Skip to main content

शेतकरी

पाण्याची धुळवड आणि काही आकडे

लेखक साहना यांनी मंगळवार, 22/03/2016 01:31 या दिवशी प्रकाशित केले.
भारतांतच नाही तर जगांत सगळीकडे प्राणीप्रेमी, निसर्गप्रेमी इत्यादी चे कातडे पांघरून राजकारण करणे सर्रास चालते. अश्या संघटनांना किंवा लोकांना मदत करताना आपली विवेकबुद्धी वापरूनच मदत करावी. दर वर्षी होळीच्या उत्सव जवळ आला कि "पाणी वाचवा होळी खेळू नका" असे आवाहन केले जाते. आणखी कुठे दुष्काळ आहे, कुठे शेतकरी संकटात आहे असे भासवून मुंबई पुण्यात होळी खेळू नये असे सर्व राजकारणी NGO वगैरे लोक सांगत फिरतात. होळीमध्ये नक्की किती पाण्याची नासाडी होते ह्याचे आकडे कधी कुणे पुढे ठेवल्याचे आठवत नाही.