Skip to main content

५ राज्यातील विधानसभा निवडणुक - २०१६

लेखक श्रीगुरुजी यांनी रविवार, 20/03/2016 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
भारतातील ५ राज्यांची विधानसभा निवडणुक ४ एप्रिल ते १६ मे या कालखंडात होत आहे. मतमोजणी १९ मे रोजी आहे. या पाचही राज्यांचा निवडणुकीसाठी आढावा. ____________________________________________________________________________________ (१) पुदुचेरी (पाँडिचेरी) - सर्वात लहान राज्य. हे केंद्रशासित राज्य आहे. राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने अजिबात महत्त्व नाही. लोकसभेच्या ५४३ जागातील फक्त १ जागा या राज्यात आहे. या राज्यात विधानसभेच्या ३० जागा आहेत. इतर सर्व छोट्या राज्यांप्रमाणे इथेही प्रादेशिक पक्ष प्रबळ आहेत. सध्या या राज्यात All India N R Congress (AINRC) हा पक्ष सत्तेवर असून "N R" म्हणजे Namathu Rajiyam (meaning our kingdom). या पक्षाचे संस्थापक N Rangasamy यांच्या आद्याक्षरांवरून N R बनविलेले आहे असेही मानतात. ७ फेब्रुवारी २०११ या दिवशी काँग्रेसमधून बाहेर पडून एन रंगासामी यांनी या पक्षाची स्थापना केली. सध्या एन रंगासामी हेच मुख्यमंत्री आहेत. याच पक्षाचे आर राधाकृष्णन हे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पुदुचेरीतून निवडून आले होते. सध्या हा पक्ष भाजप नेतृत्वाखालील रालोआचा भागीदार आहे. पुदेचेरीत सध्या AINRC चे १६ आमदार असून काँग्रेसचे ७, अद्रमुकचे ५ व द्रमुकचे २ आमदार आहेत. भाजपला या राज्यात कणभरही स्थान नाही आणि आगामी निवडणुकीत भाजपचे तेच स्थान राहणार आहे. या राज्यातील राजकारणाची मला फारशी माहिती नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अजिबात अंदाज नाही. परंतु तिथे कोणताही पक्ष सत्तेवर असला तरी त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात कणभरही फरक पडणार नाही हे नक्की. ____________________________________________________________________________________ (२) तामिळनाडू - - देशाच्या एका कोपर्‍यात असले तरी राष्ट्रीय राजकारणात या राज्याची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. या राज्यात लोकसभेच्या ३९ जागा असून विधानसभेच्या २३४ जागा आहेत. गेली जवळपास ५ दशके या राज्यात दोनच प्रादेशिक पक्ष आलटून पालटून सत्तेवर येतात. भूतकाळात कामराज, मूपनार, कुमारमंगलम, वैजयंतीमाला आणि वर्तमानात जयंती नटराजन (सध्या या काँग्रेसमध्ये नाहीत), पी चिदंबरम, मणी शंकर अय्यर इ. दिग्गज नेते तामिळनाडूतून काँग्रेसला मिळाले. परंतु काँग्रेसला विशेषतः १९७७ नंतर द्रमुक किंवा अद्रमुक यांच्याबरोबर दुय्यम भागीदाराचे स्थान मान्य करावे लागत आहे. तीच गोष्ट भाजपची आहे. कॉंग्रेसची काही हक्काची मते तामिळनाडूत आहेत. परंतु भाजपला इथे फारसे स्थान नाही. भाजपला या राज्यात चेहरा नाही व नाव घेण्यासारखे प्रभावी नेतेही नाहीत. डाव्या पक्षांची थोडी मते आहेत. इतर राष्ट्रीय पक्षांना इथे काहीही महत्त्व नाही. कोणत्यातरी द्रविड पक्षाची मदत त्यांना घ्यावी लागते. तामिळनाडूतील प्रमुख स्थानिक पक्ष अद्रमुक - अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळ्घम् - (AIADMK) : प्रमुख - जयललिता द्रमुक - द्रविड मुन्नेत्र कळ्घम् - (DMK) : प्रमुख - करूणानिधी, इतर नेते - दयानिधी मारन, टी आर बालू, ए राजा, कणीमोळी, एम के स्टॅलिन डीएमडीके - देसिया मुरगोप्पू द्रविड कळ्घम् - (DMDK) : प्रमुख - अभिनेता विजयकांत एमडीएमके - मरूमलार्ची द्रविड मुन्नेत्र कळ्घम् - (MDMK) : प्रमुख - वैको पीएमके - पट्टली मक्कल काट्ची - (PMK) : प्रमुख - माजी केंद्रीय मंत्री अंबुमणी रामदास (हा पक्ष वण्णियार या मागासलेल्या जातीचा प्रातिनिधिक पक्ष आहे) २०११ च्या विधानसभा निवडणुकीत अशी स्थिती होती. अद्रमुक+ : एकूण २०३ अद्रमुक - १५०, डीएमडीके (विजयकांत) - २९, उजवे कम्युनिस्ट - ९, डावे कम्युनिस्ट - १०, एमएनएमके - २, पीटी - २, फॉरवर्ड ब्लॉक - १ द्रमुक+ : एकूण २०३ द्रमुक - २३, काँग्रेस - ५, पीएमके - ३ भाजप व इतर पक्ष - ० २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अशी स्थिती होती. एकूण जागा - ३९ अद्रमुक - ३७ (४४.३% मते), द्रमुक - ० (२३.६% मते), भाजप - १ जागा (५.५०% मते) + पीएमके - १ जागा (४.४०%) या राज्यात १९८४ पासून प्रत्येक निवडणुकीत सत्ताबदल झालेला आहे. १९८४ मध्ये अद्रमुक, १९८९ मध्ये द्रमुक, १९९१ मध्ये पुन्हा अद्रमुक, १९९६ मध्ये द्रमुक, २००१ मध्ये अद्रमुक, २००६ मध्ये पुन्हा द्रमुक आणि २०११ मध्ये पुन्हा अद्रमुक असे आलटून पालटून सत्ता मिळवित आले आहेत. या क्रमानुसार यावेळी द्रमु़कची पाळी आहे. द्रमुकचे ९१ वर्षीय करूणानिधी पुन्हा एकदा नव्या उत्साहाने निवडणुकीला सामोरे जात आहेत. या राज्यात चित्रपट तारे व तारकांचा राजकारणात जबरदस्त प्रभाव असतो. द्रमुक व अद्रमुक व्यतिरिक्त इथे विजयकांत यांचा डीएमडीके, रामदास यांचा पीएमके, वैकोंचा एमडीएमके असे अनेक प्रादेशिक द्रविड पक्ष आहेत. या प्रत्येक पक्षाची स्वतःची व्होटबँक आहे. हे पक्षसुद्धा कोणत्यातरी एका मोठ्या द्रविड पक्षाच्या वळचणीला उभे राहून राजकारण करतात. सध्याच्या अद्रमुकच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर अनेक खटल्यांची टांगती तलवार आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अद्रमुकचे ३९ पैकी ३७ खासदार निवडून आले होते व तो लोकसभेतील तिसर्‍या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला होता. जयललिता मोदींविषयी अनुकूल असल्याचे बोलले जाते. परंतु अजूनपर्यंत त्यांनी भाजपला उघडउघड पाठिंबा दिलेला नाही. अत्यंत लहरी, चक्रम, बेभरवशाच्या व सूडबुद्धी स्वभावाच्या जयललितांबरोबर डील करणे हे अत्यंत अवघड काम आहे. प्राथमिक अंदाज जयललिता पुन्हा एकदा बहुमत मिळवतील असे सांगत असले तरी तामिळनाडूच्या परंपरेप्रमाणे यावेळी द्रमुकला बहुमत मिळेल असे वाटते. ही आपली शेवटची निवडणुक आहे असे भावनिक आव्हान करूणानिधींनी केले तर भावनिक लाटेवर वाहून जाणार्‍या तामिळी मतदारांवर त्याचा निश्चित प्रभाव पडेल. जयललितांना ही निवडणुक सोपी नाही. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी जयललितांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याकांडातील जन्मठेपेची शिक्षा झालेल्या सात जणांची तुरुंगातून सुटका करण्यासाठी केंद्र सरकारला पुन्हा प्रस्ताव पाठवून हा मुद्दा उकरून काढला आहे. करूणानिधींना या प्रस्तावाला विरोध करता आलेला नाही. या वादामध्ये अर्थातच काँग्रेसचा या सुटकेला विरोध आहे, तर भाजप 'नरो वा कुंजरो वा' या भूमिकेत आहे. त्यामुळे या मारेकऱ्यांच्या सुटकेचा विषय यंदाच्या निवडणुकीत गाजण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातच जयललितांना झालेली अटक, चेन्नईतील पूरस्थिती हाताळण्यामध्ये झालेली ढिलाई, अनेक योजनांमध्ये झालेले भ्रष्टाचाराचे आरोप आदी मुद्द्यांवरून जयललितांविरोधात करुणानिधी मैदानात उतरणार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जयललिता यांच्यासोबत युती करणाऱ्या विजयकांत याच्या 'डीमडीके' पक्षाला दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळाल्या होत्या. पण या निवडणुकीत विजयकांत स्वतंत्र लढणार आहे. करूणानिधींच्या स्टॅलिन व अळगिरी या दोन मुलांमध्ये प्रचंड भांडण आहे. अळगिरीला पक्षातून काढून टाकण्यात आले आहे व स्टॅलिनला वारस जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे द्रमुकमध्ये अंतर्गत बंडाळी भरपूर आहे. द्रमुक आणि अण्णा द्रमुक दोघेही एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत असले तरीही दोन्ही पक्षांमधील अनेक नेत्यांची नावे विविध घोटाळ्यांच्या निमित्ताने गाजली आहेत. जयललिता यांना बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी मध्यंतरी तुरुंगवास भोगावा लागला. 'द्रमुक'चे नेते करुणानिधी यांची कन्या आणि खासदार कनिमोळी व पक्षाचे नेते राजा हे टूजी घोटाळ्यात तुरुंगात जाऊन आले आहेत. दोन्ही पक्षांना लक्ष्य करून माजी केंद्रीय आरोग्यमंत्री अंबुमणी रामदास यांच्या पट्टली मक्कल कच्छी (पीएमके) या पक्षाने तिसरा पर्याय देण्यासाठी धडपड चालू केली आहे. मात्र हा अत्यंत छोटा पक्ष आहे. - 'ब्रँड अम्मा'च्या माध्यमातून तमिळनाडूमध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू केलेल्या योजनांचा अण्णा द्रमुकला निश्चितच फायदा होईल. स्वस्तामध्ये सुरू केलेल्या या योजनांमुळे तमिळनाडूतील सर्वसामान्य जनतेसाठी अम्मा तारणहार म्हणून पुढे आल्या आहेत. - जयललितांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा द्रमुककडून प्रचारासाठी वापरला जाणार आहे. - द्रमुक आणि अण्णा द्रमुक हे दोन्ही पक्ष तमीळ अस्मितेचा मुद्दा प्रतिष्ठेचा करतील. - एम. करुणानिधींपुढे द्रमुकमधील बंडखोरी रोखण्याचे आव्हान असेल. स्टॅलिन यांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली असली तरीही ९१ वर्षीय करुणानिधी हाच पक्षाचा प्रमुख चेहरा ठरतील. - 'नम्मकू नमे' या यात्रेच्या माध्यमातून राज्यात एम. के. स्टॅलिन यांनी जयललितांविरोधात केलेला प्रचार महत्त्वाचा ठरू शकतो. - द्रमुक व काँग्रेस युती करणार आहेत. त्यामुळे मतांची फाटाफूट टळेल. मागील निवडणुकीत विजयकांतचा डीएमडीके जयललिताबरोबर होता व त्यांनी २९ जागा जिंकून दुसर्‍या क्रमांकाचा मोठा पक्ष होता. नंतर द्रमुकला विरोधी पक्षनेतेपद मिळू नये यासाठी जयललिताने विजयकांतच्या पक्षाबरोबर दुरावा दाखवून विजयकांतला विरोधी पक्षनेतेपद मिळवून दिले होते. या निवडणुकीत डीएमडीके स्वतंत्र लढणार असल्याने अद्रमुकला तोटा होणार आहे. तामिळनाडूतील सत्ताबदलाच्या परंपरेप्रमाणे यावेळीही तसेच होऊन द्रमुकला बहुमत मिळेल असे मला वाटते. २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे २ खासदार निवडून आले असले व १०% हून अधिक मते मिळाली असली तरी २०११ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला फक्त ८ लाख १९ हजार मते मिळून (२.६% मते) शून्य जागा मिळाल्या होत्या. भाजपचे पूर्वी १९९६ व २००१ च्या निवडणुकीत १-२ आमदार निवडून आले होते. यावेळीही भाजपला जास्तीत जास्त २-३ जागा मिळतील असे वाटते. ____________________________________________________________________________________ (३) केरळ केरळमध्ये लोकसभेच्या २० व विधानसभेच्या १४० जागा आहेत. तामिळनाडूप्रमाणेच इथेही प्रादेशिक पक्षांची रेलचेल आहे. परंतु इथे काँग्रेस व डावे पक्ष या दोन राष्ट्रीय पक्षांचे प्राबल्य आहे. इथे सुरवातीपासूनच दोन आघाड्या आहेत. संयुक्त लोकशाही आघाडी (संलोआ) - यात काँग्रेस व्यतिरिक्त मुस्लिम लीग, केरळ काँग्रेस (मणी गट), क्रांतिकारी समाजवादी पक्ष, संजद, केरळ काँग्रेस (जेकब गट), कम्युनिस्ट मार्क्सिस्ट पक्ष (जॉन गट), जेएसएस हे पक्ष आहेत. डावी लोकशाही आघाडी (डालोआ) - यात डावे कम्युनिस्ट, उजवे कम्युनिस्ट या दोन राष्ट्रीय पक्षांबरोबर निजद, राष्ट्रवादी काँग्रेस, केरळ काँग्रेस (थॉमस गट), समाजवादी काँग्रेस, कम्युनिस्ट मार्क्सिस्ट पक्ष, केरळ काँग्रेस (पिल्लई गट), आयएनएल हे पक्ष आहेत. गंमत अशी की केरळ काँग्रेस हे नाव असलेले ४ वेगवेगळे पक्ष असून ते वेगवेगळ्या गटांच्या नावे ओळखले जातात. दोन्ही आघाड्यात दोनदोन गट आहेत. २०११ मध्ये संलोआने १४० पैकी ७२ जागा मिळवून निसटते बहुमत मिळवून सत्ता स्थापन केली. डालोआला ६८ जागा मिळाल्या होत्या. या दोन आघाड्यांच्या एकूण मतात १% पेक्षाही कमी फरक होता. भाजपने १३९ जागा लढवून एकही जागा मिळाली नव्हती. या राज्यात भाजपने आजतगायत खाते उघडलेले नाही. या राज्यात डावे पक्ष व भाजप/संघ यांच्यात कायम हिंसक चकमकी सुरू असतात. गेल्या काही महिन्यात भाजप/संघाच्या काही कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ले होऊन त्यात एकाचा प्राण गेलेला आहे. २०११ मध्ये अशी स्थिती होती. एकूण जागा - १४० संलोआ (४५.