भाषा सल्लागार मंडळाची परिभाषेच्या निर्मितीसाठी निदेशक तत्त्वे तशी सुस्पष्ट आहेत. संकेतानुसार इंग्रजी नावांचे केवळ देवनागरीकरण करणे अभिप्रेत आणि पुरेसे असावे. तरी सुद्धा सोपे, (खासकरुन नवीन पिढीस रुचतील असे) आकलन आणि वापरसुलभ मराठी पर्याय उपलब्ध करण्याचा प्रयत्न करावा असे व्यक्तीशः मला वाटत असतानाच क्लिष्ट बोजड आणि संस्कृतप्रचुरता लादण्याचा त्यात उद्देश असू नये असे ही वाटते.
आकलन आणि वापरसुलभ नसलेल्या शब्दांचा मारा नविन पिढीवर कुणी शुद्धतावादी करु लागतात तेव्हा कपाळावर आठी पडतेच.
असेच काहीसे मराठी विकिपीडियावरील रसायनशास्त्र विषयक शब्दांविषयी होताना दिसते आहे. मराठी विकिपीडियावरील देवनागरी आकलन सुलभ असल्यामुळे हिंदीभाषी सुद्धा येऊन अचानक संस्कृतनिष्ठ पण आकलन सुलभ नसलेले शब्द वापरुन प्रचलित शब्द परस्पर बदलताना दिसतात.
रासायनिक मूलद्रव्यांचे संस्कृतकरण लाहोर मधिल संस्कृत अध्यापक रघुवीर यांनी विसाव्या शतकात केले. ते मराठी विकिपीडियावर थोपले जाताना दिसते आहे. यातील बर्याच शब्दांचे वाचन मला कम्फर्टेबल वाटत नाही एसएससी बोर्डाच्या मराठी रसायन शास्त्राच्या पुस्तकातून कोणते शब्द वापरात आहेत आणि खालील पैकी रसायनांना रघुविरांनी सुचवलेल्या शब्दा पेक्षा काही अधिक सुबोध शब्द सुचवणे शक्य आहे का ते पहावे आणि त्या निमीत्ताने विवीध मुलद्रव्यांच्या गुणधर्मांची चर्चा झाल्यास हवी आहे जेणे करून मराठी विकिपीडियावरील लेखांना अद्ययावत करणे सोपे जाईल.
अणुवस्तुमान / अणुअंक संकेतचिन्ह इंग्रजी मूलतत्त्व संस्कृत-हिंदी मूलतत्त्व समाईक
ऑक्सिडीभवन स्थिति
१ उ [H] hydrogen उदजन ±1
२ या [He] helium यानाति 0
३ ल [Li] lithium लघ्वातु +1
४ वि [Be] beryllium विडूर +2
५ टा [B] boron टांकण +3
६ प्रां [C] carbon प्रांगार ±4
७ भू [N] nitrogen भूयाति −3
८ जा [O] oxygen जारक −2
९ त [F] fluorine तरस्विनी −1
१० शि [Ne] neon शिथिराति 0
११ क्षा [Na] sodium क्षारातु +1
१२ भ्रा [Mg] magnesium भ्राजातु +2
१३ स्फ [Al] aluminum स्फटयातु +3
१४ सै [Si] silicon सैकता ±4
१५ भा [P] phosphorus भास्वर −3
१६ शु [S] sulfur शुल्वारि −2
१७ नी [Cl] chlorine नीरजी −1
१८ मं [Ar] argon मंदाति 0
१९ द [K] potassium दहातु +1
२० चू [Ca] calcium चूर्णातु +2
२१ स्तो [Sc] scandium स्तोकातु +3
२२ रं [Ti] titanium रंजातु +4,3,2
२३ रो [V] vanadium रोचातु +5,2,3,4
२४ व [Cr] chromium वर्णातु +3,2,6
२५ लो [Mn] manganese लोहक +2,3,4,6,7
२६ अ [Fe] iron अयस् +3,2
२७ के [Co] cobalt केत्वातु +2,3
२८ रू [Ni] nickel रूपक +2,3
२९ ता [Cu] copper ताम्र +2,1
