्षा काही बाबतीत कमी दर्जाची असेल तर 'ती फेकून द्या, वापरायच्या लायकीची नाही' हे म्हणणे जितके बालिश पणाचे आहे तितकेच 'हिंदू धर्मात सगळ्या अंधश्रद्धा भरल्या आहेत' हे वाक्य हे देखील बालिश पणाचे आहे. आजकाल हे सगळीकडे वाचायला मिळते कारण छापणार्यांना चर्चे पेक्षा पोटशूळ काढण्यात जास्त इंटरेस्ट असतो हे चांगलेच समजले आहे.....म्हणूनच पेकाटात एक लाथ घालण्यात अतीव आनंद मिळतो.

In reply to by DEADPOOL

https://mr.m.wikipedia.org/wiki/
वरच्या लिंकवर क्लिक केल्यावर हे दिसले. काय टिंगल्या करता पूलशेठ. आजच्या आशयाचे आकर्षण २०१५ क्रिकेट विश्वचषक ही क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची ११वी आवृत्ती १४ फेब्रुवारी ते २९ मार्च, इ.स. २०१५ दरम्यान ऑस्ट्रेलिया व न्यू झीलँड देशांमध्ये खेळवली गेली. मेलबर्न येथे आय.सी.सी.ने ३० जुलै २०१३ रोजी आयोजित केलेल्या सोहळ्यात २०१५ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये संयुक्तरीत्या आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धेचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर करण्यात आला. एकूण ४४ दिवस चालणाऱ्या ह्या स्पर्धेमध्ये १४ देशांचे राष्ट्रीय संघ सहभागी होणार असून १४ वेगवेगळ्या मैदानांवर हे सामने रंगणार आहेत. स्पर्धेमध्ये एकूण ४९ सामने खेळविले जातील. त्यामधील २६ सामने ऑस्ट्रेलियातील ॲडलेड, ब्रिस्बेन, कॅनबेरा, होबार्ट, मेलबर्न, पर्थ व सिडनी या ठिकाणी तर उर्वरित २३ सामने न्यूझीलंडमधील ऑकलंड, क्राइस्टचर्च, ड्युनेडिन, हॅमिल्टन, नेपियर, नेल्सन आणि वेलिंग्टन येथे खेळविण्यात येतील. साखळी फेरीसाठी १४ देशांना अ आणि ब गटामध्ये विभागण्यात आले. अ गटामध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, बांगलादेश, न्यू झीलँड, पात्रता फेरीतील संघ २, पात्रता फेरीतील संघ ३ चा समावेश होता. तर ब गटामध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे, आयर्लण्ड आणि पात्रता फेरीतील संघ ४ चा समावेश होता. साखळी फेरीमध्ये प्रत्येक संघाचे सहा सामने झाले. विश्वचषकाचा अंतिम सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा ७ गडी राखून विजय मिळवित पाचव्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. पुढे वाचा... मागील अंक - नोव्हेंबर २०१५ - जुलै २०१५ - मे २०१५ - एप्रिल २०१५ - मार्च २०१५ - ऑक्टोबर २०१४ - ऑगस्ट २०१३ - २०१२ मधील सदर लेख - २०११ मधील सदर लेख - २०१० मधील सदर लेख - २००९ मधील सदर लेख - २००८ मधील सदर लेख - मागील अंक पुढील अंक - पुढच्या मुखपृष्ठ सदराबद्दल आपले मत येथे द्या.

In reply to by मितभाषी

हम्म त्यांची लिंक गंडली आहे. त्यांना मराठी विकिपीडियावरील हिंदू_धर्म या धाग्याची लिंक द्यावयाची असावी असा कयास आहे.

In reply to by मितभाषी

भारत सोडून बाकी अजून कुठल्या देशात मराठी बोलतात कि काय? नाही म्हणजे भारतात राहून 'हिंदू म्हणजे काय' असा प्रश्न विचारताय ते बघून राहवले नाही....आणि इतकी वर्षे तिथे राहून जर तुम्हाला समजले नसेल तर विकिपीडिया काय समजावणार!