८३% मते) - काँग्रेस (३९), मुस्लिम लीग (२०), केरळ काँग्रेस मणी गट (७), इतर चिल्लर पक्ष (७) डालोआ (४४.९% मते) - डावे कम्युनिस्ट (४४), उजवे कम्युनिस्ट (१३), निजद (४), राष्ट्रवादी काँग्रेस (२), इतर चिल्लर पक्ष (५) भाजप - ६:०३% आणि शून्य जागा २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अशी स्थिती होती. एकूण जागा - २० काँग्रेस - ८ (३१.१% मते) + मुस्लिम लीग - २ (४.५०% मते) + केरळ काँग्रेस - १ (२.४०% मते) सीपीआयएम - ५ (२१.६०% मते) + सीपीआय - १ (७.६०% मते) + डाव्या आघाडीने पाठिंबा दिलेले अपक्ष - २ + आरएसपी - १ भाजप - ० (१०.३० % मते) सध्या काँग्रेसचे ओमान चंडी हे मुख्यमंत्री आहेत. या राज्यात अंदाजे २६% ख्रिश्चन, १८ टक्के मुस्लिम व ५०% हून अधिक हिंदू आहेत. मात्र काँग्रेसने २००१ मध्ये ए के अँटोनी व ओमान चंडी व नंतर २०११ पासून ओमान चंडी हे दोन्ही ख्रिश्चन मुख्यमंत्री दिले आहेत. भाजपवर सातत्याने जातीयवादी, धार्मिक भेदभाव करणारा पक्ष अशी टीका करणारी काँग्रेस केरळमध्ये अनेक दशकांपासून मुस्लीम लीग या जातीयवादी पक्षासोबत युतीत आहे. मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाही ओवेसीच्या एमआयएम चा काँग्रेसला पाठिंबा होता. केरळमधील अब्दुल नासीर मदानी हे वेगळेच प्रस्थ आहे. १९९२ मध्ये एका हल्ल्यात उजवा पाय गमाविलेला मदानी १९९८ मधील कोईमतूर बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी होता (त्यात लालकृष्ण अडवाणींच्या सभेपूर्वी अनेक ठिकाणी बाँबस्फोट होऊन ६० जणांचा मृत्यु झाला होता.). त्या आरोपाखाली साडेनऊ वर्षे तुरूंगात काढल्यावर त्याची पुराव्याअभावी मुक्तता झाली. सध्या तो २००८ मध्ये बंगळूरात झालेल्या बॉम्बस्फोटाच्या मालिकेतील प्रमुख आरोपी आहे. २००७ मध्ये मदानीला जामिनावर मुक्त करावे असा ठराव तामिळनाडू विधानसभेत प्रचंड बहुमताने मंजूर झाला होता. भाजपचे १-२ आमदार वगळता सर्व द्रविड पक्ष, डावे पक्ष व काँग्रेसने ठरावाला पाठिंबा दिला होता. नंतर काही काळाने तो जामिनावर सुटल्यावर केरळमध्ये सर्व पक्षांनी त्याच्या स्वागताचे बॅनर लावले होते. हा मदानी यावेळी कोणाच्या बाजूने आहे ते अजून नक्की दिसत नाही. २०१६ च्या निवडणुकीत पुन्हा एकदा संलोआ आणि डालोआ या दोन आघाड्यातच चुरस आहे. भाजपने वेलापल्ली नटेशन यांच्या भारत धर्म जन सेना (बीजेडीएस) या पक्षाशी युती केली आहे. यावेळी डालोआला सत्ता मिळण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे यावेळी प्रथमच भाजप खाते उघडून २-३ जागा मिळवेल असे वाटते. भाजपने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत १०% हून अधिक मते मिळविली होती. २०१५ मधील नगरपालिकांच्या निवडणुकीतही भाजपने बर्‍यापैकी यश मिळविले होते. बीजेडीएस हा इझवा या मागासवर्गीय जातीचे प्रतिनिधित्व करणारा पक्ष आहे. हा समाज आतापर्यंत परंपरेने डाव्या आघाडीच्या पाठीशी राहात होता. आत त्यात थोडीफार फूट अपेक्षित असल्याने जे काही संभाव्य खिंडार पडेल ते डाव्यांच्या मतपेढीलाच पडेल, असे मानले जात आहे. भाजपने विधानसभेत चंचूप्रवेश केल्यास तो एक इतिहास असेल. तामिळनाडूप्रमाणेच भाजपला या राज्यातही चेहरा नाही व नाव घेण्यासारखे प्रभावी नेतेही नाहीत. गेल्या निवडणुकीत तीन मतदारसंघात पक्षाचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. माजी केंद्रीय मंत्री ओ. राजगोपाल, प्रदेशाध्यक्ष के. राजशेखरन हे पक्षाचे राज्यातील प्रमुख चेहरे असतील. भाजप आघाडी राज्यात जेवढी चालेल तेवढा फटका डाव्यांना बसेल, असा आडाखा असल्यामुळे काँग्रेस पुन्हा विजयाची खात्री देत आहे. सध्याच्या चंडी सरकारवर भ्रष्टाचाराचे (सौर ऊर्जा घोटाळा, बार परवान्यांसाठी लाच घोटाळा आदी) आरोप आहेत. मात्र, मुख्यमंत्री चंडी प्रचंड लोकप्रिय नेते आहेत; तसेच दारूबंदीच्या निर्णयामुळे महिला वर्गाचा पाठिंबा त्यांना आहे. काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यास तोही एक इतिहास ठरेल, कारण प्रत्येक निवडणुकीत विरोधी आघाडीला विजयी करणे, हे केरळचे वैशिष्ट्य आहे. यंदाच्या निवडणुकीतही चंडीच यूडीएफचे नेतृत्व करतील, अशी शक्यता आहे. मात्र, पक्षाचे आणखी एक ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला हे त्यांचे स्पर्धक मानले जातात. काँग्रेस सरकारविरोधातील प्रस्थापितविरोधी लाटेचा फायदा आपल्याला मिळेल, अशी आशा डाव्या आघाडीला वाटते आहे. त्याचबरोबर काँग्रेस आघाडीच भाग असलेल्या केरळ काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. हा फुटीर गट डाव्या आघाडीकडे आला आहे. त्याचबरोबर जनतीपथिया संरक्षा समिती (जेएसएस) हा छोटा पक्षही यूडीएफमधून बाहेर पडून डाव्या आघाडीकडे आला आहे. चंडी सरकारच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून डावी आघाडी प्रचारात रान उठवेल, यात शंका नाही. डाव्यांसाठी ही निवडणूक अस्तित्वाची आहे. सध्या त्रिपुरा वगळता एकाही राज्यात डाव्यांची सत्ता नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांना बांधून ठेवायचे असल्यास केरळ जिंकणे त्यांना आवश्यक आहे. मात्र, पक्षाचे नेतृत्व कोणी करायचे हा मोठा मुद्दा आहे. माजी मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन आणि माकपचे प्रदेशाध्यक्ष पिनराई विजयन हे दोन दिग्गज नेते पक्षाकडे आहेत. अच्युतानंदन अनुभव असलेले लोकप्रिय नेते आहेत; पण त्यांचे वय ९३ वर्षे आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा भार ते कसा पेलणार, याविषयी शंकाच आहे. तरीही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचा कल अच्युतानंदन यांच्याकडेच आहे. विजयन यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते, मात्र त्यातून ते निर्दोष सुटले. तरीही केरळमधील कॅथलिक चर्चशी त्यांचे संबंध फारसे सलोख्याचे नाहीत. नामशेष होण्याच्या दिशेने चाललेल्या डाव्या पक्षांनी केरळ जिंकल्यास तोही एक इतिहासच ठरेल. पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांशी चुंबाचुंबी करण्याचा प्रयत्न काँग्रेस करीत आहे. त्याच्या निषेधार्थ तॄणमूल काँग्रेस केरळमधील सर्व १४० जागा लढविणार आहे. शिवसेना देखील केरळमध्ये ४५ जागा लढविणार आहे. ____________________________________________________________________________________ (४) पश्चिम बंगाल - - पश्चिम बंगालमधील प्रमुख डावे पक्ष माकप - मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (CPIM) म्हणजेच डावे कम्युनिस्ट भाकप - भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) म्हणजेच उजवे कम्युनिस्ट फॉरवर्ड ब्लॉक (AIFB) क्रांतिकारी समाजवादी पक्ष (RSP - Revolutionary Socialist Party) २०११ च्या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये खालील चित्र होते. एकूण जागा - २९४ तृणमूल काँग्रेस (१८४ जागा, ३८.९३% मते) + काँग्रेस (४२ जागा, ९.०९% मते) - एकूण २२६ जागा, ४८.०२% मते डावी आघाडी (सीपीआय, सीपीआयएम, फॉरवर्ड ब्लॉक, आरएसपी) - एकूण ६० जागा, ३९.६८% मते भाजप - शून्य जागा, ४.०६% मते बाकी इतर सर्व पक्ष या राज्यात नगण्य आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अशी स्थिती होती. एकूण जागा - ४२ तृणमूल काँग्रेस - ३४ (३९.३% मते), सीपीआयएम - २ (डावी आघाडी एकूण मते - २९.५% मते), भाजप - २ जागा (१६.८% मते), काँग्रेस - ४ जागा (९.६% मते) २०११ च्या तुलनेत तॄणमूल काँग्रेस व काँग्रेसच्या एकूण मतांची टक्केवारी जवळपास तेवढीच राहिली. भाजपची १२% अधिक मते वाढली तर डाव्या आघाडीची १०% हून अधिक मते कमी झाली. डाव्या आघाडीची मते भाजपकडे गेल्याचे निदान आकडेवारीवरून तरी वाटते. डाव्या आघाडीने बंगालमध्ये १९७७ ते २०११ या काळात तब्बल ३४ वर्षे सलग राज्य केले. या काळात त्यांनी सलग ७ विधानसभा निवडणुका जिंकल्या. परंतु अनेक दशके सातत्याने डाव्या आघाडीला प्रखर विरोध करणार्‍या ममता बॅनर्जींनी २०११ मध्ये डाव्या आघाडीची मक्तेदारी संपवून सत्ता त्यांच्याकडून हिसकावून घेतली. त्यानंतर गेल्या ५ वर्षात ममतादिदींचा कारभार अत्यंत वादग्रस्त राहिलेला आहे. अत्यंत लहरी, चंचल व बेभरवशाच्या असलेल्या ममता बॅनर्जी अत्यंत लढावू वृत्तीच्या आहेत. अनेक वर्षे डाव्यांबरोबर संघर्ष करून कधी काँग्रेसबरोबर, कधी भाजपबरोबर तर कधी स्वबळावर निवडणुक लढवून त्यांनी हिंमतीने सत्ता मिळविली. गेल्या ५ वर्षात शारदा चिट फंड प्रकरण अतिशय गाजले. हजारो गुंतवणुकदारांच्या कोट्यावधी रूपयांची फसवणूक केल्याचे बालंट तृणमूलच्या काही नेत्यांवर आले आहे. काही काळापूर्वीच घडलेले माल्डा जिह्यातील जातीय हिंसाचाराचे प्रकरण आणि याच आठवड्यात उघडकीला आलेले तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी पैसे घेतल्याचे स्टिंग ऑपरेशन तॄणमूलच्या अंगावर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परंतु ममता बॅनर्जींची लोकप्रियता कायम आहे. आतापर्यंत झालेल्या बहुतेक नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने बहुमत मिळविलेले आहे. यावेळची निवडणुक वैशिष्ट्यपूर्ण आहे. आश्चर्य म्हणजे काँग्रेस व डावी आघाडी यांच्यात युती होण्याची शक्यता आहे. या दोन्ही पक्षांच्या अस्तित्वाचा प्रश्न असल्याने कॉंग्रेस व डावे पक्ष हे दोघेही एकमेकांना डोळा मारत आहेत. राज्यात प्रबळ विरोधक नसणे आणि सरकारविरोधी भावना बळकट नसणे ही ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेससाठी जमेची बाजू आहे. विरोधक प्रबळ नसले तरी दोन विरोधी एकत्र आले, तर मात्र ताकद वाढते. या न्यायाने डावे पक्ष आणि काँग्रेस यांची आघाडी झाली, तर मात्र ममता बॅनर्जी यांच्यासाठी निवडणूक चुरशीची होऊ शकते. केरळमध्ये काँग्रेस व डावे एकमेकांविरूद्ध लढत आहेत, पण बंगालमध्ये ते युतीची बोलणी करीत आहेत. या विसंगतीचे सोनिया गांधी व येचुरी कसे समर्थन करणार याचे कुतुहल वाटते. देशात इतरत्र हे दोन पक्ष एकमेकांविरूद्ध लढतात. पण बंगालमध्ये या दोन पक्षांची खरोखरच युती झाली तर ही विसंगत शय्यासोबत बंगालमधील मतदारांना आवडते का ते मतमोजणीच्याच दिवशी समजेल. Politics makes strange bedfellows हेच शेवटी खरं. ममता बॅनर्जी यांची गेल्या पाच वर्षांतील कारकीर्द फारशी लक्षणीय ठरली नाही. डाव्यांच्या काळात असलेला बंगाल आजही तसाच आहे. फक्त डाव्यांच्या प्रभावाखाली असलेल्या नोकरशाहीवर त्यांनी चांगली पकड बसविली हे ममता बॅनर्जी यांचे पहिले