३० कु [Zn] zinc कुप्यातु +2
३१ द्र [Ga] gallium द्रवातु +3
३२ सि [Ge] germanium सिकातु +4,2
३३ ने [As] arsenic नेपाली ±3,+5
३४ मे [Se] selenium मेचाग्नि +4,−2,+6
३५ दु [Br] bromine दुराघ्री ±1,+5
३६ ली [Kr] krypton लीनाति 0
३७ दी [Rb] rubidium दीपातु +1
३८ शो [Sr] strontium शोणातु +2
३९ भृ [Y] yttrium भृशला +3
४० गो [Zr] zirconium गोमेदातु +4
४१ का [Nb] niobium काशातु +5,3
४२ सं [Mo] molybdenum संवर्णातु +6,3,5
४३ चे [Tc] technetium चेष्टातु +7,4,6
४४ नक [Ru] ruthenium नक्षरातु +4,3,6,8
४५ ना [Rh] rhodium नाम्लातु +3,4,6
४६ नि [Pd] palladium निचूषातु +2,4
४७ रज [Ag] silver रजत +1
४८ मृ [Cd] cadmium मृज्यातु +2
४९ नै [In] indium नैलातु +3
५० त्र [Sn] tin त्रपु +4,2
५१ अं [Sb] antimony अंजन +3,5
५२ वं [Te] tellurium वंगक +4,6,−2
५३ जं [I] iodine जंबुकी −1,+5,7
५४ को [Xe] xenon कोटयाति 0
५५ द्यु [Cs] cesium द्युतातु +1
५६ ह [Ba] barium हर्यातु +2
५७ सु [La] lanthanum सुजारला +3
५८ पु [Ce] cerium पुष्कला +3,4
५९ श्या [Pr] praseodymium श्यामला +3,4
६० आ [Nd] neodymium आपीतला +3
६१ पि [Pm] promethium पिविरला +3
६२ धू [Sm] samarium धूसरला +3,2
६३ किं [Eu] europium किंविरला +3,2
६४ यो [Gd] gadolinium योनिला +3
६५ इ [Tb] terbium इद्भृशला +3,4
६६ चु [Dy] dysprosium चुम्बला +3
६७ पां [Ho] holmium पांडुला +3
६८ र [Er] erbium रक्तला +3
६९ व्या [Tm] thulium व्याहरिला +3,2
७० श्वे [Yb] ytterbium श्वेतला +3,2
७१ निर्व [Lu] lutetium निर्वर्णला +3
७२ गा [Hf] hafnium गावातु +4
७३ स [Ta] tantalum सहातु +5
७४ च [W] tungsten चण्डातु +6,4
७५ बा [Re] rhenium बाष्पातु +7,4,6
७६ गु [Os] osmium गुर्वातु +4,6,8
७७ घ [Ir] iridium घनातु +4,3,6
७८ म [Pt] platinum महातु +4,2
७९ स्व [Au] gold स्वर्ण +3,1
८० पा [Hg] mercury पारद +2,1
८१ सितु [Tl] thallium सिक्ष्यातु +1,3
८२ सी [Pb] lead सीस +2,4
८३ भि [Bi] bismuth भिदातु +3,5
८४ तो [Po] polonium तोयातु +4,2
८५ ला [At] astatine लावणी
८६ तै [Rn] radon तैजसाति 0
८७ क्षु [Fr] francium क्षुद्रातु +1
८८ ते [Ra] radium तेजातु +2
८९ ए [Ac] actinium एजातु +3
९० ह्र [Th] thorium ह्रसातु +4
९१ प्रै [Pa] protactinium प्रैजातु +5,4
९२ कि [U] uranium किरणातु +6,3,4,5
उपरोक्त यादी रघुविर यांची संस्कृत पर्यायांची बहुधा हिंदी भाषेसाठी वापरली जात असावी. हि मोठी यादी वाचत खाली येई पर्यंत काहीतरी वाचकांचा गैरसमज होत असावा म्हणून धागा लेखाची भूमिका पुन्हा एकदा च्योप्यपेस्त करत आहे.