In reply to by मितभाषी

मनोहर जोशी यांनी निवडणुकीच्या प्रचारात हिंदू धर्माचा उल्लेख मते मिळवण्यासाठी केला आणि म्हणून त्यांची निवडणूक रद्द व्हावी अशी फिर्याद झाली होती . प्रकरण सर्वोच न्यायालया पर्यंत गेले. तेथे जोशींच्या वकिलाने ते हिंदुत्वावर बोलले हिंदू धर्मावर नाही आणि हिंदुत्व ही एक जीवन पद्धति आहे असा युक्तिवाद केला. न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य करून जोशींची निवडणूक रद्द करण्यास नकार दिला.

In reply to by रमेश आठवले

नायालयात काहीही खेळ चालतात हो! आणि एक भिकारडी निवडणुक वाचवण्यासाठी जोशींनी पूर्ण हिंदू धर्माचीच बदनामी केली!

मला तो म्रूत मनुक्शास मन्त्राने जिवन्त करतात तो मन्त्र मिळेल का.

In reply to by टवाळ कार्टा

मला एखादा 'मांत्रिक' असेल तर सांगा. ;) मन्त्र पाहीजे आहे.

In reply to by मितभाषी

मिभा ही तुमची नेहमीची सवय आहे! आपल्या मतानुसार धागा नसला की काहीही प्रतिसाद देऊन धाग्याची गंभीरता घालवायची! असो आपण परत या धाग्यावर आला नाहीत तरी चालेल!

फल्यान्दा ते सुद्द लिवायला सिका, मन्तर कसा वाचनार तुम्ही , ओरंगजेबाची दाढी रजिया सुल्तानला डकवनार तुम्ही! ते गरीब चिमणा वांटेड झालं की राव! आता काय येत नाय ते.

गरीब चिमणाजी , ABP माझा बघता का तुम्ही ? त्यांचे ब्रिद का काय म्हणतात ते माहीत आहे का ? "उघडा डोळे बघा नीट" आपल्याही तेच म्हणावेसे वाटतेय. पुढे आपली मर्जी !

माननिय मिपाकर, सर्वांनी मुस्लिम धर्म स्विकारावा, हा सर्वात उत्तम मार्ग आहे. अत्यंत प्रगत धर्म असलेला तो धर्म आहे.

पार खिचडी करून टाकली आहे मुद्द्यांची। whatapp फॉरवर्ड होता का? मूळ प्रश्न काय होता? असहिष्णुता वाढत आहे कि नाही याबद्दल, बरोबर? यावर कोणते लेख वाचले आहेत आपण, आणि कोणत्या context मध्ये अशी विधाने केली गेली याची माहिती द्यावी। बाकी प्रश्न निरर्थक आहेत।

पहिल्या दोन वाक्यातच तर्कदोष आहे। १. असहिष्णुता वाढणे २. असहिष्णुता "असणे" यात फरक आहे। आधी तुमचे मत सांगा - १. भारतात काही प्रमाणात असहिष्णुता आहे की नाही? २. ज्या लोकांचं असं म्हणणं आहे, कि असहिष्णुता वाढलीये, त्यांनी पुरावे काय दिले आहेत (तुमच्या वाचनात आलेले)? ३. या पुराव्यांचे खंडन करा. मग चर्चा करता येईल सविस्तर।

In reply to by अत्रे

भारतात असहिष्णुता नाही!!!!! आणि पुरावा हवा असेल तर अजूनही पाकिस्तानी हिंदू आणि भारतीय मुस्लिम यांची तुलना करून बघा!

In reply to by DEADPOOL

एखादी गोष्ट आहे कि नाही यासाठी तुलना करणे हा मार्ग योग्य नाही। "तुमच्या कडे आंबे आहेत का" याचं उत्तर हो किंवा नाही एवढंच असतं। शेजाऱ्याकडे आमराई आहे म्हणून comparatively आमच्याकडे आंबेच नाहीत , असे म्हणण्याला काय अर्थ आहे।

In reply to by अत्रे

पण काही गोष्टीत तुलना होऊ शकते. उदा हिंदूंवर भारतात झालेले हल्ले व मुस्लिमांवर भारतात झालेले हल्ले! मुस्लिमांवर भारतात झालेले हल्ले व पाकिस्तानात हिंदूंवर झालेले हल्ले!