यश आहे. डाव्यांना राज्यांतून उखडताना ते पुन्हा प्रबळपणे विरोधक म्हणूनही उभे राहणार नाहीत याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली. विकासाच्या पातळीवर राज्याचे ब्रँडिंग करण्याचा त्यांनी प्रयत्न केला; पण तरीही त्यांच्यातील नकारात्मक दृष्टिकोन आणि अस्थिरता कायम राहिली. सत्तेवर असताना केंद्र सरकारशी कशा प्रकारचे संबंध ठेवायचे हेही त्यांना नीटपणे निश्चित करता आले नाही. त्यामुळेच केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध विशेषतः गेल्या दोन वर्षांत ताणलेले राहिले. ममता बॅनर्जी यांच्या कारकिर्दीतील सर्वांत मोठी घटना म्हणजे सारदा चिटफंड घोटाळा ही होती. गरीब लोकांचे पैसे या चिटफंडमधून हडप करण्यात आले. त्यात ममता बॅनर्जी यांच्याच जवळचे खासदार आणि नेते सहभागी होते. या घोटाळ्याने पश्चिम बंगाल हादरला होता. मात्र, असे असूनही याचा फायदा विरोधक म्हणून डाव्या पक्षांना आणि काँग्रेसलाही उठवता आला नाही. हे प्रकरण जर डाव्यांच्या सत्तेखाली घडले असते आणि त्यात डावे नेते अडकले असते, तर ममता बॅनर्जी यांनी पूर्ण राज्यात आंदोलनाचा धुरळा उडवून दिला असता. दुर्देवाने याचा फायदा उचलण्याची ताकद डाव्यांमध्ये राहिली नाही. तीच स्थिती काँग्रेसची आहे. २०११ च्या निवडणुकीत काँग्रेसने तृणमूल काँग्रेसबरोबर आघाडी करीत ४२ जागा जिंकल्या, तरी ममतांनी काँग्रेसला पुढे फारसे महत्त्व दिले नाही. सत्तेतही वाटा दिला नाही. काँग्रेसचे प्रदेश नेतृत्व अगदीच कमकुवत राहिले. त्यामुळे काँग्रेस आज डाव्यांच्या वळचणीला जाण्याचा प्रयत्न करताना दिसते. भाजपने फार पूर्वी श्यामाप्रसाद मुखर्जी जनसंघाचे अध्यक्ष असण्याच्या काळात बंगालमध्ये एका निवडणुकीत तब्बल १३ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर अशी कामगिरी त्यांना कधीही जमली नाही. यावेळीही भाजप जवळपास त्याच अवस्थेत आहे. इतर राज्यांप्रमाणेच भाजपला या राज्यातही चेहरा नाही व नाव घेण्यासारखे प्रभावी नेतेही नाहीत. भाजपने या निवडणुकीसाठी 'महाभारत' या दूरदर्शनवरील प्रसिद्ध मालिकेतील द्रौपदीची भूमिका केलेली अभिनेत्री रूपा गांगुलीला तिकिट दिले आहे. तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू (grandnephew) चंद्र बोस हे भाजपच्या तिकिटावर ममता बॅनर्जींच्या विरोधात उभे राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीत जरी भाजपने जवळपास १७% मते मिळवून लोकसभेच्या २ जागा जिंकल्या तरी विधानसभेत मात्र भाजपला इतकी मते मिळण्याची शक्यता नाही. भाजप या राज्यात फारतर ३-५ जागा जिंकू शकेल. राज्यात ३५ ते ३७ टक्के मुस्लिम मते आहेत. त्यातील बहुसंख्य मते ममतांकडे आहेत. हिंदू मते तृणमूलपासून दूर जात आहेत. त्यामुळे निवडणूक जिंकण्यासाठी ममता बॅनर्जी यांना अजून १० ते १२ टक्के मतांची गरज लागणार आहे. काँग्रेसने जर तृणमूलशी युती केली, तरच ही मते ममतांना मिळू शकतील. ती शक्यता आता नाही. तृणमूलनेच काँग्रेसशी आघाडी न करण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसकडे डाव्यांजवळ जाण्याशिवाय पर्याय नाही. मतांच्या या गणितात डावे आणि काँग्रेस एकत्र आले, तर राज्यात चुरस होऊ शकते. या निवडणुकीत पुन्हा एकदा तॄणमूल काँग्रेस बहुमत मिळविण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेस व डावी आघाडी यांची युती झाली तर निवडणुक प्रचंड चुरशीची होईल व कदाचित अधांतरी विधानसभा निर्माण होईल. अशा परिस्थितीत ममता बॅनर्जी भाजपशी छुपा समझोता करू शकतात कारण भाजपकडे किमान ५% मते आहेतच. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २ जागा जिंकताना २४ विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळविली होती. परंतु विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इथे भाजप असून नसल्यासारखाच आहे. भाजप फार तर ३-५ जागा मिळवेल. ____________________________________________________________________________________ (५) आसाम आसाममधील प्रमुख पक्ष काँग्रेस, भाजप, आसाम गण परिषद, ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (एआययुडीएफ), बोडोलँड पीपल्स फ्रंट (बीपीएफ) २०११ च्या निवडणुकीत आसाममध्ये खालील चित्र होते. एकूण जागा - १२६ काँग्रेस (७८ जागा, ३९.३९% मते), एआययुडीएफ (१८ जागा, १२.५७% मते), बीपीएफ (१२ जागा, ६.१३% मते), आसाम गण परीषद (१० जागा, १६.२९% मते), भाजप (५ जागा, ११.४७% मते), तृणमूल काँग्रेस (१ जागा, २.०५% मते), अपक्ष (२ जागा) आसाममध्ये बर्‍याच मतदारसंघात एका विशिष्ट पक्षाच्या मतांचे ध्रुवीकरण झाल्याचे दिसून येते. बीपीएफ ला फक्त ६.१३% मते मिळून सुद्धा १२ जागा मिळाल्या. पण आसाम गण परीषद (१६.२९% मते) व भाजप (११.४७% मते) यांना जास्त मते मिळूनसुद्धा कमी जागा मिळाल्या. एआययुडीएफ सुद्धा मते १२.५७% मिळाली पण जागा मात्र १८ मिळून तो दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष बनला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अशी स्थिती होती. एकूण जागा - १४ काँग्रेस - ३ (२९.६०% मते), भाजप - ७ जागा (३६.५०% मते), एआययुडीएफ - ३ (१४.८०% मते), आसाम गण परीषद - ० (३.८०%), अपक्ष - १ २०११ च्या तुलनेत काँग्रेसने जवळपास १०% मते गमाविली, भाजपने जवळपास २५% मते जास्त मिळविली, एआययुडीएफने देखील २% मते जास्त मिळविली आणि आसाम गण परिषदेने १२% हून अधिक मते गमाविली. भाजपला जी जास्तीची २५% मते मिळाली आहेत ती काँग्रेस व आसाम गण परीषदेकडून आलेली दिसतात. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आसाम गण परीषद व बीपीएफ बरोबर युती केलेली आहे. परंतु सर्वच पक्षातून काही जणांनी या युतीला विरोध केलेला आहे. भाजपच्या काही स्थानिक नेत्यांच्या दाव्यानुसार आसाम गण परीषद व बीपीएफ या दोन्ही पक्षांचा प्रभाव अत्यंत कमी झाला आहे. २०१० मध्ये Bodoland territorial council च्या निवडणुकीत बीपीएफ ने ४० पैकी ३३ जागा मिळविल्या होत्या. परंतु २०१५ मध्ये त्यांना फक्त २० जागा मिळाल्या. भाजपच्या काही नेत्यांना असे वाटते की लोकसभा निवडणुकीत बोडो नसलेल्या इतर जमाती भाजपमागे उभ्या होत्या. परंतु भाजपने आता बीपीएफशी युती केल्याने ही मते भाजपपासून दूर जाण्याची शक्यता आहे. बोडो व इतर आदिवासी जमातीत काही काळापासून संघर्ष सुरू आहे. २०१२ ते २०१४ या काळात किमान १०० जणांचा मृत्यु झाला होता व ५०००० नागरिक बेघर झाले होते. डिसेंबर २०१४ मध्ये बोडो बंडखोरांनी ७० आदिवासींची हत्या केली होती. आसाम गण परीषदेला भाजपने २४ जागा दिल्याने दोन्ही पक्षात असंतोष आहे. भाजप १२६ पैकी फक्त ९० जागा लढवित असून उरलेल्या जागा मित्रपक्षांना दिलेल्या आहेत. भाजपने केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केले आहे. सोनोवाल पूर्वी आसाम गण परीषदेत होते. काँग्रेसमधून हिमंता बिस्व सर्मा व कामख्य प्रसाद तशा हे भाजपत आले आहेत. कामख्य प्रसाद तशा आता भाजपच्या तिकिटावर मुख्यमंत्री तरूण गोगोईंविरूद्ध उभे आहेत. इतर राज्यांप्रमाणे याही राज्यात भाजपकडे चेहरा व प्रभावी स्थानिक नेते नाहीत. भाजपबरोबर युती मान्य नसलेल्या आसाम गण परीषदेतील काही नेत्यांनी AGP Jatiyatabadi Mancha (AGP Regionalist Forum) हा पक्ष स्थापन केला आहे. भाजपमधील काही नेत्यांनी तॄणमूल भाजप नावाचा नवीन पक्ष स्थापन केला आहे. हे दोन्ही पक्ष भाजप+ आघाडीविरूद्ध लढणार आहेत. सत्ताधारी काँग्रेसने नव्याने स्थापन झालेल्या United People's Party या पक्षाशी युती केली आहे. या पक्षाला All Bodo Student Union या संघटनेचा पाठिंबा आहे. या पक्षाला राज्यात बर्‍यापैकी आधार आहे. या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष वेधून घेत आहे तो एआययुडीएफ हा पक्ष. बद्रुद्दीन अजमल या धनाढ्य उद्योगपतीने स्थापन केलेल्या या पक्षाने २०११ च्या विधानसभा निवडणुकीत १८ जागा जिंकून दुसरा क्रमांक मिळविला होता. अजमल हे परफ्युम च्या व्यवसायातील एक मोठे नाव आहे. आसाममध्ये किमान ३५ मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या ४०% ते ८०% टक्के आहे. यात अनेक बेकायदेशीर स्थलांतरीत आहेत. या ३५ मतदारसंघांवरच या पक्षाची भिस्त आहे. या पक्षात अनेक बांगलादेशी स्थलांतरितांचा समावेश आहे. आसामचा भविष्यातील मुख्यमंत्री बांगलादेशी स्थलांतरीत असण्याची भीति अनेकांना वाटते ती या पक्षामुळेच. या पक्षाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही ३ जागा जिंकल्या होत्या. राज्यात फारसे स्थान नसलेल्या संजद व राजद या दोन पक्षांनी एआययुडीएफशी युती केली आहे. जर काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळाले नाही तर काँग्रेस या पक्षाची मदत घेऊ शकते. भाजपला सर्वाधिक संधी असेल तर ती याच राज्यात. काँग्रेस सलग १५ वर्षे सत्तेत असल्याने कॉंग्रेसला प्रस्थापितविरोधी लाटेचा फटका बसण्याची शक्यता आहे. भाजपचा लोकसभा निवडणुकीच्या यशाची पुनरावृत्ती करणे अवघड आहे. एआययुडीएफचे जबरदस्त आव्हान दोन्ही पक्षांपुढे आहे. भाजप व आसाम गणपरीषदेतील बंडखोरी भाजपला त्रासदायक ठरणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस पुन्हा एकदा बहुमताचा ६४ हा आकडा पार करण्याची शक्यता खूपच कमी आहे. भाजप आघाडी फार तर ४०-५० जागा मिळवू शकेल असे वाटते. भाजप ३०-४० जागा मिळवून सर्वाधिक मोठा पक्ष असू शकेल. एआययुडीएफ आघाडी देखील आपल्या जागा वाढविण्याची शक्यता आहे. एकंदरीत त्रिशंकू विधानसभा असण्याची शक्यता वाटते. __________________________________________________________________________________ या ५ राज्यातील निवडणुकांचे निकाल राष्ट्रीय राजकारणावर परीणाम करण्याची शक्यता शून्य आहे. या निवडणुकीत भाजपला गमवायचे काहीच नाही. सध्या सर्व राज्यात मिळून भाजपचे १० पेक्षा कमी आमदार आहेत. या निवडणुकीनंतर भाजपच्या एकूण आमदारांची संख्या ४०+ असेल. कदाचित भाजप आसाममध्ये सरकार बनविण्याच्या स्थितीत असेल. भाजप केरळमध्ये प्रथमच खाते उघडण्याची शक्यता आहे. बंगालमध्ये देखील मोठ्या कालावधीनंतर भाजप विधानसभेत प्रवेश करेल. जुलै २०१७ मध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणुक आहे. या निवडणुकीत राज्यसभा व लोकसभेचे सर्व खासदार व सर्व राज्यातील आमदार मतदान करतात. या निवडणुकीनंतर भाजपच्या आमदारांची संख्या निश्चित वाढणार आहे. भाजपला त्याचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी फायदा होईल. तसेच भविष्यात आसाममधून राज्यसभेवर एखादा खासदार निवडून आणणेही शक्य होईल. काँग्रेस केरळ व आसाम गमाविण्याची शक्यता आहे. तामिळनाडूत द्रमुकबरोबर युती झाली व बंगालमध्ये डाव्या पक्षांबरोबर युती झाली तरच काँग्रेसला या दोन्ही राज्यातले अस्तित्व टिकविता येईल. डावे पक्ष केरळमध्ये पुन्हा एकदा सत्ता मिळविण्याची शक्यता आहे. बंगालमध्ये ते स्वतंत्र लढले तर त्यांचे तिथले अस्तित्व संपून जाईल. ____________________________________________________________________________________ वरील लेखात काही तपशीलांच्या व आकडेवारीच्या चुका असण्याची शक्यता आहे. चुभूदेघे. ____________________________________________________________________________________ इति लेखनसीमा