भाषा सल्लागार मंडळाची परिभाषेच्या निर्मितीसाठी निदेशक तत्त्वे तशी सुस्पष्ट आहेत. संकेतानुसार इंग्रजी नावांचे केवळ देवनागरीकरण करणे अभिप्रेत आणि पुरेसे असावे. तरी सुद्धा सोपे, (खासकरुन नवीन पिढीस रुचतील असे) आकलन आणि वापरसुलभ मराठी पर्याय उपलब्ध करण्याचा प्रयत्न करावा असे व्यक्तीशः मला वाटत असतानाच क्लिष्ट बोजड आणि संस्कृतप्रचुरता लादण्याचा त्यात उद्देश असू नये असे ही वाटते.
आकलन आणि वापरसुलभ नसलेल्या शब्दांचा मारा नविन पिढीवर कुणी शुद्धतावादी करु लागतात तेव्हा कपाळावर आठी पडतेच.
असेच काहीसे मराठी विकिपीडियावरील रसायनशास्त्र विषयक शब्दांविषयी होताना दिसते आहे. मराठी विकिपीडियावरील देवनागरी आकलन सुलभ असल्यामुळे हिंदीभाषी सुद्धा येऊन अचानक संस्कृतनिष्ठ पण आकलन सुलभ नसलेले शब्द वापरुन प्रचलित शब्द परस्पर बदलताना दिसतात.
रासायनिक मूलद्रव्यांचे संस्कृतकरण लाहोर मधिल संस्कृत अध्यापक रघुवीर यांनी विसाव्या शतकात केले. ते मराठी विकिपीडियावर थोपले जाताना दिसते आहे. यातील बर्याच शब्दांचे वाचन मला कम्फर्टेबल वाटत नाही एसएससी बोर्डाच्या मराठी रसायन शास्त्राच्या पुस्तकातून कोणते शब्द वापरात आहेत आणि खालील पैकी रसायनांना रघुविरांनी सुचवलेल्या शब्दा पेक्षा काही अधिक सुबोध शब्द सुचवणे शक्य आहे का ते पहावे आणि त्या निमीत्ताने विवीध मुलद्रव्यांच्या गुणधर्मांची चर्चा झाल्यास हवी आहे जेणे करून मराठी विकिपीडियावरील लेखांना अद्ययावत करणे सोपे जाईल.
मराठी विकिपीडियासाठी वापरले जाण्याची शक्यता असल्यामुळे आपले प्रतिसाद प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जातील. अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे टाळण्यासाठी आणि चर्चा सहभागासाठी आभार.
वर्गीकरण
वाचन संख्या
13805
प्रतिक्रिया
58
मिसळपाव
प्रतिक्रिया
आज जेवणात नीरजी क्षारातु अंमळ
क्षारातु नीरजी हो चिमणराव!
In reply to आज जेवणात नीरजी क्षारातु अंमळ by कॅप्टन जॅक स्पॅरो
"नीरजी क्षारातु" नाय हो...
In reply to आज जेवणात नीरजी क्षारातु अंमळ by कॅप्टन जॅक स्पॅरो
काय गरज आहे इंग्रजी नावे
विषेशनामांचे भाषांतर ही
In reply to काय गरज आहे इंग्रजी नावे by टवाळ कार्टा
अरे, अरे अरे, एखाद्या
यादी मस्त आहे, मराठी
भाषा ही संवादाकरता असते
In reply to यादी मस्त आहे, मराठी by विद्यार्थी
अहो मिपावर विषय मराठीचाच
In reply to भाषा ही संवादाकरता असते by वेल्लाभट
ऑक्सिजनला प्राणवायू हा उत्तम
In reply to अहो मिपावर विषय मराठीचाच by विद्यार्थी
ओह् दीज मराठी पीपल्स....
अगदी अगदी. माझं अनुप्रस्थ
In reply to ओह् दीज मराठी पीपल्स.... by आदूबाळ
काय नाय. ही ब्याण्णव कौरवांची
In reply to अगदी अगदी. माझं अनुप्रस्थ by गवि
सहीच!!!
In reply to काय नाय. ही ब्याण्णव कौरवांची by अभ्या..
हरीभाई देवकरण, गावाची मोल....
In reply to सहीच!!! by राघवेंद्र
हरीभाई देवकरणला शिकलेले दोघे
In reply to हरीभाई देवकरण, गावाची मोल.... by अभ्या..
:)
In reply to हरीभाई देवकरण, गावाची मोल.... by अभ्या..