In reply to by अत्रे

पण काही गोष्टीत तुलना होऊ शकते. उदा हिंदूंवर भारतात झालेले हल्ले व मुस्लिमांवर भारतात झालेले हल्ले! मुस्लिमांवर भारतात झालेले हल्ले व पाकिस्तानात हिंदूंवर झालेले हल्ले!

अजून एक - एक विधान घ्या. मुंबईत कावळे आहेत. याला disprove करण्यासाठी असे म्हणून चालेल का, कि आमच्या गल्लीत एक पण कावळा मी पाहिला नाही? हे वाक्य सिद्ध करण्यासाठी एक कावळा कुठेही पाहिला तरी sufficient आहे। पण disprove करण्यासाठी पूर्ण मुंबईत कुठेच कावळे नाहीत असे दाखवावे लागेल। तुम्ही असे सांगितले कि ओवेसी वर कोणी हल्ला केला नाही. याने हे सिद्ध होत नाही कि असहिष्णुता नाहीए। त्यासाठी तुम्हाला असे दाखवावे लागेल, कि कोणाही नेत्यावर त्याच्या विधानामुळे आजपर्यंत हल्ला झालेला नाही।

In reply to by अत्रे

कोणत्याही नेत्यांवर ही सार्वत्रिकरण झालं. माझा उल्लेख हिंदू धर्माची बदनामी करणाऱ्या ओवेसीवर होता! आणि जर सर्वच नेत्यांचा उल्लेख करायचा झाला तर धागा कुठल्याकुठे वाहत जाईल! जे तुम्हाला अमान्य आहे!

In reply to by DEADPOOL

ठीक आहे, मग तुमचं असं म्हणणं आहे का, कि हिंदू धर्माविरुद्ध बोलणाऱ्या एकाही नेत्यावर (किंवा माणसावर), त्यांच्या बोलण्यामुळे एकही हल्ला झाला नाही?

In reply to by अत्रे

माझा मुद्दा ओवेसिंचा आहे. आणि हल्ले झालेत हे मान्य आहे. पण ९० कोटी जनता जर हिंदू असेल तर हे प्रमाण अत्यल्प आहे. कीम्बहुना अशा वाक्यांमुळे हिंदूंनी लगेच दंगली केल्या नाहीत. असेच पकिस्तानात कोणी हिंदू इस्लामविरोधात बोलला असता तर?

In reply to by DEADPOOL

आणि हिंदूंविरोधात बोलनार्यावरील हल्ले व इस्लामविरोधात बोलणार्यावरील हल्ले याची तुलना करून बघा! मग सांगा कोण सहिष्णु व कोण असहिष्णु!

In reply to by DEADPOOL

तुम्हाला असे सिद्ध करायचे असेल, कि मुस्लिम लोक जास्त असहिष्णू आहेत, तर ते एखाद्यावेळेस सिद्ध करता येईल. त्यासाठी तेवढा अभ्यास/research करावा लागेल। उगाच आपल्याला वाटत आहे म्हणून खरे असलेच पाहिजे असेही नाही. आणि जरी सिद्ध केले, याचा अर्थ असा होत नाही कि १. हिंदू समाजात असहिष्णुता नाही २. भारतीय समाजात असहिष्णुता वाढत आहे ३. हिंदू समाजात असहिष्णुता वाढत आहे

In reply to by अत्रे

बदल करुन वाचल्यास आपलेच "त्यासाठी तेवढा अभ्यास/research करावा लागेल। उगाच आपल्याला वाटत आहे म्हणून खरे असलेच पाहिजे असेही नाही." स्टेटमेंट आपल्याही वाक्यांना लागू होईल हेवेसांनल.

In reply to by अत्रे

तुम्हाला असे सिद्ध करायचे असेल, कि मुस्लिम लोक जास्त असहिष्णू आहेत, तर ते एखाद्यावेळेस सिद्ध करता येईल. त्यासाठी तेवढा अभ्यास/research करावा लागेल>>>>>>>>>>>>>>>>> त्याचीही गरज नाही, भारताचा इतिहास बघीतल्यावर आपोआप उत्तर मिळेल.