वाचने 31072
प्रतिक्रिया 147

प्रतिक्रिया

व्यासंग पूर्ण लेख आहे. पुढील दोन महिने निवडणुकींच्या रणधुमाळी विषयी बातम्या येत रहातील. त्या समजून घेण्यासाठी या धाग्याचा चांगला उपयोग होइल.

अब आयेगा मजा ! '' एक वर्षानंतर " चि तर हजारी झालि. ये उससे भि उपर जायेगा. इस बार कॉग्रेस, भाजपा के साथ साथ 'लाल सलाम' वाले भि हय परतिसाद देनेकु.

In reply to by गरिब चिमणा

या पूर्वी भाजपा या राज्यांच्या विधानसभा मध्ये अस्तित्वातच नसल्या सारखी होती. त्या मुळे आता ज्या जागा मिळतील त्यांना प्रगतीची निशाणी म्हणता येईल .

काँ. व कमुनिस्ट = शय्यासोबत ? काश्मिरात भाजपा करते ते काय ? प्लेटॉनिक लव्ह ?

In reply to by hmangeshrao

काश्मीर मध्ये निवडणुकीच्या निर्णया नंतर करावी लागणारी तरतूद ही वास्तवाशी केलेली तडजोड आहे. बंगाल मध्ये निवडणुकी आधी केलेली अनैसर्गिक गळाभेट ही आस्तित्वाच्या भीती पायी केलेली तडजोड आहे.

In reply to by hmangeshrao

प्ले फाॅर मेहबूबा, टाॅनिक फाॅर भाजप असं ते प्लेटाॅनिक लव्ह आहे.

संपादक मंडळ, हा लेख प्रचंड मोठा झालेला आहे. हा लेख खालीलप्रमाणे ३ भागात विभाजित करता येईल का? १) विधानसभा निवडणुक २०१६ भाग १ - पाँडिचेरी व तामिळनाडू २) विधानसभा निवडणुक २०१६ भाग २ - केरळ व पश्चिम बंगाल ३) विधानसभा निवडणुक २०१६ भाग ३ - आसाम

या निवडणूकीचा राज्यसभेमधल्या संख्येवर काही फरक पडेल का?

In reply to by कपिलमुनी

भविष्यातील राज्यसभेतील संख्येवर या निवडणुकीचा नक्कीच फरक पडेल. द्रमुकचे तामिळनाडूतून व भाजपचे आसाममधून खासदार वाढतील. अद्रमुकचे कमी होतील. काँग्रेसचेही केरळ व आसाममधून कमी होतील. तृणमुलचे आहेत तेवढेच पुढेही निवडून येतील. डाव्या पक्षांचे केरळमधून वाढतील. कदाचित बंगालमधूनही वाढतील.

In reply to by श्रीगुरुजी

राज्यसभेमधल्या अल्पमतामुळे बरीचशी विधेयके रखडली आहेत ( असे म्हणतात , संयुक्त वगैरे चर्चा नको ) या निवडणुकींच्या निकालाने त्यात फरक पडेलच. सर्व पक्ष आणि आयडींना शुभेच्छा !!

In reply to by कपिलमुनी

या निवडणुकीच्या निमित्ताने फारच किरकोळ फरक पडेल. डाव्या पक्षांच्या जागा वाढणे आणि काँग्रेसच्या कमी होणे, द्रमुकच्या वाढून अद्रमुकच्या कमी होणे, भाजपची एखादी जागा वाढून तृणमूलची एखादी जागा कमी होणे म्हणजे ताटातले वाटीत असा प्रकार आहे. प्रत्यक्षात रालोआला फार तर एक-दोन जागांचा लाभ होईल. रालोआविरोधी गटांच्या एकूण जागात १-२ जागांची घट होईल. पण त्यामुळे फार फरक पडणार नाही. रालोआला राज्यसभेत पूर्ण बहुमतासाठी २०१८ च्या उत्तरार्धापर्यंत वाट बघावी लागेल. तोपर्यंत विद्यमान सरकारच्या पहिल्या टर्मची जवळपास साडेचार वर्षे संपलेली असतील.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत तामिळनाडूत भाजपने विजयकांतचा डीएमडीके, वैकोचा एमडीएमके व अंबुमणी रामदासांचा पीएमके या पक्षांशी युती केली होती. आता २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप एकटा आहे. डीएमडीके, एमडीएमके, दोन्ही डावे पक्ष व Viduthalai Chiruthaigal Katchi (VCK - Liberation Panther Party) या ५ पक्षांनी एकत्रित आघाडी बनविली असून त्यांनी विजयकांतला आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला आहे. यातील प्रत्येक पक्षाची स्वतःची छोटीशी व्होटबँक आहे. या आघाडीचा दोन्ही प्रमुख द्रविड पक्षांना नक्कीच थोडासा फटका बसणार.

निदान या धाग्यावर तरी मी ओवेसीच्या गळा ह्या धाग्यात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल अशी आशा आहे. काय मंता गुर्जी?

In reply to by तर्राट जोकर

इथे उत्तर देत बसलो तर विषयांतर होऊन धागा भरकटेल. त्या विषयाला वाहिलेला वेगळा धागा काढा. तिथे सविस्तर उत्तर देतो.

In reply to by श्रीगुरुजी

कित्ता भागोगे गुर्जी, ह्याच धाग्यात तुम्ही शय्यासोबत हा शब्द काँग्रेसडाव्यांच्या युतीसाठी वापरला. मग आता विषयांतर कसले? भाजपने आजवर केलेल्या सगळ्या युतींना हाच शब्द वापराल काय?

In reply to by तर्राट जोकर

हा धागा ५ राज्यांची निवडणुक या संदर्भात आहे. या निवडणुकीत केरळमध्ये डावे व काँग्रेस एकमेकांविरूद्ध लढत आहेत तर हेच दोन्ही पक्ष बंगालमध्ये युती करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या संधीसाधू विरोधाभासासाठी शय्यासोबत हा अत्यंत समर्पक शब्द वापरला आहे. तुम्ही ओवेसीच्या धाग्यावर पक्षांची शय्यासोबत व इतर बरेच प्रश्न भाजप व इतर अनेक पक्षांसंबंधात विचारले आहेत. एकंदरीत त्या प्रश्नांचे स्वरूप खूपच व्यापक असून फक्त त्यासाठी फक्त ही निवडणुक एवढाच मर्यादीत आवाका समोर न ठेवता या पक्षांचा इतर सर्व राज्यातील दीर्घकालीन इतिहास बघावा लागेल. म्हणूनच अशा व्यापक मुद्द्यांसाठी एक वेगळा धागा असल्यास तिथे सविस्तर उत्तर देता येईल.

Vaiko was the first member of Parliament and chief of a registered political party in the country to be detained under the Prevention of Terrorism Act, 2002.[8] He was released after spending 18 months in prison.[9] In 2008, Criminal Investigation Department of Tamil Nadu police arrested Vaiko on charges of sedition.[10] The charges stemmed from speeches Vaiko made at a party meeting on the Sri Lankan issue and the government's raids into LTTE-held areas on 21 October 2008.[10] After 14 days in judicial custody, Vaiko was released.[11] उत्तर टोकास मेहबूबाची मुहब्बत आहे अन दक्षिणला हे दिव्य मित्र आहेत! सहज चौकशी, वायको जय हिंद म्हणतात का भारत माता की जय म्हणतात का काहीच म्हणत नाहीत "जय एलम" म्हणतात! का त्यांच्याशी युती ही रण का कुठली ती निती आहे? रालोआ मधील एक घटक पक्ष म्हणून ते पहायला नको का?

In reply to by नाना स्कॉच

वैको गोपालसामी फार पूर्वीपासूनच लिट्टेचा समर्थक आहेत. पूर्वी ते द्रमुकमध्ये होते. फेब्रुवारी १९८९ मध्ये त्यांनी गुपचूप तामिळनाडूच्या किनार्‍यावरून एका छोट्या नावेत बसून उत्तर श्रीलंकेत प्रवेश करून लिट्टेचा नेता प्रभाकरनची भेट घेतली होती. तत्कालीन मुख्यमंत्री करूणानिधी यांना आपल्या पक्षातील नेत्याच्या या भेटीची अजिबात कल्पना नव्हती. भेटीचे वृत्त समजल्यावर करूणानिधींना ते आवडले नव्हते. दरम्याच लिट्टेचे समर्थन केल्याचे कारण पुढे करून करूणानिधींचे सरकार फेब्रुवारी १९९१ मध्ये बरखास्त केले गेले. नंतर मे १९९१ मध्ये राजीव गांधींच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू विधानसभेत २३४ पैकी २३३ जागा अद्रमुक्+काँग्रेस या युतीला मिळाल्या. नंतर १९९३ मध्ये करूणानिधींनी वैकोंची द्रमुकमधून हकालपट्टी केल्यावर त्यांनी एमडीएमके नावाचा नवीन पक्ष काढला. १९९९ मध्ये रालोआने तामिळनाडूत द्रमुक, एमडीएमके व पीएमके या पक्षांबरोबर युती केली होती. त्यात भाजपने ४, एमडीएमके ने ४ व पीएमके ने ५ जागा जिंकल्या होत्या. २००१ मध्ये जयललिता मुख्यमंत्री झाल्यावर तिने सूडचक्र सुरू केले. एका मध्यरात्री करूणानिधी व स्टॅलिनला अटक करून तुरूंगात टाकण्यात आले. जयललिता वैकोवरही लक्ष ठेवून होती. वैको सातत्याने जयललितावर टीका करीत होते. ती संधी शोधत होती. एका सभेत वैकोंनी लिट्टे समर्थनार्थ भाषण केल्याचा मुद्दा उचलून लगेच जयललिताने पोटा कायद्याखाली वैकोंना उचलून १८ महिने तुरूंगात टाकले. विरोधकांना तुरूंगात टाकणे हे तामिळनाडूत नवीन नाही. करूणानिधींनी १९९६ ला मुख्यमंत्री झाल्यावर जयललिता व शशिकला यांंच्यावर अनेक आरोप ठेवून त्यांना तुरूंगात पाठविले होते. जयललिताने त्याची परतफेड २००१ मध्ये केली. त्यापूर्वी १९९१-१९९६ या काळात जयललिता मुख्यमंत्री असताना तत्कालीन टाडा कायद्याखाली द्रमुकच्या नेत्या सुब्बुलक्ष्मी जगदिसन व तिच्या पतीला १ वर्ष तुरूंगात टाकले होते. नंतर २००४ मध्ये द्रमुकबरोबर वैको युपीएत सामील झाले. २००६ मध्ये त्यांचे व करूणानिधींचे पुन्हा फाटले, परंतु त्यांनी युपीएचा पाठिंबा कायम ठेवला. नंतर २०१४ मध्ये वैकोंनी रालोआत प्रवेश केला आणि आता २०१६ मध्ये रालोआ सोडून ते वेगळ्याच आघाडीत सामील झालेत. तामिळनाडूतील सर्व द्रविड पक्ष कधी युपीएत असतात तर कधी रालोआत तर कधी एकटे लढतात तर कधी आपापसात आघाडी स्थापन करतात. तामिळनाडूतील सर्व द्रविड पक्ष उघड किंवा छुप्या रितीने लिट्टेचे समर्थक आहेत/होते. वैको त्याला अपवाद नाहीत. त्यांनी लिट्टेचे समर्थन करणे हे त्यांना अटक करण्यासाठी शोधलेले एक निमित्त होते. जयललितांवर सातत्याने टीका केल्यामुळे त्यांना धडा शिकविण्यासाठी पोटा वापरला गेला.

In reply to by श्रीगुरुजी

।।इति बिनगरजेचे पुराण शुभम् भवतु।। द्रविड़ पक्ष काय आहेत ते जगजाहिर आहे देवा, पण फ़क्त ते पार्टी विथ अ डिफरेंस वगैरे ऐकले होते म्हणुन..... बरं, ते गैरसोईचे पडेल ते सोडा, फ़क्त एक निरिक्षण सांगतो, तुम्ही वायको चे ग्रहनक्षत्र कुंडली सांगितले सगळे ते असो! फ़क्त लिट्टेचे समर्थक असणे साहजिक असलेले आपले मित्रपक्ष एमडीएमकेचे सर्वेसर्वा वायको साहेब भारत माता की जय म्हणतात का तमिल इलम की जय म्हणतात, हे जाणून घ्यायची इच्छा आहे.