रशिअन/ जर्मनी डॅाइश लोकांनीही
खुळचटपणा आहे हा. हे असलं काही
हे मराठी एसएससी पर्यंतच्या
In reply to खुळचटपणा आहे हा. हे असलं काही by सतिश गावडे
मी मराठी माध्यमातून शिकलो आहे
In reply to हे मराठी एसएससी पर्यंतच्या by माहितगार
खरय.
In reply to मी मराठी माध्यमातून शिकलो आहे by सतिश गावडे
चायनीज लोक करतात त्यांच्या नावाचे इंग्रजी भाषांतर करतात त्यामुळे
In reply to खरय. by मराठी कथालेखक
ते भाषांतर नसतं. कोणतंही रँडम
In reply to चायनीज लोक करतात त्यांच्या नावाचे इंग्रजी भाषांतर करतात त्यामुळे by राघवेंद्र
काहीच्या काही!
अगागा !!!
तुम्ही पुणेकर का हो? :)
In reply to अगागा !!! by जव्हेरगंज
अहो भूच्छत्री प्रेमाने
In reply to अगागा !!! by जव्हेरगंज
Astatine ला चक्क लावणी असा
माहितगार साहेब,
मी धागा लेखातील भूमिका
In reply to माहितगार साहेब, by डॉ सुहास म्हात्रे
उत्तम उपक्रम आहे
मदनबाण यांनी शेअर केलेल्या
In reply to उत्तम उपक्रम आहे by हुप्प्या
प्रश्न न्यूनगंडाचा नाहीच आहे पण.
In reply to मदनबाण यांनी शेअर केलेल्या by माहितगार
अगदी हेच पुढचं सगळं
In reply to प्रश्न न्यूनगंडाचा नाहीच आहे पण. by बोका-ए-आझम
अगदी शब्दशः भाषांतर नसावे
In reply to अगदी हेच पुढचं सगळं by गवि
अभ्या, अरे हे सर्व उत्तम
In reply to अगदी शब्दशः भाषांतर नसावे by अभ्या..
१०० टक्के पटले गविराज.
In reply to अभ्या, अरे हे सर्व उत्तम by गवि
एकदम चपखल !
In reply to अभ्या, अरे हे सर्व उत्तम by गवि
गवी आणि म्हात्रेसर, दोघांचे
In reply to एकदम चपखल ! by डॉ सुहास म्हात्रे
याबाबतीत, शास्त्रिय व
In reply to गवी आणि म्हात्रेसर, दोघांचे by तर्राट जोकर
धन्यवाद.
In reply to याबाबतीत, शास्त्रिय व by डॉ सुहास म्हात्रे
बायको भाषाकोविद असली तर उदजन
In reply to धन्यवाद. by तर्राट जोकर
हा हा हा. पुढे हेच लिहायला
In reply to बायको भाषाकोविद असली तर उदजन by अभ्या..
नाहीतर समुद्र पार न करु
In reply to अभ्या, अरे हे सर्व उत्तम by गवि
नाहीतर समुद्र पार न करु शकणारी पण काठापासून शंभर मीटर गेल्यावर खोल पाण्यात फेकून देणारी आणि आता पोहा तुमचेतुम्ही असं म्हणणारी नाव काय कामाची?हे खास आवडले !+१०००००
In reply to अगदी हेच पुढचं सगळं by गवि
जरासे अवांतर... हा धागा पाहुन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Yalla... نانسي عجرم - فيديو كليب يلا :- Nancy Ajramमदनबाण आपण रोचक माहिती दूवा
In reply to जरासे अवांतर... हा धागा पाहुन by मदनबाण
अगाध
गंधक व स्फुरद
मी शाळेत असताना एक शाळेत एक व्याख्यान झाले होते.
In reply to गंधक व स्फुरद by तुषार काळभोर
:)
In reply to मी शाळेत असताना एक शाळेत एक व्याख्यान झाले होते. by तुषार काळभोर
पंताचे वर्णन नित्यवापरासाठी
In reply to मी शाळेत असताना एक शाळेत एक व्याख्यान झाले होते. by तुषार काळभोर
गुणवर्णन
In reply to पंताचे वर्णन नित्यवापरासाठी by माहितगार
करू नये
आईच्या गावात!!
In reply to करू नये by मिहिर
रोचक चर्चा चालली आहे... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Habibi Ya Eini... :- Nourhanneबोजड नावे कशाकरता?