।।भारत माता की जय।।


In reply to by नाना स्कॉच

ते काय म्हणतात त्याने फरक पडत नाही. भारतमाता की जय न म्हणणारा ओवेसी भारताचा नागरिक आहे. मी भारतमाता की जय म्हणणार नाही असे सांगणारा वारिस हाही भारताचा नागरिक. तसेच तेही भारताचे नागरिक आहेत. आधी लिहिल्याप्रमाणे एमडीएमके हा सगळ्या पक्षांचा मित्रपक्ष असतो. कधी रालोआचा तर कधी संपुआचा तर कधी डाव्या आघाडीचा. सध्या तो रालोआसोबत नसून डाव्या आघाडीबरोबर आहे. त्याआधी तो रालोआसोबत होता आणि त्याआधी तो संपुआसोबत होता. बादवे, तमिळ इलम की जय अशी घोषणा आहे का ते मला माहित नाही.

In reply to by श्रीगुरुजी

ते काय म्हणतात त्याने फरक पडत नाही. भारतमाता की जय न म्हणणारा ओवेसी भारताचा नागरिक आहे. मी भारतमाता की जय म्हणणार नाही असे सांगणारा वारिस हाही भारताचा नागरिक. तसेच तेही भारताचे नागरिक आहेत. का फरक पडत नाही? फ़क्त तो रालोआचा मित्रपक्ष झाला म्हणून? मग ओवैसी किंवा वारीस पठाण मुळे का फरक पडतो? ते क्लियर व्हायला नको का? ओवैसी अन वारीस भारत माता की जय न म्हणता नागरिक आहेत तसाच हा आहे हे जरी मानले तरी मग एका नागरिकाच्या नावाने शिमगा करणे ते जीभ कापायला (खात्यात छदाम नसताना) एक कोट चा चेक फड़कवणे अन दुसऱ्याला चक्क मित्रपक्ष करणे हे कुठल्या प्रकारात बसते?? अन का?? का जिंगोइसम सुद्धा सोईच्या ठिकाणी दाखवणे सुरु आहे?

In reply to by नाना स्कॉच

आधी लिहिल्याप्रमाणे एमडीएमके हा सगळ्या पक्षांचा मित्रपक्ष असतो. कधी रालोआचा तर कधी संपुआचा तर कधी डाव्या आघाडीचा. सध्या तो रालोआसोबत नसून डाव्या आघाडीबरोबर आहे. त्याआधी तो रालोआसोबत होता आणि त्याआधी तो संपुआसोबत होता. घ्या! हे म्हणजे ज्या पोराच्या शामळुपणाची गारंटी घ्यावी अन ज्याचे लाड़ करावे त्यासाठी, त्यानेच सड़केवर चालत्या चालू पोरीला कचकुन डोळा मारण्यासारखे झाले!! वर विचारले की म्हणायचे "त्यात काय तिला सवय आहे!" , देवा पोरगी चालू असली तर असू दे! शामळु अन सालस पोराने आपले गुण सोडले तर कसे होणार! त्याच गुणांपाई तर पोर हवे हवे होते! (मदर ऑफ़ मेटाफोर) अन हो, इलम की जय हा नारा खरेंच आहे का हे शब्दप्रामाण्य दाखवायचा संधिसाधुपणा सोडा आता!! तुमच्यासाठी म्हणून सांगतो तर ते एक रूपक आहे! एमडीएमके अन वायको ह्यांचे इमान भारत माते कड़े आहे की त्यांना इलम च्या स्वप्नात इंटरेस्ट आहे म्हणे?? थेट विचारले आहे थेट सांगा

In reply to by नाना स्कॉच

थेट विचारले आहे थेट सांगा गांजा लैच चडवला का बाबाजी आज? कि सडलेल्या मोहाच्या पहिल्या धारेची मारेली है?

In reply to by नाना स्कॉच

एमडीएमके अन वायको ह्यांचे इमान भारत माते कड़े आहे की त्यांना इलम च्या स्वप्नात इंटरेस्ट आहे म्हणे?? थेट विचारले आहे थेट सांगा
थेट उत्तर - वैकोंचा श्रीलंकेतील लिट्टेने सुरू केलेल्या तामिळीच्या लढ्याला पाठिंबा आहे. त्यांची भूमिका भारतविरोधी नाही.

In reply to by श्रीगुरुजी

युपिए सरकार ने जेव्हा लिट्टे ला श्रीलंके शी झालेल्या अंतिम युद्धात पाठिंबा दाखवला तेव्हा एन डी ए त्या निर्णयाच्या विरुद्ध गेले नाही किंबहुना सुब्रमन्यम स्वामी एकमेव भारतीय नेता आहेत जे भाजपतर्फे लिट्टे प्रभाकरन ह्याच्या विषयी श्रीलंकेत जाऊन गंभीर विधाने केली , आता वायको ने तेव्हा प्रभाकरन शहीद दिन तामिळनाडू मध्ये साजरा करत नाही व भारतविरोधी घोषणा देत नाही. अमित शहा ह्यांनी इंडिया टुडे च्या कार्यक्रमात हे साफ केले कि ओविसी ला ते भारत माता कि जय म्हणत नाही म्हणून देश्रोही मनात नाहीत व त्यांच्यावर ते जबरदस्ती करू इच्छित नाहीत पण त्यांचे मन वळविण्याचा ते प्रयत्न करत राहतील. हेच देशातील इतरांच्या बाबतीत लागू पडते

In reply to by निनाद मुक्काम …

किंबहुना सुब्रमन्यम स्वामी एकमेव भारतीय नेता आहेत जे भाजपतर्फे लिट्टे प्रभाकरन ह्याच्या विषयी श्रीलंकेत जाऊन गंभीर विधाने केली , सुब्रह्मण्यम् स्वामी २०१३ मध्ये भाजपत आले. ते त्यापूर्वी अनेक वर्षे जनता पक्षाचे अध्यक्ष होते. त्यांनी प्रभाकरन बद्दल श्रीलंकेत जी विधाने केली ती भाजपत आल्यानंतर की त्यापूर्वी?

In reply to by श्रीगुरुजी

२०१३ गेले होते. पण २०१४ ला द हिंदू मध्ये त्यांनी श्रीलंकेची संयुक्तराष्ट्र संघामध्ये पाठराखण करावी अशी मागणी केली होती. २०१४ मध्ये त्यांनी श्रीलंकेत डिफेन्स सेमिनार ला आमंत्रित करण्यात आले. श्रीलंका व स्वामी ह्यांच्यात उत्तर राजकीय संबंध आहेत, श्रीलंकेचे आधीचे सरकार उडवून नवीन सरकार स्थापण्यात रॉ ने बरीच हालचाल केल्याची वंदता आहे. सध्याचे श्रीलंकन सरकार प्रो इंडियन आहे. ह्या दोन डिबेट मधून स्वामींचा अजेंडा स्पष्ट होतो.

In reply to by नाना स्कॉच

मुळात वैको हे भारतमाता की जय हे म्हणतात का नाही हे नक्की माहित आहे का? ते तामिळ इलम की जय हे म्हणतात हे देखील नक्की माहित आहे का? आणि हे म्हणताना ते भारत मुर्दाबाद किंवा अशासारख्या घोषणा देतात हे नक्की माहित आहे का? सध्या फक्त एवढेच माहित आहे की वैकोंनी लिट्टेच्या समर्थनार्थ भाषण दिले होते व त्यामुळे त्यांना आत टाकले होते. वैको काही काळ रालोआचा मित्रपक्ष होता तसाच तो काही काळ युपीएचा भागीदार होता आणि आता तो डाव्या पक्षांसोबत आहे. तामिळनाडूतील बहुतेक सर्व पक्ष लिट्टेचे छुपे किंवा उघड समर्थक आहेत व हे सर्व पक्ष कोणत्यातरी राष्ट्रीय पक्षाच्या वळचणीला कायम असतात. अजून एक. १९८३ च्या आसपास इंदिरा गांधींनी लिट्टेला शस्त्रे व पैसा पुरविला होता हे माहित असेलच. वारीस पठाणच्या बाबतीत मी दुसर्‍या धाग्यावर पूर्वीच लिहिले होते की तो काय बोलला किंवा नाही बोलला या विषयावर सभागृहाचा अख्खा एक दिवस खर्ची घालणे हे चुकीचे होते. त्याची किंवा अजून कोणाची जीभ कापायला बक्षिस जाहीर करणे किंवा त्यासारख्या कृती यादेखील चुकीच्याच आहेत.

५ राज्यातील विधानसभा निवडणुकां आधीचा छान आढावा घेतला आहे तुम्ही श्रीगुरुजी. बरीच माहिती नव्याने मिळाली.

तसे करून मराठवाड्याच्या विधार्भाच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार असतील तर जरूर करा कटू सत्य हे आहे कि महाराष्ट्राची राजधानी मुंबई तेथे मराठी माणूस उपरा केंद्राचा निधी मराठवाड्याला विधार्भाला मिळत नाही त्यांचे स्वताचे राज्य असले तर काय बिघडले त्यांची भाषा मराठी असणार आहे आता मध्य प्रदेश बिहार उत्तर प्रदेश मध्ये हंदू म्हणतात ना बुमाराला तर bhrashtachari तेव्हा छोट्या मोठ्या पक्षांनी पोकळ गफ्फा मारू अहो आढावा टुमण ह्यांनी घेतला आहे असो आसाम मध्ये शहा ह्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतले तर सरकार साठ्पण होऊ शकते नाही झाले तर पुढील एक दोन वर्षात भाजपचे युती करून सरकार बनू शकते अब तो आदत हो गयी हे गडकरी इस्ट भारतात रस्ते प्रभू रेल्वे आणत आहेत तेव्हा पाहूया तामिळनाडू मध्ये अम्म्मा ताकदवर आहे व कधीकाळी भाजपशी बर्यापैकी संबंध ठेवून होती तिची छुपी मदत घेऊन एखाद दुसरा आमदार व महत्वाच्या विधेयकांना पाठिंबा किंवा प्रखर विरोध टाळता आला तर भाजपला गजरची पुंगी ह्या नात्याने तामिळनाडू मध्ये प्लस मध्ये येता येईल , अमित शहा हा जादुगार राजकीय वजाबाकी व बेरेजेचे गणित उत्तम जाणतो , केरळ मध्ये डाव्यांना सत्तेत येऊ न देणे व भाजपची मते व विधान सभे मध्ये येणे ही प्राथमिकता आहे मोदी अबू धाबी मध्ये केरळी कामारांच्या वस्तीत जाऊन आले राजाशी त्यांच्या प्रश्नांची चर्चा केली व तेथे त्यांना जो मान मिळाला ते पाहता शहरी भागात महानगर पालिकेत भाजपला काही जागा मिळाल्या , ह्या एप्रिल मध्ये सौदी मध्ये मोदिजी जाणायचे आहेत , पद्यामागून दोन्ही देशांचे नोकरशाही कमालीची कार्यरत आहे , मुस्लिमांच्या सर्वात पवित्र जागी व भारताच्या परकीय गंगाजळी चे मक्का साऱ्या सौदी मध्ये केरळी बांधव असंख्य आहेत. तेथे मोदींचे भव्य स्वागत झाले तर संपूर्ण आखातातील केरळी बांधवांच्या सदिच्छा केरळच्या निवडणुकीत भाजपला कमालीच्या सहाय्यक ठरतील. कारण केरळची अर्थव्यवस्था व आखातीतील अनिवासी ह्यांचे आणि मते व त्यांचा केरळ च्या राजकारणात महत्व हे सर्वश्रुत आहे, बंगाल मध्ये ममता दीदीला छुपा पाठिंबा देऊन स्वताची मते व जागा वाढवणे भाजपच्या हाती आहे , भाजप ममताला हरवायचे म्हणून मोदींच्या सह बिहार च्या सारखे राजकारण केले तर डाव्यांना कोन्ग्रेज ला फायदा होईल . ममता दीदी ची अवस्था बिकट आहे. तिला भाजपशी नमते घेणे सोयीस्कर आहे केंद्राशी जवळीक तिला व भाजपला दोघांना सोयीचे आहे. राज्यसभेच्या बहुमतासाठी शेवटपर्यंत थांबायची गरज नाही , ४५ खासदारातील काही बंडखोर होइउन स्वतंत्र पक्ष काढला राष्टवादी व तृणमूल सारखा तरीही कोन्ग्रेज राज्यसभेतून कमकुवत होऊ शकतो , राहुल च्या नेतृत्वावर कोन्ग्रेज मधील एक गट अजिबात काम करायला तयार नाही आहे. अवांतर धागाकार्त्याला विनंती एक धागा खास डाव्यांचे भारतातील राजकारण ह्यावर काढावा त्यांच्यातील डावे उजवे अल्ट्रा हे काय प्रकरण असते त्यांच्यातील साम्य व विरोधी मुद्दे कोणते ह्यावर महिती मिळाली असे वाटते भारतातील कोणता कम्युनिस्ट गट कोणत्या कम्युनिस्ट देशाची सहानभूती बाळगून आहे हे देखील जाणून घ्यायला आवडेल ,

संपादक मंडळाला विनंती आहे माझा प्रतिसाद संपादित करून त्यातील पहिली ८ वाक्ये काढावी ती चुकून येथे आली ती दुसर्या धाग्यासाठी होती.

देशव्यापी लोकसभेतील भाजपाच्या कामगिरिचा ' एक वर्षानंतर ' हा दागा अर्धवट सोडुन आता गुरुजी राज्यव्यापी निवडणुकांचे फुटकळ धागे विणत बसले आहेत , हे पाहुन डोळे पाणावले

काश्मिरात भाजपा करते ते काय ? प्लेटॉनिक लव्ह ? वाचक फारच काळजीपुर्वक तुमचा धागा वाचतात. पण इथे ही प्रतिक्रिया गैर आहे कारण काश्मीरमधे पी डी पी - भाजप बरोबर सत्तेत सहभागी झाली होती/ होणार आहे याला फार तर सौम्यभाषेत भाजपची बाहेरख्याली वृत्ती म्हणता येईल. प्लॅटोनिक म्हणजे एखाद्या पार्टनराच्या मनात राहुन गेलेले ( अव्यक्त ) प्रेम. नेहरुंनी जम्मु काश्मिरला धारा ३७० द्वारे विषेश दर्जा देताना जे काय व्यक्त केल त्याला फार तर प्लॅटोनिक म्हणता येईल.

तो प्लेटोनिक लव्हवाला प्रतिसाद व त्यावरील उत्तर माझे नाही. या धाग्याचा काश्मिर हा विषय नसल्याने मी त्या प्रतिसादाकडे दुर्लक्ष केले आहे. परंतु काश्मिरमधील भाजप व पीडीपी यांचे संयुक्त सरकार कोणत्या परिस्थितीत आले व त्याचे गेल्या वर्षभरात काय परीणाम झाले याबद्दल मी इतर धाग्यावर सविस्तर उत्तरे दिली आहेत.

माझ्या जिव्हाळ्याच्या चर्चेत वेळ मिळेल त्याप्रमाणे मी भाग घेणार आहेच.
ही आपली शेवटची निवडणुक आहे असे भावनिक आव्हान करूणानिधींनी केले तर भावनिक लाटेवर वाहून जाणार्‍या तामिळी मतदारांवर त्याचा निश्चित प्रभाव पडेल.
असे भावनिक आवाहन करूणानिधींनी यापूर्वी अनेकदा केले आहे. उदाहरणार्थ २००१ च्या विधानसभा आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळीही करूणानिधींनी हेच म्हटले होते. पण दोन्ही निवडणुकांमध्ये अण्णा द्रमुकने द्रमुकचा जोरदार पराभव केला होता. तसेच या लेखात असा उल्लेख आहे की २००४ च्या लोकसभा निवडणुकांच्यावेळीही करूणानिधींनी "ही माझी शेवटची निवडणुक" असे भावनिक आवाहन केले होते. आणि या निवडणुकांमध्ये द्रमुक आघाडीचा मोठा विजय झाला होता. तेव्हा मतदार मते देताना त्यांना ज्या कोणत्या मुद्द्यावरून मते द्यायची असतात त्याच मुद्द्यांवरून देतात. अशा भावनिक आवाहनांचा (अगदी तामिळनाडूमध्येही) किती प्रभाव पडेल?

केरळमध्ये भाजप आपला किती प्रभाव दाखवू शकतो यावर सरकार कॉंग्रेस बनविणार की डावी आघाडी बनविणार हे अवलंबून असेल. केरळमध्ये भाजपला फारसे स्थान नसले तरी उत्तर केरळमधील कासारगोड आणि मंजेश्वर या दोन मतदारसंघांमध्ये अगदी १९८७ पासून भाजपचे उमेदवार ३०-३२% मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्येही या दोन मतदारसंघांमध्ये भाजपच्या उमेदवाराने ३०-३२% मते घेऊन दुसरा क्रमांक राखला होता. तसेच तिरूवनंतपुरम लोकसभा मतदारसंघातील ७ पैकी ४ विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे ओ.राजगोपाल कॉंग्रेसचे विजयी उमेदवार शशी थरूर यांच्यापेक्षा आघाडीवर होते. २०१५ मध्ये झालेल्या तिरूवनंतपुरम महापालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपने दुसरा क्रमांक पटकावला होता. तर पलक्कड नगरपालिकेत प्रथमच भाजप हा सर्वात मोठा पक्ष राहिला होता. पलक्कड हे कासारगोड आणि मंजेश्वरप्रमाणे राज्याच्या उत्तर भागात नसून मध्य भागात आहे तर तिरूवनंतपुरम दक्षिणेत आहे. अर्थातच ही कामगिरी विधानसभेत जागा मिळवायला कितपत पुरेशी पडेल हे सांगता येत नसले तरी प्रस्थापितविरोधी मतांमध्ये भाजपने फूट पाडली (अगदी १० विधानसभा मतदारसंघांमध्ये सुध्दा) तर कॉंग्रेसला परत सत्तेचा मार्ग मोकळा होऊ शकेल. पक्षाचे ज्येष्ठ नेते ओ.राजगोपाल आता वृध्द झाले आहेत. तरीही नवे प्रदेशाध्यक्ष राजशेखरन हे चांगले जोमाने काम करत आहेत अशा बातम्या आहेत.

In reply to by गॅरी ट्रुमन

केरळ - २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत तिरूवनंतपुरमच्या १०० पैकी ६६ प्रभागांमध्ये भाजपच्या ओ राजगोपाल यांना मताधिक्य मिळाले होते. परंतु नोव्हेंबर २०१५ च्या महापालिका निवडणुकीत भाजपला फक्त प्रभागात बहुमत मिळून भाजप दुसर्‍या क्रमांकावर राहिला. - पलक्कड नगरपालिकेत भाजपला २०१० मध्ये १५ प्रभागात विजय मिळाला होता. २०१५ मध्ये भाजपने २४ प्रभागात विजय मिळवून तो सर्वात मोठा पक्ष ठरला. - कन्नूर जिल्ह्यात भाजपने सदस्य संख्या १४ वरून २८ वर नेली. - केरळमध्ये डाव्या आघाडीने ५४३ ग्रामपंचायतीत बहुमत मिळविले. संलोआने ३६८ व भाजपने १२ ग्रामपंचायतीत बहुमत मिळविले. एकंदरीत केरळमध्ये डावी आघाडी पुनरागमनाच्या मार्गावर आहे. संलोआला अनेक ठिकाणी पराभवाचा धक्का बसलेला आहे. भाजपला काही सांदीकोपर्‍यात मते मिळाली आहेत. आसाम फेब्रुवारी २०१५ मध्ये आसामच्या विविध भागात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने ७४६ पैकी ३४० जागा जिंकून चांगले यश मिळविले. काँग्रेसने २३२ व आगप ने ३९ जागा जिंकल्या. अर्थात या यशाचा विधानसभा निवडणुकीत कितपत उपयोग होईल याविषयी साशंकता आहे.

In reply to by श्रीगुरुजी

पहिल्या परिच्छेदात असे वाक्य हवे. परंतु नोव्हेंबर २०१५ च्या महापालिका निवडणुकीत भाजपला फक्त ३४ प्रभागात बहुमत मिळून भाजप दुसर्‍या क्रमांकावर राहिला.

भाजपाने सरकार स्थापनेच्या आधी मेहबुबा यांच्या कडून

"भारत माता की जय" आणि "अफझल गुरु मुर्दाबाद"

असे जाहीर बोलायला लावा. जर हे करू शकत नाही. राजनैतिक फायद्यासाठी कुणाबरोबर ही भाजप्यांना शैया करणे ( हा शब्द श्रीगुरुजींचा आहे ) मंजूर असेल तर त्यांनी इतरांना देशप्रेम शिकवू नये.

भाजपला यावेळी केरळमध्ये जी थोडीशी संधी आहे ती मुख्यत्वेकरून तिरूवनंतपुरम् मध्येच आहे. या शहरात हिंदू मतदारांची संख्या ६९% आहे. या क्षेत्रातील वट्टीयोरकावू या विधानसभा मतदारसंघात २०११ च्या निवडणुकीत भाजप उमेदवाराला फक्त १२% (१३,४९४) मते मिळाली होती. पण २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत इथे भाजपला ४३,५८९ म्ते मिळाली. कळकूटम् या विधानसभा मतदारसंघात २०११ मध्ये भाजपला फक्त ७,५०८ मते होती. पण २०१४ मध्ये इथे ४१,८२९ मते मिळाली. परसाला मतदारसंघात सुद्धा २०११ च्या तुलनेत २०१४ मध्ये भाजपला चौपट मते मिळाली होती. या लोकसभा मतदारसंघामध्ये ७ विधानसभा मतदारसंघ येतात. २०१४ मध्ये या ७ पैकी ४ मतदारसंघात भाजपच्या ओ राजगोपाल यांना आघाडी होती. परंतु प्रत्यक्ष निकालात काँग्रेसचे शशी थरूर जेमतेम १०,००० मतांनी निवडून आले. तिरूवनंतपुरम् महापालिकेत २०१० मध्ये भाजपने १०० पैकी फक्त ६ प्रभाग जिंकले होते. पण २०१५ मध्ये भाजपचे १०० पैकी तब्बल ३४ नगरसेवक निवडून आले व काँग्रेसचे फक्त १९ निवडून आले होते. केरळमध्ये या वेळी भाजप खाते उघडेल असा अंदाज आहे आणि तिरूवनंतपुरम् मध्येच ते खाते उघडले जाऊ शकते.

माकप - मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (CPIM) म्हणजेच डावे कम्युनिस्ट भाकप - भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) म्हणजेच उजवे कम्युनिस्ट गुर्जि हे माहित नव्हत, मुळातच सगळे जग "लेफ्टिस्ट" म्हणजे डावे म्हणते भारतात ह्यांचेहि २ प्रकार आहेत.

In reply to by होबासराव

डाव्यांमध्ये बरेच पक्ष/पंथ आहेत. १९६२ पूर्वी एकच कम्युनिस्ट पक्ष होता. चीनने १९६२ मध्ये भारतावर हल्ला केल्यावर कम्युनिस्ट पक्षात खळबळ माजली. चीनने भारतावर केलेल्या हल्ल्याचा निषेध केला पाहिजे व याप्रसंगी सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दिला पाहिजे असे श्री अ डांगे यांचे व त्यांच्या गटाचे मत होते तर चीनची सेना ही 'मुक्तीसेना' आहे व भांडवलशाही भारताला पराभूत करण्यासाठी साम्यवादी सेना आल्याने त्यांचे स्वागत करायला हवे असे नंबुद्रीपाद व त्यांच्या गटाचे मत होते. चीनच्या हल्ल्याला आक्रमण म्हणावे का अतिक्रमण म्हणावे या मुद्द्यावरून पक्षात तीव्र मतभेद झाले व शेवटी १९६४ मध्ये पक्ष फुटला. एक तुकडा सीपीआय/कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया/भारतीय कम्युनिस्ट पक्ष/भाकप/उजवे कम्युनिस्ट या नावाने ओळखला जाऊ लागला, तर दुसरा तुकडा सीपीआयएम/कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट/मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष/माकप/डावे कम्युनिस्ट या नावाने ओळखला जाऊ लागला. भाकप मुख्यत्वेकरून रशियाच्या तंत्राने चालतो तर माकप चीनच्या तंत्राने चालतो. भाकपने आणिबाणीला पाठिंबा देऊन इंदिरा गांधींना पाठिंबा दिला होता तर माकपचा आणिबाणीला विरोध होता. या दोन पक्षांव्यतिरिक्त फॉरवर्ड ब्लॉक, क्रांतिकारी समाजवादी पक्ष, सीपीआयएमएल/कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट लेनिनिस्ट असे छोटे डावे पक्ष आहेत. सीपीआयएमएल ची नक्षलवाद्यांशी जवळीक आहे. अति डावे म्हणजे नक्षलवादी व अति उजवे म्हणजे जमीनदार/हुकुमशहा इ. महाराष्ट्रात असलेले लाल निशाण गट, शेकाप हे डाव्यांचेच स्थानिक अवतार आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

भाकप मुख्यत्वेकरून रशियाच्या तंत्राने चालतो तर माकप चीनच्या तंत्राने चालतो.
म्हणजे भारतात राहून भारताच्या तंत्राने चालणारे हे पक्ष नाहीतच.एकीकडे राष्ट्र ही संकल्पनाच नाकारायची आणि दुसरीकडे चीन/रशियाच्या तंत्राने चालायचे--म्हणजे भारत हे राष्ट म्हणणे बरोबर नाही असे म्हणायचे आणि त्याचवेळी चीन/रशियाविषयी मात्र 'ही राष्ट्रे कशी' हा प्रश्न विचारायचा नाही.चीनच्या अणुचाचण्यांचे समर्थन करायचे पण भारताच्या अणुचाचण्यांना मात्र विरोध करायचा.हे असले प्रकार बघितले की बाळासाहेब ठाकरे कम्युनिस्टांना 'लाल तोंडाची माकडे' का म्हणत हे समजून येते.
भाकपने आणिबाणीला पाठिंबा देऊन इंदिरा गांधींना पाठिंबा दिला होता तर माकपचा आणिबाणीला विरोध होता.
हो. मध्यंतरी गोविंद पानसरेंच्या पहिल्या स्मृतीदिनी सीताराम येचुरी कोल्हापूरला आले होते.आणि गोविंद पानसरेंचा खून म्हणजे 'आणीबाणीची आठवण करून देणारा' आहे असे काहीसे वक्तव्य त्यांनी केले. आणि गंमत म्हणजे पानसरेंच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाने मात्र त्याच आणीबाणीचे समर्थन केले होते याचा मात्र सोयीस्कर विसर येचुरींना पडला.येचुरींच्या या गुडघ्यातल्या प्रकाराचा भाऊ तोरसेकरांनी इथे अगदी सडेतोडपणे जबरदस्त समाचार घेतला आहे. (माझ्या माहितीतील कोणापेक्षाही कम्युनिस्टांचा अधिक कन्टेम्प्ट असलेला आणि त्याचा जाज्वल्य अभिमान असलेला) ट्रुमन

In reply to by गॅरी ट्रुमन

साम्यवादी पक्ष आता इतक्या वाईट अवस्थेत आहेत की पक्षवाढीसाठी आता त्यांना कन्हैय्याकुमारवर अवलंबून रहावे लागत आहे. ज्या पक्षात ज्योती बसू, हरकिशनसिंग सुरजीत, बर्धन, इंद्रजीत गुप्ता इ. महान नेते होऊन गेले व येचुरी, कराट दांपत्य, सोमनाथ चटर्जी, डी राजा, बुद्धदेव भट्टाचार्य इ. दिग्गज नेते आहेत त्यांना पक्षासाठी आता एका विद्यार्थ्यावर अवलंबून रहावे लागत आहे. साम्यवाद्यांचा यापेक्षा जास्त दारूण पराभव तो कोणता?

तामिळनाडूमध्ये सध्या परिस्थिती अधिक रंगतदार होत आहे. विजयकांत यांचा डी.एम.डी.के हा पक्ष स्वतंत्र लढणार आहे. द्रमुकने आपल्या मित्रपक्षांबरोबर २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यातील सर्व जागा जिंकून क्लीन स्वीप केला. त्यानंतर २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्येही द्रमुकनेच विजय मिळवला (जरी सगळ्या जागा जिंकल्या नसल्या तरी). खरे तर तामिळनाडूतील राजकारणाला अनुसरून २००९ मध्ये अण्णा द्रमुकने विजय मिळवायला हवा होता.पण तसे का झाले नाही? याचे एक कारण म्हणजे २००९ च्या निवडणुकांच्या आधी स्थापन झालेल्या डी.एम.डी.के ने स्वतंत्र लढून द्रमुकविरोधी (प्रस्थापितविरोधी) मतांमध्ये फूट पाडली आणि त्याचा फायदा द्रमुकला झाला. हे लक्षात घेऊन २०११ मध्ये जयललितांनी या पक्षाला आपल्याबरोबर घेतले आणि प्रस्थापितविरोधी मतांमध्ये फूट टाळली.त्यानंतर आपल्या लहरी राजकारणाला अनुसरून जयललितांनी या पक्षाला सोडून दिले--बहुदा याच उद्देशाने की हा पक्ष परत एकदा प्रस्थापितविरोधी मतांमध्ये फूट पाडेल आणि त्याचा फायदा अण्णा द्रमुकला होईल. द्रमुक आणि काँग्रेस या आघाडीतही जागावाटपावरून कुरबुरी आहेत अशा बातम्या आहेत.काँग्रेसला ४० जागा हव्या आहेत आणि द्रमुक मात्र तितक्या जागा द्यायला तयार नाही--२०११ मध्ये काँग्रेसची कामगिरी लक्षात घेता तितक्या जागांवर काँग्रेस हक्क सांगू शकत नाही असा द्रमुकचा दावा आहे. या सगळ्या भानगडीत तामिळनाडूमध्ये काही प्रमाणावर राजकीय पोकळी निर्माण होताना दिसत आहे. एक तर द्रमुकमध्ये करूणानिधी वृध्द झाले आहेत आणि स्टॅलीनकडे करूणानिधींची लोकप्रियता नाही. अण्णा द्रमुकमध्ये जयललिता हा एकखांबी तंबू आहे. जयललितांची प्रकृतीही तितकीशी बरी नसते अशा बातम्या मध्यंतरी आल्या होत्या. सप्टेंबर २०१५ मध्ये परत मुख्यमंत्रीपदी आल्यानंतर अगदी चेन्नई मेट्रोच्या उद्घाटनालाही जयललिता प्रत्यक्ष न जाता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारेच उपस्थिते राहिल्या होत्या. तसेच मुख्यमंत्रीपदी पुनरागमन झाल्यानंतर बराच काळ जयललितांनी मंत्रीमंडळाची बैठकही घेतली नव्हती यावरून जयललितांची प्रकृती तितकीशी चांगली नसते अशा बातम्या आल्या होत्या. कदाचित हे तर्कही असतील. तरीही जयललितांच्या स्वभावाला अनुसरून त्या पक्षात कुणालाही दुसर्‍या क्रमा़ंकाचे स्थान देतील असे वाटत नाही. जर करूणानिधी आणि जयललिता या दोघांचाही सक्रीय राजकारणातून सहभाग कमी झाला तर मात्र एक पोकळी निर्माण होईल.ती पोकळी विजयकांत भरून काढायचा प्रयत्न करतीलच.त्याचबरोबर भाजपलाही थोडेफार हातपाय रोवायला या निमित्ताने संधी मिळू शकेल. राज्यात कन्याकुमारीमध्ये भाजपचा उमेदवार २०१४ मध्ये विजयी झाला. २००९ मध्येही दुसर्‍या क्रमांकाची मते या मतदारसघातून भाजपला होती.२०१४ मध्ये कोईम्बतूरमधूनही भाजपचा उमेदवार दुसर्‍या क्रमांकावर होता.अशा काही मतदारसंघांमध्ये भाजपला हातपाय रोवायची ती एक चांगली संधी असेल.

In reply to by गॅरी ट्रुमन

याचे एक कारण म्हणजे २००९ च्या निवडणुकांच्या आधी स्थापन झालेल्या डी.एम.डी.के ने स्वतंत्र लढून द्रमुकविरोधी (प्रस्थापितविरोधी) मतांमध्ये फूट पाडली आणि त्याचा फायदा द्रमुकला झाला. हे लक्षात घेऊन २०११ मध्ये जयललितांनी या पक्षाला आपल्याबरोबर घेतले आणि प्रस्थापितविरोधी मतांमध्ये फूट टाळली.त्यानंतर आपल्या लहरी राजकारणाला अनुसरून जयललितांनी या पक्षाला सोडून दिले--बहुदा याच उद्देशाने की हा पक्ष परत एकदा प्रस्थापितविरोधी मतांमध्ये फूट पाडेल आणि त्याचा फायदा अण्णा द्रमुकला होईल.
२००९ मध्ये तामिळनाडूत विजयकांतने, महाराष्ट्रात मनसेने व आंध्रात चिरंजीवीच्या पक्षाने काँग्रेसच्या जागा वाढण्यास मदत केली होती. नंतर २०११ मध्ये विजयकांतने अद्रमुकशी युती करून दुसर्‍या क्रमांकाच्या जागा मिळविल्या. विजयकांत व जयललिताची युती असल्याने साहजिकच द्रमुकला विरोधी पक्षनेतेपद मिळायला हवे होते. परंतु द्रमुकला तेसुद्धा मिळून द्यायची जयललिताची इच्छा नव्हती. त्यामुळे जयललिताने विजयकांतच्या पक्षाशी दुरावा दाखवून त्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळवून दिले. अशीच उदाहरणे इतरत्र पहायला मिळतात. पुणे महापालिकेत महापौर राकाँचा व उपमहापौर कॉंग्रेसचा. इतर पदेही हे दोन पक्ष आपापसात वाटून घेतात. परंतु कागदोपत्री युती नसल्याचे दाखवून विरोधी पक्षनेतेपदही काँग्रेसकडेच आहे. खरं तर संख्याबळानुसार विरोधी पक्षनेतेपद मनसेकडे असायला हवे होते. पुण्यात काँग्रेसचा उपमहापौर आहे आणि विरोधी पक्षनेतासुद्धा आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत अगदी अशीच स्थिती आहे.

२०१५ मधील दिल्ली व बिहार विधानसभा निवडणुकीसाठी अनेक वृत्तवाहिन्यांनी मतदानपूर्व व मतदानोत्तर मतदार सर्वेक्षण केले होते. एखादा अपवाद वगळता त्यातील जवळपास सर्व अंदाज मोठ्या फरकाने चुकले होते. बहुसंख्य सर्वेक्षणे ही निष्पक्षपाती नव्हती. या निवडणुकीसाठी मी आतापर्यंत अशा सर्व सर्वेक्षणांकडे दुर्लक्ष केले होते. परंतु गेल्या काही दिवसात अनेक सर्वेक्षणांचे अंदाज जाहीर झाले आहेत. यातील एकाही सर्वेक्षणावर मी विश्वास ठेवत नाही. परंतु केवळ निवडणुक संबंधातील बातमी म्हणून काही सर्वेक्षणांचे अंदाज इथे देत आहे. ५ मार्च २०१६ - इंडीया टीव्ही - सी व्होटर (http://www.firstpost.com/politics/wins-for-tmc-in-west-bengal-left-in-k…) पश्चिम बंगालः तॄणमूल - १५६, डावे पक्ष - ११४, काँग्रेस - १३, भाजप - ४, इतर - ७ केरळः डालोआ - ८९, संलोआ - ४९, रालोआ - १, इतर - १ आसाम: काँग्रेस - ४४, रालोआ - ५७, एआययुडीएफ - १९, इतर - ६ तामिळनाडू: अद्रमुक - ११६, द्रमुक - १०१, इतर - १७ २ एप्रिल २०१६ - http://www.ibnlive.com/news/india/opinion-polls-win-for-mamata-lead-for… पश्चिम बंगाल - सी-व्होटरः तॄणमूल - १६०, डावे पक्ष + कॉंग्रेस - १२७, भाजप - ४, इतर - ३ पश्चिम बंगाल - नेल्सनः तॄणमूल - १७८, डावे पक्ष + कॉंग्रेस - ११०, भाजप - १, इतर - ५ केरळ - सी-व्होटरः डालोआ - ८६, संलोआ - ५३, रालोआ - १, इतर - ० केरळ - सी फोर एशियानेटः - ७७-८२, संलोआ - ५५-६०, रालोआ - ३-५, इतर - ० तामिळनाडू - सी व्होटरः अद्रमुक - १३०, द्रमुक - ७०, इतर - ३४ आसाम - सी व्होटर: काँग्रेस - ५३, रालोआ - ५५, एआययुडीएफ - १२, इतर - ६ आसाम - नेल्सन: काँग्रेस - ३६, रालोआ - ७८, एआययुडीएफ - १०, इतर - २ आसाम - एव्हीसी: काँग्रेस - ४०, रालोआ - ४८-५४, एआययुडीएफ - २५, इतर - १०

In reply to by श्रीगुरुजी

बर्‍याच वाहिन्यांनी मतदानोत्तर सर्वेक्षण करून आपले अंदाज प्रसिद्ध केले आहेत. २०१५ मधील दिल्ली व बिहार विधानसभा निवडणुकीसाठी अनेक वृत्तवाहिन्यांनी मतदानपूर्व व मतदानोत्तर मतदार सर्वेक्षण केले होते. एखादा अपवाद वगळता त्यातील जवळपास सर्व अंदाज मोठ्या फरकाने चुकले होते. बहुसंख्य सर्वेक्षणे ही निष्पक्षपाती नव्हती. या निवडणुकीसाठी मी आतापर्यंत अशा सर्व सर्वेक्षणांकडे दुर्लक्ष केले होते. यातील एकाही सर्वेक्षणावर मी विश्वास ठेवत नाही. परंतु केवळ निवडणुक संबंधातील बातमी म्हणून काही सर्वेक्षणांचे अंदाज इथे देत आहे.

मतदानोत्तर सर्वेक्षणांचे अंदाज -

एबीपी न्यूज आसाम: भाजप+ ८१, काँग्रेस+ ३३ पश्चिम बंगालः तृणमूल १७८, काँग्रेस्+डावे पक्ष ११० आजतक आसामः भाजप+ ७९-९३, काँग्रेस+ २६-३३ केरळः डावी आघाडी ९४, संयुक्त लोकशाही आघाडी ४३ पश्चिम बंगालः तृणमूल २३३, काँग्रेस्+डावे पक्ष ३८ तामिळनाडू: अद्रमुक+ ८९, द्रमुक+ १२४ इंडिया टीव्ही पश्चिम बंगालः तृणमूल १६३-१७१, काँग्रेस्+डावे पक्ष ७५ + ४५ = १२० सी व्होटर पश्चिम बंगालः तृणमूल १६३-१७१, काँग्रेस्+डावे पक्ष ७१-७९ आसामः भाजप+ ५७, काँग्रेस+ ४१ केरळः डावी आघाडी ७४, संयुक्त लोकशाही आघाडी ५४ न्यूज नेशन आसामः भाजप+ ६३, काँग्रेस+ ४७ तामिळनाडू: अद्रमुक+ ९५, द्रमुक+ ११४ चाणक्य आसामः भाजप+ ९०, काँग्रेस+ २७ टाइम्स नाउ पश्चिम बंगालः तृणमूल १६३-१७१, काँग्रेस्+डावे पक्ष १२० केरळः डावी आघाडी ७८, संयुक्त लोकशाही आघाडी ५८

In reply to by श्रीगुरुजी

दिल्ली आणि बिहारमध्ये अ‍ॅक्सिसच्या चाचण्या बर्‍याचशा बरोबर आल्या होत्या. अ‍ॅक्सिसने दिल्लीत आआपला ६० जागा दिल्या होत्या. तितक्या जागा कोणत्याच इतर चाचणीत दिलेल्या नव्हत्या. तसेच बिहारमध्येही महाठगबंधनला १७५ जागा अ‍ॅक्सिसने दिल्या होत्या. प्रत्यक्षात मिळाल्या १७८. चाणक्यने २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बर्‍यापैकी अचूक भाकित केले होते.पण नंतर त्यांची भाकिते तितकी बरोबर आली नाहीत किंवा काही ठिकाणी चुकलीच. उदाहरणार्थ बिहारमध्ये चाणक्यने भाजप आघाडीला बहुमत मिळेल असे भाकित केले होते.

In reply to by गॅरी ट्रुमन

दोन्ही निवडणुकीत एखादा अपवाद वगळता इतर जवळपास सर्व अंदाज चुकले होते. त्यामुळेच या चाचण्यांवरचा विश्वास उडाला आहे.

श्रीगुरुजी, केरळ विधान सभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपाशी काडीमोड करुन स्वतंत्र्यपणे ४५ जागांवर विधानसभा निवडणुक लढवायची तयारी केलेय. २५ उमेदवारांची यादि देखिल त्यांनी आता जाहिर केलीय. तर सेनेला केरळात ह्या निवडणुकीत कितपत यश मिळेल असे तुम्हाला वाटते.

सेनेला महाराष्ट्राबाहेर अस्तित्व नाही. भाजपची मते काटण्यासाठी सेनेला महाराष्ट्राबाहेर उमेदवार उभे करण्यास उद्युक्त केले जाते असा संशय आहे. १९९३ च्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत ४०३ जागांपैकी भाजपला १७७, सप + बसप युतीला १७६ जागा होत्या. सेनेने अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले होते. त्यातील एकही निवडून आला नाही. परंतु सेनेच्या काही उमेदवारांनी भाजपच्या उमेदवारांचे नुकसान केले होते. मतदानाच्या काही दिवस आधी झी टीव्ही वर बाळासाहेब ठाकर्‍यांची एक प्रदीर्घ मुलाखत दाखविली होती. त्यात बाळासाहेबांनी अत्यंत आक्रमक हिंदुत्वाची भूमिका मांडली होती. बाबरी मशीद प्रकरण नुकतेच घडले असल्याने बाळासाहेबांच्या मुलाखतीचा उ.प्र. मध्ये थोडासा परीणाम झाल्याचे काही लेखातून आले होते. नुकत्याच संपलेल्या बिहारमधील निवडणुकीतही सेनेने अनेक जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यात २-३ जागांवर सेनेच्या उमेदवारामुळे रालोआचा उमेदवार पडला होता. केरळमध्ये परिस्थिती वेगळी आहे. मुळात भाजपलाच तिथे फारसे स्थान नाही. त्यामुळे सेना भाजपचे तसे नुकसान करू शकणार नाही. मुळात भाजपचेच जेमतेम १-२ उमेदवार निवडून येतील. तिथे सेनेचा एकही उमेदवार निवडून येणे तर सोडाच, अनामत रक्कमही वाचणार नाही.

मोदिनी सौदी अरेबियाचा दौर्याची अचूक वेळ निवडली आहे , मागे यु ए इ मध्ये बहुसंख्य सर्वधर्मीय केरळी बांधवाच्या लेबर केम्प ला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान त्यांनतर त्यांनी केलेले भव्य भाषण आणि राजासोबत केलेले अनेक ऐतिहासिक करार ह्यामुळे मोदी एक कणखर भारतीय पंतप्रधान ही त्याची छबी अनिवासी केरळी बांधवांच्या मनात रुजू झाली जिचे प्रतिबिंब हे केरळ मधील महानगराल पालिकेत शहरी भागात प्रथमच भाजपच्या मोठ्या प्रमाणात सीट्स जिंकून आल्या ,ह्यावेळी आखतात सर्वात जास्त केरळी बांधवाचा समूह सौदी येथे आहे पाकिस्तानी शरीफ ला मिळतो त्याहून सहस्त्र पटीने जस्त मान ह्यावेळी मोदींना येथील राजाने दिला , भारतीय पंतप्रधान तुमच्या खिश्यात आहे असे तेथील अनिवासी भारतीयांना सांगून मोदिनी त्यांची मने जिंकली २४ तास चालू राहणारी हेल्प लाईन त्यांच्यासाठी मोदिनी उलपब्ध करून दिली ह्यामुळे शहरी भागात भाजपचे २ ते ३ उमेदवार नक्कीच जिंकून येऊ शकतात श्रीशांत चे चान्सेस जिंक्यांचे जास्त आहे कारण केरळी बांधव त्याला मानतात , त्याला आय पी ल च्य अवेळी आत टाकल्यावर माझा एक केरळी मित्र श्रीशांत कसा निर्दोष असून उत्तर भारतीय क्रिकेटर लॉबीने त्याला कसा आणि का अडकवला असे जीवतोडून सांगत होता तेव्हा , अझर सारखा श्री सुद्धा विधानसभेत येणार हे नक्की भाजपच्या मतांचा टक्का वाढणार हे नक्की पण त्याचा कोणाला तोटा कोणाला फायदा होणार ते पहायचे केरळमध्ये थरूर व मोदींचे म्हटले तर जिव्हाळ्याचे म्हटले तर राजकीय विरोधकाचे नाते आहे तेव्हा केरळ मध्ये भाजप व कोंग चा काही गुप्त समझोता झाला तर डावे सत्तेपासून लांब राहू शकतात भाजपने बंगाल मध्ये दीदींना छुपा पाठिंबा देऊन आपल्या जागा मतदाराचा टक्का वाढवावा व डाव्यांचे कोन्ग्रेज चे घर उन्हात बांधावे.

In reply to by निनाद मुक्काम …

श्रीशांत चे चान्सेस जिंक्यांचे जास्त आहे कारण केरळी बांधव त्याला मानतात , त्याला आय पी ल च्य अवेळी आत टाकल्यावर माझा एक केरळी मित्र श्रीशांत कसा निर्दोष असून उत्तर भारतीय क्रिकेटर लॉबीने त्याला कसा आणि का अडकवला असे जीवतोडून सांगत होता विषेष उल्लेखनिय आहे संपूर्ण प्रतिसादात. भाजपमधे असले की सर्व निर्दोष होऊन जातात. जसे येडियुरप्पा. ;-)

In reply to by तर्राट जोकर

खरं तर येडप्पांचा या धाग्याशी अजिबात संबंध नाही. परंतु उल्लेख आल्यामुळे फक्त एका प्रतिसादापुरते उत्तर देत आहे. याविषयी सविस्तर प्रतिसाद हवे असल्यास येडप्पाविषयी दुसरा धागा काढावा. तेथे अगदी सविस्तर उत्तर देईन. इथेच प्रतिसादाला प्रतिसाद देत बसलो तर धाग्याचा मूळ विषय भरकटून जाईल. म्हणून हा एकच प्रतिसाद देत आहे. येडप्पांवर आजवर जे जे खटले दाखल झाले त्यातून एकतर ते न्यायालयात निर्दोष सुटले आहेत किंवा न्यायालयाने त्यांच्यावरील सर्व खटले रद्द केले आहेत. इच्छुकांनी खालील पाने वाचावीत व निदान न्यायालयावर तरी विश्वास ठेवावा. HC quashes all FIRs against Yeddyurappa in land denotification cases Karnataka High Court quashes land case against B S Yeddyurappa Shivakumar, BS Yeddyurappa Get Clean Chit in Land Case by karnataka HC Court quashes corruption case against Yeddyurappa Court quashes bribery case against Yeddyurappa (Lead)

In reply to by श्रीगुरुजी

येडीचं सोडा, श्रीशांतचं काय? आणि बरेच आहेत हो लिस्टमधे. भास्कर शर्मा आणि कुशल दुवोरीबद्दल काय मत आहे? ते तर चक्क अतिरेकी आहेत - माजी असले तरी.

काल मतदानाच्या फेरीत आसाममधील ६५ मतदारसंघात व बंगालमधील १८ मतदारसंघात मतदान झाले. आसाममध्ये ७८% व बंगालमध्ये ८१% इतके प्रचंड मतदान झाले. मतदानाची टक्केवारी खूप जास्त असल्याने वाढीव मते नक्की कोणाच्या पारड्यात पडली असतील ही उत्सुकता आहे.

In reply to by श्रीगुरुजी

आसाममध्ये ७८% व बंगालमध्ये ८१% इतके प्रचंड मतदान झाले.
बंगालमध्ये इन जनरल इतर राज्यांपेक्षा जास्त मतदान होते. उदाहरणार्थः १९८२: ७६.९६% १९८७: ७५.६६% १९९१: ७६.८०% १९९६: ८२.९४% २००१: ७५.२९% २००६: ८१.९७% २०११: ८४.३३% आसामातले आकडे तपासून बघायला हवेत.

मतदानाच्या दुसर्‍या फेरीतही जोरदार मतदान झालेलं दिसतंय. आसाममध्ये जवळपास ८३% आणि बंगालमध्ये जवळपास ८०% मतदान झालेले आहे. आसाममधील सर्व १२६ मतदारसंघातील मतदान संपलेलं आहे.

In reply to by श्रीगुरुजी

आसाममध्ये जवळपास ८३% आणि बंगालमध्ये जवळपास ८०% मतदान झालेले आहे. आसाममधील सर्व १२६ मतदारसंघातील मतदान संपलेलं आहे.
आसामात गेल्या काही निवडणुकांमध्ये झालेल्या मतदानाची टक्केवारी खालीलप्रमाणे: २०११: ७५.९२% २००६: ७५.७७% २००१: ७५.०५% १९९६:७८.९२% १९९१: ७४.६७% याचा अर्थ आसामात आजपर्यंत (१९९६ चा अपवाद वगळता) ७५-७६% मतदान झाले आहे. यावेळी पहिल्या फेरीत ७८% आणि दुसऱ्या फेरीत ८३% म्हणजे पूर्ण राज्यात ८०% च्या आसपास मतदान झालेले दिसते. तरूण गोगाई १५ वर्षे सत्तेत आहेत आणि चौथ्या निवडणुकीला सामोरे जात आहेत.आजपर्यंत सलग चौथी निवडणुक एकाच नेत्याच्या नेतृत्वाखाली जिंकणाऱ्या नेत्यांमध्ये पश्चिम बंगालमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्योती बसू आणि सिक्कीममध्ये सिक्कीम डेमॉक्रॅटिक फ्रंटचे पवनकुमार चामलिंग सोडून तिसरे नाव पटकन डोळ्यासमोर येत नाही. त्यामुळे मुळातच ’गोगाई फटिग’ मुळे अन्य कोणाला संधी देऊन बघू या भावनेतून तरूण गोगाईंना ही निवडणुक त्या मानाने जड जायची शक्यता आहेच. कॉंग्रेसपुढे असलेली इतर आव्हाने पुढीलप्रमाणे: १. असे म्हटले जात आहे की यावेळची निवडणुक बरीच Polarized होती. बद्रुद्दिन अजमल यांच्या AIUDF पक्षामुळे कॉंग्रेसची हक्काची मते गेली आहेत. २. तरूण गोगाईंचे उजवे हात हिमन्त बिस्वा सर्मा त्यांची साथ सोडून भाजपमध्ये गेले आहेत. NDTV वरील एका कार्यक्रमात बोलताना शेखर गुप्ता म्हणाले की हे सर्मा म्हणजे भाजपमधील प्रमोद महाजन आणि नितीन गडकरी यांचे कॉम्बिनेशन होते (संघटना बांधणी आणि strategy चा विचार करता). त्यांच्याबरोबर ९ आमदारही भाजपमध्ये गेले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर असा ज्येष्ठ नेता गमावावा लागणे म्हणजे १९७७ मध्ये निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर जगजीवन राम इंदिरा गांधींची साथ सोडून पक्षातून बाहेर पडल्यानंतर कॉंग्रेसला राष्ट्रीय पातळीवर जसा धक्का लागला तसाच धक्का आसामात राज्यपातळीवर लागला आहे. तरीही कॉंग्रेस पक्षापुढे असलेल्या संधी पुढीलप्रमाणे: १. या मतदारांवर भाजपला सक्षम पर्याय आपण आहोत आणि AIUDF नाही हे चित्र उभे करण्यात कॉंग्रेसला जितके यश येईल तितक्या प्रमाणावर ही हक्काची मते कॉंग्रेसकडे परत येतील आणि पक्षाला त्याचा फायदा होईल. पण २०११ च्या विधानसभा निवडणुकांपेक्षा २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये या पक्षाने आपली मतांची टक्केवारी वाढवली आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये सामान्यपणे स्थानिक पक्षांपेक्षा राष्ट्रीय पक्षांचा वरचष्मा असतो हे मी पूर्वी म्हटलेच आहे. तरीही या पक्षाने आपली ताकद लोकसभा निवडणुकांमध्येही वाढवली. तेव्हा यावेळी विधानसभा निवडणुकांमध्ये या पक्षाचे बळ कमी करणे कॉंग्रेसला तितके सोपे जाणार नाही. २. भाजपने बोडो पीपल्स फ्रंट या पक्षाबरोबर युती केली आहे. बोडो जमातीचे मतदार राज्यात बऱ्याच प्रमाणावर असले तरी बोडो आणि इतर जमातींमध्ये बऱ्याच प्रमाणावर वितुष्ट आहे. बोडो आंदोलनाच्या दरम्यान बोडो विरूध्द इतर जमातीच्या लोकांमध्ये हिंसाचारही झाला होता. त्यामुळे बोडोंबरोबर भाजपने युती केली असेल तर इतर जमातीच्या मतदारांना आपल्याकडे आकृष्ट करणे कॉंग्रेसला अधिक सोपे जायला हवे. ३. आसामात चहाच्या मळ्यांमध्ये काम करायला उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड इत्यादी राज्यांमधून मोठ्या प्रमाणावर मजूर गेले आहेत. या मतदारांनी २०१४ मध्ये नरेंद्र मोदी लाटेत भाजपला भरभरून मते दिली होती.आता राष्ट्रीय पातळीवर मोदी लाट वगैरे नाही (निदान २०१४ च्या तुलनेत नक्कीच कमी आहे). त्यामुळे या मतदारांना काही प्रमाणावर कॉंग्रेसने आपल्याकडे आकर्षित केल्यास नक्कीच पक्षाचा फायदा होईल. प्रत्यक्षात काय होते हे १९ मे रोजीच कळेल.

In reply to by गॅरी ट्रुमन

आसामात घुसखोरांच्या सतत वाढणारी संख्या आणि मतदानाचा वाढीव टक्का याचा काहि संबंध असावा काय ? पाहुणे मंडळी राजकारणात बरेच सक्रीय झाले असावे का?

In reply to by अर्धवटराव

हे खरे आहे. माझ्या माहितीप्रमाणे हि निवडणुक भारतीय आसामिज लोक व बांगलादेशातून स्थायिक झालेले लोक यात आहे. माझे मत माझ्या टीममेट बरोबर संभाषणातून झाले आहे.